S M L

डायबेटिस म्हणजे काय?

भारतात सर्वात जास्त लोकांना डायबेटिस होतो. 4 कोटी डायबेटिस झालेले लोक एकट्या भारतात आहेत, तर संपूर्ण जगात 20 टक्के लोकांना डायबेटिस होतो. त्या 20 टक्क्यांमध्ये भारतातले डायबेटिक्स रूग्ण सर्वाधिक आहेत. तर डायेबेटिसवर मात कसा करावा, आपली काळजी कशी घ्यावी याची माहिती 'टॉक टाइम'मध्ये डायबेटिस तज्ज्ञ विजय कुलकर्णी यांनी दिली. 20 ते 25 वर्षांपूर्वी भारतात डायबेटिसचं प्रमाण अत्यंत कमी होतं. पण जसजसं लोकांचं राहणीमान बदललं, खाण्यापिण्याच्या सवयी बदलल्या तसतसं डायबेटिसचं प्रमाण वाढलं. अनियमित खाण्याच्या सवयी, प्रमाणापेक्षा जास्त खाणं, व्यायाम न करणं, धूम्रपान, दारूचं सेवनसारख्या सवयींमुळे डायबेटिसचं प्रमाण वाढतं. पहिल्या भागात डॉक्टरांनी डायबेटिसची म्हणजे काय ते सांगितलं. डायबेटिस हा एकप्रकारचा मेटॅबॉलिक सिन्ड्रोम आहे. मेटॅबॉलिक सिन्ड्रोम म्हणजे अनेक प्रकारच्या आजारांतून होणारा रोग. ब्लड प्रेशर, इन्सुलीनचं प्रमाण कमी होणं याचा विपर्यास नंतर डायबेटिस मध्ये होतो.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 14, 2008 12:18 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 14, 2008 12:18 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close