S M L

ग्रेट भेटमध्ये प्रभाकर कोलते

ग्रेट भेटच्या 8 नोव्हेंबरच्या भागात आयबीएन लोकमतचे संपादक निखिल वागळे यांनी प्रसिद्ध चित्रकार प्रभाकर कोलते यांची मुलाखत घेतली. प्रभाकर कोलते हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार आहेत. कोलते सरांनी अ‍ॅब्स्ट्रॅक्ट चित्रकलेच्या महत्त्वाचं योगदान दिलं आहे. कुंचल्याइतकंच त्यांचं लेखणीवरंही प्रभुत्व आहे. ' कलेपासून कलेकडे ' हे त्यांचं पुस्तक प्रसिद्ध आहे. या बहुरंगी माणसाच्या जीवनातले विविध रंग या मुलाखतीत उलगडले गेले.' अभिव्यक्तीचं माध्यम म्हणून मी चित्रकला निवडली असं म्हणण्यापेक्षा चित्रकलेनी मला निवडलं ' अशी सुरुवात करत ते म्हणाले, ' सुरुवातीपासून मी माझ्या वडिलांना आणि माझ्या मामांना चित्र काढताना बघून मी या क्षेत्राकडे आकर्षित झालो. जेजे स्कूल ऑफ आर्टमध्ये गेल्यावरंही बर्‍याच दिवसांनी मला कळलं की मला या क्षेत्राचं किती आकर्षण होतं. जेजेमधून बाहेर पडल्यावरंही जेव्हा पोटासाठी कला की जगण्यासाठी कला हा प्रश्न पडला, तेव्हा या प्रश्नाचं उत्तर मी माझ्यापुरतं शोधलं. जगायचं तर चित्रकलेसाठी, मरायचं तर चित्रकलेसाठी असं मी ठरवलं. ' कोलते सरांना या अपारंपारिक क्षेत्राकडे जाण्यास कुटुंबियांचा विरोध नव्हता. मुलांनी स्वत:च्या पायावर उभं रहावं, एवढीच त्यांच्या घरच्यांची मोजकी अपेक्षा होती.सुरुवातीच्या काळात दलालांच्या चित्रांचा कोलते सरांवर प्रचंड प्रभाव होता. त्यांच्या चित्रात जो जीवंतपणा होता, त्यामुळे कोलते सर भारवून गेले होते. तो जिवंतपणा आपल्याही चित्रात असावा यासाठी त्यांनी प्रयत्न केले. रंगांचं आकर्षण तर त्यांना होतंच, त्यातंच छबिलदासमध्ये त्यांना चांगले शिक्षक भेटले. त्यांची चित्रं बघताना कोलते सरांना वाटायचं की चित्रकला ही एक जादू आहे आणि चित्रं काढता काढता एक दिवस ती आपल्याला उमगेल. छबिलदासमधल्या एम. एस. जोशी सरांकडे मॉडेल आर्टिस्टचा क्लास जॉइन करायला गेले असताना त्यांच्याच सल्ल्याने कोलते सरांनी जेजे स्कूल आर्ट्समध्ये प्रवेश घेतला. जेजेमध्ये एक वेगळंच विश्व कोलतेंसमोर उलगडलं गेलं. तिकडचे शिक्षक, शिस्त, लायब्ररी याचा कोलते सरांना खूप फायदा झाला. दातार सरांनी काढलेलं फळ्यावरचं बदक, जोशी सरांनी केलेला लॅन्डस्केप, कदम सरांनी केलेलं पोर्ट्रेट आज अनेक वर्षांनंतरही चित्रकलेचे पहिले धडे कोलते सरांच्या मनावर कोरले गेले आहेत. जेजेमध्ये त्यांना तंत्राची किमया कळली. ' पण अर्थात केवळ तंत्र म्हणजे कला नव्हे ' असं सांगत ते म्हणाले, ' माझी दृष्टी विकसित होत जाण्याची प्रक्रिया जेजेमध्ये घडली. 'पळशीकर सर हे कोलते सरांचे गुरू. ' मी आज जो कोणी आहे, तो पळशीकर सरांमुळे आहे. एका बाजूला देव उभा असेल आणि दुसरीकडे पळशीकर, तर मी पळशीकरांची निवड करीन. ' या शब्दात कोलते सरांनी पळशीकर सरांविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या. ' माझ्यातला जो मी पणा आहे तो पळशीकर सरांनी दिला ' असं सांगत कोलते सर पुढे म्हणाले, ' माझ्यासारख्या गिरणगावात रहाणार्‍या सामान्य माणसाला उचलून त्यांनी आयडेंटिटी दिली. त्यांनी असे अनेक विद्यार्थी घडवले. मोहन सामंत सारखे आंतरराष्ट्रीय किर्तीचे चित्रकार जगाला सांगायचे की मी जेजेमध्ये नाही तर पळशीकरांकडे शिकलो. 