S M L

फंडे करिअरचे (भाग : 1)

टेक ऑफचा हा या वर्षातला शेवटचा भाग होता. त्यामुळे या ' टेक ऑफ 'मध्ये चर्चा करण्याता आली ती करिअरचे फन्डे वर. म्हणजे करिअर प्लॅनिंगच्या बेसिक फन्डाज्‌वर. ' टेक ऑफ 'च्या पहिल्याच भागात प्रख्यात लेखक आणि आय.टी तज्ज्ञ यांनी करिअरवर मार्गदर्शन केलं होतं. त्यामुळे ' टेक ऑफ'च्या वर्षातल्या शेवटच्या भागातही त्यांनीच मार्गदर्शन केलं. नेहमी करिअर प्लॅनिंगवर बोललं जातं. यशस्वी कसं व्हावं यावरही चर्चा केली जाते. पण यशस्वी माणसाशी करियर प्लॅनिंगबाबत बोलल्यावर, त्यांच्याकडून करिअर प्लॅनिंगचे बेसिक फन्डाज जाणून घेतल्यावर इतरांनाही त्यांचं करिअर प्लान करणं सोपं जातं. आय.टी.तज्ज्ञ अच्युत गोडबोले यांनी चांगल्या पण यशस्वी करिअरची काही मूलभूत तत्त्व सांगीतली.करिअर प्लॅनिंग हा शब्द घासूनपुसून गुळगुळीत झालेला आहे, पण या करिअर प्लॅनिंगचा बेसिक फंडा काय आहे ? 10 वी, 12 वी किंवा मीड करिअर प्रोफेशल्सना करिअर प्लॅनिंगच्या बाबतीत काय मार्गदर्शन करशील ?करियर प्लॅनिंगच्या दोन गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. त्यातली पहिली गोष्ट आहे ती आपल्या अर्थव्यवस्थेची आपली अर्थव्यवस्था कुठे चालली आहे, आपल्याकडे कोणत्या प्रकारच्या नोक-या उपलब्ध आहेत याचा विचार अटळ आहे. पण त्याचबरोबर आपल्याला मनातून काय वाटतंय याचाही विचार करायला हवा. म्हणजे आपल्यला कुठेतरी वाटत असतं की अमूक एका गोष्टीची आपल्याला आवड आहे... मग ही आवड चित्रकलेची असेल, गाण्याची असेल, अर्थशास्त्र, इंजिनिअरिंग, बायोलॉजी अशी कोणतीही असू शकते.पण ती आवड आतून असायला हवी. पण लोकं प्रॅक्टीकल गोष्टींचा विचार जास्त करायला लागले आहेत. ' इधर पैसा ज्यादा है ते ये करो..' अशी लोकांची मनोवृत्ती आहे. म्हणजे मी असं सांगत नाहीये की प्रॅक्टील गोष्टींचा विचार करूच नका. तर तुम्हाला आवड कशात आहे आणि तुमच्या प्रॅक्टील आयुष्य या दोघांचा नीट विचार करून आपलं करियर निवडायला हवं. आपण 2008 हे वर्ष अतिशय वेगळ्या पद्धतीनं अनुभवलं आहे. दहशतवादी हल्ले, मंदी पाहिली आहे तरीही करिअरचं प्लॅनिंग करताना आतला आवाज ऐकणं हा करिअरचा बेसिक फन्डा आहे यावर तू ठाम आहेस तर... हो. कोणत्याही क्षेत्रात जा. तुफान मेहनत ही करवीच लागणार आहे. मला असं नेहमी वाटतं की आतला आवाज ऐकायला पाहिजे. आजकाल स्कोप वगैरेचीही चर्चा केली जाते. स्कोप म्हणजे काय ?... तर स्कोप म्हणजे मी इंजिनीअरिंगला गेलो, आयटीत गेलो तरी मला प्रचंड प्रयत्न करावे लागतील पण प्रचंड प्रयत्न न करता जॉब मात्र सर्वसाधारण मिळणार आहे, असा त्या स्कोपचा अर्थ असतो. व्हेअर अ‍ॅज मी संगीतात गेलो, चित्रकलेत गेलो तर मला जास्त परिश्रम तर करावे लागणार आहेत. आणि मी जर ते केले तर त्यात मी टॉपला राहणार आहे. म्हणजेच आपल्या आवडत्या विषयात करिअर केलं जास्त यश मिळतं. याचा अर्थ प्रॅक्टीकल विचार करू नका असा नाहीये. तर करा आणि आपल्या आवडत्या कला जोपासा. तू ' स्कोप 'ची चंगली व्याख्या सांगितली आहेत. मला कमी श्रमात झटकन् नोकरी मिळते. जर 8 तास काम करून मला 5 हजार रुपये मिळतात तर दुसरीकडे 25 हजार रूपये मिळतात. हा स्कोपचा अर्थ तू चांगला सांगितला आहेस. पण अच्युत हुशार मुलांना या गोष्टी चट्कन जमतात.. मात्र जर एखादा 60 टक्के मुलगा फार श्रम करून 75 टक्क्यांपर्यंत पोहोचतो. तर अशा सर्वसामान्य बुद्धीमत्तेच्या मुलांनीही आतला आवाज ऐकायला पाहिजे का ?