S M L
  • शालोम इस्त्राएल - भाग 1

    Published On: Dec 28, 2008 02:52 PM IST | Updated On: May 13, 2013 04:12 PM IST

    अलका धुपकर रिपोर्ताजचा हा भाग झाला तो किबुत्झच्या देशात म्हणजेच इस्त्राएलमध्ये. इस्त्राईलची आर्थिक राजधानी असलेल्या तेल अवीवमधल्या बेन गुरीयान हे आंतरराष्ट्रीय विमानतळ जगभर प्रसिद्ध आहे. याच विमानतळापासून एस्त्राएलची ही सफर सुरू झाली. इस्त्राएलचं नाव घेतलं की पहिल्यांदा आठवतो तो हजारो वर्ष चाललेला ज्यूंच्या संघंर्ष. इस्त्राएल देश तसा नव्यानंच वसवलेला. फक्त 60 वर्षांपूर्वीचा. ज्यूंचा एकमेव देश. ज्यूंना या देशातून तरी कोण हाकलणार नाही. याा खात्रीने जगभरातले ज्यू या देशात आले. जेरुसलेम या त्यांच्या पवित्र धर्मस्थळाच्या ओढीने. या इतिहासाच्या सगळ्या खाणाखुणा जागोजागी दिसतात त्या जेरुसलेम शहरात. तीन हजार वर्षांपूर्वी राजा डेविडने वसवलेलं हे ऐतिहासिक शहर. आजच्या इस्त्राएलची आर्थिक राजधानी. इस्त्राएलमधलं सर्वाधिक वस्तीचं, सात लाख लोकसंख्या असलेलं शहर. इथली सगळं बांधकामं खास पांढर्‍या दगडाने केलेली.जेरुसलेम शहरात येण्यासाठी जाफा बंदरातून येणारा एकच रस्ता होता. म्हणूनच त्या गेटला जाफा गेट असं म्हणतात. सेपल्चर चर्च ही खरं तर पूर्वीच्या काळातली दफनभूमी. इथं अरुंद जिना चढत वरती जावं लागतं.. प्रार्थनेसाठी लावलेल्या मेणबत्तांचाच काय तो आत उजेड असतो. बाकी अंधार. आणि प्रत्येकजण प्रार्थनेत दंग. येशू ख्रिस्ताला जिथं फासावर चढवण्यात आलं तीच ही जागा त्यामुळे इथे भेट द्यायला जगभरातले लोकं उत्सुक असतात.जेरुसलेमला गेल्यावर वेलिंग वॉलला म्हणजेच वेस्टर्न वॉलला भेट ही दिलीच पाहिजे. या भिंतीपाशी रडून प्रत्येकजण आपल्या भावना व्यक्त करतात. 1967 च्या प्रसिद्ध सहा दिवसांच्या युद्धात इस्त्राएलने जॉर्डनकडून ही भिंत ताब्यात घेतली. मूळची 485 मीटर लांब असलेली भिंत आता उरलेय फक्त 60 मीटर एवढीच. मंदीराचा शेवटचा अवशेष म्हणून सध्या यावेलिंग वॉलची फक्त भिंत उरलेय. जगभरातले हजारो ज्यू दररोज इथं दर्शनासाठी येतात. वेलिंग वॉलच्यामध्ये पार्टीशन टाकण्यात आलंय. स्त्रीयांसाठी आणि पुरुषांसाठी. प्रत्येक जण इथं स्वत:च्या पद्धतीनं प्रार्थना करु शकतो. मनातली कुठलीही मागणी लिहून चिठ्ठीवर टाकली की ती इथं पूर्ण मनातली कुठलीही मागणी लिहून चिठ्ठीवर टाकली की ती इथं पूर्ण होते, अशी समजूत आहे. त्यामुळेच जगभरातले ज्यू वेलिंग वॉलला एकदा तरी भेट द्यायला उत्सुक असतात. वेलिंग वॉलची भिंत अशा चिठ्‌ठ्यांनीच भरुन गेली आहे. भंगलेल्या मंदीराची पुन्हा एकदा उभारणी करायची, या जिद्दीची सतत आठवण करुन देणारी ही दु:खित भिंत ज्यूंनी वर्षानुवर्ष सोसलेल्या दु:खाचंच एक प्रतीक बनलीय.भूमध्य समुद्राच्या किनारी असलेलं 'सिझेरिया' हे इस्त्राईलमधलं आणखी एक ऐतिहासिक शहर. या शहरातलं सगळं बांधकाम पडलेलं असलं तरी शहराच्या खाणाखुणा शहरात फिरताना सगळीकडे दिसतात. भूमध्य समुद्राचं बंदर असलेल्या इस्त्राईलच्या पश्चिम भागात दोन हजार वर्षांपूर्वी रोमन पद्धतीचं हे शहर वसवण्यात आलं. त्याकाळात सिझेरियामध्ये बांधलेलं असं प्रशस्त अ‍ॅम्फीथिएटर आजही पर्यंटकांचं आकर्षण आहे. आता या जागेत होतात म्युझिक कॉन्सर्टस. किंग हेरॉडने बांधलेलं हे शहर मुस्लीमांच्या आक्रमणानंतर पुन्हा कधी उभं राहिलं नाही. पण पाण्याची अतिशय उत्तम केलेली सोय हे या शहराचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे.इस्त्राईलच्या उत्तरेला असलेल्या गोलन हाईटसनीही कित्येक आक्रमणं झेलली आहेत. लेबनॉन, सिरिया, इजिप्त आणि जॉर्डन या अरब देशांच्या मध्ये असलेला इस्त्राईल 1948 साली स्वतंत्र झाला. तेव्हापासून अरबांसोबतचा इस्त्राएलचा रक्तरंजीत संघर्ष सुरूच आहे. 1967 च्या युद्धात येथील रणगाड्यांच्या तोफा धडाडल्या होत्या. त्या युद्धात मिळालेल्या विजयाची आठवण म्हणून या तोफा ऐतिहासिक स्मारक बनवून गोलन हाईटसवर जतन करण्यात आल्या आहेत.युद्धात उध्वस्त झालेली अनेक गावं सिरिया देशाच्या सीमेलगत, गोलन हाईटसवर बघायला मिळतात. समुद्रसपाटीपासून 1200 मीटर उंचीवर असलेल्या या गोलन हाईटस भौगोलिक रचनेमुळे टूरिस्ट पाँईंट बनल्या आहेत. युद्धाच्या आठवणींना सोबत घेउनच या भागाचा नागरी वस्तीसाठी विकास करण्याचेही इस्त्राएली सरकारचे प्रयत्न सुरु आहेत. कुठल्याही असाध्य गोष्टींवर मात करण्याच्या ज्यूंच्या चिवट स्वभावाचं हे आणखी एक उदाहरण.शालोम इस्त्राएल - भाग 2 पहाण्यासाठी इथे क्लिक करा http://www.ibnlokmat.tv/programdetails.php?id=33991&channelid=261

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close