'आपल्यावर प्रभाव असणार्‍या प्रसिद्ध चित्रकार पॉल क्लीविषयी बोलताना ते म्हणाले, ' जेजेमध्ये असताना माझे सहकारी मला परदेशी चित्रकारांचे दाखले द्यायचे. त्यांच्यामुळे मी परदेशी चित्रकारांची पुस्तकं वाचायला लागलो. मग मला कळलं की जरी यांना भेटलो नसलो, तरी त्यांची आणि माझी जातकुळी एकच आहे. मला सांगितलं गेलं की डिक्शनरी घेऊन बस, आणि त्यांचे विचार समजून घे. मग मला तो छंद लागला. पॉल क्ली काय सांगतो? फॉलो द नेचर. बिकॉझ यू आर पार्ट ऑफ नेचर. आता याचा अर्थ जेव्हा मी शोधायला गेलो तेव्हा मला कळलं की आंब्याचं झाड हे आंब्याचंच झाड आहे, सह्याद्री हा सह्याद्रीच आहे. या सगळ्यांसारखंच मला माझं व्यक्तिमत्व आहे, माझी विचारसरणी आहे. मग या आतल्या स्वरुपाचा शोध घेण्याचा मी प्रयत्न केला. आणि त्यातूनच मला कळलं की हे आतलं चैतन्य मला कागदावर साकारायचंय. चित्रकाराच्या डोक्यातली कल्पना, रंग आणि विचार या सगळ्यातून मला चित्र साकारता आली. मला असं वाटायचं की मानवी मन इतकं विशाल आहे, की बाहेरच्या विश्वासारखी असंख्य विश्वं या मनाच्या कोपर्‍यात राहू शकतील. मग बाहेरच्या विश्वाची मला गरजच नाही. मग मी फक्त आणि फक्त ही अंतरंगातली चित्र रेखाटत गेलो.'' कशासाठी जगायचं, हे मला कळलं होतं. पेंटिंग करण्यासाठी माझा जन्म झालाय, आणि ते मला आवडतं म्हणून मी केलं. पेंटिंग हा माझ्यासाठी आत्मशोध आहे. जर मी तडजोड केली असती तर आज माझ्याकडे जे काही आहे, ते मी मिळवू शकलो नसतो. मला आवडतं म्हणून मी काम केलं. त्यात तडजोड करायचा प्रश्नच येत नाही. ' असं प्रभाकर कोलतेंनी सांगितलं. ' अर्थात सुरुवातीला मी अशी काहीतरी कामं केली. सगळया चित्रकारांप्रमाणे मीही म्युरल्स केली. पण काही काळानंतर मलाच जाणवलं की म्युरल्स करणं बरोबर नाही. मग काही काळानंतर मी ठरवून अशी चित्र काढणं बंद केलं. ' आयपीसीसाठी कोलते सरांनी जे नेहरूंचं चित्र काढलंय त्यात नेहरूंना आपल्या परिभाषेत कोलते सरांनी बद्ध केलं. पण यात गैर काय ? या प्रश्नाचं उत्तर देताना ते म्हणाले, ' चित्रकाराची कला, हा आतून निघणारा हुंकार आहे. पण नेहरूंचं चित्र काढण्याचं काम माझ्याकडे देण्यात आलं होतं, मी ते चित्र रेखाटावं, असंमला वाटलं नव्हतं. किंबहुना त्यातून मिळणारा मान, पैसा याला मी बळी पडलो, म्हणून मला त्याची खंत वाटते. ' ' अ‍ॅब्स्ट्रॅक्ट चित्रकला हे माझ्या चित्रांना दिलेलं लेबल आहे. मुळात मी माझी चित्रं काढतो असं सांगत ते म्हणाले , ' ज्या गोष्टीची मी कल्पना केला आहे, त्याच्याशी माझी निष्ठा जोडली आहे. चित्रामध्ये चित्त आहे, तसं माझ्या मते पेंटिंगमध्ये पेन आहे, पेंट आहे आणि जसं नावं चालू वर्तमानकाळ दाखवतं तसं वर्तमान आहे. पेंटिंगमध्ये गती आहे. प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया थांबली की गती संपते. म्हणून मला असं वाटतं की पेंटिंग मला वर्तमानात जगायला शिकवतं. 