S M L

गोपीनाथ मुंडेंचा काँग्रेस प्रवेश होता होता राहिला - कदम

29 जानेवारीभाजप नेते खासदार गोपीनाथ मुंडे पक्ष श्रेष्ठींवर नाराज होते. त्यावेळी मुंडे काँग्रेसमध्ये जाणार असंही म्हंटलं जात होतं. याला वनमंत्री पतंगराव कदम यांनी दुजोरा दिलाय. गोपीनाथ मुंडेना काँग्रेसमध्ये आणण्याची तयारी पूर्ण झाली होती. मात्र आमच्याच पक्षातील काही लोकांना मुंडे आल्यानंतर आपलं काय याची चिंता वाटली आणि मुंडेंचा काँग्रेस प्रवेश बारगळला असा गौप्यस्फोट कदमांनी केला आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील भगवानगड इथल्या कार्यक्रमात पतंगराव कदम बोलत होते. गोपीनाथ मुंडे यांचं नाराजीनाट्य बीड ते दिल्ली चांगलंच गाजलं होतं. खुद्द मुंडे यांनी आयबीएन लोकमतकडे आपल्याकडे सर्व पर्याय खुले आहे असे स्पष्ट संकेत दिले होते. मात्र दिल्लीत सुषमा स्वराज यांच्याशी चर्चा केल्यानंतर मुंडेंनी आपला निर्णय रद्द करून आपण भाजपमध्येच राहणार असं स्पष्ट केलं होतं. गडकरी विरूद्ध मुंडे असा सामनाच रंगला होता. अलीकडे नितीन गडकरी अध्यक्षपदावरून पायउतार झाले होते. त्यांनंतर मुंडेंनी आयबीएन लोकमतला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत गडकरींसोबत मतभेद होते पण मनभेद नव्हते असा खुलासा केला होता.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 29, 2013 09:52 AM IST

गोपीनाथ मुंडेंचा काँग्रेस प्रवेश होता होता राहिला - कदम

29 जानेवारी

भाजप नेते खासदार गोपीनाथ मुंडे पक्ष श्रेष्ठींवर नाराज होते. त्यावेळी मुंडे काँग्रेसमध्ये जाणार असंही म्हंटलं जात होतं. याला वनमंत्री पतंगराव कदम यांनी दुजोरा दिलाय. गोपीनाथ मुंडेना काँग्रेसमध्ये आणण्याची तयारी पूर्ण झाली होती. मात्र आमच्याच पक्षातील काही लोकांना मुंडे आल्यानंतर आपलं काय याची चिंता वाटली आणि मुंडेंचा काँग्रेस प्रवेश बारगळला असा गौप्यस्फोट कदमांनी केला आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील भगवानगड इथल्या कार्यक्रमात पतंगराव कदम बोलत होते. गोपीनाथ मुंडे यांचं नाराजीनाट्य बीड ते दिल्ली चांगलंच गाजलं होतं. खुद्द मुंडे यांनी आयबीएन लोकमतकडे आपल्याकडे सर्व पर्याय खुले आहे असे स्पष्ट संकेत दिले होते. मात्र दिल्लीत सुषमा स्वराज यांच्याशी चर्चा केल्यानंतर मुंडेंनी आपला निर्णय रद्द करून आपण भाजपमध्येच राहणार असं स्पष्ट केलं होतं. गडकरी विरूद्ध मुंडे असा सामनाच रंगला होता. अलीकडे नितीन गडकरी अध्यक्षपदावरून पायउतार झाले होते. त्यांनंतर मुंडेंनी आयबीएन लोकमतला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत गडकरींसोबत मतभेद होते पण मनभेद नव्हते असा खुलासा केला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 29, 2013 09:52 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close