S M L

रिवाइंड 2008 - दहशतवादाचा भस्मासूर

2008 मध्ये दहशतवादानं भारताला अनेक हादरे दिले. दहशतवादानं सीमेवरचे स्थान सोडून सामान्य माणसाच्या आयुष्यात प्रवेश केला...मुंबईवरील भीषण दहशतवादी हल्ला26 नोव्हेंबर 2008 एव्हाना मुंबईकर आपापल्या घरी परतले होेते. तर काहींची पावलं घराकडे वळत होती. त्यांच्यासाठी तो नेहमीचाच दिवस होता.मात्र ही रात्र वैर्‍याची असेल, याची पुसटशी कल्पना कोणाच्याच मनात शिवली नाही. अशातच ते दहा दहशतवादी काळ बनून मुंबईवर येऊन थडकले. मुंबईचा सागरकिनारा त्यांना उतरण्यासाठी सुरक्षित होता. कुलाब्याच्या कफ परेड किना-यावर ते यमदूत उतरले. सोबत होतं मृत्यूचं सामान. योजना तर ठरलेली होती . गटा-गटाने ते दक्षिण मुंबईत पसरले. ताज ,ऑबेरॉय ही पंचतारांकित हॉटेल्स आणि सीएसटी रेल्वे स्थानक त्यांच्या हिटलिस्टवर होतं. थोड्याच वेळात सगळीक डे हाहाकार माजला. दहशतवाद्यांनी त्यांचा मोर्चा हळूहळू कामा हॉस्पिटलकडं वळवला. तिथेही त्यांनी हिंसाचाराचं थैमान घातलं. याहीवेळी मुंबईत घुसण्यासाठी दहशतवाद्यांनी समुद्र मार्गेच घुसघोरी केली. या हल्ल्यात मात्र त्यांनी पंचतारांकित हॉटेलला लक्ष्य केलं होतं. तसंच इस्त्रायली लोकांचंं गेस्ट हाऊस असलेलं नरीमन हाऊसही त्यांच्याकडून लक्ष्य झालं होतं. या रक्तपातामध्ये तब्बल 182 निरपराध लोकांचे बळी गेले. दहशतवाद्यांना काबूत करण्यासाठी सरकरानं लष्कराला पाचारण केलं. पण त्यालाही उशीर झाला होता. लष्करानं ताबा घेईपर्यंत अनेकांना आपले प्राण गमवावे लागले होते. संध्याकाळच्या वेळी गेट वे ऑफ इंडियाच्या परिसरात फिरायला जाणार्‍यांनी मात्र त्या रात्री चांगलाच थरार अनुभवला. सगळीकडे केवळ गोळीबाराचेच आवाज कानावर थडकत होते. घटनास्थळावरून प्रसारमाध्यमांनी केलेलं थेट प्रक्षेपण... प्रत्यक्ष घटनास्थळी तिथला थरार अनुभवणारे मुंबईकर... शिवाय हॉटेलमध्ये अडकलेले लोक सुखरूप बाहेर पडावेत म्हणून प्रार्थना करणारे त्यांचे नातेवाईक! हा सगळा सीन कुठल्या सिनेमा सेटवरचा नव्हता. तर मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचं हे यथायोग्य वर्णन आहे. तब्बल साठ तास मुंबईकरांनी हा थरार अनुभवला.अमेरिकेतल्या एफबीआयनंही हा जगातला सगळ्यात मोठा हल्ला असल्याचं नमूद केलं. दक्षिण मुंबईतल्या प्रमुख तीन ठिकाणावर सुरू असलेला हा हल्ला म्हणजे युद्धजन्य स्थिती असल्याची जाणीव होण्यासाठी तीन ते चार तासांचा काळ लोटला. एनएसजी आणि मरीन कमांडो आल्यानंतर दहशतवाद्यांकडं किती ताकदीची शस्त्रे आहेत, याचा अंदाज आला. रात्रीनंतर सगळे रस्ते सुनसान झाले. पोलिसांच्या गाड्या आणि अ‍ॅम्ब्युलन्सच्या सायरननं सगळ्यांच्याच काळजात चर्रर होत होतं. आवाज फक्त गोळीबाराचे...