'कोलते सरांवर वासुदेव गायतोंडे, प्रभाकर बर्वे या चित्रकारांचा प्रभाव आहे. आपल्या एकटेपणाविषयी ते म्हणाले, ' हा जो अलोनलेस आहे, तो कलाकाराठी आवश्यक आहे. या सृजनशील विश्वाचा जो बिंग बँग आहे, तिथपर्यंत दोघं जण जाऊ शकत नाहीत. तो एकट्यानेच शोधता येतो. ' 'कलाकाराची गरज असेल, तर त्याने समाजापासून दूर गेलं तरी समाजानं स्वीकारावं ', असंही कोलते सरांनी स्पष्ट केलं. ' अर्थात माझ्यात धैर्य नाही म्हणा किंवा मला जे जमतंय, ते लोकांपर्यंत पोहचवणं मला आवश्यक वाटतंय, म्हणून मी समाजापासून तुटलो नाही ' असं कोलते सरांनी सांगितलं. ' एक वेळ मी पेंटर झालो नसतो, पण शिक्षक नक्कीच झालो असतो ' असं सांगत ते म्हणाले, ' माझ्यावर माझ्या शिक्षकांनी इतका प्रभाव टाकला आहे, की माझे शिक्षक हे मला पंतप्रधांपेक्षाही ग्रेट वाटायचे. सोलापूरकर, पळशीकर, कदम, दातार एम एस जोशी असे इतके चांगले शिक्षक भेटले की मी शिक्षकच व्हायचं, हे मनाशी ठरवून टाकलं. 'आपल्या जेजेमधल्या शिक्षक म्हणून केलेल्या कामाविषयी ते म्हणाले, 'मी जेजेमध्ये गेलो तेव्हा मला कळलं की मला शिकवायची इच्छा आहे, पण शिकवता येत नाही. मग माझा स्वत:शी संघर्ष सुरू झाला. मी स्वत:मध्ये सुधारणा घडवून आणल्या. पण जेजेतले जुने शिक्षक सोडून गेल्यावर वातावरण फार बदललं. पण जुने लोक गेल्यावर जेजेच्या कारभारात सरकारची ढवळाढवळ सुरू झाली. आधीचे शिक्षक हे स्वतंत्र बाण्याचे होते, पण नंतर नंतर सगळा कारभार हा सरकारी बनत गेला. साधे साधे कार्यक्रम करायला दोन दोन महिने परवानगीची वाट पहावी लागली. त्यातच जेजे स्कूल ऑफ आर्ट्स एकाच वेळी जेजेतल्या 18 लोकांची ज्या वेळेस बदली केली गेली, तेव्हा आम्ही संप घडवून आणला. म्हणजे जेजेचं त्यांनी सरकारी खातं केलं. जेजेमध्ये शिकायचं आणि पुढे तिथेच शिक्षक म्हणून काम करायचं, ही जेजेची पंरपरा आहे. ती मोडण्याचा प्रयत्न झाला, तेव्हा आम्हाला संप करावा लागला. '' राखीव जागांना माझा विरोध नाही. पण तेवढी कुवत असली पाहिजे. नामदेव ढसाळ हे खूप मोठे कवी आहेत. तसंच, माझे शिक्षक कदम सर आहेत त्यांची जात विचारावी, असं माझ्या स्वप्नातंही आलं नाही. पण केवळ राखीव जागा म्हणून कोणालाही आणून बसवायचं आणि त्याच्याविरोधोत कोण काही बोललं, तर त्याच्यावर जातीयवादाचा आरोप करायचा हे ही चुकीचं आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.' जेजे स्कूल ऑफ आर्ट्सला स्वायत्तता मिळावी यासाठी मी खूप प्रयत्न केले. आणि आम्हाला स्वायत्तता हवी आहे कारण जशी आपण लोकशाहीची व्याख्या करतो की लोकांनी लोकांसाठी चालवलेलं लोकांच राज्य, या धर्तीवर मला जेजे स्कूल ऑफ आर्ट्स चालवायचं होतं. माझी मागणी त्यांना योग्य वाटली. त्यांनी मला एक प्रपोजल करून द्यायला सांगितलं. मी शासनाचा एक पैसाही न घेता मी अहवाल दिला. तीन महिन्यात त्यावर निर्णय होणार होता. आज चार महिने होऊन गेले, पण त्यावर निर्णय झाला नाही. ' असं कोलते सरांनी सांगितलं.पण शासनाची ही बेपर्वाई सगळीकडेच दिसून येतीय का, या प्रश्नाचं उत्तर देताना ते म्हणाले, ' शासन लांब राहिलं, ही बेपर्वाई घरापासूनच सुरू होते. म्हणजे हे कर, हे करू नका, असं घरापासून सांगितलं जातं. कलेचं बोलायचं तर पहिल्यापासूनच त्याला विरोध होतो. घर म्हणजे फक्त जेवायची आणि झोपायची जागा झाली आहे. मूल्यं हरवली आहेत, फक्त स्वार्थ राहिला आहे.