S M L

गप्पा केशव परांजपे आणि सतीश पाकणीकरांशी (भाग : 1)

' सलाम महाराष्ट्र 'मध्ये संगीताचे ज्येष्ठ अभ्यासक केशव परांजपे आणि सुप्रसिद्ध फोटोग्राफर सतीश पाकणीकर यांच्या गप्पा ऐकायला मिळाल्या. नवोदितांना व्यासपीठ मिळवून देणं ही संगीताचे ज्येष्ठ अभ्यासक केशव परांजपे यांची ओळख आहे. नवोदितांसाठी ते गेली 25 वर्षं ' स्वर माऊली ' ही संस्था चालवत आहेत. सध्या ते अभिनव कॉलेजचे प्राचार्य आहेत. किशोरीबाई आमोणकर यांच्याबरोबर त्यांनी संगीताची सेवा करत आहेत. ' सलाम महाराष्ट्र 'मध्ये त्यांच्या कामाविषयी ऐकायला मिळालं. गप्पांची सुरुवात झाली ती किशोर परांजपे यांच्या ' स्वर माऊली ' या संस्थेपासून. " माझी आणि संगीताची नाळ मी कॉलेजमध्ये असल्यापासून जुळली. मला साधं गाता आणि वाजवताही येत नव्हतं. त्यामुळे मी संगीताच्या ऑर्गनायझेशनकडे वळलो. त्यावेळी पार्ल्यामधले ज्येष्ठ संगीत सेवक मनोहर रेगे यांनी ' स्वर माऊली ' ही संस्था नुकतीच स्थापन केली होती. प्रस्थापित म्युझिक सर्कल आहेत ते फक्त मोठ्या कलांकारांना घेऊन कामं करतात. त्यामुळे नवोदितांसाठी काहीतरी केलं पाहिजे असा मनोहर रेगेंचा मानस होता. रेगेंची माऊली भजनमंडळ नावाचं भजनमंडळ होतं. त्यांचं नाव मग ' स्वर माऊली ' झालं. त्यांनी मला त्यांच्या कामात ओढून घेतलं. त्यातून मी ' स्वर माऊली 'चा सेवक झालो. ' स्वर माऊली ' ही संस्थानसून एक प्रकारचं म्युझिक सर्कल आहे. गेल्या 25 वर्षांपासून ते म्युझिक सर्कल नवोदितांसाठी काम करत आहे. अनौपचारिक असं हे म्युझिक सर्कल आहे. या म्युझिक सर्कलमधला एक कार्यक्रम हा नवोदित कलाकारांसाठी असतो. दोन कलाकारांना आम्ही संधी देतो. शास्त्रीय संगीताची आवड असणा-या श्रोत्यांची अभिरुची संपन्न व्हावी, त्यांचं कुतूहल क्षमावं यासाठीही आम्ही विशेष प्रयत्न करत असतो. त्यासाठी आम्ही व्याख्यानमाला, चर्चासत्रांचंही आयोजन करतो. विलेपार्लेभागामध्ये आमच्या या संगीत चळवळीला खूप चांगला प्रतिसाद आहे. कोलकातापासूनचे कलाकार आमच्या संपर्कात आहेत, " 'स्वर माऊली'चा इतिहास सांगताना केशव परांजपे नकळत भूतकाळात रमले. नुकताच पुण्यात 25वा सवाई गंधर्व महोत्सव संपन्न झाला. त्या महोत्सवात फोटोग्राफर सतीश पाकणीकर यांच्या बज्म-ए-गझल नावाचं कॅलेन्डरचं प्रकाशन झालं आहे. अनेक दिग्गज गझल गायकांचे यामध्ये फोटो या कॅलेन्डरमध्ये आहेत. सतीश पाकणीकर हे स्वत: इंडस्ट्रियल फोटोग्राफर असून दरवर्षी ते वेगवेगळ्या विषयांवर कॅलेंडर काढतात. संगीत आणि फोटोग्राफी या त्यांना असलेल्या दोन वेगवेगळ्या छंदाबद्दल ते ' सलाम महाराष्ट्र 'मध्ये बोलले. " 1983 सालापासून माझ्या इंडस्ट्रीयल फोटोग्राफर म्हणून काम करायला सुरुवात केलं. पण त्याही आधीपासून मी सवाई गंधर्वमध्ये गाणं ऐकायला जायचो. 1983पासून माझा कॅमेरा माझ्याबरोबर ' सवाई गंधर्व ' महोत्सवात गेला. अगदी जवळून मी कलाकारांच्या भावमुद्रा टिपल्या आहेत. मी जे काम करायचो ते लोकांना आवडायचं. त्यातूनच कॅलेंडर काढण्याची कल्पना सुचली, " हे सांगताना सतीश पाकणीकरांच्या चेह-यावर समाधान झळकलं. संगीताचे ज्येष्ठ अभ्यासक केशव परांजपे आणि सुप्रसिद्ध फोटोग्राफर सतीश पाकणीकर यांच्या गप्पांची मैफल पाहण्यासाठी व्हिडिओ क्लिक करा.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 20, 2008 07:12 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 20, 2008 07:12 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close