अशातच तीन जिगरबाज अधिकारी गमावून बसल्याची बातमी आली आणि सगळ्यांच्याच मनात पुन्हा चर्रर झालं. एटीएस प्रमुख हेमंत करकरे, अ‍ॅडिशनल सीपी अशोक कामटे आणि खंडणीविरोधी पथकाचे प्रमुख विजय साळसकर शहीद झाले. दुसर्‍याच दिवशी कामटे यांच्या पुण्यातल्या अंत्ययात्रेत त्यांच्या मुलांच्या किंकाळ्या कामटे गेले त्यापेक्षाही सगळ्यांचं मन विषण्ण करून सोडणार्‍या होत्या. एनएसजीच्या कमांडोजची तर कडवी झुंज सुरूच होती... कारवाईच्या गोंधळातच राजकीय शेरेबाजी सुरूच होती, त्यातून जनतेच्या जीवापेक्षा राजकारणालाच महत्त्व देण्यात आमचे दिग्गज राजकारणी गुंतले होते. अशा परिस्थितीत सरकारमधलेच जबाबदार मंत्री मात्र, बेजबाबदार विधानं करत होते आर. आर. पाटील यांनी तर "मोठ्या शहरात अशी एखादी गोष्ट घडते" असं विधान करून लोकांच्या संतापात अधिकच भर घातली.अखरे जिगबारज कमांडोंनी तब्बल साठ तासांच्या लढाईत, दहशतवाद्यांना पाणी पाजलंच. दहशतवाद्यांना यमसदनी पाठवल्यानंतर बड्या दिलानं तिथं उपस्थित मुंबईकरांनी त्यांचं स्वागत केलं. 'भारत माता की जय' च्या घोषणा दिल्या. मुंबईकरांनी दिलेली शाबासकी आणि मानसिक बळ हे कमांडोंना प्रेरणा देणारं होतं. मुंबईवरील हल्ल्याचा थरार संपून आठ दिवस उलटत असताही आपली सुरक्षा व्यवस्था कशी सुस्त आहे, याचा नमुना सगळ्यांनाच पाह्यला मिळाला, तो म्हणजे सीएसटी स्टेशनवर पुन्हा एका बॅगमध्ये सापडलेल्या स्फोटकांच्या रूपानं.मुंबईवर हल्ला करणार्‍या अजमल कसाब या अतिरेक्याला जिवंत पकडण्यात पोलिसांना यश आलं. पण हा लढा लढताना सोळा जवानांना आपण गमावून बसलो. अखेर ह्या हल्ल्याच्या मागं पाकिस्तान असल्याच्या पुराव्यांना दुजोरा मिळू लागला. पण पाकिस्तानं ही गोष्ट झिडकारली.तो प्रकार नेहमीचाच होता! अजमल कसाब पाकिस्तानचा असल्याचं भारतानं पुरावे देऊनही पाकिस्तानं त्याला मान्यता दिली नाही. पण अखेर पाकिस्तानमधल्या राजकीय सुंदोपसुंदीनं तिथल्या सरकारला खोटं पाडलं. माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनीच कसाब पाकिस्तानी असल्याची कबुली देऊन टाकली.मुंबईवर झालेल्या हल्ल्यानं तब्बल साठ तास गुमान सगळी युद्धजन्य परिस्थिती पाहणार्‍या जनतेनं मात्र उत्स्फुर्त उठाव केला आणि गेट वे ऑफ इंडिया समोर जमलेल्या लाखो मुंबईकरांनी सगळ्याच राजकारण्यांना धारेवर धरलं. जनतेनं केलेल्या ह्या उठावामुळं राजकारणी खडबडून जागे झाले. सरकारला पाय उतार व्हावं लागलं... केंद्रातल्या मंत्र्यांना आपली पदं सोडावी लागली. जनतेच्या उद्रेकाचाच हा परिणाम होता.भगवा दहशतवादनोव्हेंबरमध्ये मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला आणि महिन्यापूर्वी देशात दहशतवादी कारवाया करण्यात हिंदुत्त्ववादी संघटनांचा हात सांगून एटीएसनं खळबळ माजवून दिली होती. ह्या सगळ्या तपासाचे प्रमुख होते मुंबईवरच्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले एटीएसप्रमुख हेमंत करकरे.साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर, स्वयंघोषित शंकराचार्य असलेल्या दयानंद पांडे आणि लष्कराच्या सेेवेत असलेला कर्नल प्रसाद पुरोहित यांची नावं प्रमुख आरोपी म्हणून समोर आली. त्यांच्यासह अकरा जण या कटात सहभागी असल्याचे पुरावे एटीएसनं उघड केले. शिवाय अभिनव भारत सारख्या हिंदुत्ववादी संघटनांचा यात हात असल्याचं समोर आल्यानंतर शिवसेना हिंदुत्वाच्या मुद्यावर या