कलेचा जो बाजार झालाय त्याविषयी आपली परखड मतं व्यक्त करताना कोलते सर म्हणाले, ' हा बाजार थाबंवणं शक्य नाही. जगभर कलेची हीच अवस्था झाली आहे. फक्त फरक हा आहे की युरोपात कलेची संस्कृती खोलवर रुजली आहे. सामान्य माणसाच्या घरातही आपल्याला पेंटिंग्ज दिसतात. उदाहरणच द्यायचं झालं तर पॅरिसमध्ये पॉल गोगँच्या चित्रांच प्रदर्शन बघायला आम्ही गेलो होतो. त्यावेळी तिथं आपल्याकडे सिद्धिविनायक मंदिरासमोर असते तशी रांग होती. आमच्याकडे इतका वेळ नव्हता. पण जेव्हा मी संयोजकांना सांगितलं, तेव्हा त्यांनी माझं स्वागत केलं, लवकर प्रवेश दिला. एवढंच नाही, तर तिकडचे महाग कॅटलॉग भेटही दिले. तिथे मी एका खूप साध्या कपड्यातल्या सर्वसामान्य माणसाला पाहिलं. सहज उत्सुकता म्हणून मी जेव्हा त्याच्याशी बोललो तेव्हा मला कळलं की तो शेतकरी आहे. मला आश्चर्य वाटलं. त्यावर त्यानं मला सांगितलं की पॉल गोगँ हा आमचा हिरो आहे. आमचा हिरो काय करतोय, हे बघायला मी इथे आलोय. याला मी संस्कृती म्हणतो. ती भाषणं देऊन शिकता येत नाही, तर ती रुजावी लागते. 'कोलते सरांनी आपल्या पुस्तकात गायतोंडे आणि एम. एफ. हुसेन यांची तुलना केली आहे. हुसेननी चित्रकलेला लोकप्रिय केलं. पण हुसेन इफेक्टनंतर कलेचा बाजार झाला हे मान्य करत ते म्हणाले, ' माझ्या मते भारतातील बहुसंख्य लोक मिडिऑकर आहे. काही असामान्य माणसं आहेत, पण सर्वसामान्य माणसांबाबत बोलायचं, तर जगण्यापेक्षा जिवंत रहाणं, त्यांच्यांसाठी महत्वाचं आहे. या परिस्थितीत सगळ्याच क्षेत्रांचा बाजार होणार आणि त्याचा परिणाम कलेच्या क्षेत्रावर होणारच. मी तर असं ऐकतो की आजकाल चित्रकारच आपली चित्र ऑक्शमनध्ये पाठवतो. मग जर चित्रकारानंच हे मान्य केलंय तर इतरांचं काय बोलायचं ! 'हुसेनविषयी बोलताना कोलते सर म्हणाले, ' हुसेन हा हुसेनसारखा जगला. माझ्या मते त्यानं चित्रकलेला खुलं केली. त्याने चित्र रंगवली, स्कल्पचर केली, चित्रपट काढले, स्टंट्स केले. पण त्यामुळे झालं काय की हुसेननं जे केलं ते आपणही करू शकतो, असं सगळ्यांना वाटलं. त्यतून काही चुकीचे संकेतही गेले. पण त्यामागचे हुसेनचे प्रयोग कोणाला कळले नाही. त्याचा श्वेतांबरी नावाचा जो प्रयोग होता, तो बर्‍याच लोकांना कळलाच नाही. स्वत:ला विसरून कलेच्या आत ते घुसू शकले नाहीत. लोकांनी त्याच्याकडून अपेक्षा ठेवल्या आणि त्या पूर्ण करण्यासाठी तो जगला नाही. मला त्याच्या सगळ्याच गोष्टी आवडत नाहीत, पण त्याने चित्रकलेला चांगले दिवस मिळवू दिले, हे नाकारता येणार नाहीत. 'कलाकाराच्या स्वातंत्र्याविषयी बोलताना कोलते सर म्हणाले, ' जोपर्यंत आपण आपापसातली भांडणं विसरू शकत नाही, एकसंध होऊ शकत नाही तोपर्यंत कलाकाराला अपेक्षित असणारं स्वातंत्र्य या देशात मिळू शकणार नाही.नवीन चित्रकारांविषयी बोलताना कोलते सर म्हणाले, ' नवीन चित्रकार वैचारिक पातळीवर बरेच वर आहेत, पण त्यांना दिशा नाही. त्यांना दिशा द्यायची असेल, तर चांगल्या इन्स्टिट्यूट्स हव्यात. जेजे स्कूल ऑफ आर्ट्सचं एवढं नाव झालं कारण उत्तम विद्यार्थी घडवणारी शिक्षकांची टीम तिकडे होती. बडोदा स्कूल ऑफ आर्ट्सकडे आजही काही प्रमाणात अशी टीम आहे. पण इन्स्टिट्यूट म्हणजे इमारत नाही, हे जोपर्यंत लोकांना कळणार नाही, तोपर्यंत हे शक्य नाही. यासाठी मीडिया खूप चांगली भूमिका पार पाडू शकते, असंही ते म्हणाले.या मुलाखतीचा शेवट करताना आयबीएन लोकमतचे संपादक निखिल वागळे म्हणाले, ' प्रत्येक क्षेत्रात यशस्वी माणसं असतात. पण आपल्या क्षेत्राला दिशा देऊ शकणारी माणसं खूप कमी असतात. प्रभाकर कोलते, हे त्यांपैकीच एक आहेत. '

आईबीएन लोकमत | Updated On: May 13, 2013 03:41 PM IST

ग्रेट भेटमध्ये प्रभाकर कोलते

