S M L

हत्ती इले रे..! भाग 1

दिनेश केळुस्कर सिंधदुर्ग, गोवा आणि कोल्हापूरातील चंदगडमध्ये हत्तींचा धुडगूस सुरू आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात तर कर्नाटकातून आलेल्या हत्तीनी शेतकर्‍यांच्या समृद्धीवरच घाला घातलाय. माणसांच्या वस्त्यांवर हत्तींचं धुमशान सुरू आहे. रात्रभर ग्रामस्थ हत्तींच्या हशतीखाली जागे असतात. हातात मशाली घेऊन हत्तींचा शोध घ्यायला गावकरी निघतात. हत्ती असतील तिथे गावकर्‍यांना इशारा दिला जातो. हत्तींच्याविरोधात गावकर्‍यांनी संघर्षाची भूमिका घेतलीय पण उलट हत्ती आपल्या गावात आले म्हणजे साक्षात देव गणेशच आल्याचंही त्यांना वाटतं.' गजशास्त्र ' असं सांगतं की ज्या ठिकाणी हत्ती आहे, त्याठिकाणी सुख आणि समृद्धी आहे. पण कर्नाटकातून आलेल्या हत्तींनी इथल्या शेतकर्‍यांच्या समृद्धीवरच घाला घातलाय. पण गजशास्त्र असही सांगतं की जिथे हत्ती आहे, तिथे विजय आहे. त्यामुळे पुन्हा एकदा दुसर्‍या हत्तींकडून या हत्तींना कर्नाटकात परत पाठवण्याची मोहीम हाती घेण्यात येईल, का या आशेवर इथले शेतकरी आहेत. शेतीचं नुकसान करणारे हत्ती आता आणखी आक्रमक झाले आहेत. माणसांच्या अंगावर चाल करून येवू लागलेत. तळकोकणात सध्या सहा हत्तींचा वावर सुरू आहे. त्यात एक टस्कर हत्ती आहे. पावलापावलावर भीती दबा धरून बसलीय.कर्नाटकातील दांडेलीच्या अभयारण्यातून ऑक्टोबर 2002 मध्ये 20 हत्ती निघाले आणि दोडामार्ग तालुक्यातल्या मांगेली गावात मानमार्गे उतरले आणि त्यावेळेपासून हत्ती आणि माणूस यांच्यातला संघर्ष सुरू झाला. महाराष्ट्र आणि गोवा या दोन राज्यांसाठी असलेल्या तिलारी धरणात जानेवारी 2003 मध्ये पाणी साठायला सुरुवात झाली आणि हत्तींच्या पाण्याचा प्रश्न मिटला पण खाण्याचा प्रश्न होताच. मांगेली गावात ते त्यांना मिळालं. 2004 पर्यंत 20 हत्तीपैकी 11 हत्ती या भागात राहिले. बाकीचे काही कर्नाटकात तर काही चंदगडमध्ये गेले. हत्तींनी सर्वात जास्त नुकसान दोडामार्ग जिल्ह्यातील मांगेली गावात केलंय. पण योग्य नुकसान भरपाई न मिळाल्यानं शेतकरी हवालदिल झाले आहेत. हा आयता मिळालेला नवीन मुद्दा घेऊन सगळेच पुढारी आपापल्यापरीने सरकारविरोधात निषेध मोर्चे घेऊन निघाले. काहींनी तर आत्महत्त्या करण्याचा प्रयत्न केला. संतप्त झालेले शेतकरी या सगळयाला वनविभागालाच जबाबदार धरू लागले. हत्ती काही केल्या परत जाईनात. म्हणून मग वनविभागाने ' ऑपरेशन एलिफंट बॅक टू होम ' नावाची एक धाडसी मोहीम हाती घेतली. कर्नाटकातूनच आणलेल्या तीन प्रशिक्षित हत्तींचा वापर करण्यात आला. इथे धुडगूस घातलेल्या हत्तींना पुन्हा कर्नाटकात पाठवण्याचं उद्दिष्ट घेऊन ही मोहीम सुरू झाली. शेकडो कर्मचार्‍यांचा ताफा यासाठी कामाला लावण्यात आला. पण मंत्री, आमदार आणि स्थानिक लोकप्रतिनिधींचीच जास्त गर्दी होती. त्यांच्या प्रसिद्धीच्या हव्यासापोटी मोहिमेचा बराच वेळ वाया गेला. या सगळयामुळे हे प्रशिक्षित हत्तीही बिथरले. केवळ एका दिवसातच या मोहिमेचा फज्जा उडाल्यामुळे ती गुंडाळण्यात आली. वनमंत्र्यांनी आता पुन्हा एकदा नव्या मोहीमेची तयारी केलीय. दोडामार्ग, आजरा, चंदगड आणि वेंगुर्ला या तालुक्यांतील जवळपास 250 हेक्टर जागा हत्तीग्रामसाठी उपयोगात आणण्याचा सरकारचा विचार आहे. भारतातील हे पहिलंच एलिफंट व्हिलेज असेल. यामुळे इको ट्युरिझमला चालना मिळून सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पर्यटन विकास होईल, असा सरकारला विश्वास आहे.