हो. कारण एखाद्या मनापासून आवडणा-या गोष्टीवर जर आपण खरोखरीच खूप परिश्रम केलेत तर त्यात यश नक्कीच मिळू शकतं. पण एखाद्या आवडणा-या गोष्टीवर मनापासून प्रेम केलंच जात नाही. आपण नेहमी मार्क, नोकरी, पैसा, प्रमोशन, परदेशवारी, प्रसिद्धी ही उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून कामं करतो. झपाटून जाऊन काम करणारी माणसं मला नेहमीच आवडतात. तू मगाशी विचारलसं की असं झप्राटून जाऊन काम करणं, करिअरच्याबाबतीत आतला आवाज ऐकणं हे प्रत्येकाला शक्य आहे का ? तर यावर मी तुला सांगेन की आतला आवाज ऐकणं याकडे बरेच जणं दुर्लक्ष करतात. हीच तर माझी खरी खंत आहे. काही लोकांनाच हे असं झपाटून काम करणं जमतं. तरीही मनापासून आवडणा-या गोष्टीवर प्रेम केलंत आणि स्वत:ला झोकून दिलंत तर तुम्ही कोणत्यातरी उंचीला नक्की पोहोचाल. माझं म्हणणं जर मला कॉर्पोरेट भाषेत सांगायचं झालं तर मी असं सांगेन की ' मनापासून आवडणा-या विषयात झोकून देऊन काम केल्यान तुम्ही सीईओ नाही पण कंपनीच्या एखाद्या उच्चपदापर्यंत जाऊन तरी नक्की पोहोचाल. अच्युत झपाटून किंवा झोकून काम करणं म्हणजे नक्की काय ? विद्यार्थ्यांना तू तुझ्या उदाहरणावरून सांगशील का ?माझ्या आयुष्यातली कोणतीच गोष्ट प्लॅण्ट करून तसंच पैसा आणि प्रसिद्धी ही दोन उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून झाली नाही. आणि मी तसं केलं नाही. मला ज्या ज्या विषयांची गोडी लागली त्यात्या गोष्टी मी त्या त्या वेळेला अगदी मनापासून करत गेलो. मला जेव्हा गाण्याची गोडी लागली तेव्हा मी गाणं वेड्यासारखं ऐकत गेलो. वर्षानुवर्षं मी जवळपास प्रत्येक मैफील ऐकली. मुंबई - पुण्यातली कोणतीच मैफील मी सोडली नाही. अनेक गायकांचे अनेक राग मी ऐकलेत. गाण्यानं मला पैसे मिळणार नव्हते की प्रसिद्धी मिळणार नव्हती. पण गाण्याची मला अशी काही गोडी लागली की प्रत्येक राग माझ्या डोक्यात तीन तीन महिने घोळायचा. आयआयटीतला क्लास एकीकडे चालू असायचा. पण डोक्यातला मालकंस काही जाता जायचा नाही. तसंच विज्ञान आणि अर्थशास्त्राचंही माझ्याबाबतीत झालं. आमच्या ग्रुपमध्ये आयआयटीत असताना ' भारताता गरिबी का आहे, ' या विषयावर चर्चा चालू होती. त्या चर्चेमुळे आम्ही झपाटून अर्थशास्त्र वाचायला सुरुवात केली. अ‍ॅडम स्मिथ , मार्कस् , केन्स अशा सगळ्या अर्थ शास्त्रज्ञांच्या थिअरीज आम्ही वाचायला सुरुवात केली. चर्चा करून वाद घालून तो आमचा प्रश्न असल्याप्रमाणे आम्ही त्यावर उत्तरं शोधत होतो. हा विचार करताना भारतातल्या गरिबीशी आपल्याला काय करायचंय, हा प्रश्न कधीच माझ्या मनाला शिवला नाही. आमचाच प्रश्न असल्याप्रमाणं आम्ही अर्थशास्त्राचं वाचन करत गेलो. आयआयटीचा अभ्यास पूर्ण होईपर्यंत आम्ही अर्थशास्त्र वाचलं आहे. म्हणजे आयुष्यात कधीही यश आणि पैसा हा फोकस नसावा.. पण कधी कष्ट आपल्याला टाळता येत नाहीत तर... हो. कारण हार्डवर्कला पर्याय नाहीये. म्हणजे करिअरचा एक फन्डा मनच ऐका आहे आणि दुसरं कष्टाला शॉर्टकट नाहीये...