S M L

श्रीमंत व्हा (भाग 1)

श्रीमंत व्हा (भाग 1)घर घेताना...गृह कर्जाचे व्याजदर कमी झालेत त्यामुळे सर्वसामान्यांना घर घेणं आता सोपं झालंय. पण नवं घर घेताना काय काय करावं लागतं अगदी घरासाठीच्या कर्जासाठी कोणती कागदपत्रं लागतात याची माहिती यावेळच्या श्रीमंत व्हा कार्यक्रमामध्ये दिली श्री.श्रीनिवास घैसास यांनी.श्रीनिवास घैसास सांगतात, घर घेताना प्रथम घर कुठे घ्यायचं हे पाहिलं पाहिजे. मग घर किती मोठं म्हणजे घर केवढं असावं. सर्वात प्रथम आपल्या नोकरी किंवा व्यवसाच्या जागेपासून घर किती सोयीच आहे हे प्रथम पाहिलं पाहिजे. सर्वसामान्य माणूसाचं स्वप्नं असतं की आपलं स्वत:चं घर असावं. त्याकरिता तो कर्ज घेतोच काही वेळेला दागिनेसारख्या वस्तूपासून पैसा जमवला जातो. त्यामुळे आपल्या मेहनतीने कमावलेले पैसे वाया जाऊ नये म्हणून विशेष काळजी घेतली पाहिजे.घर घेताना त्या घराची वैधता, मालकी हक्क कोणाकडे आहे हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असतं. सद्या मंदीमुळे आणि विशेषत: बँकांनी गृहकर्जावरील व्याज दर कमी केल्यामुळे नवीन घर घेणा-यासाठी चांगली संधी आहे. पण घर घेताना किंवा घरासाठी जमीन घेताना त्या जागेची मालकी हक्क कोणाकडे आहे हे पाहणं गरजेचं आहे. तसेच त्याजागेचा बिल्डरकडे बिल्डिंग बांधण्याचे मालकी हक्क आहे का? तसंच मालक, बिल्डरच्या अ‍ॅग्रीमेंटमध्ये छुपे कोणते रूल, रेग्युलेशन आहेत का ? ह्या बाबी व्यवस्थित पडताळून पाहिल्या पाहिजेत.गृहकर्ज घेतानाही बँकाचे नियम व्यवस्थित पाहूनच कर्ज घेतलं पाहिजे. कर्ज देताना बँकेकडून सर्वप्रथम त्याजागेचा प्लान व्यवस्थित आहे का हे पाहिलं जातं. तसेच त्यासंबधीत योग्य कागदपत्रं पाहिली जातात. त्याच बरोबर सध्या एनऐ ऑर्डर पाहिली जाते. म्हणजे बांधकामाची जमीन बिगर शेती अंतर्गत असली पाहिजे. रिसेल घर घेताना पूर्वीचा मालकाच्या जागेचा सातबारा सर्टिफिकेट तसंच तो कोणाला कर भरत होता हे पाहणं गरजेच असतं.गृहकर्ज देताना बँका तुमचं इनकम किती आहे. भविष्यात तुम्ही घेतलेलं कर्ज परत करू शकता की नाही हे पाहण्यासाठी मागील तीन वर्षाचं इनकम टॅक्स रिटर्न पाहतात. सर्व बँकांमध्ये गृहकर्जावरील व्याज दर सध्यातरी सारखेच आहेत. सध्याची मंदी पाहता गृहकर्ज स्वस्त झालं असलं तरी भविष्यात यापेक्षा मोठे बदल होणं शक्य नाही. कारण मुंबई सारख्या शहरात अपु-या जागेमुळे घरांची मागणी नेहमीच वाढत असते. शेतकरी, लहान उद्योजकही मग त ेइनकम टॅक्स भरत नसतील तरी त्यांना कर्ज मिळू शकतं फक्त ते कर्जाची रक्कम कशी भरणार हे त्यांनी आधी स्पष्ट केलं पाहिजे. घैसास सांगतात, गृहकर्ज घेताना तुम्ही किती वर्षासाठी कर्ज घेणार त्याचबरोबर तुमचं उत्पन्न किती आहे यावरच तुम्हाला कर्ज दिलं जातं. म्हणून कर्ज घेताना भविष्यात वाढणारं उत्पन्न आणि आपणं कर्ज किती वर्षात परत करू शकतो यावर आपण किती रक्कम घ्यायची हे ठरवलं पाहिजे.साधारणत: उत्पन्नाच्या 40पट कर्ज मिळतं. तसंच कुटुंबातील सगळयाच एकूण उत्पन्न मिळवून जॉइण्ट रक्कमेवरही कर्ज मिळू शकतं. समजा एखादी बँक गृहकर्ज देताना सामान्य बँकापेक्षा जास्त कर्ज दराने व्याज देत असेल तर आज अनेक पर्यायी बँका उपलब्ध आहेत त्यामुळे सर्वबाबीची तपासणी करून गृहकर्ज घ्यावं

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 24, 2008 07:59 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 24, 2008 07:59 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close