ग्रेट भेटच्या 8 नोव्हेंबरच्या भागात आयबीएन लोकमतचे संपादक निखिल वागळे यांनी प्रसिद्ध चित्रकार प्रभाकर कोलते यांची मुलाखत घेतली. प्रभाकर कोलते हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार आहेत. कोलते सरांनी अ‍ॅब्स्ट्रॅक्ट चित्रकलेच्या महत्त्वाचं योगदान दिलं आहे. कुंचल्याइतकंच त्यांचं लेखणीवरंही प्रभुत्व आहे. ' कलेपासून कलेकडे ' हे त्यांचं पुस्तक प्रसिद्ध आहे. या बहुरंगी माणसाच्या जीवनातले विविध रंग या मुलाखतीत उलगडले गेले.' अभिव्यक्तीचं माध्यम म्हणून मी चित्रकला निवडली असं म्हणण्यापेक्षा चित्रकलेनी मला निवडलं ' अशी सुरुवात करत ते म्हणाले, ' सुरुवातीपासून मी माझ्या वडिलांना आणि माझ्या मामांना चित्र काढताना बघून मी या क्षेत्राकडे आकर्षित झालो. जेजे स्कूल ऑफ आर्टमध्ये गेल्यावरंही बर्‍याच दिवसांनी मला कळलं की मला या क्षेत्राचं किती आकर्षण होतं. जेजेमधून बाहेर पडल्यावरंही जेव्हा पोटासाठी कला की जगण्यासाठी कला हा प्रश्न पडला, तेव्हा या प्रश्नाचं उत्तर मी माझ्यापुरतं शोधलं. जगायचं तर चित्रकलेसाठी, मरायचं तर चित्रकलेसाठी असं मी ठरवलं. ' कोलते सरांना या अपारंपारिक क्षेत्राकडे जाण्यास कुटुंबियांचा विरोध नव्हता. मुलांनी स्वत:च्या पायावर उभं रहावं, एवढीच त्यांच्या घरच्यांची मोजकी अपेक्षा होती.सुरुवातीच्या काळात दलालांच्या चित्रांचा कोलते सरांवर प्रचंड प्रभाव होता. त्यांच्या चित्रात जो जीवंतपणा होता, त्यामुळे कोलते सर भारवून गेले होते. तो जिवंतपणा आपल्याही चित्रात असावा यासाठी त्यांनी प्रयत्न केले. रंगांचं आकर्षण तर त्यांना होतंच, त्यातंच छबिलदासमध्ये त्यांना चांगले शिक्षक भेटले. त्यांची चित्रं बघताना कोलते सरांना वाटायचं की चित्रकला ही एक जादू आहे आणि चित्रं काढता काढता एक दिवस ती आपल्याला उमगेल.

छबिलदासमधल्या एम. एस. जोशी सरांकडे मॉडेल आर्टिस्टचा क्लास जॉइन करायला गेले असताना त्यांच्याच सल्ल्याने कोलते सरांनी जेजे स्कूल आर्ट्समध्ये प्रवेश घेतला. जेजेमध्ये एक वेगळंच विश्व कोलतेंसमोर उलगडलं गेलं. तिकडचे शिक्षक, शिस्त, लायब्ररी याचा कोलते सरांना खूप फायदा झाला. दातार सरांनी काढलेलं फळ्यावरचं बदक, जोशी सरांनी केलेला लॅन्डस्केप, कदम सरांनी केलेलं पोर्ट्रेट आज अनेक वर्षांनंतरही चित्रकलेचे पहिले धडे कोलते सरांच्या मनावर कोरले गेले आहेत. जेजेमध्ये त्यांना तंत्राची किमया कळली. ' पण अर्थात केवळ तंत्र म्हणजे कला नव्हे ' असं सांगत ते म्हणाले, ' माझी दृष्टी विकसित होत जाण्याची प्रक्रिया जेजेमध्ये घडली. 'पळशीकर सर हे कोलते सरांचे गुरू. ' मी आज जो कोणी आहे, तो पळशीकर सरांमुळे आहे. एका बाजूला देव उभा असेल आणि दुसरीकडे पळशीकर, तर मी पळशीकरांची निवड करीन. ' या शब्दात कोलते सरांनी पळशीकर सरांविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या. ' माझ्यातला जो मी पणा आहे तो पळशीकर सरांनी दिला ' असं सांगत कोलते सर पुढे म्हणाले, ' माझ्यासारख्या गिरणगावात रहाणार्‍या सामान्य माणसाला उचलून त्यांनी आयडेंटिटी दिली. त्यांनी असे अनेक विद्यार्थी घडवले. मोहन सामंत सारखे आंतरराष्ट्रीय किर्तीचे चित्रकार जगाला सांगायचे की मी जेजेमध्ये नाही तर पळशीकरांकडे शिकलो. 