S M L

आयबीएन - लोकमतशी बाळासाहेबांचा खास संवाद

19 फेब्रुवारी, मुंबई विनोद तळेकरशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आज मुंबईत मातोश्रीवर पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारल्या. यावेळी काँग्रेसवर टीका करत, अपराधी सरकारलाच तुम्ही मते देता आणि नंतर स्वतःच अडचणीत येता असा टोला बाळासाहेबांनी लगावला. पण आता जागं व्हा, असं आवाहन करायलाही ते विसरले नाहीत. यावेळी त्यांनी श्रीराम सेनेवर त्यांनी टीका केली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी बर्‍याच दिवसांनंतर पत्रकारांशी संवाद साधला. दसरा मेळाव्यात दिसलेले बाळासाहेब आणि या पत्रकार परिषदेच्या वेळी दिसलेले बाळासाहेब यात खूपच फरक होता. शिवसेनाप्रमुखांची तब्येत सुधारलेली दिसली. ऑक्टोबर 2008 गुरूवार... शिवसेनेचा दसरा मेळावा होता. स्थळ शिवाजी पार्क... बाळासाहेब आले.. आधार घेऊन..हातात काठी..बोलताना खोकल्याची ढास..19 फेब्रुवारी 2009..गुरूवार...वेळ सकाळचे अकरा ...स्थळ मातोश्री...एका अनौपचारिक कार्यक्रमासाठी बाळासाहेब ..त्यांच्या नेहमीच्या खोलीतआले. कोणाचाही आधार न घेता त्यांनी दालनात प्रवेश केला. आणि बाळासाहेब आपल्या खुर्चीवर बसले. त्यांच्या बोलण्यातूनही एक प्रकारचा उत्साह जाणवत होता. या पुर्ण कार्यक्रमादरम्यान त्यांना एकदाही खोकल्याची उबळ आली नाही. त्यांच्या एकुणच वावरावरून त्यांची तब्येत उत्तम असल्याचं जाणवत होतं. मग त्यांनी आपल्या नेहमीच्या ठाकरी शैलीत उपस्थितांशी संवादही साधला.महाराष्ट्रातल्या महापुरुषांचे पुतळे आणि घरांची अवस्था फारच वाईट आहे. रायगडाकडे तर बघूच नका. शिवसेना रायगडावरच्या महाराजांच्या पुतळ्यावर छत्री उभारण्यासाठी प्रयत्न करत आहे. पण सरकार काहीच प्रयत्न करत नाही. सरकार निर्लज्ज आहे, असं म्हणत बाळासाहेबांनी सत्ताधा-यांवर टीका केली. " असे अक्षम्य गुन्हे करणा-या सरकारला निवडून देण्याचं काम मतदार करतात, " असं म्हणत बाळासाहेबांनी मतदारांवर टीका केली. "शिवय जयंतीच्या पुण्यतिथीवरून वाद घालण्याची तुमची लायकी आहे का, वाद कसले घालता ? असा सवालही त्यांनी विचारला. व्हॅलेंटाईन डेचं आंदोलन नीट न करता आलेल्या श्रीराम सेनेवरही बाळासाहेबांनी टीका केली. " गुलाबी चड्‌ड्या भेट म्हणून मिळालेले श्रीराम सेनेचे हनुमान त्याच चड्‌ड्या घालून पबमध्ये जणार का, " अशी श्रीाराम सेनेवर टोलेबाजी करत ' आजचा तरूण पबच्या मागे धावतोय, अशी खंत शिवसेना प्रमुखांनी व्यक्त केली. लोकांनी देशासाठी त्याग केला नसता तर देशाला स्वातंत्र्य मिळालं असतं का, असा प्रश्न विचारत बाळासाहेबांनी, " आमच्या संस्कार आणि संस्कृतीला विसरू नका. तसंच महाराष्ट्राच्या इतिहासाला विसरू नका, " असा इशाराही दिला. गेले काही दिवस बाळासाहेब क्वचितच प्रसिद्धी माध्यमांसमोर दिसतात. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीविषयी अनेकदा चर्चा होत असते. . मात्र भेटीदरम्यान बाळासाहेबांच्या एकूणच चालण्याबोलण्यातून त्यांची तब्येत उत्तम असल्याचंच दिसत होतं.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 19, 2009 01:51 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 19, 2009 01:51 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close