दरम्यान, हत्तींकडून होणार्‍या नुकसानीचा आलेख दरवर्षी वाढतोच आहे. 2005 सालात 45 लाख 94 हजाराचं नुकसान, 2006 मध्ये तब्बल 1 कोटी दोन लाखाचं, 2007 सालात 1 कोटी 14 लाखाचं तर 2008 मध्ये आत्तापर्यंत 1 कोटी 25 लाखाचं नुकसान झालंय. 4 कोटी 50 लाखाच्या नुकसानीपैकी 4 कोटी 13 लाखाचं वाटप करण्यात आलंय तर भविष्यातल्या नुकसानीपोटी राज्याकडून 1 कोटींची तरतूद करण्यात आलीय. गेल्या तीन वर्षांत झालेल्या हत्तींच्या हल्ल्यात महाराष्ट्रातल्या पाच जणांचा तर गोव्यातल्या एकाचा बळी गेलाय. 6 वनकर्मचारी गंभीर जखमी झालेत. एका वनकर्मचार्‍याचा मृत्यूही झालाय. हत्तींच्या हल्ल्यात मृत्यू झाला तर शासनाकडून नातेवाईकांना 2 लाख रुपये देण्यात येतात पण भातशेतीच्या नुकसानीपोटी एकरी केवळ 400 रुपये तर एका धरत्या माडाच्या नुकसानीपोटी 2 हजार रुपये दिले जातात. शेतकर्‍यांना हे मान्य नाही. हत्तींच्या हल्ल्यात गंभीर जखमी होऊन रोजगाराला मुकलेल्यांकडे मात्र शासनाचं अजिबात लक्ष नसल्याचंच दिसून येतंय. हत्ती हा वन्यजीव अधिसुचीतला नंबर एक चा प्राणी. हत्तीला माणसाकडून कोणतीही दुखापत झाली तर कायद्यानं कडक शिक्षा होऊ शकते. कर्नाटक राज्यात मात्र गेल्या सहा महिन्यात 25 हत्तींचा मृत्यू झालाय. याविषयी चौकशी चालू आहे. माणूस आणि हत्ती यांच्यातला संघर्ष दिवसेंदिवस वाढतोच आहे, अशा परिस्थितीत तळकोकणातल्या हत्तींना पुन्हा कर्नाटकात पाठवणं जोखमीचचं आणि असं गावाजवळ राहू देणंही धोक्याचं. तिलारी धरणाच्या आसपास वस्ती नाही. त्यामुळे या सहा हत्तींना तिथे ठेवण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारनं घेतलाय. ऑपरेशन एलिफंट बॅक टू तिलारी ही आता सुरू झालंय. आसामातील प्रशिक्षित हत्तींच्या मदतीनं सावंतवाडी आणि वेंगुर्ल्यांत धुमशान घालणारे हत्ती डोंगररांगातून तिलारीकडे आणले जातायत. काही दिवसांतच ते इथे येतील आणि त्यानंतर काही महिन्यांनी हत्तीग्रामच्या संकल्पनेला प्रत्यक्ष कृतीत आणण्याचा कार्यक्रम सुरू होईल. हत्तींच्या उपद्रवामुळे उद्धवस्त झालेल्या शेतकर्‍यांच्या या भावना भविष्यातल्या सरकारविरोधातील तीव्र उद्रेकाची चिन्हे आहेत. पण म्हणून हत्तींना माणसाळवणे हा यावर उपाय नाही, असं वन्यजीव अभ्यासकांचं मत आहे. हत्ती आणि मनुष्य कसे एकमेकांशी व्यवस्थित राहू शकतील, याचा विचार झाला पाहिजे. ते तितकं सोपं नाही. कारण, जिथे हत्ती आणि मनुष्य असतात, तिथे त्यांच्यामध्ये संघर्ष होतो आणि काही वाईट घटना घडतात, असं वन्यजीव अभ्यासक जयंत कुलकर्णी सांगतात. सहा वर्षांत इथल्या शेतकर्‍यांनी बरंच काही सोसलंय. हे सगळं त्यांना परत मिळायला हवं. हत्ती म्हणजे सुख आणि समृद्धी असं समीकरण इथे पुन्हा यायला हवं.

