S M L

कॅल्शियमची कमतरता (भाग : 2)

आपल्या शरीरातला कॅल्शियम हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. आपले दात आणि हाडे यांच्यात आपल्याला जास्तीत जास्त प्रमाणात कॅल्शियम असतं. शरीरातल्या कॅल्शियमचं प्रमाण कमी झालं तर निरनिराळ्या प्रकारचे आजार होतात. शरीरात कॅल्शियमची कमतरता झाली तर काय करायचं, ती भरून कशी काढायची याची चर्चा ' टॉक टाइम 'मध्ये करण्यात आली होती. ' टॉक टाइम'मध्ये कॅल्शियमची कमतरता याविषयावर आहारतज्ज्ञ डॉ. लीना राजे यांनी मार्गदर्शन केलं.कॅल्शियमचा आपल्या शरीरामध्ये आवश्यक आहे. यावर आहारतज्ज्ञ डॉ. लीना राजे सांगतात, "आपल्या शरीरामध्ये आढळणारं कॅल्शियम हे सर्वात महत्त्वाचं खनिज आहे. मानवी शरीरातली हाडं आणि दात यांच्याप्रमाणे रक्तातही कॅल्शियमचं प्रमाण आढळतं. एखादी इमारत बनण्यासाठी जसं सिमेंट आणि विटांची आवश्यकता असते, तशी मानवी शरीर बनण्यासाठी कॅल्शियमचीही आवश्यकता असते. वयोमानानुसार कॅल्शियमची गरज कमी अधिक होत जाते. ज्यावयामध्ये आपल्या हाडांची आणि दातांची वाढ जास्त होते त्यावयामध्ये कॅल्शियमची गरज जास्त भासते. बाल्याचस्थेतून मुलं- मुली जेव्हा अ‍ॅडोलेसेन्स काळामध्ये प्रवेश करतात म्हणजे युवक आणि युवती बनतात, तेव्हा कॅल्शियमची गरज सर्वात जास्त भासते, गरोदरपणात बाळाच्या वाढीसाठी कॅल्शिम लागतं. अडल्ट एजमध्ये म्हणजे आपल्या शरीराची वाढ पूर्ण झाल्यानंतरही शरीर बळकट रहावं लागतं, यासाठीही कॅल्शियम लागतं. केस गळणं, पाय दुखणं, अंग दुखणं, नखं तुटणं, अंगावर पांढरे डाग येणं ही शरीरात कॅल्शियमची कमतरता होण्याची काही लक्षणं आहेत. अशावेळी कॅल्शियमचा इंटेक वाढवायचा." आहारतज्ज्ञ डॉ. लीना राजे यांनी कॅल्शियम या खनिजाबद्दल सांगितलेली माहिती व्हिडिओवर पाहता येईल.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 10, 2008 11:25 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 10, 2008 11:25 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close