S M L

गप्पा सिद्धार्थ जाधवशी

' जागो मोहन प्यारे ' या नाटकाचे 400 प्रयोग पूर्ण झाले. या नाटकात प्रमुख व्यक्तिरेखेची भूमिका करणारा अभिनेता सिद्धार्थ जाधवाला 'टॉक टाइम' मध्ये आमंत्रित करण्यात आलं होतं. जत्रा, दे धक्का यांसारख्या चित्रपटांमधून तसंच ' जागो मोहन प्यार ' , ' लोच्या झाला रे ' सारख्या नाटकांमधून त्याने आपल्याला भरपूर हसवलंय. अनेक समीक्षकांनी त्याच्या अभिनयाचं कौतुक केलं आहे. त्याचा अभिनय, त्यामागची मेहनत, अनुभव अशा अनेक विषयांवर त्याने मनमोकळ्या गप्पा मारल्या तसंच प्रेक्षकांच्या प्रश्नांना उत्तरंही दिली. 'आयुष्यात मी सिरियस असतो, पण त्याचं प्रदर्शन करायला मला आवडत नाही ' , असंही त्यानी सांगितलं. प्रेक्षकांच्या खास आग्रहाखातर स्वता:च्या चित्रपटातले काही डायलॉगही त्याने ऐकवून दाखवले.' जागो मोहन प्यारे 'च्या अनुभवाविषयी बोलताना तो म्हणाला, ' त्याच्यामागे खूप मोठी कथा आहे. ग्रॅज्युएशनला असताना आम्ही मित्रांनी ठरवलं की, आपण सगळे मिळून काही तरी करुयात. तोपर्यंत मी ' लोच्या झाला रे ', ' तुमचा मुलगा करतो काय ?' , अशी काही नाटकं केली होती. थोडासा अनुभव होता, त्यामुळे आम्ही हे नाटक रंगभूमीवर आणलं. त्याला खूप यश मिळालं, लोकप्रियता मिळाली. यामुळे आमचं एक स्वप्न पूर्ण झालं. '' या क्षेत्रात येण्याची प्रेरणा मला माझ्या कुटुंबियांकडून मिळाली. माझे वडील हे हौशी रंगकर्मी होते. पण माझ्या रक्तातच नाटक आहे, असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे माझ्याबाबतीत, असं म्हटलं जातं की मी जन्मापासून अभिनय करत आलोय. लहानपणी शाळेतल्या स्नेहसंमेलनापासून माझ्या अभिनयाला सुरुवात झाली. मी ज्या ज्या लोकांबरोबर काम केलं, म्हणजे मग भरत जाधव असेल, मकरंद अनासपुरे असेल किंवा देवेंद्र पेम असतील. प्रत्येकाकडून मला बरंच शिकायला मिळालं ' , असं तो म्हणाला.दिवाळी म्हटलं की, मला माझं लहानपण आठवतं. मला लहानपणापासून फटाके उडवायला फार आवडायचे, अजूनही आवडतं. आणि त्याच्याबरोबर, वेगवेगळे प्रयोग करायला मला आवडायचं. पण माझ्या वडिलांनी मला एवढं जपलं की त्यांनी मला फटाक्यांपासून कायमच लांब ठेवलं.' आपल्या भविष्यातील भूमिकांविषयी सांगताना तो म्हणाला, ' माझी प्रत्येक भूमिका मी खूप एन्जॉय करतो. माझ्याकडे खूप वेगवेगळ्या भूमिका आहेत. उलाढाल, छापा काटा अशा अनेक चित्रपटात मी वेगवेगळ्या भूमिका साकारत आहे. केदार शिंदेंच्या एका चित्रपटातही मी काम करत आहे. ' स्वत:च्या फिटनेसचं रहस्य सांगताना तो म्हणाला ' जिथे जाईन, तिथे मी डंबेल्स बरोबर घेऊन जातो. जमेल तसा व्यायाम करतो. सध्याच्या बिझी शेड्युलमध्ये फारसा वेळ मिळत नाही, पण तरीही शक्य होईल तिथे मी फिटनेसची काळजी घेतो'. ' माझ्या कुटुंबियांना मी आवर्जून वेळ देतो. आजही मी भाऊबीजेसाठी माझ्या बहिणीकडे जाणार आहे. दिवाळीत मी आवर्जून माझ्या कुटुंबीयांना वेळ देतो. माझ्या बायकोलाही जितका वेळ देता येईल, तितका द्यायचा माझा प्रयत्न असतो', असंही त्याने सांगितलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 30, 2008 04:33 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 30, 2008 04:33 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close