S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • दहशतवादाच्या कव्हरेजमध्ये इलेक्ट्रॉनिक मीडियानं अतिरेक केलाय का?
  • दहशतवादाच्या कव्हरेजमध्ये इलेक्ट्रॉनिक मीडियानं अतिरेक केलाय का?

    Published On: Dec 3, 2008 01:21 PM IST | Updated On: May 13, 2013 02:03 PM IST

    गेले दोन दिवस विविध वृत्तपत्रांतून इलेक्ट्रॉनिक माध्यमांवर टीका केली जात आहे. इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या पत्रकारांनी जिवाची बाजी लावून मुंबई तोंड देत असलेल्या दहशतवादी हल्ल्याचं वृत्तांकन केलं. राजकारण्यांच्या ज्या चुका झाल्या त्यावरही प्रकाशझोत टाकला. तरीसुद्धा असं म्हटलं जातंय की काही चॅनेल्सने बेजाबबदारपणा केला. चॅनेलचा टीआरपी वाढवण्यासाठी पत्रकारांनी आपला जीव धोक्यात घातला असंही म्हटलं जात आहे. इलेक्ट्रॉनिक्स चॅनेल्समधल्या पत्रकारांनी राजकारण्यांच्या चुका दाखवून दिल्या तरी असं म्हटलं जातंय की हा लोकशाहीवरचा हल्ला आहे. नेमकी काय परिस्थिती आहे? इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांनी चांगलं काम केलंय की फक्त चुका...चुका आणि चुकाच केल्या आहेत ? याची पडताळणी 'आजचा सवाल 'मधून करण्यात आली. त्यासाठी प्रश्न होता, दहशतवादाच्या कव्हरेजमध्ये इलेक्ट्रॉनिक मीडियानं अतिरेक केलाय का? या प्रश्नावरच्या चर्चेत 'आयबीएन-लोकमत 'चे न्यूज एडिटर मंदार फणसे, टाइम्स ऑफ इंडियाचे सिनिअर एडिटर प्रफुल्ल मारपकवार, एमआयटी कॉलेज ऑफ मॅनेजमेण्टचे डायरेक्टर दीपक आपटे यांचा सहभाग होता. या चर्चेत दीपक आपटे यांचं असं मत होत - " दहशतवादाच्या कव्हरेमध्ये इलेक्ट्रॉनिक मीडियाचा अतिरेक झाला नसून थोडासा बेजबाबदारपणा झाला असेल." त्याची कारणंही दीपक आपटेंनी सांगितली. " दहशातवादासारख्या घटनांचं कसं कव्हरेज करावं याची मीडियाला कल्पना नव्हती. सराव नव्हता. अशा घटनांचं लाईव्ह वृत्तांकन करण्यासाठी त्यांच्याकडे प्रशिक्षित रिपोर्टर नव्हते. युद्धाचं वृत्तांकन, वार्तांकन करणारे पत्रकार शिकाऊ असतात. प्रत्येक बाईट मिळावी, किंवा पहिल्यांदा काहीतरी करायला मिळतंय याची या लोकांना एक्सायटमेण्ट होती. पण त्यामुळे आपण त्या देशाचं काय नुकसान करतोय, त्या कंमाडोजचं काय नुकसान करत आहोत याची कल्पना नव्हती. म्हणजे उद्या एखादं टॉप सिक्रेट पत्रकाराला मिळालं तर उत्साहाच्या भरात जाहीरपणे तेही सांगेल याची भीती वाटायला लागली आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियाला विचार करायला वेळ नसतो. वृत्तपत्रांना असतो. या दहशतवादी हल्ल्याच्या वृत्तांकनामध्ये इलेक्ट्रॉनिक्स मीडियाच्या प्रतिनिधींनी ब-याचवेळेला चुकीची माहिती दिली. कंमाडोज कुठून जात होते हे सांगत होते. ते दहशतवाद्यांना आयतंच मिळत होतं. ' वेण्डसडे ' सिनेमासारखं हे झालं आहे. ' वेन्डसडे 'त दहशतवादी मीडिया देत असलेल्या माहितीचा कसा करतात, याचं चित्रण करण्यात आलं आहे. दीपक आपटे यांनी चर्चेत इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या