S M L

असुरक्षित पुरूष मन (भाग -1)

19 नोव्हेंबर या जागतिक पुरुष दिवसानिमित्त ' टॉक टाइम 'मध्ये 'असुरक्षित पुरुष मन ' या संवेदनशील विषयावर चर्चा झाली. 'असुरक्षित पुरुष मन ' या विषयावर करण्यासाठी ' टॉक टाइम 'मध्ये मानसोपचार तज्ज्ञ आशिष देशपांडे आले होते. पुरुषांनी आपल्या मनातली असुरक्षितता घालवण्यासाठी काय काय करायला हवं यावर डॉक्टरांनी मार्गदर्शन केलं आणि अनेकांच्या शंकांचं निरसनही केलं. भावना बदलत चालल्या आहेत, समाजामध्ये आर्थिक बदल होत आहे. तर अशा बदलत्या समाजामध्ये पुरुष मन कधी आणि केव्हा असुरक्षित होतं, याबाबत मानसोपचार तज्ज्ञ डॉ. आशिष देशपांडे सांगतात - " घर हे दोघांचं असतं. आता झालंय काय तर स्त्रियांच्या ज्या काही स्वत:च्या आणि आयुष्याकडच्या अपेक्षा आहेत, त्या पूर्वी नव्हत्या. पूर्वी स्वत:च्या कसल्याच अपेक्षा नसणारी स्त्री आता स्वत:च्या अपेक्षा, गरजा आपसुकच पूर्ण करत आहे. मग त्या गरजा आर्थिक असो, सामाजिक असो, मानसिक की शारीरिक... त्यामुळे घरात कुठेतरी इमबॅलन्स, असमतोल निर्माण झाला आहे. स्त्री आपल्यापेक्षा हे कसं काय मिळवू शकते याचा पुरुष मनवर परिणाम होत आहेत." यावर डॉ. आशिष देशपांडे यांनी निरनिराळे उपाय सांगितले आहेत. ते तुम्हाला शेजारच्या व्हिडिओवर पाहता येईल.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 19, 2008 11:50 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 19, 2008 11:50 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close