S M L

धक्क्यातून सावरताना... (भाग - 1)

मुंबईवरच्या दहशतवादी हल्ल्यातून मंबई सावरत आहे. तेव्हा टॉक टाईमचा विषय ' धक्क्यांतून सावरताना ' होता. ' टॉक टाइम 'मध्ये असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर संजय गोविलकर आणि मानसोपचारतज्ज्ञ डॉ.विहंग वाहिया आले होते. संजय गोविलकर पोलीस इन्स्पेक्टर या पदावर कार्यरत आहेत. 26 / 11 च्या दहशतवादी हल्ल्यातल्या एका अतिरेक्याला जिवंत आणि 1 अतिरेक्याला मृत पकडण्यात ज्या पोलिसांच्या पथकाला यश आलं आहे, त्या पथकामध्ये संजय गोविलकर होते. या अशाप्रकारच्या धक्क्यातून कसं बाहेर यावं, ही परिस्थिती कशी हाताळली पाहिजे याविषयी यावर मानसोपचारज्ज्ञ डॉ.विहंग वाहिया आणि असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर संजय गोविलकर यांनी पोलीस आणि जनतेला मार्गदर्शन केलं. युनिफॉर्ममधले अधिका-यांना पाहिलं की ते आपलं संरक्षण करणार, असा विचार डोक्यात पटकन् येतो. त्या अधिका-यांच्या मागे त्यांचं मन आहे, त्यालाही हा धक्का बसू शकतो. मुंबईवर अतिरेकी हल्ला झालेला आहे, यातनं सावरणं कठीण आहे. त्याविषयी संजय गोविलकर सांगतात, " ही दुदैर्वी घटना होती. या घटनेतून आपण सगळ्यांनी बोध घ्यायला हवा की, आपण मानसिकरित्या सक्षम असलंच पाहिजे. आम्हा पोलिसांच्या सुदैवानं आम्हाला या सगळ्याच गोष्टी ट्रेनिंगमध्ये असतात. पण एक नागरिक म्हणून आपण आपली कर्तव्य पार पाडतो का, याचा विचार करायला हवा. आपण नागरिक म्हणून आपली कर्तव्य पार पडली तर अर्ध्या अधिक समस्या तिथेच सुटतात. प्रत्येक नागरिक आपली दु:ख व्यक्त केल्यानं मनावरचा ताणही भरपूर कमी होतं. पोलिसांवर ताण असतात. या ताणामुळे त्यांना घरच्यांशी अजिबात बोलता येत नाही. मग अशावेळी पोलिसांनी त्यांचं मन आप्तेष्टांकडे मोकळं केलं पाहिजे, असं संजय गोविलकर म्हणाले. " पोलीस दलात जेव्हा आम्ही भरती होतो, तेव्हा आम्हाला या अशाप्रकारच्या संकटांना तोंड द्यावं लागणार याची कल्पना असते. कधीकधी हिंसक घटनांनी मन सुन्न व्हायला होतं. अशावेळी पालिसांनी त्यांच्या मनात जे काही साठलं आहे ते त्यांच्या बायकोकडे, मित्रमैत्रिणींकडे ते बोलावं. आपलं मन मोकळं करावं. त्याने मनातल्या दु:खाचा उद्‌वेग होत नाही, " असा मोलाचा सल्ला संजय गोविलकरांनी पोलीस दलात कामकरणा-या प्रत्येक बांधवाला दिला.अशाप्रकारचा आकस्मित मृत्यू पाहून मन विदीर्ण होतं.अशा वेळेस अनेकवेळा काय करावं हे सुचत नाही. मन नॉर्मलला यायला वेळ लागतो. या संदर्भात डॉ. विहंग वाहिया सांगतात, " कोणत्याही व्यक्तीचा जर मृत्यूशी सामना झाला तर त्याला धक्का बसणं स्वाभाविकच आहे. त्याला झोप येत नाही. तेच तेच दृश्य त्यांच्या डोळ्यांसमोर येत राहतं. पुढे आपलं काय होईल या चिंतेनं ते व्याकुळ होतात. आपण वाचलो पण लोकांना वाचवू शकलो नाही, ही मनात अपराधी पणाची भावना येत राहते. आपण इतरांना वाचवू न शकल्याचं शल्य त्यांना बोचतं. हिंसक पद्धतीचा मृत्यूचा अनुभव होणं हा एका वेगळ्या पद्धतीच्या ताणाचा अनुभव असतो. त्याला पीटीएसडी पोस्ट ट्रॉमेटिक स्ट्रेस डिसऑर्डर असं नाव दिलेलं