S M L

बाळाला लस देताना... (भाग - 2 )

भविष्यात आपल्या बाळाचं आरोग्य चांगलं रहावं, अशी प्रत्येक पालकांची इच्छा असते. बाळाच्या चांगल्या आरोग्यासाठी त्याला निरनिराळ्या प्रकारच्या लसी द्याव्या लागतात. बाळाला कोणती लस कधी द्यावी, कोणती लस दिल्याने बाळाची कोणत्या रोगातून मुक्तता होते अशाप्रकारच्या लसीकरणाबाबतच्या असंख्य प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी ' टॉक टाइम 'मध्ये बालरोगतज्ज्ञ डॉ. सुधीर साने आले होते. लहानमुलांना बॅक्टेरिया, व्हायरल इन्फेक्श्नची लागण जलद होते. ती होऊ नये या करता बाळाला लस द्याव्या लागतात. लहान बालकांना लस दिल्याने त्यांच्या शरीरातली रोगप्रतिकारक्षमता नैसर्गिकरित्या वाढते. त्यांचं शरीर रोगाचा प्रतिकाराकरण्यासाठी तयार होतं. बाळांना कोणकोणत्या प्रकारच्या लसी कधी आणि केव्हा दिल्या पाहिजेत याचा एक ठराविक आराखडा असतो. बाळाला लस देताना ती लस दिल्यावर किंवा बाळाला कोणत्या प्रदार्थांची अ‍ॅलर्जी आहे की नाही ते डॉक्टरांना सांगावं. अशी महत्त्वाची माहिती बालरोगतज्ज्ञ डॉ. सुधीर साने यांनी सांगितलं. डॉक्टरांनी कोणत्या लसी कधी द्याव्यात यावरही मार्गदर्शन केलं. ते पुढीलप्रमाणे -बाळाच्या जन्मापासून ते साधारणत: 5 वर्षांपर्यंत वेगवेगळ्या लसी देण्यात येतात.ओरल पोलिओची लस, क्षयाविरुद्धची BCGची लस दिलीच पाहिजे.ट्रिपल लस - डांग्या खोकला, घटसर्प आणि धनुर्वातासाठी आहे.MMR लस ही गोवर, गालगुंड आणि रुबेलासाठी (सौम्य गोवर) दिली जाते.दीड आणि साडेचार वर्षांच्या वयात पोलिओ आणि ट्रिपलचा बुस्टर देतात.हिपॅटायटीस B आणि HIB या लसी मुंबईतल्या सगळ्या महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये मोफत मिळतात.बाळाला ताप, उलट्या, अ‍ॅलर्जी असेल तर त्याची माहिती डॉक्टरांना द्यावी .बाळाला लस देताना -साईड इफेक्ट जाणून घ्या.योग्य डॉक्टर निवडा.लसीची पूर्ण माहिती करून घ्या.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 26, 2008 01:33 PM IST

बाळाला लस देताना... (भाग - 2 )

भविष्यात आपल्या बाळाचं आरोग्य चांगलं रहावं, अशी प्रत्येक पालकांची इच्छा असते. बाळाच्या चांगल्या आरोग्यासाठी त्याला निरनिराळ्या प्रकारच्या लसी द्याव्या लागतात. बाळाला कोणती लस कधी द्यावी, कोणती लस दिल्याने बाळाची कोणत्या रोगातून मुक्तता होते अशाप्रकारच्या लसीकरणाबाबतच्या असंख्य प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी ' टॉक टाइम 'मध्ये बालरोगतज्ज्ञ डॉ. सुधीर साने आले होते. लहानमुलांना बॅक्टेरिया, व्हायरल इन्फेक्श्नची लागण जलद होते. ती होऊ नये या करता बाळाला लस द्याव्या लागतात. लहान बालकांना लस दिल्याने त्यांच्या शरीरातली रोगप्रतिकारक्षमता नैसर्गिकरित्या वाढते. त्यांचं शरीर रोगाचा प्रतिकाराकरण्यासाठी तयार होतं. बाळांना कोणकोणत्या प्रकारच्या लसी कधी आणि केव्हा दिल्या पाहिजेत याचा एक ठराविक आराखडा असतो. बाळाला लस देताना ती लस दिल्यावर किंवा बाळाला कोणत्या प्रदार्थांची अ‍ॅलर्जी आहे की नाही ते डॉक्टरांना सांगावं. अशी महत्त्वाची माहिती बालरोगतज्ज्ञ डॉ. सुधीर साने यांनी सांगितलं. डॉक्टरांनी कोणत्या लसी कधी द्याव्यात यावरही मार्गदर्शन केलं. ते पुढीलप्रमाणे -

बाळाच्या जन्मापासून ते साधारणत: 5 वर्षांपर्यंत वेगवेगळ्या लसी देण्यात येतात.ओरल पोलिओची लस, क्षयाविरुद्धची BCGची लस दिलीच पाहिजे.ट्रिपल लस - डांग्या खोकला, घटसर्प आणि धनुर्वातासाठी आहे.MMR लस ही गोवर, गालगुंड आणि रुबेलासाठी (सौम्य गोवर) दिली जाते.दीड आणि साडेचार वर्षांच्या वयात पोलिओ आणि ट्रिपलचा बुस्टर देतात.हिपॅटायटीस B आणि HIB या लसी मुंबईतल्या सगळ्या महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये मोफत मिळतात.बाळाला ताप, उलट्या, अ‍ॅलर्जी असेल तर त्याची माहिती डॉक्टरांना द्यावी .

बाळाला लस देताना -

साईड इफेक्ट जाणून घ्या.योग्य डॉक्टर निवडा.लसीची पूर्ण माहिती करून घ्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 26, 2008 01:33 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close