S M L

अर्थवेध 2009 ( भाग 3 )

अर्थवेध 2009 ( भाग 3 )2008 हे वर्ष भारतीय अर्थव्यवहारासाठी खूप घडामोडीचं ठरलं. वर्ष सुरू झालं तेव्हा शेअर बाजार 22,000च्या वर होता. पण आज 10,000चा आकडा पार करायला सेन्सेक्स लडखडतोय. यासर्व एकूण व्यवहारापासून आपण कोणता घडा घेतला पाहिजे आणि येणा-या काळात कोणती काळजी घेतली पाहिजे यावर आहे यावेळचा श्रीमंत व्हा कार्यक्रम. आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी दोन सल्लागार आहेत हर्षल देशपांडे आणि एस. पी तुलसीयानहर्षल सांगतात, 2008 वर्षाच्या घडामोडी पाहता आपली क्षमता आणि रिस्क ओळखून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करावी. तसंच आपले दुसरे सल्लागार श्री. तुलसीयान सांगतात, ज्या कंपनीची परिस्थिती चांगली आहे अशाच कंपनीचे शेअर घेतले पाहिजे. आणि फायदा झाल्यानंतर गुंतवलेला पैसा दुस-या शेअरमध्ये टाकला पाहिजे. त्यांच्यामते 2008मध्ये जे मार्केट पडलं त्याचं मुख्य कारण अमेरिकेत आलेली मंदी आहे. पण कोणत्याही भारतीय कंपन्यांनी, सरकारने, अर्थतज्ज्ञांनी इतक्या मोठ्या प्रमाणात मार्केट खाली येईल यांची अपेक्षाही केली नव्हती त्यामुळे हा मोठा धक्का होता. पण मार्केट 2009मध्येही असंच राहिलं ही चूकची धारणा आहे. मे-जून 2009 नंतर मार्केट पुन्हा चांगल्या स्तरावर पोहचेल. 2010मध्ये पुन्हा सेन्सेक्स चांगला स्तर गाठू शकेल असं तुलसीयान याचं मत आहे.रिटायर्ड व्यक्तींनी आपली गुंतवणूक शेअर मार्केटमध्ये न करता सरकारी बॉण्ड किंवा पोस्टाच्या स्किममध्ये करावी आणि 10% रक्कम मार्केटमध्ये टप्प्या-टप्प्याने गुंतवावी. गेल्या मागील 2-3 वर्षात अनेकांनी 35%च्या वर प्रॉफिट घेऊन शेअर मार्केटमधून पैसे कमावले आहेत. आता मार्केट खाली आल्यामुळे थोडी रिस्क आहे. त्यामुळे पैसे गुंतवताना लोकांनी विचारपूर्वक गुंतवणूक करावी. जर नव्याने गुंतवणूक करायची झाल्यास म्युच्युअल फंडात करावी.2008 ह्या वर्षात रिअ‍ॅलटी आणि ऑटोमोबाइल क्षेत्रामध्ये फार मोठी घसरण झाली. तुलसीयान याच्यामते या क्षेत्रात आतापर्यंतची घसरण झाली ती पुरेशी आहे. त्यामुळे यानंतर मोठी घसरण या क्षेत्रात नसेलही. आणि सरकारने या क्षेत्रांना मदत केली किंवा भविष्यात मोठे बदल झाले तर या क्षेत्रातील शेअरपासून फायदा होऊ शकतो.मंदीच्या काळात गृहिणींनी एकतर फिक्स रिटर्न किंवा इक्विलिटीमध्ये आपली गुंतवणूक करावी. पण सद्या डे-टू-डे ट्रेडिंगमध्ये करू नये. याकाळात वायफळ खर्च न करता सेव्हिंगच्या दृष्टीने प्रयत्न केले तर त्यांचा फायदाच होईल. आताची कोणतीही गुंतवणूक ही लॉग टर्म इन्व्हेस्टमेंट म्हणूनच केली पाहिजे.मार्केट खाली आलं आहे. यानंतर ते हळूहळू वर जाईल त्यामुळे सद्या शेअर मार्केटमध्ये केलेली गुंतवणूक भविष्यात फायद्याची ठरणार आहे. श्री. तुलसीयान सांगतात, ज्यांना कोणाला लॉग टर्मसाठी इन्व्हेस्टमेंट करायची आहे त्यांनी पब्लिक किंवा शुगर सेक्टरमध्ये करण्यास हरकत नाही. कारण आतापर्यंत इतर शेअरशी तुलना करता या क्षेत्रामध्ये खूप कमी उतार आलेला आहे. तसंच भविष्यात या क्षेत्रातील शेअरमध्ये पॉझिटिव्हली वाढ होण्याचे संकेत दिसत आहेत. गुंतवणूकदार स्वत:च्या अभ्यासाने काही निर्णय घेत असेल तर तो चांगल्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करणारच त्यामुळे शेअर बाजार आणि म्युच्युअल फंड यासारखे पर्याय असतील तर म्युच्युअल फंड केव्हाही योग्य पर्याय आहे. 2009 हे वर्ष अनेक बदलांच असणार आहे. त्यामुळे गुंतवणूकधाराने प्रथम स्वत:चा पोर्टफोलियो बनवला पाहिजे. त्यानंतर कर्ज काढून कोणतीही गुंतवणूक करू नये. 25% रक्कम बचतीमध्येच ठेवली पाहिजे. उत्पन्नापैकी 2/3 रक्कम किंवा आपल्या ताकदीनुसार जी रक्कम गुंतवायची असेल त्याचा अवधी कमीत कमी सहा महिन्याचा असला पाहिजे. कारण 2009 हे वर्षात शेअर मार्केटमध्यून गुंतवलेल्या योग्य रक्कमेतून 20% तरी फायदा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संधीचा फायदा घेऊन तोटा झालेल्या शेअरमधून बाहेर या किंवा फायदेशीर शेअरमध्ये गुंतवणूक करा.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 28, 2008 10:37 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 28, 2008 10:37 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close