हो. प्रचंड श्रम करण्याची तयारी असायला हवी. कारण झोकून दिलं पाहिजे. कामावर प्रेम केलं पाहिजे. पैसा आणि प्रतिष्ठेच्या मागे कधीच जायचं नाही. मला एखादी गोष्ट आवडी, म्हणून मी ती केली त्यात मी स्वत:ला इतकं झोकून दिलं की पैसा आणि प्रतिष्ठा माझ्यामागे आपोआपच आली ही गोष्ट वेगळी . ते खरं यश. प्रॅक्टील आयुष्याचा विचार कराच. पण मनापासून आवडणा-या विषयांत झोकून आणि झपाटून देऊन काम करा हा आदर्श ठेवून करिअरकडे वळलं पाहिजे तर...हो. अगदी बरोबर आहे. भारताची लोकसंख्या पाहता आपल्याकडे स्पर्धाही तीव्र आहे. प्रत्येकाला टॉपला जायचं असतं. ऑलवेज रुम अ‍ॅट द टॉप. ती जी वरची रुम आहे ती मोठी आहे का की तिथे फक्त एकालाच जाता येईल. का प्रत्येकाला त्याच्या त्याच्या क्षेत्रासाठी मोठी रुम उपलब्ध आहे ?हो आहेत की. आता आयटीमध्ये रुम अ‍ॅट द टॉप मोठी आहे. आयटीमध्ये सर्वात जास्त स्कोप आहे. म्हणजे तिथे कमी श्रमानं जाता येतं. तसं प्रत्येक क्षेत्रात रुम ऑफ द टॉप मोठी आहे. त्या खालोखालही चांगली पदं आहेत. तुम्ही स्कोप असलेलं कोणतंही क्षेत्र करिअरसाठी निवडलंत तरी काही हरकत नाही. पण त्याही पदावर झोकून देऊन कामं करणं हे तुमचं कर्तव्य आहे. त्या क्षेत्रातले बारकावे माहीत असलेच पाहिजे. मी आतापर्यंत आयटीच्या नोकरीसाठी खूप मुलांच्या मुलाखती घेतल्या आहेत. पण जेव्हा विद्यार्थ्यांना त्यात्या विषयातल्या साध्या साध्या गोष्टी काही माहीत नसल्याचं कळतं तेव्हा भरपूर दु:ख होतं. म्हणजे स्कोप म्हणून करिअरसाठी निवडलेल्या विषयाच्या प्रत्येक गोष्टींची तुम्हाला माहिती असायला हवी. इंटरव्ह्यूला मुलं आल्यावर त्यांना साध्या साध्या गोष्टींची माहिती नसते. तेव्हा करिअरच्या बेसिक फन्डामध्ये ज्ञानाविषयी प्रेम असणं ही गोष्ट महत्त्वाची आहे तर...हो. आणि ते खूप गरजेचं आहे. मी मगाशी सांगितल्याप्रमाणं मी आजपर्यंत कित्येक आयटी पदवीधर मुलांच्या मुलाखती घेतल्या आहेत. पण त्या मुलाखती घेताना माझी दारुण निराशा झालेली आहे. मी आता मुलांना तुम्ही इतर गोष्टी काय करतात ते विचारण्याच्या भानगडीतच पडत नाही. मुलाखतीला जाताना कपडे कसे घालावेत, कोणते घालावेत, कसं बोलावं याची माहिती मुलांना असते. पण आपण ज्या विषयातून शिक्षण घेतलं आहे, त्याची माहिती अजिबात नसते. हे योग्य नाही. ज्ञानाविषयी प्रेम असणं फार महत्त्वाचं आहे. बहुतेक मुलं मार्क आणि भविष्यात नोकरी यांच्यासाठी शिकतात. पण जी मुलं ज्ञानासाठी शिकतात तीच पुढे आयुष्यात यशस्वी होतात.कधीकधी एखाद्या व्यक्तीला तो जे काम करत आहे, ते आवडेनासं होतं. पण तो त्यावेळेला इतर गोष्टी चांगल्या करत असतो. अनेकदा मनात नोकरी सोडण्याचेही विचार येतात. मग अशावेळी त्या व्यक्तीनं काय करायला पाहिजे ?