S M L

जॉइण्ट रिप्लेसमेण्ट (भाग : 3)

ठराविक वयानंतर गुडघेदुखी सुरू होते. हे दुखणं नंतर इतकं वाढत जातं की त्याचा विपर्यास नंतर जॉइण्ट रिप्लेसमेण्टमध्ये होता. ठराविक वयानंतर नी-जॉइण्ट रिप्लेसमेण्ट करावी लागत. पण नी -जॉइण्ट रिप्लेसमेण्ट म्हणजे काय, त्याने काय फायदा होतो, रिप्लेसमेण्ट नंतर कोणत्या प्रकारची काळजी घ्यावी लागते या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ' टॉक टाइम 'मध्ये मिळाली. ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. सतीश पुराणिक यांनी नी-जॉईण्ट रिप्लेसमेण्टवर मार्गदर्शन केलं.आपल्या भारतीयांचं आरोग्याबाबत एक व्यवच्छेदक लक्षण आहे. ते म्हणजे कोणतंही दुखणं जिवावर आधी अंगावर काढायचं त्या दुखण्याचा जास्त त्रास व्हायला लागला की डॉक्टरांकडे जायचं. गुडघेदुखीचा त्रास हा त्यापैकीच एक आहे. साधारणत: वयाच्या पन्नाशी नंतर गुडघेदुखीचा त्रास होतो. चालताना गुडघे दुखणं, पाय भरून येणं ही लक्षणं नी रिप्लेसमेण्टची आहेत. गुडघ्यामध्ये फिमर, टिबिया ही दोन महत्त्वाची हाडं असतात. त्यावर पटेला हे वाटीसारखं आवरण असतं. फिमर, टिबियाच्या वर आणि पटेलाच्या आत कृत्रिम आवरण बदलणं यालाच नी-जॉइण्ट रिप्लेसमेण्ट म्हणातात. नी-जॉइण्ट रिप्लेसमेण्ट झाल्यावर जड वस्तू उचलायची नाही, वजनावर नियंत्रण ठेवायचं जॉगिंग, स्किईंग करायचं नाही, एरोबिक्स करणं टाळायचं, खेळात भाग घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा, जमिनीवर बसणं टाळायचं खासकरून मांडी घालून बसायचं नाही, असे सल्ले डॉ. सतीश पुराणिक यांनी िदले आहेत. डॉक्टरांनी जॉइण्ट रिप्लेसमेण्टवर केलेलं मार्गदर्शन तुम्हाला व्हिडिओवर बघता येईल.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 3, 2008 11:02 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 3, 2008 11:02 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close