S M L

नाशिकमध्ये पालिकेच्या शाळेत भक्तांची बापू'गिरी'

07 फेब्रुवारीनाशिक महापालिकेच्या शाळांमध्ये सध्या सर्रासपणे आसाराम बापूंच्या विचारांचा प्रचार सुरू आहे. येत्या 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डेऐवजी मातापित्यांची पूजा करण्याचं आवाहन आसाराम बापूंनी केलं आहे. त्याचा प्रचार करण्यासाठी बापूंचे साधक महापालिकेच्या शाळांमध्ये जाऊन हे कार्यक्रम करत आहे. आणि बापूंच्या विचारांचा प्रचार करत आहे. विशेष म्हणजे यासाठी कोणाची परवानगीही घेण्यात आलेली नाही. उलट महापालिकेचे मुख्याध्यापक आणि शिक्षक शिकवणं थांबवून या प्रचारासाठी वेळ देत आहे. शाळेत वह्यापुस्तकांसोबत पूजेचं साहित्य घेऊन जाताना विद्यार्थी दिसत आहे. आधीच महापालिकेच्या शाळांमधल्या शिक्षणाचा दर्जा खालावलेला असताना दुसरीकडे चालणार्‍या या धार्मिक प्रचाराबद्दल पालकांनी मात्र आक्षेप घेतला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 7, 2013 01:40 PM IST

नाशिकमध्ये पालिकेच्या शाळेत भक्तांची बापू'गिरी'

07 फेब्रुवारी

नाशिक महापालिकेच्या शाळांमध्ये सध्या सर्रासपणे आसाराम बापूंच्या विचारांचा प्रचार सुरू आहे. येत्या 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डेऐवजी मातापित्यांची पूजा करण्याचं आवाहन आसाराम बापूंनी केलं आहे. त्याचा प्रचार करण्यासाठी बापूंचे साधक महापालिकेच्या शाळांमध्ये जाऊन हे कार्यक्रम करत आहे. आणि बापूंच्या विचारांचा प्रचार करत आहे. विशेष म्हणजे यासाठी कोणाची परवानगीही घेण्यात आलेली नाही. उलट महापालिकेचे मुख्याध्यापक आणि शिक्षक शिकवणं थांबवून या प्रचारासाठी वेळ देत आहे. शाळेत वह्यापुस्तकांसोबत पूजेचं साहित्य घेऊन जाताना विद्यार्थी दिसत आहे. आधीच महापालिकेच्या शाळांमधल्या शिक्षणाचा दर्जा खालावलेला असताना दुसरीकडे चालणार्‍या या धार्मिक प्रचाराबद्दल पालकांनी मात्र आक्षेप घेतला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 7, 2013 01:40 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close