S M L

पुण्यात 11 ते 13 डिसेंबरपासून सवाई गंधर्व महोत्सव सुरू

6 डिसेंबर, पुणेस्नेहल शास्त्री पुण्यातला अत्यंत प्रतिष्ठित समजला जाणारा सवाई गंधर्व महोत्सव यावर्षी 11 ते 13 डिसेंबरला होणार आहे. भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्कार पंडितजींना मिळाल्यानंतर त्यांच्या दुर्मिळ छायाचित्रांचं प्रदर्शन महोत्सवात भरवण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे महोत्सवात ' षड्ज ' हा लघुपट महोत्सव, ' अंतरंग ' यांसारखी चर्चासत्रं होणार आहेत. यात रोहिणी भाटे यांच्यावरील लघुपटही दाखवण्यात येणार आहेत. पंडितजींना कार चालवायची आवड होती. ते त्यांच्या लाडक्या मर्सिडीज कारमध्ये बसून मैला न् मैल फिरायचे. त्यामुळे यंदा महोत्सवात त्यांची लाडकी मार्सिडीज कार प्रदर्शनासाठी ठेवली जाणार आहे, अशी माहिती ज्येष्ठ गायक श्रीकांत देशपांडे यांनी दिली. पं. शिवकुमार शर्मा यांच्यावरील अंतर्ध्वनी या माहितीपटानं महोत्सवाचा शुभारंभ होणार आहे.कलाकारांचा कलाप्रवास उलगडून सांगणारा ' अंतरंग ' हा कार्यक्रम गणेशखिंड रस्त्यावरील सवाई गंधर्व स्मारकामध्ये होणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 6, 2008 10:48 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 6, 2008 10:48 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close