वृत्तांकनाला ' अतिरेक ' या शब्दाची उपमा दिली होती. तिच्याशी प्रफुल्ल मारपकवार सहमत नव्हते. " इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये असणारी स्पर्धा आणि आपण काहीतरी नवीन द्यावं याभावनेतून इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या प्रतिनिधींची वृत्तांकन करण्यासाठी थोडी घाई झाली असावी. त्यातून अतिमहत्त्वाची माहिती जाहीररित्या वृत्तांकन करताना सांगितली गेली. यासाठी भारतीय इलेक्ट्रॉनिक मीडियाने परदेशी मीडियाचा आदर्श डोळ्यांसामोर ठेवावा. जेव्हा अमेरिकेवर असा दहशतवादी हल्ला झाला होता, तेव्हा तिथली परिस्थिती कशी तिथल्या मीडियाने हातळली असेल याचा अभ्यास करायाला पाहिजे, असा सल्ला टाइम्स ऑफ इंडियाचे सिनिअर एडिटर प्रफुल्ल मारपकवार यांनी दिला. इलेक्ट्रॉनिक मीडियावर प्रिण्ट मीडिया जो बेजबाबदारपणाचा आरोप करते, तो आरोप 'आयबीएन-लोकमत 'चे न्यूज एडिटर मंदार फणसे यांनी खोडून काढला. " इलेक्ट्रॉनिक मीडियाकडून जबाबदारीची अपेक्षा करणारा प्रिण्ट मीडिया हा स्वत: किती जबाबदार आहे याची चाचपणी प्रिण्ट मीडियाने स्वत:हून करायला हवी. एखादं विधान करताना त्याच्या पुढच्या मागच्या घटनांची प्रिण्टकडून किती तपासणी होते याचं भान कधी प्रिण्टला असतं का, टीव्ही चॅनेल्स आता आता कुठे इव्हॉल्व्ह होत आहे. संघर्षाच्या जर्नलिझमला नुकतीच कुठे सुरुवात झाली आहे. मुंबई शहरात जी स्थिती निर्माण झाली होती, याच्याआधी कुठेच नव्हती. याच्या आधी कोणतंच शहर किंवा महानगर वेठीस धरलं गेलं नव्हतं. अशावेळेला काय करायचं असतं ते बेस्ट देण्याचा प्रयत्न इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पत्रकारांनी केला, " असं मंदार फणसे म्हणाले. या चर्चेत मंदार फणसे यांनी एक महत्त्वपूर्ण मत नोंदवलं. ते म्हणाले की, प्रिण्ट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाला परस्पर पूरक पत्रकारिता करता येते. हा विचार दोन्ही माध्यमातल्या पत्रकारांनी करायला हवा. आम्ही नवीन होतो त्यावेळी अनेक गोष्टी प्रिण्टकडून शिकल्या आहेत." 'आम्ही इलेक्ट्रॉनिकच्या माध्यमातून जबाबदार पत्रकारिता करत आसल्याचं मंदार फणसे म्हणाले. या चर्चेतल्या ' दहशतवादाच्या कव्हरेजमध्ये इलेक्ट्रॉनिक मीडियानं अतिरेक केलाय का? ' या प्रश्नाला 84 टक्के लोकांनी ' होय ' असा पोल दिला, तर 16 टक्के लोकांनी ' नाही ' असा पोल दिला. या चर्चेचा शेवट करताना आयबीएन-लोकमतचे एडिटर निखिल वागळे म्हणाले, "'आयबीएन लोकमत'वरून आम्ही जी पत्रकारिता केली ती जबाबदार पत्रकारिता केली आहे. वृत्तपत्रांतून टीका करणा-यांनी आमच्या कामावर काळीमा फासू नये आणि राजकारण्यांच्या हातातले हस्तक बनू नये.आम्ही अतिरेक केला आहे, असं ज्यांना वाटत असेल तर आम्ही याहीपेक्षा अधिक जबाबदारपत्रकारिता करून जनतेचं आमच्याविषयीचं मत बदलवू. जबाबदार पत्रकारितेचा आदर्श निर्माण करू. "

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close