S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • उत्तर भारतीय महाराष्ट्रात असुरक्षित आहे का ?
  • उत्तर भारतीय महाराष्ट्रात असुरक्षित आहे का ?

    Published On: Nov 11, 2008 02:49 PM IST | Updated On: May 13, 2013 02:21 PM IST

    राहुल राज एन्काऊंटर त्यानंतर धर्मदेव रायचं मारहाणीत झालेला मृत्यू आणि हरियाणात मराठी कुंटुंबाला राज्य सोडण्याची धमकी. दिवसेंदिवस भाषिक द्वेषाचा वणवा भडकत चालला आहे. बिहारी नेत्यांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी केंद्रावर दबाव आणलाय आणि आता सुप्रीम कोर्टानंही उत्तर भारतीयांच्या सुरक्षिततेबाबत राज्य सरकारला नोटीस बजावलीय. परप्रांतीयांवर होणारे हल्ले थांबवण्याची राजकीय इच्छाशक्ती सरकारकडे नाही, असा ताशेराही न्यायालयानं ओढला.यावरच 'आजचा सवाल ' होता उत्तर भारतीय महाराष्ट्रात असुरक्षित आहे का ? या चर्चेत पत्रकार अनिल त्रिवेदी, सुप्रीम कोर्टात उत्तर भारतीयांच्या प्रश्नावर याचिका दाखल करणार्‍या याचिकाकत्याचे वकील सुग्रीव दुबे, अ‍ॅड. माजीद मेमन आणि राष्ट्रवादीचे सरचिटणीस उदयप्रताप सिंग सहभागी झाले होते. उत्तर भारतीय महाराष्ट्रात असुरक्षित असल्याचं सांगत सुग्रीव दुबे यांनी संविधानाचा दाखला दिला. आपण भारतीय नागरिक आहोत. संविधानाने देशात कोणालाही कुठे राहण्याची तरतूद आहे. संविधानाचं आपण पालन नाही केलं तर या देशाचे तुकडे होतील, असं दुबे यावेळी म्हणाले. चर्चेत सहभागी झालेले अ‍ॅड. माजीद मेमन म्हणाले, ' मुंबई हे फार मोठं शहर आहे. इथे तुरळक घटना घडतच असतात. काही दिवसांपूर्वी मनसेनं राजकीय वातावरण निमिर्ती केली होती, पण मुंबईत उत्तर भारतीय पूर्णपणे सुरक्षित आहेत. मूळचे रायबरेलीचे असलेले अनिल त्रिवेदी यांनी महाराष्ट्राच्या संस्कृती काय हे प्रभावीपणे चर्चेच मांडले. ' उत्तर भारतीय असुरक्षित असल्याचा चुकीचा समज आहे. माझं शिक्षण मराठी शाळेत झालं आहे ',असं त्रिवेदी म्हणाले. उदयप्रताप सिंग यांनीही तीच भूमिका मांडली. वकील दुबे यांनी उत्तर भारतीय विद्यार्थ्यांना मारहाण तसंच राहुल राज प्रकरणात कायद्याची पायमल्ली केल्याचा मुद्दा मांडला. यावर बोलताना अनिल त्रिवेदी म्हणाले, बसमध्ये विनापरवाना बंदूक घेऊन शिरणं, हे कायद्यात बसतं का ? बसमध्ये बंदूक घेऊन शिरणं, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. ती कानपूर,जौनपूरमध्ये आहे. पोलमध्ये विचारण्यात आलेल्या उत्तर भारतीय महाराष्ट्रात असुरक्षित आहे का ? या प्रश्नावर 51 टक्के लोकांनी 'हो' मत नोंदवलं. चर्चेचा शेवट करताना आयबीएन-लोकमतचे संपादक निखिल वागळे म्हणाले की, उत्तर भारतीय महाराष्ट्रात असुरक्षित म्हणणं, हे अतिरेकीपणाचं होईल. कोणताही महाराष्ट्रीय हे खपवून घेणार नाही. महाराष्ट्र सर्वांसाठी सुरक्षित आहे, हे ठामपणे सांगितलं पाहिजे.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close