S M L

जेवणाची लज्जत वाढवणारे स्टार्टर्स (भाग : 1)

' टॉक टाइम ' मध्ये पाककलातज्ज्ञ स्मिता नाबर आल्या होत्या. त्यांनी ' स्टार्टर्स ' बनवायचे कसे याची माहिती सांगितली. गेल्या काही वर्षांपासून पार्टी फूडमध्ये स्टार्टर्स हा प्रकार सर्वात जास्त रुढ व्हायला लागला आहे. कोणत्याही समारंभात, पार्टीमध्ये आपण वेगवेगळ्या लोकांना विविध ठिकाणांहून आमंत्रित करत असतो. काही लोक लवकर येतात, तर काही उशीरा येतात, काही भुकेने येतात, तर काही अर्ध्याभुकेनं येतात. तर या पाहुण्यांना काहीतरी थोडं खायला देऊन स्वागत करण्याची आपली पद्धत असते. हे खाणं अल्पोपहारी असायला पाहिजे. यातूनच स्टाटर्सची पद्धत अस्तित्त्वात आली आणि आता ती फारच पॉप्युलर व्हायला लागली आहे. थोडक्यात स्टार्टर्स म्हणजे जेवणाआधीचं चमचमीत खाणं. स्टार्टर्स म्हटले की आपल्याला आठवतात ते कबाब. पण याही व्यतिरिक्त स्टाटर्समध्ये ब्रेड रोल, कॉर्न रोल, स्प्रिंग रोल, ड्राय मन्च्युरीअन, पनीर बॉल्स, मीनी समोसा, चायनीज समोसा, पनीर टीक्का. पटॅटो रोल असे निरनिराळे पदार्थ येतात. आणि ते टुथपीकला टोचून खाता येतात. जशी आपण जेवण करताना आधी निरनिराळ्याप्रकारची तयारी करून ठेवतो, तशी स्टाटर्स करतानाही आधी निरनिराळ्या प्रकारची तयार करून ठेवता येते. स्टार्टर्स बनवताना ब्रेड क्रम्स, बटाटा, कॉर्न स्टार्च, मैदा कमीत कमी वापर करायचा. स्टार्टर्स म्हणून तयार केलेल्या पदार्थांमध्ये कधीच गेव्ही नसावी. तसचं स्टार्टर्स म्हणून तयार कलेल्या पदार्थांचा आकार लहान असावा. स्टार्टर्समध्ये अनेक भाज्यांचाही वापर करता येतो. नीट न जेवणार्‍या मुलांच्या तक्रारीही या स्टार्टर्समुळे कमी होतात, अशी महत्त्वपूर्ण माहिती पाककलातज्ज्ञ स्मिता नाबर यांनी सांगितली.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 19, 2008 12:01 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 19, 2008 12:01 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close