S M L

लाख मोलाचा जीव...

मुंबईत झालेला दहशतवादी हल्ला सर्वांनीच लाईव्ह पाहिला. त्यात लढणार्‍या पोलिसांचं आणि एनएसजी कमांडोंचं सर्वांनीच कौतुक केलं. पण अग्निशमन दलाचे जवानही एनएसजी कमांडोंच्या खांद्याला खांदा लावून लढत होते. एकग बाजूला दहशतवादी हँडग्रेनेड फेकत होते...दुसर्‍या बाजूला सतत आग लागत होती...त्यात जीवाची बाजी लावून हे फायर फायटर्सही लढत होते. त्यांच्या बहादुरीला सलाम ठोकणा-या लाख मोलाचा जीव... ' या कार्यक्रमात चीफ फायर ऑफिसर अनिल सावंत, जॉईन्ट फायर ऑफिसर प्रताप करगोपीकर आणि असिस्टन्ट डिव्हिजनल फायर ऑफिसर प्रभात रहंगदाळे हे पाहुणे आले होते. अग्निशामक दलानं दहशतवादी हल्ल्यांच्या वेळी केलेल्या कामाचा आढावा ' लाख मोलाचा जीव... ' या परिसंवादातून घेण्यात आला होता. दहशतवाद्यांनी मुंबईवर केलेल्या 26 / 11 च्या कृष्णकृत्याच्या जखमा अजूनही ताज्या आहेत. त्यात 28 नोव्हेंबरचा दिवस अजूनही सगळ्यांच्या चांगल्याच लक्षात आहे. संध्याकाळची वेळ होती. हॉटेल ताजच्या पाचव्या मजल्यावरची आग प्रचंड भडकली होती. ती विझवण्या शिवाय पर्याय नव्हता. ताजमध्ये ज्या ठिकाणी आग लागली होती तिथे खाली फायर बिग्रेडने आपला तळ बनवला होता. ते फायरब्रिगेडच्या शिड्या लावून ते आगीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होते. दहशतवाद्यांविरोधातलं ऑपरेशन अंतिम टप्यात आलं होतं. फायर बिग्रेडचे जवान केवळ ताजच्या बाहेरचत नाहीत तर चक्क आतमध्ये जाऊन एकीकडे लोकांना वाचवत होते. तर दुसरीकडे दहशतवाद्यांनी लावलेली आग विझवून फायर बिग्रेडचे जवान एनएसजीच्या जवानांना वाट करुन देत होते. दहशतवाद्यांनी वाचण्यासाठी ताजच्या प्रत्येक मजल्यावर आगी लावल्या होत्या. मग एक वेळ अशी आली की या आगीच एनएसजीचे जवानचं अडकले होते. दहशतवादी दुसर्‍या मजल्यावर असल्याचं लक्षात येताच एनएसजीचे जवान त्या ठिकाणी घुसले होते..पण यावेळी तळमजल्या वर आणि पहिल्या मजल्यावर आग भडकली. त्यात एनएसजीचे जवान गुदमरले. यावेळी फायरमननी तिसर्‍या मजल्यावर घुसून शिडीच्या मदतीने एनएसजीच्या जवानांना बाहेर काढलं. एनएसजीचे जवान आणि हे फायरमन अगदी खांद्याला खांदा लावून दहशतवाद्यांना टक्कर देत होते.... अग्निशामक दलाचं काम आठवलं की अंगावर काटा येतो आणि अभिमान वाटतो.ताज, ओबेराय, नरिमन हाऊस, आणि कॅफे लिओपोर्ड या ठिकाणी झालेले हल्ले हे दहशतवादी आहेत याची कल्पना नव्हती. त्याविषयी चीफ फायर ऑफिसर अनिल सावंत सांगतात, " कंट्रोलमधून ऑबेराय हॉटेलला आग लागल्याचा फोन आला. आम्ही अग्निशामक पथक घेऊन घटनास्थळी पोहोचलो. पाहिलं तर नवीन ऑबेरायच्या पहिल्या मजल्याला आग लागली होती. ती जर विझवली नसतीतर संपूर्ण हॉटेल जळून खाग झालं असतं. त्यामुळे आम्हाला सर्वात आधी ती आग विझवावी लागली. ते काम पूर्ण होत नाही तर कंट्रोलमधून हॉटेल ताजला आग लागल्याचा फोन आला. आम्ही पोहोचलो त्या वेळेला हॉटेल ताजची आग भडकली होती. आत खूप लोकं अडकली होती. शिवाय दारं, खिडक्या आणि दरवाजे बंद होते.