S M L

टीव्ही आणि अभिनेता सुनील (भाग - 1)

' वर्ल्ड टेलिव्हिजन ' डे निमित्ताने 21 नोव्हेंबरच्या ' टॉक टाइम 'मध्ये सुनील बर्वे अभिनेता सुनील बर्वेला आमंत्रित करण्यात आलं. सुनील छोट्या पडद्यावर विनय आपटेंमुळे आला. ' गजरा ', ' चाळ नावाची वाचाळ वस्ती ', ' इमारत ' सारख्या जुन्या पण लोकांच्या लक्षात राहणा-या मालिकांमधून त्याने कामं केली आहेत. त्याने 'टॉक टाइम'मध्ये त्याच्या छोट्या पडद्यावरच्या आठवणी सांगितल्या. तो सांगतो, " पूर्वी मालिका या सिनेमाच्या तंत्राने बनवल्या जायच्या. टेलिव्हिजनचं तंत्र फारसं कुणाला ठाऊक नव्हतं. त्यात आम्ही रंगभूमीवर काम करणारी माणसं. रंगभूमीवर काम करणं आणि टीव्हीवर काम करणं यात जमीनआसमानाचा फरक असतो. तोही आम्हाला शिकावा लागला. सगळं काही झटपट नाही तर आम्ही टप्प्याटप्प्याने शिकलो." छोट्या पडद्यावर जे काही बदल झाले त्या बदलांविषयीही सुनील बोलला. पूर्वी 10 ते 15 भागांच्या मालिका असायच्या. त्याच्यानंतर ट्रेंड आला तो विकली मालिकांचा. खाजगी वाहिन्या आल्यावर डेलिसोपच्या ट्रेण्डला सुरुवात झाली. आणि आता आलाय तो रिअ‍ॅलिटी शोचा,' अशी माहिती सुनील बर्वेने दिली. सुनील बर्वेने सांगितलेल्या छोट्या पडद्यावरच्या आठवणी तुम्हाला ह्या व्हिडिओवर ऐकता आणि पाहता येतील. सुनीलने त्याचा थोडावेळ 'आयबीएन लोकमत 'च्या वेबसाईटलाही दिला. त्याने आतापर्यंत छोट्यापडद्यावर भरपूर काम केलं आहे. सुनीलची आवडती मालिका आहे ' प्रपंच '. सुनील सांगतो, " प्रपंच ही मालिका मला आवडते कारण त्यातले संवाद. या मालिकेत इतकं छान कौटुंबिक वातावरण दाखवलं होतं की ते माझ्या मनातून जाता जात नाही. काही दिवसांपूर्वी 'प्रपंच 'चा चमू एकत्र भेटला होता. फक्त रेखा ताई आणि सुधीर जोशी नव्हते. आम्ही सगळ्यांनी एकत्र भेटून केक कापला. आणि ' प्रपंच 'च्या जुन्या आठवणींना उजाळा दिला, " 'प्रपंच' बाबत बोलताना सुनील मस्तपैकी 'प्रपंच'च्या आठवणींमध्ये रमला. सुनीलला त्याचा 'मेघ दाटले 'मधला निगेटीव्ह रोल आवडतो. निघता निघता सुनील एक गोष्ट बोलून गेला. आणि ती अशी की, छोट्यापडद्याने खूप जणांना पैसा, प्रसिद्धी, मनामर्यादा मिळवून दिली. काही जणांना स्वत:चं घर आणि गाडी विकत घेता आली. त्यामुळे आम्हा प्रत्येकाच्या आयुष्यात छोट्यापडद्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 21, 2008 03:25 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 21, 2008 03:25 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close