S M L

मुलांसाठी हेल्पलाइन

प्रत्येक मुलाची शारीरिक आणि मानसिक काळजी घेणं गरजेचं असतं. अशावेळी पालकांनी काय केलं पाहिजे यावर 'टॉक टाइम'मध्ये 'बालप्रफुल्लता' या संस्थेचे प्रकल्प अधिकारी स्नेहल राणे यांनी मार्गदर्शन केलं. मुलांची व्याख्या, मुलांचे अधिकार, मुलांचे हक्क याविषयी त्यांनी सांगितलं. याचबरोबरीने मुलांसाठी हेल्पलाईन काय काय काम करते याचीही माहिती स्नेहल राणे यांनी दिली. संयुक्त राष्ट्रसंघाने 1989 साली मुलांसाठी 54 अधिकार बनवले आहेत. तर याच संयुक्त राष्ट्राने भारतातल्याच नाही तर संपूर्ण जगभरातल्या मुलांची व्याख्या तयार केली आहे. 18 वर्षांखालची कोणतीही व्यक्ती (मग तो मुलगा असो वा मुलगी) ही मूल असते. एखाद्या मुलाला जर कोणत्याही प्रकारची मदत हवी असेल तर ती हेल्प लाइनच्या माध्यमातून पूर्ण केली जाते. मग ती मदत छोट्यात छोटीही आणि मोठ्यात मोठी असू शकतो. या मदतीबाबत सांगताना स्नेहल राणे म्हणाले की, 'बालप्रफुलता'मध्ये मुलांच्या निरनिराळ्या प्रकल्पांवर कामं केली जातात. जसं घरातून पळून आलेली मुलं, घर कामगार, जरी कामगार, बालमजूर, विविध स्थरांतली मुलं यांचे समस्या, त्यांच्या मागण्या यांच्यावर आम्ही प्रकल्प करतो. त्या माध्यमांतून त्यांच्या समस्या सोडवल्या जातात. यासाठी स्नेहल राणे यांनी काही हेल्पलाइन सांगितल्या आहेत. त्या पुढीलप्रमाणेज्ञ् बालप्रफुल्लता - 0222-8265618, 8255889. प्रथम- 0222- 65134884.साथी- 0222-23090026.प्रत्येक मुलाचा जगण्याचा, विकासाचा, सहभागाचा, सुरक्षिततेचा अधिकार आहे. तो त्याला मिळायलाच पाहिजे असंही ते म्हणाले. मुलांकडे दुर्लक्ष करु नका, मुलांना योग्य मार्गदर्शन करा, मुलांची काळजी घ्या असंही ते म्हणाले.(बालप्रफुल्लता ही संस्था बालमजूर, मुलांचे अधिकार, मुलांच्या समस्यांवर काम करते.)

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 13, 2008 12:03 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 13, 2008 12:03 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close