आईबीएन लोकमत | Updated On: May 13, 2013 04:17 PM IST

दिनेश केळुस्कर

सिंधदुर्ग, गोवा आणि कोल्हापूरातील चंदगडमध्ये हत्तींचा धुडगूस सुरू आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात तर कर्नाटकातून आलेल्या हत्तीनी शेतकर्‍यांच्या समृद्धीवरच घाला घातलाय. माणसांच्या वस्त्यांवर हत्तींचं धुमशान सुरू आहे. रात्रभर ग्रामस्थ हत्तींच्या हशतीखाली जागे असतात. हातात मशाली घेऊन हत्तींचा शोध घ्यायला गावकरी निघतात. हत्ती असतील तिथे गावकर्‍यांना इशारा दिला जातो. हत्तींच्याविरोधात गावकर्‍यांनी संघर्षाची भूमिका घेतलीय पण उलट हत्ती आपल्या गावात आले म्हणजे साक्षात देव गणेशच आल्याचंही त्यांना वाटतं.' गजशास्त्र ' असं सांगतं की ज्या ठिकाणी हत्ती आहे, त्याठिकाणी सुख आणि समृद्धी आहे. पण कर्नाटकातून आलेल्या हत्तींनी इथल्या शेतकर्‍यांच्या समृद्धीवरच घाला घातलाय. पण गजशास्त्र असही सांगतं की जिथे हत्ती आहे, तिथे विजय आहे. त्यामुळे पुन्हा एकदा दुसर्‍या हत्तींकडून या हत्तींना कर्नाटकात परत पाठवण्याची मोहीम हाती घेण्यात येईल, का या आशेवर इथले शेतकरी आहेत. शेतीचं नुकसान करणारे हत्ती आता आणखी आक्रमक झाले आहेत. माणसांच्या अंगावर चाल करून येवू लागलेत. तळकोकणात सध्या सहा हत्तींचा वावर सुरू आहे. त्यात एक टस्कर हत्ती आहे. पावलापावलावर भीती दबा धरून बसलीय.कर्नाटकातील दांडेलीच्या अभयारण्यातून ऑक्टोबर 2002 मध्ये 20 हत्ती निघाले आणि दोडामार्ग तालुक्यातल्या मांगेली गावात मानमार्गे उतरले आणि त्यावेळेपासून हत्ती आणि माणूस यांच्यातला संघर्ष सुरू झाला. महाराष्ट्र आणि गोवा या दोन राज्यांसाठी असलेल्या तिलारी धरणात जानेवारी 2003 मध्ये पाणी साठायला सुरुवात झाली आणि हत्तींच्या पाण्याचा प्रश्न मिटला पण खाण्याचा प्रश्न होताच. मांगेली गावात ते त्यांना मिळालं. 2004 पर्यंत 20 हत्तीपैकी 11 हत्ती या भागात राहिले. बाकीचे काही कर्नाटकात तर काही चंदगडमध्ये गेले. हत्तींनी सर्वात जास्त नुकसान दोडामार्ग जिल्ह्यातील मांगेली गावात केलंय. पण योग्य नुकसान भरपाई न मिळाल्यानं शेतकरी हवालदिल झाले आहेत. हा आयता मिळालेला नवीन मुद्दा घेऊन सगळेच पुढारी आपापल्यापरीने सरकारविरोधात निषेध मोर्चे घेऊन निघाले. काहींनी तर आत्महत्त्या करण्याचा प्रयत्न केला. संतप्त झालेले शेतकरी या सगळयाला वनविभागालाच जबाबदार धरू लागले. हत्ती काही केल्या परत जाईनात. म्हणून मग वनविभागाने ' ऑपरेशन एलिफंट बॅक टू होम ' नावाची एक धाडसी मोहीम हाती घेतली. कर्नाटकातूनच आणलेल्या तीन प्रशिक्षित हत्तींचा वापर करण्यात आला. इथे धुडगूस घातलेल्या हत्तींना पुन्हा कर्नाटकात पाठवण्याचं उद्दिष्ट घेऊन ही मोहीम सुरू झाली. शेकडो कर्मचार्‍यांचा ताफा यासाठी कामाला लावण्यात आला. पण मंत्री, आमदार आणि स्थानिक लोकप्रतिनिधींचीच जास्त गर्दी होती. त्यांच्या प्रसिद्धीच्या हव्यासापोटी मोहिमेचा बराच वेळ वाया गेला. या सगळयामुळे हे प्रशिक्षित हत्तीही बिथरले. केवळ एका दिवसातच या मोहिमेचा फज्जा उडाल्यामुळे ती गुंडाळण्यात आली. वनमंत्र्यांनी आता पुन्हा एकदा नव्या मोहीमेची तयारी केलीय. दोडामार्ग, आजरा, चंदगड आणि वेंगुर्ला या तालुक्यांतील जवळपास 250 हेक्टर जागा हत्तीग्रामसाठी उपयोगात आणण्याचा सरकारचा विचार आहे. भारतातील हे पहिलंच एलिफंट व्हिलेज असेल. यामुळे इको ट्युरिझमला चालना मिळून सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पर्यटन विकास होईल, असा सरकारला विश्वास आहे.