S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • मालेगाव बॉम्बस्फोटाच्या राजकारण केलं जातंय का ?
  • मालेगाव बॉम्बस्फोटाच्या राजकारण केलं जातंय का ?

    Published On: Nov 18, 2008 11:49 AM IST | Updated On: May 13, 2013 02:16 PM IST

    मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाची सुनावणी नशिकच्या कोर्टात सुरू आहे. कोर्टाबाहेर हिंदुत्ववादी संघटनाकडून आरोपींचं समर्थन केलं जातंय. बॉम्बस्फोटाचा तपास करणार्‍या एटीएस पथकावर राजकारण्यांकडून संशय व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी अटकेत असलेल्या कर्नल पुरोहितनं समझोता एक्सप्रेसच्या बॉम्बस्फोटाप्रकरणी आरडीएक्स पुरवलं की नाही, याचा तपास होत असताना भाजपकडून आरोप प्रत्यारोप होत आहेत. या प्रकरणावरच होता आजचा सवाल. प्रश्न होता मालेगाव बॉम्वस्फोटाच्या तपासाचं राजकारण केलं जातंय का ?. यावर बोलण्यासाठी चर्चेत भाजपचे नेते नितीन गडकरी, हुसेन दलवाई, निवृत्त आय.पी.एस.ऑफिसर सुधाकर सुराडकर आणि आयबीएन लोकमतचे नाशिक ब्युरो चीफ निरंजन टकले सहभागी झाले होतं. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात हिंदू संतांना उगाच गोवलं जातंय का ? या संपादक निखिल वागळे यांच्या प्रश्नावर नितीन गडकरी म्हणाले, हे खरं आहे. समझौता एक्सप्रेस प्रकरणात एटीएसला माघार घ्यावी लागली आहे. पोलिसांनी बेल्टनं मारहाण केल्याचं साध्वीनं आज कोर्टात प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे. एका सभेत शरद पवारांनी म्हटलं होतं, मुस्लीम अतिरेक्यांनाच नेहमी टार्गेट केलं जातं.त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. मतपेटीच्या राजकारण्यासाठी सरकारच्या एजन्सीचा वापर केला जातोय. यावर बोलताना काँग्रेसचे नेते हुसेन दलवाई यांनी सर्व आरोप फेटाळले. हे सर्व चुकीचं आहे. याआधी कुठला अतिरेकी पकडला गेला की, त्याला मोक्का लावा. एटीएसच्या तपासात कॉग्रेस-राष्ट्रवादीचा कुठलाही हस्तक्षेप नाही, असं हुसेन दलवाई म्हणाले. राजकारण्यांच्या आरोप-प्रत्यारोपाचा तपासावर परिणाम होतो का ? या प्रश्नावर माजी आयपीएस अधिकारी सुधाकर सुराडकर म्हणाले की एटीएसच्या तपासावर परिणाम होतो. मात्र एटीएसचे प्रमुख हेमंत करकरे यांना चांगल्याप्रकारे मी ओळखतो. त्यांच्यावर कोणताही दबाव येत नाही. चर्चेमध्ये नितीन गडकरी यांनी काँग्रेसवर थेट आरोप केला. ' सीबीआय म्हणजे काँगेस ब्युरो ऑफ इन्व्हस्टेगेशन झालंय. काँग्रेस त्याचा पुरेपर फायदा उठवतोय ' असं गडकरी म्हणाले. याला प्रत्युत्तर करताना दलवाई म्हणाले की आरएसएसची माणसं सीबीआय आणि मिलिटरीमध्ये आहेत. सीबीआयचा वापर भाजपकडून केला गेला आहे. पत्रकार निरंजन टकले यांनी मालेगाव स्फोट प्रकरणात समझोता एक्सप्रेसचा मुद्यावर एटीएसच्या वकिलांनी कोर्टात सांगितलेली माहिती स्पष्ट केली.दरम्यान, हिंदुची मतं मिळवण्यासाठीच भाजप हे राजकारण करतंय, असं सुधाकर सुराडकर यांनी म्हटलं. यावर बोलताना गडकरी म्हणाले, आम्ही राजकारण करत नाही फक्त एटीएसनं निरपेक्ष तपास करायला हवा,असं आमचं म्हणणं आहे. मालेगाव बॉम्बस्फोटाच्या राजकारण केलं जातंय का ? या पोलमध्ये विचारण्यातआलेल्या प्रश्नावर 87 टक्के लोकांनी 'हो' असं मत नोंदवलं. चर्चेचा शेवट करताना संपादक निखिल वागळे म्हणाले की बॉम्बस्फोट कुठलाही असो. तो कुठल्याही धर्माच्या अतिरेक्यानं केलेला असो.तो एक देशद्रोहाचा गुन्हा आहे. त्यामुळे त्यावर राजकारण करताना विचार करायला हवा.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close