आपल्याला नोकरी करणं का आवडत नाही याची कारण शोधलं पाहिजे. एक तर ती व्यक्ती जे काम करत आहे ते काम आवडीचं नसतं किंवा काम आवडीचं असूनही कामातून समाधान मिळत नसतं. ही दोन कारणं असू शकतात. अशावेळेला झटपट नोकरी सोडणं कधीच चांगलं नाही. शेवटी पोटाचा प्रश्न असतो. या परिस्थितीत आपण जे काम करत आहोत ते चालू ठेवायचंच पण दुसरीकडे स्वत:ला आवडीच्या विषयात गुंतवायचं. तसं केल्यानं अनेक पर्याय खुले होतील. करिअरचे आणि समाधानाचेही.सध्या जगात मंदीचं वातावरण सुरू आहे. स्वच्छेनं आणि आवडीच्या विषयात करिअर करूनही कित्येक पदवीधरांना कंपनीतून कमी केलं जात आहे. अशास्थितीत आयटीक्षेत्रात करिअरच्या काही संधी आहेत का, किंवा आयटी पदवीधरांनी काय केलं पाहिजे ?आयटी पदवीधरांना दोन पद्धतीनं करिअर करता येत. एक म्हणजे टेक्नॉलॉजीत आणि दुसरं म्हणजे टेक्नॉलॉजी मॅनेजमेंटमध्ये. आता टेक्नॉलॉजी हे क्षेत्र असं आहे की मॅनेजमेंटच्या माणसाला टेक्नॉलॉजी चांगली माहीत असणं गरजेचं आहे आणि टेक्नॉलॉजीच्या माणसाला मॅनेजमेंट उत्तम येणं आवश्यक आहे. टेक्नॉलॉजीच्या माणसाला मॅनेजमेंट आवडत असेल तर इच्छा असल्यास एमबीए करावं. नाहीतर टेक्नॉलॉजीचे इतर कोर्स करून साऊण्ड व्हावं.मॅनेजरिअल स्किल्समध्ये तुमची पर्सनॅलिटी कशी आहे, तुम्ही समोरच्याला कसे जोडून घेतात ही स्किल्स सगळ्यांना ठाऊक आहेत. पण अजून कोणती स्किल्स मॅनेजरिअल लेव्हलमध्ये येतात ? यात व्यक्तिमत्त्वविकास आणि करिअर यांचा एकमेकांशी कसा संबंध येतो ?मॅनेजरिअल स्किल्समध्ये यक्तिमत्त्वविकास आणि करिअर यांचा एकमेकांशी संबंध येतो. कारण एखाद्या माणसला तंत्रज्ञानाविषयी खूप माहिती आहे पण जर तो एकल कोंडा असेल तर तो चांगला सीईओ कधीच होऊ शकणार नाही. आपल्याबरोबर चार लोकांची आणि कंपनीची प्रगती करण्याची ताकद ज्याच्याकडे असेल तो चांगला सीईओ होऊ शकतो.मंदीची झळ मार्केटिंग या क्षेत्राला बसत आहे. अशावेळेला करिअरचं मॅनेजमेंट कसं करावं ?मंदीची समस्या जेन्युईन आहे. मंदीचा काळ कधी संपेल हे सांगता येणार नाही. मला स्वत:ला असं वाटतं की हा वेळ वाया घालवता कामा नये. कारण मंदी कायमची टिकणार नाही. ही मंदी जेव्हा जाईल तेव्हा प्रत्येकानं विनर म्हणून पुढे यायला पाहिजे. या काळात पर्सनॅलिटी डेव्हलप करणं, इंग्रजी सुधारणं, इतर वेगळे मॅनेजमेंट कोर्सेस करणं, किंवा स्वत:ला काही उद्योग जमतोय का, ते करून पहायचं. मार्केटिंगच्या माणसानं कॉलेजमध्ये शिकवायला जावं. कित्येक कॉलेजमध्ये मार्केटींगचा इंडस्ट्रीयल अनुभव असणारी माणसं लेक्चरर म्हणून लागतात. मार्केटिंगच्याच नाही पण कोणत्याही माणसानं प्राध्यपकी केल्यावर आधी त्याचा स्वत:चा विषय पक्का होतो. पब्लिक स्पिकिंग वाढतं. मंदी आली म्हणून रडत न बसता मंदीला संधी समजून मी काम करावं.फंडे करिअर 'चे पुढचे दोन भाग म्हणजे फंडे करिअर (भाग :2) आणि फंडे करिअर (भाग :3) पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक कारा. http://ibnlokmat.tv/programdetails.php?id=33821&channelid=291 http://ibnlokmat.tv/programdetails.php?id=33831&channelid=291

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 27, 2008 01:26 PM IST

फंडे करिअरचे (भाग : 1)

