S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी का ?
  • महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी का ?

    Published On: Dec 2, 2008 05:38 PM IST | Updated On: May 13, 2013 02:03 PM IST

    मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर त्याची नैतिक जबाबदारी स्वीकारुन राजकीय नेते एकापाठोपाठ एक राजीनामा देत आहेत. राजीनामा सत्रामुळे महाराष्ट्रातही राजकारण अस्थिर झालं आहे. शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळांनं राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांची भेट घेत महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणी केली. यावरच होता आजचा सवाल. ' महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी का ? ' यावर बोलण्यासाठी शिवसेनेच्या प्रवक्त्या नीलम गोर्‍हे, राष्ट्रवादीचे प्रवक्ते गुरुनाथ कुलकर्णी, कम्युनिस्ट पक्षाचे नेते भालचंद्र कांगो आणि ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई उपस्थित होते. शिवसेनेनं राष्ट्रपतींकडे ही मागणी का केली, या प्रश्नावर नीलम गोर्‍हे म्हणाले की राज्यात सर्वत्र गोंधळाची परिस्थिती आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. आम्ही सागरी सुरक्षेचा मुद्दा गेली कित्येक वर्ष मांडत आहोत पण त्याकडे सातत्यानं दुर्लक्ष केलं गेलं. शिवसेनेची मागणी पूर्णपणे चुकीची असल्याचं राष्ट्रवादीचे प्रवक्ते गुरुनाथ कुलकर्णी यांनी चर्चेत सांगितलं. ' शिवसेनेनं महाराष्ट्रात 356 कलम लावण्याची केलेली मागणी अत्यंत चुकीची आहे. ही हास्यापद मागणी आहे ', असं कुलकर्णी म्हणाले. शिवसेनेची मागणी म्हणजे रोगापेक्षा इलाज भयंकर असल्याची प्रतिक्रिया कम्युनिस्ट नेते भालचंद्र कांगो यांनी चर्चेत नोंदवली. ' सत्ताधार्‍याप्रमाणे विरोधकही बेजबाबदार आहेत. रोगापेक्षा इलाज भयंकर झाला आहे. या स्थितीत लोकशाही स्थिर असणं आवश्यक आहे. हा राजकीय हेतू साधण्याचा प्रयत्न असून ते दुर्देवी आहे. हा राजकीय खेळीचा भाग आहे. शिवसेनेचा दहशतवाद आणि कायदा सुव्यवस्थेशी काही संबंध नाही. 356 कलमाचा गैरवापर होता कामा नये. पंतप्रधानांनी बोलवलेल्या विशेष बैठकीत शिवसेना आणि भाजपनं बहिष्कार घातला होता ', असं कांगो म्हणाले. ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई हे परखडपणे भूमिका मांडत म्हणाले, राज्य सरकार 100 टक्के अपयशी आहे. पण हा आंतरराष्ट्रीय दहशतवाद आहे. त्यामुळे केंद्र सरकार ही तेवढंच जबाबदार आहे. राष्ट्रपती राजवटीनं काय साध्य होणार आहे. ही उतावीळ आणि आक्रस्ताळेपणाची मागणी आहे. शिवसेनेनं कायदा आणि सुव्यवस्थेचा किती अवलंब केलाय, या मुद्यावर नीलम गोर्‍हे, गुरुनाथ कुलकर्णी आणि पत्रकार हेमंत देसाई यांच्या दरम्यान खडाजंगी झाली. चर्चेत दहशतवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झालेले एटीएसचे प्रमुख हेमंत करकरेंवर शिवसेनेनं केलेल्या टीकेचा प्रश्न आला. आयबीएन-लोकमतचे संपादक निखिल वागळे यांनी नीलम गोर्‍हे यांना थेट प्रश्न विचारला, 'सामना ' तून करकरेंवर जहरी टीका झाली. तुम्ही करकरेंच्या कुटुंबियांची माफी मागणार का ? यावर नीलम गोर्‍हे म्हणाल्या, हेमंत करकरेंवर व्यक्तिगत टीका नव्हती. दहशतवाद विरोधी पथकात महिला अधिकारी असण्याची आमची मागणी होती. आज मी शिवसेनेच्यावतीनं करकरेंच्या कुटुंबियांची माफी मागत आहे.पत्रकार हेमंत देसाई यांनी राजकीय पक्षांनी मॅच्युरिटी दाखवण्याची गरज दाखवणं गरज असल्याचं मत व्यक्त केलं. ' महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी का ? ' या पोलमध्ये विचारण्यात आलेल्या प्रश्नावर 89 टक्के लोकांनी ' हो ' असं मत नोंदवलं. चर्चेचा शेवट करताना निखिल वागळे म्हणाले की राजकीय नेत्यांसह समाजातील सर्व प्रतिष्ठातांनी आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. दहशतवाद्यांचा हल्ला ही शेवटची अलार्म बेल आहे. ही भ्रष्ट व्यवस्था बदलायला आपण तयार होऊ या. अन्यथा हा देश कधीच वाचणार नाही.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close