S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • साध्वी प्रज्ञासिंगच्या अटकेचं हिंदुत्ववादी राजकारण करतायत का ?
  • साध्वी प्रज्ञासिंगच्या अटकेचं हिंदुत्ववादी राजकारण करतायत का ?

    Published On: Nov 5, 2008 12:55 PM IST | Updated On: May 13, 2013 02:23 PM IST

    मालेगाव बॉम्बस्फोटाचे धागेदोरे हिंदुत्ववादी संघटनापर्यंत पोहचले आहेत. याप्रकरणी साध्वी प्रज्ञासिंग ठाकूरला अटक करण्यात आली आहे. साध्वीला समर्थन देण्यासाठी हिंदुत्ववादी संघटना पुढे आल्या आहेत. शिवसेनेनं जाहीर समर्थन केलं आहे.या सर्व प्रकरणावर ' आजचा सवाल ' मध्ये साध्वी प्रज्ञासिंगच्या अटकेचं हिंदुत्ववादी राजकारण करतायत का ? यावर चर्चा करण्यात आली. चर्चेत शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे, ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई, सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड आणि हिंदू राष्ट्र सेनेचे धनजंय उपस्थित होते. साध्वीला पांठिबा देण्याच्या मुद्यावर सेनेचे चंद्रकांत खैरे म्हणाले, शिवसेनेची भूमिका योग्य आहे. मुसलमानांच्या मतांसाठी युपीए सरकारनं हिंदू संघटनांना लक्ष्य केलं आहे. शिवसेनेची भूमिका 100 टक्के मान्यअसून साध्वी प्रकरणात त्यांनी राजकीय द्रष्टेपणा दाखवल्याचं हिंदू राष्ट्र सेनेचे धनंजय देसाई म्हणाले. चर्चेत सहभागी झालेले पत्रकार हेमंत देसाई म्हणाले, हिंदूच्या मतांसाठी हे सर्व काही होत आहे. जागतिक मंदी, सेझ, महागाईसारखे मुद्दे असताना या प्रकरणाला समर्थन दिलं जात आहे. सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांनी चर्चेत रोखठोक भूमिका मांडली. ' याआधी ठाणे आणि पनवेलमध्ये झालेल्या स्फोटानंतर शिवसेनाप्रमुखांनी सामनाच्या अग्रलेखात हिंदुनो फुसके बॉम्ब बनवू नको, असं म्हटलं होतं. हिंदुत्ववादी संघटना संविधानाला मानत नाही. नांदेड स्फोटाचा मालेगावप्रमाणे तपास झाला असता आणखी सत्य बाहेर आलं असतं. बॉम्बस्फोटात हिंदू आणि मुस्लीम मरत नसतो तर एक माणूस मरतो, असं सेटलवाड म्हणाल्या.सेटलवाड यांच्या भूमिकेवर धनंजय देसाई यांनी आक्षेप घेतला. ' तिस्ता सेटलवाड राष्ट्रवादी नाहीत. त्या सर्व प्रसिद्धीसाठी करत आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये तिरंगा जाळला, तेव्हा त्या तिकडे का गेल्या नाहीत, या धनंजय देसाईंच्या प्रश्नावर सेटलवाड म्हणाल्या, मीच का ? बाळासाहेब ठाकरे आणि प्रवीण तोगाडिया का गेले नाहीत. या रोखठोक शब्दात तिस्ता सेटलवाड यांनी उत्तर दिलं.पत्रकार हेमंत देसाई यांनी तिस्ता सेटलवाड यांच्यावर धनंजय देसाई यांनी केलेल्या आरोपाचा निषेध केला. ' धर्माच्या नावावर मतं मिळवण्यासाठी देश तोडण्याचं काम सुरू आहे. पुढील काळात देश एकसंध ठेवणं, हे एक आव्हान राहणार आहे ', असं हेमंत देसाई यावेळी म्हणाले. ' साध्वी प्रज्ञासिंगच्या अटकेचं हिंदुत्ववादी राजकारण करतायत का ?' या पोलमध्ये विचारण्यात आलेल्या प्रश्नावर 55 टक्के लोकांनी ' हो' असं मत नोंदवलं. चर्चेचा शेवट करताना आयबीएन-लोकमतचे संपादक निखिल वागळे म्हणाले की देश एकसंध कसा राहील, हीच सगळ्यांची चिंता आहे. बॉम्बस्फोटात निरपराध व्यक्तींचा बळी जात आहे पण राजकारण काही संपत नाही.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close