S M L

गप्पा सामाजिक कार्यकर्ते भाऊ कोरडेंबरोबर

सलाम महाराष्ट्रच्या या भागात आपण भेटलो भाऊ कोरड यांना. 1993 च्या दंगलीत धारावीमध्ये लोकांमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी बरंच काम केलंय. गल्ली-गल्लीमध्ये मोहल्ला कमिटी स्थापन करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. त्यावेळचे अनेक अनुभव त्यांनी या कार्यक्रमात सांगितले. मोहल्ला कमिटी म्हणजे सर्वसामान्य माणसे आणि पोलिसांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या समित्या. यात कोणत्याही राजकारण्याला स्थान दिलं गेलं नाही. "सर्वसामान्य माणसाच्या प्रयत्नातून समाजात शांतता प्रस्थापित करण्याचा हा अभिनव प्रयत्न होता" असं त्यांनी सांगितलं. समाजातले हिंदू-मुस्लीम असे भेद त्यांना पहिल्यापासूनच मान्य नव्हते. म्हणून पहिल्यापासूनच सामाजिक शांतता, विश्वास निर्माण करण्यासाठी त्यांनी काम केलं. "माझ्या जेव्हा लक्षात आलं की जोपर्यंत हे लोक एकमेकात मिसळत नाहीत, तोपर्यंत सामाजिक सलोखा निर्माण होणार नाही. मग त्यातून मोहल्ला कमिटीची संकल्पना पुढे आली आणि सामाजिक सलोखा प्रस्थापित करण्यासाठी त्याचा खूप उपयोग झाला" असं भाऊ कोरडेंनी सांगितलंसलाम महाराष्ट्रमध्ये आज दुसरा पाहुणा होताआश्विन वाघमारे. आश्विन अंध आहे. पण त्याचा अजिबातच बाऊ न करता तो खर्‍या अर्थानं आयुष्य एन्जॉय करतोय. तो एक उत्तम गायक आहे आणि तितकाच चांगला चित्रकारही. लहानपणी आश्विनच्या वडिलांनी त्याला खेळण्यातले प्लॅस्टिकचे प्राणी ऐकून दिले. त्यांच्याशी खेळण्यात तो रमला. पुढे जेव्हा आश्विन शाळेत गेला तेव्हा, लहानपणी खेळण्यातल्या प्राण्यांचे स्पर्श आठवून त्यानं उत्तम चित्र काढायला सुरुवात केली. "माझे डोळे माझ्या मेंदूत आहेत" असं त्यानं सांगितलं. वयाच्या तिसर्‍या वर्षापासून आश्विन गाणं शिकतोय. उत्तम संगितकार बनण्याचं त्याचं स्वप्न आहे. संदीप खरे हा आश्विनचा आवडता गायक. त्याचं गाणंही आश्विननं खास आयबीएन लोकमतच्या प्रेक्षकांसाठी सादर केलं. सगळ्याच प्रकारची गाणी आश्विनला आवडतात. "मला डबलरोल अवधूत गुप्ते व्हायचंय" असंही त्यानं सांगितलं.भाऊ कोरडे आणि आश्विन बरोबरच्या दिलखुलास गप्पा ऐकण्यासाठी सोबतच्या व्हिडिओवर क्लिक करा

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 14, 2008 12:02 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 14, 2008 12:02 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close