S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • मुंबईतल्या दहशतवादीहल्ल्यापासून आपण काही धडा शिकलो आहोत का ?
  • मुंबईतल्या दहशतवादीहल्ल्यापासून आपण काही धडा शिकलो आहोत का ?

    Published On: Dec 27, 2008 07:02 AM IST | Updated On: May 13, 2013 01:24 PM IST

    नोव्हेंबरची 26 तारीख ही मुंबईकरांच्याच नाही तर देशाच्या आठणीतून जाणं कठीण आहे. या दहशतवादी हल्ल्यानं देशात आपण फार मोठं मंथन अनुभवलं आहे. राजकीय व्यवस्थेतसुद्धा ढवळाढवळ झाली आहे. काही मंत्र्यांना राजीनामे द्यावे लागले आहेत. देशाच्या सुरक्षाव्यवस्थेवरही चर्चा झाली. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दहशतवादी हल्ल्यानं ज्या काही घटना घडल्या त्या घटनांवर मुंबईतल्या सामान्य जनतेनं रस्त्यावर उतरून आपला असंतोष व्यक्त केला आहे. मुंबईवरचा दहशतवादी हल्ला हा या पद्धतीचा पहिलाच हल्ला असला तरी अतिरेकी हल्ले आणि बॉम्बस्फोट या घटना मुंबईसाठी फार नवीन आहेत. 1993पासून मुंबई अनुभवत आहे. देशानंही अनेक ठिकाणी ते अनुभवले आहेत. हे दहशतवादी हल्ले झाल्यावर सुरक्षा यंत्रणेच्या त्रुटींवर आणि राजकीय व्यवस्थेच्या अपयशावर दरवेळेस चर्चा होते. या घटनांना काही काळ लोटल्यावर चर्चा थंडावते. एखाद्या स्तुस्त अजगराप्रमाणं सुरक्षाव्यवस्था कामाला लागते. ही खेदाची बाब आहे. या दहशतवादी हल्ल्यापासून आपण सगळ्यांनी बोध घेण्याची वेळ आली आहे. त्यावरच ' आजचा सवाल ' आधारित होता - मुंबईतल्या दहशतवादीहल्ल्यापासून आपण काही धडा शिकलो आहोत का ? या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी एसआयइएस कॉलेजच्या राज्यशास्त्राच्या विभागप्रमुख डॉ. मनिषा टीकेकर, माजी पोलीस अधिकारी व्ही.एन.देशमुख आणि अरुण भाटीया हे पाहुणे आले होते. मुंबईतल्या दहशतवादीहल्ल्यापासून आपण काही धडा शिकलो आहोत का ? या प्रश्नावर 75 टक्के लोकांनी ' नाही ' असा कौल दिला. याचर्चेचा शेवट करताना आयबीएन-लोकमतचे संपादक निखिल वागळे म्हणाले, " जनतेने त्यांच्या मनातला निराशावाद काढून टाकायला हवा. त्यांनी बदलाची अपेक्षा सरकारकडून न ठेवता स्वत:पासून करायला हवी. तरच काहीतरी चांगलं आणि सकारात्मक घडेल. दहशतवादी कधीच कुणावर उगाचच हल्ला करत नाहीत. आपल्या घराचे वासे जेव्हा पोकळ होतात तेव्हाच दहशतवाद्यांचं फावतं. मानसिकतेत बदल घडल्यावर चांगले बदल आपोआपच घडतील ."

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close