S M L

गप्पा गायक दीपक परांजपे आणि कलाकार क्रांती डागाशी (भाग - 2)

' सलाम महाराष्ट्र' मध्ये दोन पाहुण्यांच्या गप्पा ऐकायला मिळाल्या. मुंबईच्या स्टुडिओत होते गायक दीपक परांजपे आणि औरंगाबादच्या स्टुडिओत होत्या क्रांती डागा. गायक दीपक परांजपे यांनी रेडिओ आणि टीव्हीबरोबरीने त्यांनी अनेक कार्यक्रमांतून आपल्या गायकी पेश केलीये. ' पारिजात ' आणि पं. हृदयनाथ मंगेशकरांवर आधारित असलेला ' हृदयस्पर्शी 'हा कार्यक्रम लोकप्रिय झाला आहे. आतापर्यंत त्यांनी अनेक मराठी सिरिअल्समधून कामं केली आहेत. अशा गायक आणि अभिनेता दीपक परांजपे यांनी त्यांच्या गाप्पांची सुरुवात पं. हृदयनाथ मंगेशकारांच्या ' त्या फुलांच्या गंधकोशी...' या गाण्याने आणि ' हृदयस्पर्शी ' या गाण्याच्या अनुभवांनी केली. गायक दीपक परांजपे सांगतात, "पं. हृदयनाथ मंगेशकरांनी रचलेली आणि संगीतबद्ध केलेली मराठी गाणी आणि काही मोजकी हिंदी गाणी यांवर हृदयस्पर्शी हा कार्यक्रम आधारलेला आहे. आमच्या कार्यक्रमला श्रोत्यांचा चांगला प्रतिसाद मिळतो. हा कार्यक्रम माझ्यासाठी एकप्रकारे आव्हानच आहे. हा कार्यक्रम करताना आम्हाला मजा येते आणि समाधानही वाटतं.'' गाण्याच्या सरावाबद्दल ते दीपक परांजपे सांगतात, " कोणतीही गोष्ट करताना त्यात सातत्य लागतं. सातत्याशिवाय कोणतीही गोष्ट होत नाही. संगीताला, गायकीला रियाज हवा. तोही नियमित." " उगाचच ओढून ताणून गाऊ नका. आपली आवाजाची जात ओळखून त्याप्रकारची गाणी गा," असा मोलाचा सल्ला यावेळी दीपक परांजपेंनी दिला. औरंगाबादमध्ये राष्ट्रीय कलाप्रदर्शन सुरू आहे. त्यानिमित्ताने जगाच्या कानाकोप-यातून विविध कलाकार आले आहेत. या राष्ट्रीय कला प्रदर्शनात क्रांती डागा यांनी तयार केलेल्या म्युरल्स ही उल्लेखनीय ठरली आहेत. क्रांती डागा यांनी एमसील, सिरॅमिक रंगांचा वापर करून ही चित्र तयार केली आहेत. एमसीलचा वापर करून पेंटिग्ज तयार करण्याच्या प्रकाराबद्दल त्या सांगतात, "लाकडावर आधी आपल्याला हवा तो आकार कापून घ्यायचा. मग त्या आकाराला एमसीलचा रोल हवा पीळ देऊन लावायचा. रोल सुकल्यावर आतील भागांत रंग भरायचे. असंच काचेवरही करता येतं. " ' सलाम महाराष्ट्र 'मध्ये दीपक परांजपे आणि क्रांती डागाशी मारलेल्या गप्पा व्हिडिओवर पहा.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 24, 2008 07:21 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 24, 2008 07:21 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close