S M L

पारंपरिक गुंतवणूक

पारंपरिक गुंतवणूकशेअर मार्केटखाली आल्यामुळे आता पैसे कुठे गुंतवावे याबाबत अनेकजण काळजीत आहेत.मंदीचा फटका म्युच्युअल फंडावरही पडलेला दिसत आहे. आता गुंतवणुकीचे कोणते पर्याय उपलब्ध आहेत यावर आपण माहिती घेणार आहोत गुंतवणूक तज्ञ मधुसूदन सोहनी यांच्याकडूनसोहनी सांगतात, मंदी आली म्हणून नव्हे तर नॅशनल सेव्हिंग , पीपीएफ या पर्यायाकडे प्रत्येकाने अगदी पहिल्यापासून गुंतवणूक केली पाहिजे. आपल्या वयानुसार, ऐपतीनुसार स्वत:च्या भविष्याकरिता सर्वांनी गुंतवणूक ही केलीच पाहिजे. पोस्टल डिपॉझिट, बँक डिपॉझिट या सेफ गुंतवणूक म्हणून ओळखल्या जातात. पोस्टातील पैसे बुडत नाहीत. परंतु ज्यावेळी आपण बँकात मोठी गुंतवणूक करतो त्यावेळी योग्य बँक पाहूनच नंतर त्यात बचत करावी. केवळ जास्त व्याज देते म्हणून त्या बँकेची निवड करू नये. त्या बँकेची त्यावर्षाची बॅलन्सशिट, मार्केटमधील पोझिशन पाहूनच बँकेत पैसे गुंतवावे. ब-याच बँका आता फिक्स डिपॉझिटवर कर्ज देतात. म्हणजेच आपल्या एफडीच्या अगेनस्ट आपल्याला लोनही मिळू शकतं. मंदीच्या शेअर बाजारातील अनेक कंपन्याचे शेअर कमी भावात मिळत आहेत. ते दर भविष्यात जरूर वाढतील म्हणून मोठया कंपन्याचे शेअर जरूर विकत घ्यावेत.सोहनी सांगतात सध्याच्या परिस्थितीत कोणत्याही एका म्युच्युअल फंडात सेव्हिंग करणं फायदेशीर ठरणार नाही. त्यामुळे योग्यवेळी कंपनीची स्थितीपाहून वेगवेगळया फंडात पैसे गुतंवावे. या कार्यक्रमात मधुसूदन सोहनी यांनी पीएफबद्दल तसेच पोस्टाच्या विविध योजनांची, त्यांच्या दराची माहिती दिली.गुंतवणुकीच्या योग्य पर्यायाविषयी अजून माहिती घ्यायची असल्यास सोबतचा व्हिडिओ पहा.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 19, 2008 04:12 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 19, 2008 04:12 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close