S M L

एपिलेप्सीच्या स्त्री रुग्णांनी गरोदरपणात घ्यायची काळजी (भाग : 3)

एपिलेप्सीकडे मेंदूचा आजार म्हणून पाहिलं जातं. एपिलेप्सी म्हणजे काय, एपिलेप्सीचा त्रास असणा-या स्त्रीनं गरोदरपणात काय काळजी घेतली पाहिजे, एकूणच एपिलेप्सीबाबत एकूणचअसणा-या आपल्या शंकांवर ' टॉक टाइम 'मध्ये न्युरोलॉजिस्ट डॉ. योगेश गोडगे यांनी मार्गदर्शन केलं. डॉक्टर सांगतात, " एपिलेप्सी म्हणजे आकडी येणं. एपिलेप्सीचा त्रास असणा-या स्त्रियांनी गरोदर राहू नये असाआपल्या समाजात गैरसमज आहे. तर असं काहाही नाही. गरोदर होण्याअगोदर एपिलेप्सीचा त्रास असणा-या स्त्रियांनी काही विशेष काळजी घ्यावी लागत नाही. पण गरोदर राहिल्यानंतर मात्र एपिलेप्सीचा त्रास असणा-यांनी विशेष काळजी घ्यायला हवी. मला आकडीचा त्रास आहे, त्या गोळ्या जर मी चालू ठेवल्या तर त्याचा त्रास माझ्या बाळाला होईल, अशीआईची समज असते. आकडीच्या गोळ्यांचा होणा-या बाळावर परिणाम होण्याची 0.5 टक्के इतकी शक्यता असते. पण 99.99 टक्के आकडीच्या गोळ्यांचा बाळाला त्रास होत नाही. बाळाला त्रास होईल म्हणून गोळ्या घेतल्या नाही आणि त्यावेळेला जर फीटआली तर मात्र बाळाला त्रास होणार. एपिलेप्सीचा त्रास असणा-या बाईनं गरोदरपणात गोळ्या चालू ठेवल्या पाहिजे. गरोदर राहिल्यावर वरच्यावर न्युरोलॉजिस्टकडून तपासण्या करायच्या. एपिलेप्सीचा त्रास असणा-यांच्या बाळंतपणात काही कॉम्पिलीकेशन्स येत नाहीत. पण बाळंतपणाची वेळ जसजशी जवळ येते तसतसा गोळ्यांच्या प्रमाणात बदल होतो. गोळ्यांची लेव्हल खाली गेल्यानं आकडी येण्याची शक्यता सर्वात जास्त असते. त्यासाठी प्रत्येक दोन महिन्यांनंतर गोळ्यांच्या ब्लड लेव्हलची पातळी चेक करायची. आकडीचा त्रास असणा-या प्रत्येक गरोदर स्त्रीचं आम्ही कौन्सिलिंग करतो, " यासारखी महत्त्वपूर्ण माहिती ' टॉक टाइम 'मध्ये डॉ. योगेश गोडगे यांनी दिली. न्युरोलॉजिस्ट डॉ. योगेश गोडगे यांनी केलेलं मागदर्शन ऐकण्यासाठी व्हिडिओवर क्लिक करा. एपिलेप्सी म्हणजे अपस्मार म्हणजेच फीट्स येणं . एपिलेप्सीची कारणं :मेंदू आणि त्यातील पेशींचा रासायनिक असमतोल होतो.मेंदूचं शरीरावरील नियंत्रण सुटतं.मेंदू आणि त्यातील पेशींमधील रासायनिक द्रव्याची कार्यक्षमता वाढून मेंदूचं कार्य बिघडतं.एपिलेप्सीचे प्रकार : पेटीट माल एपिलेप्सी : लहान मुलांमध्ये हा प्रकार जास्त आढळतो.काही काळासाठी रुग्ण बेशुद्धावस्थेत जातो.ग्रँडमाल एपिलेप्सी : अचानक चक्कर येणं, अस्वस्थ वाटणं दातखीळ बसणं, तोंडाला फेस येणं असं या प्रकारात होतं. फीट येऊन गेल्यावर रुग्ण बराच वेळ झोपेत असतो. पोस्ट ट्रॉमॅटिक एपिलेप्सी : बाळाच्या जन्मानंतर मेंदूला इजा झाल्यास फीट्स येतात.एपिलेप्सी अ‍ॅटॅकनंतर घ्यायची काळजी : रुग्णाला जागेवरून हलवू नका.5 मिनिटांपेक्षा जास्त वेळ फीट आली तर डॉक्टरांना बोलवा.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 18, 2008 10:50 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 18, 2008 10:50 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close