S M L

मंत्रिमंडळात पुरुषांसाठी स्वतंत्र खातं असावं का ?

जागतिक पुरुष दिन. कौटुंबिक अत्याचार विरोधी कायदे, हुंडाविरोधी कायदे आणि इतरही अनेक कायदे महिलांना झुकतं माप देतात आणि पुरुषाला मात्र कायम आरोपीच्या पिंजर्‍यात उभं करतात, असा आरोप पुरुष हक्क संघटना करत आहेत. मुलांचा ताबा, घटस्फोट, पोटगी अशा प्रकरणातही पुरुषांवर अन्याय होतो, असं सांगत त्यांनी आयपीसीचं कलम 498-अ रद्द करण्याची मागणी केली आहे. दिल्लीतील ' सेव्ह फॅमिली फाऊंडेशन ' नं निदर्शनं करुन महिलाप्रमाणे पुरुषांचं कल्याण खातं असण्याची मागणी पुरुषांनी केली आहे. जागतिक पुरुष दिनानिमित्त यावरच आजचा सवाल होता. प्रश्न होता मंत्रिमंडळात पुरुषांसाठी स्वतंत्र खातं असावं का ? . या चर्चेत ' मेन अगेन्स्ट वॉयलेन्स अ‍ॅन्ड अब्युस ' चे मानद सचिव हरीश सदानी, स्त्री-मुक्ती संघटनेच्या सहसचिव नीलिमा देशपांडे आणि पुरुष हक्क संरक्षण संस्थापक सचिव धर्मेंद्र चव्हाण सहभागी झाले होते. पुरुष हक्क दिनाची गरज आहे का ? हा प्रश्न विचारुन आयबीएन लोकमतचे संपादक निखिल वागळे यांनी चर्चेला सुरूवात केली. 'पुरुष दिनाची खरंच गरज आहे. महिलांनी पुरुषांवर अत्याचार करण्याचं प्रमाण वाढलं आहे. 498 (अ) अंतर्गत पुरुषांवर गुन्हे दाखल करण्याचं प्रमाण वाढत आहे. 498 (ए ) अंतर्गत पुरुषांवर गुन्हे दाखल करण्यापूर्वी पोलिसांनी फेरविचार करावं, असं निवेदन नाशिक पोलीस आयुक्तांना आम्ही संघटनेच्यावतीनं दिलं आहे ', असं धर्मंद चव्हाण म्हणाले. यावर बोलताना नीलिमा देशपांडे म्हणाल्या, पुरुष खरंच दुर्बल आहेत का ? तसं त्यांनी जाहीर करावं. महिला दिनाची गरज आहे. रोज पेपरमध्ये महिलांवरील अत्याचारांच्या बातम्या येतात. महिला पुरुषांवर अत्याचार करतच नाही. ते खोटं बोलत आहेत. तसं असेल तर त्यांनी पुरावा द्यावा '. पुरुषांवरील अत्याचारांबाबत आकडेवारी उपलब्ध नसल्याचं यावेळी चव्हाण म्हणाले. 'महिलांना 498 ( ए ) अंतर्गत केस दाखल करण्याचा पर्याय सर्वात शेवटी दिला जातो. ते प्रमाण 1 टक्क्याहून कमी आहे ', असं हरीश सदानी यांनी स्पष्ट केलं. स्त्री मुक्ती चळवळ ही पुरूष सहभागाशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. महात्मा फुले, आगरकर आणि कर्वे हे महिलाविरोधी नव्हते. स्त्रियांच्या उद्धारासाठी त्यांनी फार मोठं काम केलं आहे, असं नीलिमा देशपांडे यांनी सांगितलं तर पुरुषप्रधान संस्कृतीचा महिलाप्रमाणे पुरुषांवरही अन्याय होत आहे. त्याकरता मुक्तपणे बोललं पाहिजे तरच स्त्री-पुरूषांमध्ये समन्वय साधला जाईल ' असं सदानी म्हणाले. मंत्रिमंडळात पुरुषांसाठी स्वतंत्र खातं असावं का ? या पोलमध्ये विचारण्यात आलेल्या प्रश्नावर 89 टक्के लोकांनी ' हो ' असं मत नोंदवलं. चर्चेचा शेवट करताना संपादक निखिल वागळे म्हणाले की स्त्री आणि पुरुषांमध्ये संवाद हवा, समन्वय हवा. स्त्री- पुरुष दोघांची निमिर्ती जग चालण्यासाठी झाली आहे. एकमेकांवर आरोप करुन काही साध्य होणार नाही. स्त्रियांची चळवळ पुरुषांशिवाय पूर्ण होणार नाही आणि पुरुषांची चळवळ स्त्रियांच्या सहभागाशिवाय पूर्ण होणार नाही. हे नातं समजून घेतलं तर अधिक संघर्ष होणार नाही.

आईबीएन लोकमत | Updated On: May 13, 2013 02:14 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 20, 2008 12:29 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close