टेक ऑफचा हा या वर्षातला शेवटचा भाग होता. त्यामुळे या ' टेक ऑफ 'मध्ये चर्चा करण्याता आली ती करिअरचे फन्डे वर. म्हणजे करिअर प्लॅनिंगच्या बेसिक फन्डाज्‌वर. ' टेक ऑफ 'च्या पहिल्याच भागात प्रख्यात लेखक आणि आय.टी तज्ज्ञ यांनी करिअरवर मार्गदर्शन केलं होतं. त्यामुळे ' टेक ऑफ'च्या वर्षातल्या शेवटच्या भागातही त्यांनीच मार्गदर्शन केलं. नेहमी करिअर प्लॅनिंगवर बोललं जातं. यशस्वी कसं व्हावं यावरही चर्चा केली जाते. पण यशस्वी माणसाशी करियर प्लॅनिंगबाबत बोलल्यावर, त्यांच्याकडून करिअर प्लॅनिंगचे बेसिक फन्डाज जाणून घेतल्यावर इतरांनाही त्यांचं करिअर प्लान करणं सोपं जातं. आय.टी.तज्ज्ञ अच्युत गोडबोले यांनी चांगल्या पण यशस्वी करिअरची काही मूलभूत तत्त्व सांगीतली.करिअर प्लॅनिंग हा शब्द घासूनपुसून गुळगुळीत झालेला आहे, पण या करिअर प्लॅनिंगचा बेसिक फंडा काय आहे ? 10 वी, 12 वी किंवा मीड करिअर प्रोफेशल्सना करिअर प्लॅनिंगच्या बाबतीत काय मार्गदर्शन करशील ?करियर प्लॅनिंगच्या दोन गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. त्यातली पहिली गोष्ट आहे ती आपल्या अर्थव्यवस्थेची आपली अर्थव्यवस्था कुठे चालली आहे, आपल्याकडे कोणत्या प्रकारच्या नोक-या उपलब्ध आहेत याचा विचार अटळ आहे. पण त्याचबरोबर आपल्याला मनातून काय वाटतंय याचाही विचार करायला हवा. म्हणजे आपल्यला कुठेतरी वाटत असतं की अमूक एका गोष्टीची आपल्याला आवड आहे... मग ही आवड चित्रकलेची असेल, गाण्याची असेल, अर्थशास्त्र, इंजिनिअरिंग, बायोलॉजी अशी कोणतीही असू शकते.पण ती आवड आतून असायला हवी. पण लोकं प्रॅक्टीकल गोष्टींचा विचार जास्त करायला लागले आहेत. ' इधर पैसा ज्यादा है ते ये करो..' अशी लोकांची मनोवृत्ती आहे. म्हणजे मी असं सांगत नाहीये की प्रॅक्टील गोष्टींचा विचार करूच नका. तर तुम्हाला आवड कशात आहे आणि तुमच्या प्रॅक्टील आयुष्य या दोघांचा नीट विचार करून आपलं करियर निवडायला हवं. आपण 2008 हे वर्ष अतिशय वेगळ्या पद्धतीनं अनुभवलं आहे. दहशतवादी हल्ले, मंदी पाहिली आहे तरीही करिअरचं प्लॅनिंग करताना आतला आवाज ऐकणं हा करिअरचा बेसिक फन्डा आहे यावर तू ठाम आहेस तर... हो. कोणत्याही क्षेत्रात जा. तुफान मेहनत ही करवीच लागणार आहे. मला असं नेहमी वाटतं की आतला आवाज ऐकायला पाहिजे. आजकाल स्कोप वगैरेचीही चर्चा केली जाते. स्कोप म्हणजे काय ?... तर स्कोप म्हणजे मी इंजिनीअरिंगला गेलो, आयटीत गेलो तरी मला प्रचंड प्रयत्न करावे लागतील पण प्रचंड प्रयत्न न करता जॉब मात्र सर्वसाधारण मिळणार आहे, असा त्या स्कोपचा अर्थ असतो. व्हेअर अ‍ॅज मी संगीतात गेलो, चित्रकलेत गेलो तर मला जास्त परिश्रम तर करावे लागणार आहेत. आणि मी जर ते केले तर त्यात मी टॉपला राहणार आहे. म्हणजेच आपल्या आवडत्या विषयात करिअर केलं जास्त यश मिळतं. याचा अर्थ प्रॅक्टीकल विचार करू नका असा नाहीये. तर करा आणि आपल्या आवडत्या कला जोपासा. तू ' स्कोप 'ची चंगली व्याख्या सांगितली आहेत. मला कमी श्रमात झटकन् नोकरी मिळते. जर 8 तास काम करून मला 5 हजार रुपये मिळतात तर दुसरीकडे 25 हजार रूपये मिळतात. हा स्कोपचा अर्थ तू चांगला सांगितला आहेस. पण अच्युत हुशार मुलांना या गोष्टी चट्कन जमतात.. मात्र जर एखादा 60 टक्के मुलगा फार श्रम करून 75 टक्क्यांपर्यंत पोहोचतो. तर अशा सर्वसामान्य बुद्धीमत्तेच्या मुलांनीही आतला आवाज ऐकायला पाहिजे का ?