S M L

कौल जनतेचा- गुजरात

कौल जनतेचा- गुजरात19 फेब्रुवारीसीएसडीएस आणि आयबीएन नेटवर्कनं देशातल्या 23 राज्यांमध्ये निवडणूकपूर्व सर्व्हे केलाय. या सर्व्हेमधून 16, 569 लोकांचा कल आजमावण्यात आला. या सर्व्हेबाबत आयबीएन लोकमतवर कौल जनतेचा हा विशेष कार्यक्रम सादर होतोय. बुधवारी या कार्यक्रमात महाराष्ट्रातल्या जनतेचा कौल काय आहे याचा आढावा घेण्यात आला. आज गुजरातमधले मतदार काय म्हणतायत, याबाबतचा सर्व्हे आपण पाहणार आहोत. गुजरातमधल्या मतदारांचा कल अजूनही भाजपकडेच आहे. काँग्रेसला येत्या निवडणुकीत 45 टक्के मतदारांचा कौल मिळण्याची शक्यता आहे, जर तसं झालं तर गेल्या खेपेपेक्षा काँग्रेसला 6 टक्के मतदारांचा कौल अधिक मिळेल. भाजप काँग्रेसच्या पुढे आहे, भाजपला 47 टक्के मतदारांनी कौल दिलाय. भाजपचे मतदार यावेळी गेल्या खेपेपेक्षा 2 टक्क्यांनी घटण्याची शक्यता आहे. गुजरातमध्ये पटेल/पाटीदार समाजाचा कल भाजपकडे आहे, पण इतर कनिष्ठ जातींमध्ये मात्र भाजपला फटका बसण्याची शक्यता आहे. पटेल/पाटीदार समाजाची 10 टक्के मतं भाजपला मिळण्याची शक्यता आहे. तर ओबीसी शेतकरी, दलित आणि आदिवासी यांची मतं भाजप गमावण्याची शक्यता आहे. तरीही गुजरातमधील सरकारवर जनता खूश आहे. गेल्या दोन वर्षाच्या तुलनेत सरकारवर समाधानी असणा-यांची संख्या कमी झाली असली, तरी मतदारांचा कल अजूनही भाजपकडेच आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 19, 2009 02:28 PM IST

कौल जनतेचा- गुजरात

कौल जनतेचा- गुजरात

19 फेब्रुवारीसीएसडीएस आणि आयबीएन नेटवर्कनं देशातल्या 23 राज्यांमध्ये निवडणूकपूर्व सर्व्हे केलाय. या सर्व्हेमधून 16, 569 लोकांचा कल आजमावण्यात आला. या सर्व्हेबाबत आयबीएन लोकमतवर कौल जनतेचा हा विशेष कार्यक्रम सादर होतोय. बुधवारी या कार्यक्रमात महाराष्ट्रातल्या जनतेचा कौल काय आहे याचा आढावा घेण्यात आला. आज गुजरातमधले मतदार काय म्हणतायत, याबाबतचा सर्व्हे आपण पाहणार आहोत. गुजरातमधल्या मतदारांचा कल अजूनही भाजपकडेच आहे. काँग्रेसला येत्या निवडणुकीत 45 टक्के मतदारांचा कौल मिळण्याची शक्यता आहे, जर तसं झालं तर गेल्या खेपेपेक्षा काँग्रेसला 6 टक्के मतदारांचा कौल अधिक मिळेल. भाजप काँग्रेसच्या पुढे आहे, भाजपला 47 टक्के मतदारांनी कौल दिलाय. भाजपचे मतदार यावेळी गेल्या खेपेपेक्षा 2 टक्क्यांनी घटण्याची शक्यता आहे. गुजरातमध्ये पटेल/पाटीदार समाजाचा कल भाजपकडे आहे, पण इतर कनिष्ठ जातींमध्ये मात्र भाजपला फटका बसण्याची शक्यता आहे. पटेल/पाटीदार समाजाची 10 टक्के मतं भाजपला मिळण्याची शक्यता आहे. तर ओबीसी शेतकरी, दलित आणि आदिवासी यांची मतं भाजप गमावण्याची शक्यता आहे. तरीही गुजरातमधील सरकारवर जनता खूश आहे. गेल्या दोन वर्षाच्या तुलनेत सरकारवर समाधानी असणा-यांची संख्या कमी झाली असली, तरी मतदारांचा कल अजूनही भाजपकडेच आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 19, 2009 02:28 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close