खिडक्यांत उभं राहून ते लोक त्यांना वाचवण्याचे इशारे करत होते. आम्ही 26 / 11 च्या घटनेत 600 लोकांना वाचवलं आहे." अशाप्रकारे युद्ध पातळीवर काम करण्याची अग्निशामक दलाची पहिलीच वेळ होती. " आम्ही आगीत अडकलेल्या लोकांना वाचवत होतो. तसेच दहशतवाद्यांच्या हल्ल्यामुळे जखमी झालेल्या लोकांनाही बाहेर काढत होतो. यासाठी आम्हाला थर्मल इमेजिंग कॅमे-याची भरपूर मदत झाली. एनएसजीच्या कमांडोजनाही आम्ही वाट करून दिली. या रेस्क्यु ऑपरेशनसाठी 13 फायर इंजिन, 5 अ‍ॅम्ब्युलन्स आणि 6 वॉटर टॅन्क्स लागले. एवढी प्रचंड साधन सामुग्री आम्हाला पहिल्यांदाच लागली होती. या ऑपरेशनसाठी आमच्याकडची सगळी साधन सामुग्री वापरली होती, " अशी माहिती जॉईन्ट फायर ऑफिसर प्रताप करगोपीकर यांनी दिली. हल्ल्याच्या वेळी निशस्त्र असणारे फायर बिग्रेडचे जवान युद्ध पातळीवर आपलं काम करत होते. मात्र,यावेळी आपण लावलेली आग तात्काळ विझवण्याचा प्रयत्न होत असल्याचं लक्षात येताचं मग दहशतवाद्यांनी एक ग्रेनेड रेस्क्यु करणा-या जवानांच्या दिशेनं फेकला. त्या ग्रेनेडची वात काढण्यात आली होती. तो हॅण्ड ग्रेनेड जिवंत होता. ज्या शिडीवरून फायरमन चढून लोकांना रेस्क्यु करत होते. बरोबर त्याच शिडीजवळ हा ग्रेनेड पडला होता. पण यामुळेही फायरमन डगमगले नाहीत. त्याच शिडीवरून त्यांनी अनेकांची सुटका केली. जेव्हा एखाद्याची सुटका व्हायची तेव्हा मृत्यू पाहिलेल्यांच्या चेहर्‍यावरचा आनंद मोजता न येणारा असा होता. यावेळी मुंबई पोलीस, एटीएस दल, एनएसजी, मार्कोस आणि अग्निशामक दल यांनी एकत्र येऊन केलेल्या प्रयत्नांचं चीज झालं असल्याचं असिस्टन्ट डिव्हिजनल फायर ऑफिसर प्रभात रहंगदाळे यांचं चर्चेत मत होतं. प्रभात रहंगदाळे यांनी युनोकडून रेस्क्यु ऑरेशनची प्रशिक्षण घेतलं आहे. ते सांगातात, " प्राप्त परिस्थितीत असलेली साधनं आणि लोक यांचा उपयोग करून आपत्ती व्यवस्थापन कसं करायचं याचं प्रशिक्षण युनोनं दिलं आहे. त्याचाच उपयोग 26 / 11 च्य रेस्क्यू ऑपरेशनमध्ये आम्ही केला आहे. मुंबई पोलीस, एटीएस दल, एनएसजीच्या जवानांनी एकत्र येऊन आम्ही काम केलं आहे. त्याचा उपयोग झाला आहे. " प्रसंगी जीव धोक्यात घालून लोकांचे प्राण वाचवणार्‍या अग्निशमन दलाच्या जवानांच्या जिवाची किंमत अवघी एक लाख रूपये झाली आहे. त्याविषयी चीफ फायर ऑफिसर अनिल सावंत सांगतात, " 390 जवांना त्यांच्या कामाचं बक्षीस मिळणार आहे. आमच्या रिस्क अलाऊन्समध्ये वाढ झाली आहे. आम्हाला अतिरिक्त विम्याचं संरक्षण मिळालं आहे."

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 24, 2008 10:13 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 24, 2008 10:13 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close