S M L

नियंत्रण वजनावर (भाग 2 )

बदलती लाइफ स्टाईल आणि वाढतं वजन हा सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. अनेकांना प्रश्न पडतो की आपण आपलं वजन कसं कमी करायचं. नेमक्या याच प्रश्नावर चर्चा करण्यासाठी ' टॉक टाइम 'मध्ये आहारतज्ज्ञ शिल्पा जोशी आल्या होत्या. वाढत्या वजनाची कारणं निरनिराळी आहेत. त्याबाबत आहारतज्ज्ञ शिल्पा जोशी सांगतात - तुमचं आमचं सगळ्यांचं आयुष्य स्ट्रेसपूर्ण आहे. या स्ट्रेसमुळे आपलं वजन वाढतं. स्ट्रेस हे दोन प्रकारचे आहेत. काही लोक स्ट्रेसमध्ये जास्त खातात तर काही खात नाहीत. स्ट्रेसमध्ये जास्त खाल्ल्यानं लोकांचं वजन वाढतं, पण जे लोक स्ट्रेसमध्ये अजिबात खातच नाहीत ते नंतर खातात. ब-याच वेळ न खाल्ल्यानं एकदम खायला सुरुवात केल्यानं खाणा-याची अवस्था किती खाऊ नि किती नको अशी होते. अशावेळी पोटात गरजेपेक्षा चार घास जास्त खाल्ले जातात. वजन वाढण्याचं दुसरं कारण म्हणजे आहार. आजकाल फास्टफूड, वेगवेगळ्या प्रकारचे गोड पदार्थ, तळलेले पदार्थ यांचा आपल्या खाण्यात सुळसुळाट असतो. त्यामुळेही आपलं वजन वाढतं. वजन वाढण्याचं तिसरं कारण म्हणजे व्यायम. आज तरुणच काय पण मोठ्यांना पुरेसा पाहिजे तेवढा व्यायाम मिळत नाही. जीमलाही बळेबळेच जातात. घरापासून स्टेशनपर्यंत आणि स्टेशनपासून ऑफिसपर्यंत एवढंच काय ते चालणं होतं. तिच गत आज कॉलेजमध्ये आणि शाळेमध्ये जाणा-या विद्यार्थी विद्यार्थिनींची आहे. पूर्वी लहान मूलं शाळेतून घरी आल्यावर खेळायची तरी. पण आता तेही वातावरण नाहीये. जिममध्से जाऊनही लोकांचं वजन उतरत नाही. युएसचे डॉक्टर डॉ. जिन लीन मेओ यांनी एक सर्व्हेक्षण केलंय. त्यात त्यांना असं आढळून आलंय की जिममध्ये जाऊन लोकांचं वजन उतरत नाही कारण ते त्यांचं घरी किंवा ऑफिसमध्ये कोणत्याच प्रकारचं चलनवलन होत नसतं. म्हणून वजन कमी होण्याऐवजी वाढतं किंवा स्टॅटीक राहतं. आहारतज्ज्ञ शिल्पा जोशी यांनी वजनावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणखीही काही उपयुक्त माहिती दिली आहे. ती व्हिडिओवर पहा. कसं ठेवाल वजनावर नियंत्रण : सुरुवातीला वजन वाढण्याचं मुख्य कारण डॉक्टरांकडून जाणून घ्यास्वत:च्या आहाराची नोंदणी करा.आहारातलं कॅलरीज्‌चं कॅलरीचं प्रमाण कमी करा.कमी कॅलरीज्‌चे पदार्थ खा पण उपाशी राहू नका.एकाच वेळेस जास्त खाऊ नका, दिवसातून पाच वेळा थोडं थोडं खा.खाण्यातील कॅलरीज्‌चं प्रमाण कमी करा आणि प्रोटीनचं प्रमाण वाढवा.जास्तीत जास्त पाणी प्या.आहारात फळे आणि भाज्यांचं प्रमाण वाढवा.चटपटीत पदार्थांऐवजी उकडलेले पदार्थ खा.नियमित 30 मिनिटं व्यायाम करा.नियमित 30 मिनिटं व्यायाम करा.जेवणात सूपचं प्रमाण वाढवा.स्वत:चा डाएट चार्ट तयार करा.वजन नियमित लक्ष ठेवा.काही महत्त्वाच्या वेबसाइट : yourtotalhealth.ivillage.comHealthizen.com:

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 25, 2008 10:18 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 25, 2008 10:18 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close