हो. कारण एखाद्या मनापासून आवडणा-या गोष्टीवर जर आपण खरोखरीच खूप परिश्रम केलेत तर त्यात यश नक्कीच मिळू शकतं. पण एखाद्या आवडणा-या गोष्टीवर मनापासून प्रेम केलंच जात नाही. आपण नेहमी मार्क, नोकरी, पैसा, प्रमोशन, परदेशवारी, प्रसिद्धी ही उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून कामं करतो. झपाटून जाऊन काम करणारी माणसं मला नेहमीच आवडतात. तू मगाशी विचारलसं की असं झप्राटून जाऊन काम करणं, करिअरच्याबाबतीत आतला आवाज ऐकणं हे प्रत्येकाला शक्य आहे का ? तर यावर मी तुला सांगेन की आतला आवाज ऐकणं याकडे बरेच जणं दुर्लक्ष करतात. हीच तर माझी खरी खंत आहे. काही लोकांनाच हे असं झपाटून काम करणं जमतं. तरीही मनापासून आवडणा-या गोष्टीवर प्रेम केलंत आणि स्वत:ला झोकून दिलंत तर तुम्ही कोणत्यातरी उंचीला नक्की पोहोचाल. माझं म्हणणं जर मला कॉर्पोरेट भाषेत सांगायचं झालं तर मी असं सांगेन की ' मनापासून आवडणा-या विषयात झोकून देऊन काम केल्यान तुम्ही सीईओ नाही पण कंपनीच्या एखाद्या उच्चपदापर्यंत जाऊन तरी नक्की पोहोचाल. अच्युत झपाटून किंवा झोकून काम करणं म्हणजे नक्की काय ? विद्यार्थ्यांना तू तुझ्या उदाहरणावरून सांगशील का ?माझ्या आयुष्यातली कोणतीच गोष्ट प्लॅण्ट करून तसंच पैसा आणि प्रसिद्धी ही दोन उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून झाली नाही. आणि मी तसं केलं नाही. मला ज्या ज्या विषयांची गोडी लागली त्यात्या गोष्टी मी त्या त्या वेळेला अगदी मनापासून करत गेलो. मला जेव्हा गाण्याची गोडी लागली तेव्हा मी गाणं वेड्यासारखं ऐकत गेलो. वर्षानुवर्षं मी जवळपास प्रत्येक मैफील ऐकली. मुंबई - पुण्यातली कोणतीच मैफील मी सोडली नाही. अनेक गायकांचे अनेक राग मी ऐकलेत. गाण्यानं मला पैसे मिळणार नव्हते की प्रसिद्धी मिळणार नव्हती. पण गाण्याची मला अशी काही गोडी लागली की प्रत्येक राग माझ्या डोक्यात तीन तीन महिने घोळायचा. आयआयटीतला क्लास एकीकडे चालू असायचा. पण डोक्यातला मालकंस काही जाता जायचा नाही. तसंच विज्ञान आणि अर्थशास्त्राचंही माझ्याबाबतीत झालं. आमच्या ग्रुपमध्ये आयआयटीत असताना ' भारताता गरिबी का आहे, ' या विषयावर चर्चा चालू होती. त्या चर्चेमुळे आम्ही झपाटून अर्थशास्त्र वाचायला सुरुवात केली. अ‍ॅडम स्मिथ , मार्कस् , केन्स अशा सगळ्या अर्थ शास्त्रज्ञांच्या थिअरीज आम्ही वाचायला सुरुवात केली. चर्चा करून वाद घालून तो आमचा प्रश्न असल्याप्रमाणे आम्ही त्यावर उत्तरं शोधत होतो. हा विचार करताना भारतातल्या गरिबीशी आपल्याला काय करायचंय, हा प्रश्न कधीच माझ्या मनाला शिवला नाही. आमचाच प्रश्न असल्याप्रमाणं आम्ही अर्थशास्त्राचं वाचन करत गेलो. आयआयटीचा अभ्यास पूर्ण होईपर्यंत आम्ही अर्थशास्त्र वाचलं आहे. म्हणजे आयुष्यात कधीही यश आणि पैसा हा फोकस नसावा.. पण कधी कष्ट आपल्याला टाळता येत नाहीत तर... हो. कारण हार्डवर्कला पर्याय नाहीये. म्हणजे करिअरचा एक फन्डा मनच ऐका आहे आणि दुसरं कष्टाला शॉर्टकट नाहीये...