S M L

'लक्ष्य'वेधी छायाचित्रकार - अरविंद भाटिया, अवनींद्र भाटिया

आपल्या आसपास ब-याच घटना घडत असतात. बहुतेकदा आपण त्या घटनांकडे दुर्लक्ष्य करत असतो किंवा काही घटना आपल्याला दिसत असून त्यांचे अर्थ चटकन आपल्या लक्षात येत नाहीत. तो काही जणांच्याच लक्षात येतो. या घटनांचे अर्थ लक्षात येण्यासाठी निसर्गाशी जवळीक करता येणं गरजेचं आहे. ती जवळीक अरविंद भाटिया आणि त्यांचा मुलगा अवनींद्र भाटिया यांनी अगदी सहजतेनं जमली आहे. अरविंद भाटिया हे 1972 सालापासून नेचर फोटोग्राफी करताहेत आणि गेल्या 20 वर्षांपासून त्यांचे सुपुत्र अवनींद्र हेही त्यांच्यासोबत नेचर फोटोग्राफी करताहेत. 'सलाम महाराष्ट्र'मध्ये या नेचर फोटोग्राफर बाप-लेकांशी गप्पांचा मस्तपैकी फड रंगला. कॉमर्स बॅकग्रॉऊण्ड असणारे अरविंद भाटीया हे फोटोग्राफर आहेत आणि त्यात त्यांना असणारी नेचर फोटोग्राफीची आवड कोणालाही थक्क करणारी अशीच आहे. ‘मला असणारी फोटोग्रॉफीची आवड ही हेरिडिटरी आहे. मी लहान असताना माझे बाबा माझे अनेक फोटो काढायचे. ते अजूनही मी जपून ठेवले आहेत. बाबांचे काढलेले फोटो बघून बघून माझ्यातही फोटो काढण्याची आवड निर्माण झाली. त्यावेळी माझ्याकडे आयसो झेकॉन हा जर्मन कंपनीचा कॅमेरा होता. मी फोटोग्राफीचा श्रीगणेशा त्याच कॅमे-याने केला. पोद्दार कॉलेजमध्ये असताना आमच्या प्राचार्यांच्या मदतीने आम्ही भित्तीपत्रिका चालवायचो. कोणाला लिखाणाची आवड होती तो त्याचं साहित्य त्या भित्तीपत्रिकेवर डखवायचा. कोणाला पेन्टींग्‌सची आवड होती तो आपली पेन्टींग्‌स लावयचा. मला फोटोग्राफीची आवड होती. त्यामुळे मी क्लिक केलेले स्नॅप्स त्यात चिकटवायचो.' अरविंद भाटीया सांगत होते. कॉलेजमध्ये असताना अरविंद जी जरा उडतच फोटोग्राफी करायचे. म्हणजे ते फोटोग्राफीबाबत सिरिअस नव्हते. फोटोग्राफीचा कंटाळा आला की ते पेन्टिंग्‌स काढायचे नि पेन्टींग्‌सचा कंटाळा आला की फोटोग्राफी. असंच एकदा त्यांच्या वाचनात 'आय फॉर बर्ड' हे पुस्तक आलं. ते पुस्तक एरिक होस्की या ब्रिटीश पक्षी निरीक्षक छायाचित्रकाराचं आहे. 'फोटोग्राफी करत असताना घुबडाने त्यांचा डोळा फोडला. चांगल्या निष्णात छायाचित्रकाराच्या बाबतीत असं घडणं हे दुदैर्वच. त्यात त्यांचं लग्नही ठरलं होतं. ज्या मुलीशी एरिकचं लग्न ठरलं होतं त्या मुलीने तशा परिस्थितीत एरिकशी लग्न केलं. पुढे त्या दोघांनी जोडीने पक्षी छायाचित्रण केलं. पक्षी छायाचित्रणासाठी ते जगभर फिरले. दुर्मिळ दुर्मिळ पक्षांच्या छायाचित्रांचा संग्रह आहे. कोणाला जर पक्षी कोष काढायचा असेल तर त्यांना नक्कीच त्या छायाचित्रांचा उपयोग होईल. त्याच्याकडे 10 लाख पक्षांच्या निगेटीव्हज सापडतील. तर एरिक होस्की यांची पॅशन मला आवडली. तीच माझा आदर्श बनली,’ अरविंद भाटीया म्हणाले.अरविंद भाटीयांचा आदर्श एरिक होस्की तर अवनींद्र भाटीयांचा आदर्श त्यांचे वडील. 'एक दिवस बाबा काश्मिरला चालले होते. रात्रीची त्यांची गाडी होती. बाबा तयारीला लागले होते. मी त्यांच्या कॅमे-याला हात लावला आणि तो बिघडला. मला शिक्षा व्हावी म्हणून बाबांनी काही दिवस माझ्याशी अबोला धरला. मी बिघडवलेला कॅमेरा काही दुरुस्त झाला नाही. पण बाबांनी माझ्याशी अबोला धरला. त्या एका प्रसंगाने माझी कॅमे-याशी दोस्ती झाली,' अवनींद्र भाटीया आपल्या फोटोग्राफीच्या आवडीबद्दल सांगत होते. 'मुळातच पक्षी निरीक्षणाबरोबरीने फोटोग्राफी करणं हे एकप्रकारचं टीम वर्क आहे. कारण पक्षी हे खूपच शार्प असतात. जरासं जरी खट्टं झालं की ते झटकन उडून जातात. त्यामुळे आमच्यापैकी कुणीतरी एकजण फोटोकाढत असला की दुसरा त्या पक्षावर नजर ठेवतो. तेव्हा कुठे तो फोटो नीट येतो,'असं टीमवर्कबद्दल बोलताना अवनींद्र म्हणाले. फोटोग्राफीचे निरनिरळे प्रकार आहेत. त्यातलाच एक आहे नेचरफोटोग्राफी. या नेचरफोटोग्राफीमध्ये अरविंद भाटीया यांनी बर्ड फोटोग्राफीची निवड केली त्याला कारणीभूत जसे एरिक होस्की आहेत तसं अजून एक कारण आहे नि ते म्हणजे शहरांमध्ये सहजच सापडणारे पक्षी. 'नेचर फोटोग्राफी मध्ये लॅण्डस्केप फोटोग्राफी, सीन्स लॅण्डस्केप असे प्रकार येतात. मी लॅण्डस्केपमध्ये प्राणी, वनस्पती, माणूस, पक्षी, किडे, मुंग्या, फुलपाखरु येतात. पण मी मात्र पक्षी निवडले. कारण ते सहजच शहरात उपलब्द्ध होतात. त्यासाठी जंगलात जावं लागत नाही. त्यामुळेही मी बर्ड फोटोग्राफीकडे वळलो. नुसती बर्ड फोटोग्राफी केली नाही तर त्याला बर्ड वॉचिंगची जोड दिली,' असं अरविंदसर म्हणाले. 'फोटोग्राफीच काय पण कोणतंही काम करताना टार्गेट म्हणजे समोर लक्ष्य असायला हवं. ते असलं की आयुष्याचं ध्येय अगदी सहजच गाठता येतं.'असा कानमंत्र अरविंद भाटीयांनी दिला. 'सलाम महाराष्ट्र'मधल्या अरविंद भाटिया, अवनींद्र भाटिया यांच्याशी मारलेल्या गप्पांची झलक तुम्हाला वरच्या व्हिडिओवर पाहता येईल. ही मुलाखत वसुंधरा काशीकर आणि मनीष आपटे यांनी घेतली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 11, 2013 01:24 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 3, 2008 01:04 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close