'आपल्यावर प्रभाव असणार्‍या प्रसिद्ध चित्रकार पॉल क्लीविषयी बोलताना ते म्हणाले, ' जेजेमध्ये असताना माझे सहकारी मला परदेशी चित्रकारांचे दाखले द्यायचे. त्यांच्यामुळे मी परदेशी चित्रकारांची पुस्तकं वाचायला लागलो. मग मला कळलं की जरी यांना भेटलो नसलो, तरी त्यांची आणि माझी जातकुळी एकच आहे. मला सांगितलं गेलं की डिक्शनरी घेऊन बस, आणि त्यांचे विचार समजून घे. मग मला तो छंद लागला. पॉल क्ली काय सांगतो? फॉलो द नेचर. बिकॉझ यू आर पार्ट ऑफ नेचर. आता याचा अर्थ जेव्हा मी शोधायला गेलो तेव्हा मला कळलं की आंब्याचं झाड हे आंब्याचंच झाड आहे, सह्याद्री हा सह्याद्रीच आहे. या सगळ्यांसारखंच मला माझं व्यक्तिमत्व आहे, माझी विचारसरणी आहे. मग या आतल्या स्वरुपाचा शोध घेण्याचा मी प्रयत्न केला. आणि त्यातूनच मला कळलं की हे आतलं चैतन्य मला कागदावर साकारायचंय. चित्रकाराच्या डोक्यातली कल्पना, रंग आणि विचार या सगळ्यातून मला चित्र साकारता आली. मला असं वाटायचं की मानवी मन इतकं विशाल आहे, की बाहेरच्या विश्वासारखी असंख्य विश्वं या मनाच्या कोपर्‍यात राहू शकतील. मग बाहेरच्या विश्वाची मला गरजच नाही. मग मी फक्त आणि फक्त ही अंतरंगातली चित्र रेखाटत गेलो.'' कशासाठी जगायचं, हे मला कळलं होतं. पेंटिंग करण्यासाठी माझा जन्म झालाय, आणि ते मला आवडतं म्हणून मी केलं. पेंटिंग हा माझ्यासाठी आत्मशोध आहे. जर मी तडजोड केली असती तर आज माझ्याकडे जे काही आहे, ते मी मिळवू शकलो नसतो. मला आवडतं म्हणून मी काम केलं. त्यात तडजोड करायचा प्रश्नच येत नाही. ' असं प्रभाकर कोलतेंनी सांगितलं. ' अर्थात सुरुवातीला मी अशी काहीतरी कामं केली. सगळया चित्रकारांप्रमाणे मीही म्युरल्स केली. पण काही काळानंतर मलाच जाणवलं की म्युरल्स करणं बरोबर नाही. मग काही काळानंतर मी ठरवून अशी चित्र काढणं बंद केलं. ' आयपीसीसाठी कोलते सरांनी जे नेहरूंचं चित्र काढलंय त्यात नेहरूंना आपल्या परिभाषेत कोलते सरांनी बद्ध केलं. पण यात गैर काय ? या प्रश्नाचं उत्तर देताना ते म्हणाले, ' चित्रकाराची कला, हा आतून निघणारा हुंकार आहे. पण नेहरूंचं चित्र काढण्याचं काम माझ्याकडे देण्यात आलं होतं, मी ते चित्र रेखाटावं, असंमला वाटलं नव्हतं. किंबहुना त्यातून मिळणारा मान, पैसा याला मी बळी पडलो, म्हणून मला त्याची खंत वाटते. '

' अ‍ॅब्स्ट्रॅक्ट चित्रकला हे माझ्या चित्रांना दिलेलं लेबल आहे. मुळात मी माझी चित्रं काढतो असं सांगत ते म्हणाले , ' ज्या गोष्टीची मी कल्पना केला आहे, त्याच्याशी माझी निष्ठा जोडली आहे. चित्रामध्ये चित्त आहे, तसं माझ्या मते पेंटिंगमध्ये पेन आहे, पेंट आहे आणि जसं नावं चालू वर्तमानकाळ दाखवतं तसं वर्तमान आहे. पेंटिंगमध्ये गती आहे. प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया थांबली की गती संपते. म्हणून मला असं वाटतं की पेंटिंग मला वर्तमानात जगायला शिकवतं. 