हो. प्रचंड श्रम करण्याची तयारी असायला हवी. कारण झोकून दिलं पाहिजे. कामावर प्रेम केलं पाहिजे. पैसा आणि प्रतिष्ठेच्या मागे कधीच जायचं नाही. मला एखादी गोष्ट आवडी, म्हणून मी ती केली त्यात मी स्वत:ला इतकं झोकून दिलं की पैसा आणि प्रतिष्ठा माझ्यामागे आपोआपच आली ही गोष्ट वेगळी . ते खरं यश. प्रॅक्टील आयुष्याचा विचार कराच. पण मनापासून आवडणा-या विषयांत झोकून आणि झपाटून देऊन काम करा हा आदर्श ठेवून करिअरकडे वळलं पाहिजे तर...हो. अगदी बरोबर आहे. भारताची लोकसंख्या पाहता आपल्याकडे स्पर्धाही तीव्र आहे. प्रत्येकाला टॉपला जायचं असतं. ऑलवेज रुम अ‍ॅट द टॉप. ती जी वरची रुम आहे ती मोठी आहे का की तिथे फक्त एकालाच जाता येईल. का प्रत्येकाला त्याच्या त्याच्या क्षेत्रासाठी मोठी रुम उपलब्ध आहे ?हो आहेत की. आता आयटीमध्ये रुम अ‍ॅट द टॉप मोठी आहे. आयटीमध्ये सर्वात जास्त स्कोप आहे. म्हणजे तिथे कमी श्रमानं जाता येतं. तसं प्रत्येक क्षेत्रात रुम ऑफ द टॉप मोठी आहे. त्या खालोखालही चांगली पदं आहेत. तुम्ही स्कोप असलेलं कोणतंही क्षेत्र करिअरसाठी निवडलंत तरी काही हरकत नाही. पण त्याही पदावर झोकून देऊन कामं करणं हे तुमचं कर्तव्य आहे. त्या क्षेत्रातले बारकावे माहीत असलेच पाहिजे. मी आतापर्यंत आयटीच्या नोकरीसाठी खूप मुलांच्या मुलाखती घेतल्या आहेत. पण जेव्हा विद्यार्थ्यांना त्यात्या विषयातल्या साध्या साध्या गोष्टी काही माहीत नसल्याचं कळतं तेव्हा भरपूर दु:ख होतं. म्हणजे स्कोप म्हणून करिअरसाठी निवडलेल्या विषयाच्या प्रत्येक गोष्टींची तुम्हाला माहिती असायला हवी.

इंटरव्ह्यूला मुलं आल्यावर त्यांना साध्या साध्या गोष्टींची माहिती नसते. तेव्हा करिअरच्या बेसिक फन्डामध्ये ज्ञानाविषयी प्रेम असणं ही गोष्ट महत्त्वाची आहे तर...हो. आणि ते खूप गरजेचं आहे. मी मगाशी सांगितल्याप्रमाणं मी आजपर्यंत कित्येक आयटी पदवीधर मुलांच्या मुलाखती घेतल्या आहेत. पण त्या मुलाखती घेताना माझी दारुण निराशा झालेली आहे. मी आता मुलांना तुम्ही इतर गोष्टी काय करतात ते विचारण्याच्या भानगडीतच पडत नाही. मुलाखतीला जाताना कपडे कसे घालावेत, कोणते घालावेत, कसं बोलावं याची माहिती मुलांना असते. पण आपण ज्या विषयातून शिक्षण घेतलं आहे, त्याची माहिती अजिबात नसते. हे योग्य नाही. ज्ञानाविषयी प्रेम असणं फार महत्त्वाचं आहे. बहुतेक मुलं मार्क आणि भविष्यात नोकरी यांच्यासाठी शिकतात. पण जी मुलं ज्ञानासाठी शिकतात तीच पुढे आयुष्यात यशस्वी होतात.कधीकधी एखाद्या व्यक्तीला तो जे काम करत आहे, ते आवडेनासं होतं. पण तो त्यावेळेला इतर गोष्टी चांगल्या करत असतो. अनेकदा मनात नोकरी सोडण्याचेही विचार येतात. मग अशावेळी त्या व्यक्तीनं काय करायला पाहिजे ?