S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • ऑस्ट्रेलियाविरुद्धचा विजय भारताला विशेष बळ देणारा आहे का ?
  • ऑस्ट्रेलियाविरुद्धचा विजय भारताला विशेष बळ देणारा आहे का ?

    Published On: Nov 12, 2008 01:35 PM IST | Updated On: May 13, 2013 02:20 PM IST

    नागपूर कसोटीत ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय मिळवून भारतीय क्रिकेट संघानं टेस्ट सिरीज 2-0 ने जिंकली. क्रिकेट क्षेत्रात जगजेते असलेल्या ऑस्ट्रेलियन टीमनं बचावात्मक खेळ केला. पराभवानंतर ऑस्ट्रेलियन मीडियाने रिकी पॉण्टिंगसह टीमवर टीका केली. हा विजय सर्व क्रिकेटप्रेमी जल्लोष साजरा करत आहेत. भारतीय टीमची वाटचाल जगजेते बनण्याच्या दिशेनं वाटचाल होऊ लागली आहे, असा क्रिकेटप्रेमींना मनापासून वाटतंय. भारताने ऑस्ट्रेलियावर मिळवलेल्या विजयाच्या पार्श्वभूमीवर 'आजचा सवाल ' मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धचा विजय भारताला विशेष बळ देणारा आहे का ? यावर चर्चा करण्यात आली. या चर्चेत माजी क्रिकेटपटू सुलक्षण कुलकर्णी, क्रिकेट समीक्षक द्वारकानाथ संझगिरी आणि आयबीएन-लोकमतचे स्पोर्टस एडिटर संदीप चव्हाण सहभागी झाले होते. ' गेल्या 25 वर्षांत ऑस्ट्रेलियन टीमला टेस्टमध्ये कोणीही 2-0 ने हरवलेलं नव्हतं. ते भारतानं करून दाखवलं. संघात आक्रमकपणा दिसला. विजयात सातत्य असेल तरच भारत जगजेता होऊ शकेल ', असं द्वारकानाथ संझगिरी चर्चेत म्हणाले. भारताच्या विजयाबद्दल बोलताना सुलक्षण कुलकर्णी म्हणाले की यावेळच्या ऑस्ट्रेलियन टीममध्ये शेन वॉर्न आणि मॅग्रा नव्हते. स्पिन अ‍ॅटकही कमकुवत होता. पण ऑस्ट्रेलियन टीम ज्याकरता ओळखली जाते, ती दिसली नाही. टीमचं लक्ष ऑन द फिल्ड पेक्षा ऑफ फिल्ड होतं. संझगिरी यांनी ही ऑस्ट्रेलियन टीम निगेटिव्ह आणि अ‍ॅटॅकिंग वाटली नसल्याचं मत व्यक्त केलं.टेस्ट क्रिकेटमध्ये धोनी सर्वात्कृष्ट कॅप्टन होईल का ? या प्रश्नावर सुलक्षण कुलकर्णी म्हणाले, धोनीची वाटचाल सर्वाेत्कृष्ट कॅप्टन म्हणून वाटचाल सुरू झाली आहे, असं म्हणता येईल तर संझगिरी म्हणाले की धोनीमध्ये गांगुलीसारखा आक्रमकपणा आहे पण तो सर्वाेत्कृष्ट कॅप्टन होईल का, याबाबत बोलणं खूप लवकर होईल. इतर खेळांमध्येही भारतीय खेळाडू यश मिळवत आहे.ऑलिम्पिकमध्ये ते दिसून आलं. याबाबत बोलताना संदीप चव्हाण म्हणाले, सध्याच्या खेळांडुमध्ये आक्रमकपणा वाढत चालला आहे. ऑलिम्पिकमध्ये अभिनव बिंद्रानं गोल्ड मेडल मिळवल्यानंतर इतर खेळाडूमध्ये आत्मविश्वास आला होता. सायना नेहवाल पदकाच्या जवळ पोहचली होती '. चर्चेचा शेवट करताना आयबीएन लोकमतचे संपादक निखिल वागळे म्हणाले की, भारतात खेळांचं भवितव्य उज्ज्वल आहे. पण त्याला दिशा द्यायला हवी. सरकारनेही मदत केली पाहिजे तरच भारताला अनेक सुवर्णपदकं आणि विजय मिळतील.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close