आहे. पीटीएसडीचा त्रास व्यक्तीला कसा होईल हे त्या व्यक्तीच्या सहनशीलतेवर अवलंबून असतं. अशा परिस्थितीत त्या व्यक्तीनं ब्रीफिंग करावं. आपल्या मनातल्या भावना एका कागदावर लिहून काढायचा. हे कल्यानं ताण ब-याचं अंशी कमी होतो. पोलिसांना ब्रीफिंगचा खूप उपयोग होतो. बाहेरचे ताण घरापर्यंत नेण्यापेक्षा बाहेरच्या बाहेर संपवलेले कधीही चांगले असतात. " या दहशतवादी हल्ल्यांनं पोलिसांच्या कुटुंबियांवरचा तणाव वाढला आहे. एकदा घरातून बाहेर गेलेली व्यक्ती सहीसलामत परतेल की नाही याची शाश्वतीच नसते. अशावेळी पोलीस दलात काम करणा-या व्यक्तीला त्याच्या कुटुंबाच्या मानसिक आधारची गरज असते. त्यानं फरक पडतो, असा दिलासा संजय गोविलकारांनी दिला. 26 / 11 च्या घटनेनं पोलीस आणि नागरिक खूप जवळ आले आहेत. इतके की पोलीस जनतेचं रक्षण करू शकतात, अशीही भावना निर्माण झाली आहे. ही भावना संपूर्ण पोलीसदलाचा गौरव करणारी अशीच आहे. त्याबद्दल संजय गोविलकर जनतेला उद्देशून सांगतात, " दहशतवादी हल्ल्यांची तुम्ही काळजी करू नका. मुंबईवर जेजे काही हल्ले झाले आहेत तेते सगळे उघडीकस आले आहेत. 93 चे मुंबई बॉम्बस्फोट असोत, 7 / 11 असतो, वा 26 / 11 असोत हे सगळे गुन्हे उघडकीस आले आहेत. त्यामुळे मुंबईला एकप्रकारे असा संदेश मिळाला आहे की मुंबईवर हल्ला करणं सोप्प नाहीये. या घटनेनंतर पोलीस पोलिसांशी आणि पोलीस सामान्य नागरिकांशी जोडले गेल्यानं आता त्याचा पोलिसांनी खूप उपयोग होणार आहे. कारण आतापर्यंत सिनेमामधूनही पोलिसांची चांगली प्रतिमा साकारली गेली नव्हती. पण या घटनेमुळे जुनी प्रतिमा पुसायला मदत होणार आहे. सर्व भारतीयांनी एक येऊन जसा ब्रिटीशांच्या विरूद्धात लढा दिला होता, तसा या घडीला सगळे एक भारतीय एक येऊन दहशतवादाच्या विरोधात लढा देत आहोत. भारतानं एक व्हायला पाहिजे ही गेल्या कित्येक दिवसांपासूनची माझ्या मानातली गोष्ट आहे. या दुदैर्वी घटनेमुळे का होईना पण साध्य झाली आहे. भगत सिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्या बलिदानानं भारतीय स्वातंत्र्य लढ्याला वेगळं वळण मिळालं होतं.तसंच वळण हेमंत करकरे , विजय साळसकर आणि अशोक कामटे यांच्या जाण्यानं दहशतवादविरोधाच्या लढ्याला मिळालं आहे. यांच्या बदानानं आपल्यामधलं भारतीयत्त्व जागृत झालं आहे. या देशभावनेला जगात कुठेही तोड नाहीये.26 / 11 मध्ये माझ्यामुळे काहीच झालं नाही. तर संपूर्ण मुंबई पोलीसच्या एकीमुळे आम्ही दहशतवादाचा बीमोड करू शकलो आहोत. संपूर्ण मुंबई पोलीस तब्बल तीन दिवस दहशतवाद्यांशी लढा देत होता. मुंबई पोलिसांमुळे दहशतवादी हल्ल्यांचा तपास शक्य झाला आहे. "' धक्क्यांतून सावरताना... ' मध्ये असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर संजय गोविलकर आणि मानसोपचारतज्ज्ञ डॉ.विहंग वाहिया यांनी केलेलं मार्गदर्शन ऐकण्यासाठी व्हिडिओ क्लिक करा.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 26, 2008 03:10 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 26, 2008 03:10 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close