आपल्याला नोकरी करणं का आवडत नाही याची कारण शोधलं पाहिजे. एक तर ती व्यक्ती जे काम करत आहे ते काम आवडीचं नसतं किंवा काम आवडीचं असूनही कामातून समाधान मिळत नसतं. ही दोन कारणं असू शकतात. अशावेळेला झटपट नोकरी सोडणं कधीच चांगलं नाही. शेवटी पोटाचा प्रश्न असतो. या परिस्थितीत आपण जे काम करत आहोत ते चालू ठेवायचंच पण दुसरीकडे स्वत:ला आवडीच्या विषयात गुंतवायचं. तसं केल्यानं अनेक पर्याय खुले होतील. करिअरचे आणि समाधानाचेही.सध्या जगात मंदीचं वातावरण सुरू आहे. स्वच्छेनं आणि आवडीच्या विषयात करिअर करूनही कित्येक पदवीधरांना कंपनीतून कमी केलं जात आहे. अशास्थितीत आयटीक्षेत्रात करिअरच्या काही संधी आहेत का, किंवा आयटी पदवीधरांनी काय केलं पाहिजे ?आयटी पदवीधरांना दोन पद्धतीनं करिअर करता येत. एक म्हणजे टेक्नॉलॉजीत आणि दुसरं म्हणजे टेक्नॉलॉजी मॅनेजमेंटमध्ये. आता टेक्नॉलॉजी हे क्षेत्र असं आहे की मॅनेजमेंटच्या माणसाला टेक्नॉलॉजी चांगली माहीत असणं गरजेचं आहे आणि टेक्नॉलॉजीच्या माणसाला मॅनेजमेंट उत्तम येणं आवश्यक आहे. टेक्नॉलॉजीच्या माणसाला मॅनेजमेंट आवडत असेल तर इच्छा असल्यास एमबीए करावं. नाहीतर टेक्नॉलॉजीचे इतर कोर्स करून साऊण्ड व्हावं.मॅनेजरिअल स्किल्समध्ये तुमची पर्सनॅलिटी कशी आहे, तुम्ही समोरच्याला कसे जोडून घेतात ही स्किल्स सगळ्यांना ठाऊक आहेत. पण अजून कोणती स्किल्स मॅनेजरिअल लेव्हलमध्ये येतात ? यात व्यक्तिमत्त्वविकास आणि करिअर यांचा एकमेकांशी कसा संबंध येतो ?मॅनेजरिअल स्किल्समध्ये यक्तिमत्त्वविकास आणि करिअर यांचा एकमेकांशी संबंध येतो. कारण एखाद्या माणसला तंत्रज्ञानाविषयी खूप माहिती आहे पण जर तो एकल कोंडा असेल तर तो चांगला सीईओ कधीच होऊ शकणार नाही. आपल्याबरोबर चार लोकांची आणि कंपनीची प्रगती करण्याची ताकद ज्याच्याकडे असेल तो चांगला सीईओ होऊ शकतो.मंदीची झळ मार्केटिंग या क्षेत्राला बसत आहे. अशावेळेला करिअरचं मॅनेजमेंट कसं करावं ?मंदीची समस्या जेन्युईन आहे. मंदीचा काळ कधी संपेल हे सांगता येणार नाही. मला स्वत:ला असं वाटतं की हा वेळ वाया घालवता कामा नये. कारण मंदी कायमची टिकणार नाही. ही मंदी जेव्हा जाईल तेव्हा प्रत्येकानं विनर म्हणून पुढे यायला पाहिजे. या काळात पर्सनॅलिटी डेव्हलप करणं, इंग्रजी सुधारणं, इतर वेगळे मॅनेजमेंट कोर्सेस करणं, किंवा स्वत:ला काही उद्योग जमतोय का, ते करून पहायचं. मार्केटिंगच्या माणसानं कॉलेजमध्ये शिकवायला जावं. कित्येक कॉलेजमध्ये मार्केटींगचा इंडस्ट्रीयल अनुभव असणारी माणसं लेक्चरर म्हणून लागतात. मार्केटिंगच्याच नाही पण कोणत्याही माणसानं प्राध्यपकी केल्यावर आधी त्याचा स्वत:चा विषय पक्का होतो. पब्लिक स्पिकिंग वाढतं. मंदी आली म्हणून रडत न बसता मंदीला संधी समजून मी काम करावं.

फंडे करिअर 'चे पुढचे दोन भाग म्हणजे फंडे करिअर (भाग :2) आणि फंडे करिअर (भाग :3) पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक कारा.

http://ibnlokmat.tv/programdetails.php?id=33821&channelid=291

http://ibnlokmat.tv/programdetails.php?id=33831&channelid=291

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 27, 2008 01:26 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close