S M L

सूर तेच छेडिता... (भाग -1)

कल्पना करा... तुमच्या पहाटेची सुरुवात अहिर भैरव या रागाने झाली तर... पूर्ण दिवस चांगला जाईल...दिवसाची सुरुवात प्रसन्न आणि चांगली करायची असेल तर 19 नोव्हेंबर 2008 चा 'सलाम महाराष्ट्र' व्हिडिओवर ऐका. कारण त्या दिवशीच्या भागात शास्त्रीय आणि उपशास्त्रीय गायिका तनुजा जोग आल्या होत्या. त्यांनी अहिर भैरव या रागातली ' तेरोनी या सुख पाये ' ही बंदिश गाऊन प्रेक्षकांची सकाळ ' सुप्रभात ' केली. ठुमरी आणि गझलवर हुकमत असणा-या गायिका तनुजा जोग यांनी खूप छान छान ठुमरी आणि गझल गायल्या.तनुजा जोग यांच्याला गाण्याचा टॅलेण्ट त्यांच्या आजीने अचूक ओळखला. आजीने त्यांना गाणं गाण्यासाठी ख्‌ूप प्रोत्साहन दिलं. लग्नानंतर त्यांच्या मिस्टरांनीही त्यांना गाणं गाण्यासाठी प्रोत्साहन दिल. पं. वसंतराव देशपांडे, शोभा गुर्टु, यशवंत देव यांच्या संस्काराने त्यांचं गाणं बहरलं. समृद्ध झालं. " माझ्या नशिबाने मला गुरू चांगले लाभले. त्यांच्यामुळे मला खूपशा गोष्टी शिकता आल्या. त्यामुळे माझ्या आवाजाला मॅच्युरिटी प्राप्त झाली. चांगले गुरू लाभले हाच माझ्या दृष्टीने मला लाभलेला सर्वोच्च पुरस्कार आहे," असं तनुजा जोग यांनी अभिमानाने सांगितलं. आजच्या कार्यक्रमात त्यांनी शोभा ताईंची आठवण सांगितली. " गाण्यात गायकीला, सूर, ताल यांना जितकं महत्त्व असतं तितकं महत्त्व आपण गाणं कसं म्हणतो, ते कसं सादर करतो, याला असतं. मला याची जाणीव शोभा ताईंनी करून दिली. 'पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा' ही बैठकीची लावणी मला शिकवताना शोभा ताईंनी मस्त शालू नेसला होता. छान दागिने होते. नंतरच त्यांनी मला गाणं शिकवायला सुरुवात केली. तेही मस्तपैकी हावभावा सहीत..." ही आठवण सांगून त्यांनी 'पिकल्या पानाचा...' ही बैठकीची लावणी म्हटली. ख्याल आणि ठुमरीतला फरक तनुजा जोग यांनी सांगितला. ख्याल हे गंभीर स्वरुपाच्या गायकीचा प्रकार आहे. ख्यालमध्ये विचार मांडलेला असतो. तर ठुमरीमध्ये शृंगार आणि विनोदाला स्थान असतं, असंही त्या म्हणाल्या. तनुजा जोग यांनी गायलेल्या गाण्यांची सुरेल मैफल तुम्हाला शेजारच्या व्हिडिओवर पाहता येईल.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 19, 2008 07:42 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 19, 2008 07:42 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close