S M L

अमेरिकेतील व्हार्टन स्कूलने मोदींचं भाषण केलं रद्द

04 मार्चअमेरिकेतल्या प्रतिष्ठीत व्हार्टन स्कूलने गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींचं भाषण रद्द केलं. याचे पडसाद आता उमटू लागले आहे. स्कूलच्या या निर्णयाविरोधात शिवसेनेचे नेते सुरेश प्रभू यांनीही व्हॉर्टनमधील आपलं भाषण रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रभू हे व्हार्टन इथल्या इंडिया इकॉनिमिक फोरमचे सदस्य आहेत. मोदींचं भाषण रद्द करण्याचा निर्णय हा देशाचा अपमान असल्याचं प्रभू यांनी म्हटलं आहे. विद्यापीठातले विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी मोदी यांना आमंत्रित करण्यास विरोध केला होता. यावरून वाद वाढायला लागल्यानंतर मोदींचं भाषण रद्द करण्याचा निर्णय आयोजन समितीनं घेतला. मोदींना अमेरिकेचा व्हिसा मिळालेला नसल्याने ते सॅटेलाईटद्वारा भाषण करणार होते. आता मोदी यांच्याऐवजी दुसर्‍या भारतीय नेत्याला आमंत्रित केलं जाईल असे आयोजकांनी सांगितले आहे. प्रभू यांच्या पाठोपाठ गौतम अदानी यांनीही या कार्यक्रमात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 4, 2013 09:30 AM IST

अमेरिकेतील व्हार्टन स्कूलने मोदींचं भाषण केलं रद्द

04 मार्च

अमेरिकेतल्या प्रतिष्ठीत व्हार्टन स्कूलने गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींचं भाषण रद्द केलं. याचे पडसाद आता उमटू लागले आहे. स्कूलच्या या निर्णयाविरोधात शिवसेनेचे नेते सुरेश प्रभू यांनीही व्हॉर्टनमधील आपलं भाषण रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रभू हे व्हार्टन इथल्या इंडिया इकॉनिमिक फोरमचे सदस्य आहेत. मोदींचं भाषण रद्द करण्याचा निर्णय हा देशाचा अपमान असल्याचं प्रभू यांनी म्हटलं आहे. विद्यापीठातले विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी मोदी यांना आमंत्रित करण्यास विरोध केला होता. यावरून वाद वाढायला लागल्यानंतर मोदींचं भाषण रद्द करण्याचा निर्णय आयोजन समितीनं घेतला. मोदींना अमेरिकेचा व्हिसा मिळालेला नसल्याने ते सॅटेलाईटद्वारा भाषण करणार होते. आता मोदी यांच्याऐवजी दुसर्‍या भारतीय नेत्याला आमंत्रित केलं जाईल असे आयोजकांनी सांगितले आहे. प्रभू यांच्या पाठोपाठ गौतम अदानी यांनीही या कार्यक्रमात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 4, 2013 09:30 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close