'कोलते सरांवर वासुदेव गायतोंडे, प्रभाकर बर्वे या चित्रकारांचा प्रभाव आहे. आपल्या एकटेपणाविषयी ते म्हणाले, ' हा जो अलोनलेस आहे, तो कलाकाराठी आवश्यक आहे. या सृजनशील विश्वाचा जो बिंग बँग आहे, तिथपर्यंत दोघं जण जाऊ शकत नाहीत. तो एकट्यानेच शोधता येतो. ' 'कलाकाराची गरज असेल, तर त्याने समाजापासून दूर गेलं तरी समाजानं स्वीकारावं ', असंही कोलते सरांनी स्पष्ट केलं. ' अर्थात माझ्यात धैर्य नाही म्हणा किंवा मला जे जमतंय, ते लोकांपर्यंत पोहचवणं मला आवश्यक वाटतंय, म्हणून मी समाजापासून तुटलो नाही ' असं कोलते सरांनी सांगितलं. ' एक वेळ मी पेंटर झालो नसतो, पण शिक्षक नक्कीच झालो असतो ' असं सांगत ते म्हणाले, ' माझ्यावर माझ्या शिक्षकांनी इतका प्रभाव टाकला आहे, की माझे शिक्षक हे मला पंतप्रधांपेक्षाही ग्रेट वाटायचे. सोलापूरकर, पळशीकर, कदम, दातार एम एस जोशी असे इतके चांगले शिक्षक भेटले की मी शिक्षकच व्हायचं, हे मनाशी ठरवून टाकलं. 'आपल्या जेजेमधल्या शिक्षक म्हणून केलेल्या कामाविषयी ते म्हणाले, 'मी जेजेमध्ये गेलो तेव्हा मला कळलं की मला शिकवायची इच्छा आहे, पण शिकवता येत नाही. मग माझा स्वत:शी संघर्ष सुरू झाला. मी स्वत:मध्ये सुधारणा घडवून आणल्या. पण जेजेतले जुने शिक्षक सोडून गेल्यावर वातावरण फार बदललं. पण जुने लोक गेल्यावर जेजेच्या कारभारात सरकारची ढवळाढवळ सुरू झाली. आधीचे शिक्षक हे स्वतंत्र बाण्याचे होते, पण नंतर नंतर सगळा कारभार हा सरकारी बनत गेला. साधे साधे कार्यक्रम करायला दोन दोन महिने परवानगीची वाट पहावी लागली. त्यातच जेजे स्कूल ऑफ आर्ट्स एकाच वेळी जेजेतल्या 18 लोकांची ज्या वेळेस बदली केली गेली, तेव्हा आम्ही संप घडवून आणला. म्हणजे जेजेचं त्यांनी सरकारी खातं केलं. जेजेमध्ये शिकायचं आणि पुढे तिथेच शिक्षक म्हणून काम करायचं, ही जेजेची पंरपरा आहे. ती मोडण्याचा प्रयत्न झाला, तेव्हा आम्हाला संप करावा लागला. '' राखीव जागांना माझा विरोध नाही. पण तेवढी कुवत असली पाहिजे. नामदेव ढसाळ हे खूप मोठे कवी आहेत. तसंच, माझे शिक्षक कदम सर आहेत त्यांची जात विचारावी, असं माझ्या स्वप्नातंही आलं नाही. पण केवळ राखीव जागा म्हणून कोणालाही आणून बसवायचं आणि त्याच्याविरोधोत कोण काही बोललं, तर त्याच्यावर जातीयवादाचा आरोप करायचा हे ही चुकीचं आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.' जेजे स्कूल ऑफ आर्ट्सला स्वायत्तता मिळावी यासाठी मी खूप प्रयत्न केले. आणि आम्हाला स्वायत्तता हवी आहे कारण जशी आपण लोकशाहीची व्याख्या करतो की लोकांनी लोकांसाठी चालवलेलं लोकांच राज्य, या धर्तीवर मला जेजे स्कूल ऑफ आर्ट्स चालवायचं होतं. माझी मागणी त्यांना योग्य वाटली. त्यांनी मला एक प्रपोजल करून द्यायला सांगितलं. मी शासनाचा एक पैसाही न घेता मी अहवाल दिला. तीन महिन्यात त्यावर निर्णय होणार होता. आज चार महिने होऊन गेले, पण त्यावर निर्णय झाला नाही. ' असं कोलते सरांनी सांगितलं.पण शासनाची ही बेपर्वाई सगळीकडेच दिसून येतीय का, या प्रश्नाचं उत्तर देताना ते म्हणाले, ' शासन लांब राहिलं, ही बेपर्वाई घरापासूनच सुरू होते. म्हणजे हे कर, हे करू नका, असं घरापासून सांगितलं जातं. कलेचं बोलायचं तर पहिल्यापासूनच त्याला विरोध होतो. घर म्हणजे फक्त जेवायची आणि झोपायची जागा झाली आहे. मूल्यं हरवली आहेत, फक्त स्वार्थ राहिला आहे.