दरम्यान, हत्तींकडून होणार्‍या नुकसानीचा आलेख दरवर्षी वाढतोच आहे. 2005 सालात 45 लाख 94 हजाराचं नुकसान, 2006 मध्ये तब्बल 1 कोटी दोन लाखाचं, 2007 सालात 1 कोटी 14 लाखाचं तर 2008 मध्ये आत्तापर्यंत 1 कोटी 25 लाखाचं नुकसान झालंय. 4 कोटी 50 लाखाच्या नुकसानीपैकी 4 कोटी 13 लाखाचं वाटप करण्यात आलंय तर भविष्यातल्या नुकसानीपोटी राज्याकडून 1 कोटींची तरतूद करण्यात आलीय. गेल्या तीन वर्षांत झालेल्या हत्तींच्या हल्ल्यात महाराष्ट्रातल्या पाच जणांचा तर गोव्यातल्या एकाचा बळी गेलाय. 6 वनकर्मचारी गंभीर जखमी झालेत. एका वनकर्मचार्‍याचा मृत्यूही झालाय. हत्तींच्या हल्ल्यात मृत्यू झाला तर शासनाकडून नातेवाईकांना 2 लाख रुपये देण्यात येतात पण भातशेतीच्या नुकसानीपोटी एकरी केवळ 400 रुपये तर एका धरत्या माडाच्या नुकसानीपोटी 2 हजार रुपये दिले जातात. शेतकर्‍यांना हे मान्य नाही. हत्तींच्या हल्ल्यात गंभीर जखमी होऊन रोजगाराला मुकलेल्यांकडे मात्र शासनाचं अजिबात लक्ष नसल्याचंच दिसून येतंय. हत्ती हा वन्यजीव अधिसुचीतला नंबर एक चा प्राणी. हत्तीला माणसाकडून कोणतीही दुखापत झाली तर कायद्यानं कडक शिक्षा होऊ शकते. कर्नाटक राज्यात मात्र गेल्या सहा महिन्यात 25 हत्तींचा मृत्यू झालाय. याविषयी चौकशी चालू आहे. माणूस आणि हत्ती यांच्यातला संघर्ष दिवसेंदिवस वाढतोच आहे, अशा परिस्थितीत तळकोकणातल्या हत्तींना पुन्हा कर्नाटकात पाठवणं जोखमीचचं आणि असं गावाजवळ राहू देणंही धोक्याचं. तिलारी धरणाच्या आसपास वस्ती नाही. त्यामुळे या सहा हत्तींना तिथे ठेवण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारनं घेतलाय. ऑपरेशन एलिफंट बॅक टू तिलारी ही आता सुरू झालंय. आसामातील प्रशिक्षित हत्तींच्या मदतीनं सावंतवाडी आणि वेंगुर्ल्यांत धुमशान घालणारे हत्ती डोंगररांगातून तिलारीकडे आणले जातायत. काही दिवसांतच ते इथे येतील आणि त्यानंतर काही महिन्यांनी हत्तीग्रामच्या संकल्पनेला प्रत्यक्ष कृतीत आणण्याचा कार्यक्रम सुरू होईल. हत्तींच्या उपद्रवामुळे उद्धवस्त झालेल्या शेतकर्‍यांच्या या भावना भविष्यातल्या सरकारविरोधातील तीव्र उद्रेकाची चिन्हे आहेत. पण म्हणून हत्तींना माणसाळवणे हा यावर उपाय नाही, असं वन्यजीव अभ्यासकांचं मत आहे. हत्ती आणि मनुष्य कसे एकमेकांशी व्यवस्थित राहू शकतील, याचा विचार झाला पाहिजे. ते तितकं सोपं नाही. कारण, जिथे हत्ती आणि मनुष्य असतात, तिथे त्यांच्यामध्ये संघर्ष होतो आणि काही वाईट घटना घडतात, असं वन्यजीव अभ्यासक जयंत कुलकर्णी सांगतात. सहा वर्षांत इथल्या शेतकर्‍यांनी बरंच काही सोसलंय. हे सगळं त्यांना परत मिळायला हवं. हत्ती म्हणजे सुख आणि समृद्धी असं समीकरण इथे पुन्हा यायला हवं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 23, 2008 04:50 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close