कलेचा जो बाजार झालाय त्याविषयी आपली परखड मतं व्यक्त करताना कोलते सर म्हणाले, ' हा बाजार थाबंवणं शक्य नाही. जगभर कलेची हीच अवस्था झाली आहे. फक्त फरक हा आहे की युरोपात कलेची संस्कृती खोलवर रुजली आहे. सामान्य माणसाच्या घरातही आपल्याला पेंटिंग्ज दिसतात. उदाहरणच द्यायचं झालं तर पॅरिसमध्ये पॉल गोगँच्या चित्रांच प्रदर्शन बघायला आम्ही गेलो होतो. त्यावेळी तिथं आपल्याकडे सिद्धिविनायक मंदिरासमोर असते तशी रांग होती. आमच्याकडे इतका वेळ नव्हता. पण जेव्हा मी संयोजकांना सांगितलं, तेव्हा त्यांनी माझं स्वागत केलं, लवकर प्रवेश दिला. एवढंच नाही, तर तिकडचे महाग कॅटलॉग भेटही दिले. तिथे मी एका खूप साध्या कपड्यातल्या सर्वसामान्य माणसाला पाहिलं. सहज उत्सुकता म्हणून मी जेव्हा त्याच्याशी बोललो तेव्हा मला कळलं की तो शेतकरी आहे. मला आश्चर्य वाटलं. त्यावर त्यानं मला सांगितलं की पॉल गोगँ हा आमचा हिरो आहे. आमचा हिरो काय करतोय, हे बघायला मी इथे आलोय. याला मी संस्कृती म्हणतो. ती भाषणं देऊन शिकता येत नाही, तर ती रुजावी लागते. 'कोलते सरांनी आपल्या पुस्तकात गायतोंडे आणि एम. एफ. हुसेन यांची तुलना केली आहे. हुसेननी चित्रकलेला लोकप्रिय केलं. पण हुसेन इफेक्टनंतर कलेचा बाजार झाला हे मान्य करत ते म्हणाले, ' माझ्या मते भारतातील बहुसंख्य लोक मिडिऑकर आहे. काही असामान्य माणसं आहेत, पण सर्वसामान्य माणसांबाबत बोलायचं, तर जगण्यापेक्षा जिवंत रहाणं, त्यांच्यांसाठी महत्वाचं आहे. या परिस्थितीत सगळ्याच क्षेत्रांचा बाजार होणार आणि त्याचा परिणाम कलेच्या क्षेत्रावर होणारच. मी तर असं ऐकतो की आजकाल चित्रकारच आपली चित्र ऑक्शमनध्ये पाठवतो. मग जर चित्रकारानंच हे मान्य केलंय तर इतरांचं काय बोलायचं ! 'हुसेनविषयी बोलताना कोलते सर म्हणाले, ' हुसेन हा हुसेनसारखा जगला. माझ्या मते त्यानं चित्रकलेला खुलं केली. त्याने चित्र रंगवली, स्कल्पचर केली, चित्रपट काढले, स्टंट्स केले. पण त्यामुळे झालं काय की हुसेननं जे केलं ते आपणही करू शकतो, असं सगळ्यांना वाटलं. त्यतून काही चुकीचे संकेतही गेले. पण त्यामागचे हुसेनचे प्रयोग कोणाला कळले नाही. त्याचा श्वेतांबरी नावाचा जो प्रयोग होता, तो बर्‍याच लोकांना कळलाच नाही. स्वत:ला विसरून कलेच्या आत ते घुसू शकले नाहीत. लोकांनी त्याच्याकडून अपेक्षा ठेवल्या आणि त्या पूर्ण करण्यासाठी तो जगला नाही. मला त्याच्या सगळ्याच गोष्टी आवडत नाहीत, पण त्याने चित्रकलेला चांगले दिवस मिळवू दिले, हे नाकारता येणार नाहीत. 'कलाकाराच्या स्वातंत्र्याविषयी बोलताना कोलते सर म्हणाले, ' जोपर्यंत आपण आपापसातली भांडणं विसरू शकत नाही, एकसंध होऊ शकत नाही तोपर्यंत कलाकाराला अपेक्षित असणारं स्वातंत्र्य या देशात मिळू शकणार नाही.नवीन चित्रकारांविषयी बोलताना कोलते सर म्हणाले, ' नवीन चित्रकार वैचारिक पातळीवर बरेच वर आहेत, पण त्यांना दिशा नाही. त्यांना दिशा द्यायची असेल, तर चांगल्या इन्स्टिट्यूट्स हव्यात. जेजे स्कूल ऑफ आर्ट्सचं एवढं नाव झालं कारण उत्तम विद्यार्थी घडवणारी शिक्षकांची टीम तिकडे होती. बडोदा स्कूल ऑफ आर्ट्सकडे आजही काही प्रमाणात अशी टीम आहे. पण इन्स्टिट्यूट म्हणजे इमारत नाही, हे जोपर्यंत लोकांना कळणार नाही, तोपर्यंत हे शक्य नाही. यासाठी मीडिया खूप चांगली भूमिका पार पाडू शकते, असंही ते म्हणाले.या मुलाखतीचा शेवट करताना आयबीएन लोकमतचे संपादक निखिल वागळे म्हणाले, ' प्रत्येक क्षेत्रात यशस्वी माणसं असतात. पण आपल्या क्षेत्राला दिशा देऊ शकणारी माणसं खूप कमी असतात. प्रभाकर कोलते, हे त्यांपैकीच एक आहेत. '

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 9, 2008 04:00 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close