सगळ्यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर आली. कोर्टाच्या आवारात या खटल्यात आरोपींवर पुष्पवृष्टी करण्याचे प्रकारही घडले. मालेगाव बॉम्बस्फोटाशी निगडित सर्वच आरोपींना मोक्काही लावण्यात आला. हिंदुत्ववादाला दहशतवादाची उपमा देऊन हिणवू नका, असा कांगावा करायला भाजपनं सुरूवात केली. पण या घडामोडीत सगळ्यात महत्त्वाची बाब समोर आली ती म्हणजे या स्फोटाच्या कटात लष्करातले माजी अधिकारी आणि सेवेत असलेला एक अधिकारी सहभागी होता. त्यामुळे देशाच्या सुरक्षा व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं. या स्फोटाचे धागेदोरे शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अजून कुणीही कुठल्या निष्कर्षापर्यंत येऊन पोहचलं नाही. ही घटना अगदी हे वर्ष सरत असताना समोर आली. पण वर्षाच्या मध्यंतरीला म्हणजे मे महिन्यात वाशीच्या विष्णुदास भावे नाट्यगृहात स्फोट होण्यापूर्वीच सर्व स्फोटकं पोलिसांनी ताब्यात घेतली. हे नाट्य संपत नाही तोच, जून महिन्याच्या सुरूवातीलाच ठाण्याच्या गडकरी रंगायतन स्फोटानं हादरलं. यात सनातन संस्थेचा हात असल्याचं बोललं जात होतं. पण त्यावरूनही बराच वादंग झाला. याला काही राजकीय पक्षांनी भगवा दहशतवाद म्हणून संबोधलं. त्यावरून शिवसेनेची अस्मिता जागृत झाली. साध्वीच्या पाठीशी उभं राहण्याचं आवाहन बाळासाहेबांनी हिंदुंना केलं. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात राजकीय उलथापालथ सुरूच आहे. त्यात आता याप्रकरणातल्या प्रत्येक आरोपीनं एटीएस त्यांचा छळ करत असल्याचं न्यायालयासमोर प्रतिज्ञापत्राद्वारे सांगितल्यानं, त्यावरून मोठं वादळ उठलं. एकीकडं भगव्या दहशतवादाच्या मुद्यावरून सार्‍या देशात रान पेटलं असताना मात्र, संसदेत बजरंग दल आणि हिंदू जागरण मंचावर बंदी घालण्याच्या मुद्यानं उचल खाल्ली. हिंदू आणि मुस्लीम दहशतवाद्यांमध्ये कोणत्याही पद्धतीचा दुटप्पीपणा नको, अशी भूमिका कम्युनिस्ट पक्षानं घेतली. हिंदुत्ववादी संघटनेच्या विरोधात हे रान उठलेलं असताना गडकरी रंगायतन स्फोटातला आरोपी रमेश गडकरी हा सनातन प्रभातचा साधक असल्याचं समोर आलं. पण या संस्थेनं तो साधक त्यांचा असल्याचं मान्य केलं, पण स्फोटाशी संबंध असल्याच्या मुद्यावरून मात्र हात झटकले. देशभरातील दहशतवादी हल्लेजगभरातल्या पर्यटकांचे आकर्षणकेंद्र असलेलं 'गुलाबी शहर' जयपूरदेखील मे महिन्यात बॉम्बस्फोटांच्या धक्क्यानं हादरून गेलं. केवळ 20 मिनिटात सारं शहर हादरून गेलं. या भीषण बॉम्बस्फोटात 60 जण ठार झाले. जुलै महिन्यात बंगलोरमध्ये लागोपाठ नऊ स्फोट झाले. तर त्याच्या दुसर्‍यादिवशी अहमदाबादही स्फोटांच्या मालिकानं हादरून गेलं. या दोन्ही ठिकाणांच्या स्फोटामध्ये 47 जणांना आपले प्राण गमवावे लागले. जुलैच्या महिन्याच्या शेवटी सुरत शहरात 18 जिवंत बॉम्ब सापडल्यानं सगळ्यांच्या मनाचा थरकाप उडाला. हे दिवस सरत नाहीत तोच सप्टेंबर महिन्यात देशाच्या राजधानीलाही बॉम्बस्फोटाचे धक्के बसले. दिल्लीतल्या पाच प्रमुख ठिकाणांना दहशतवाद्यांनी लक्ष्य करून, 20 निरपराध लोकांचा बळी घेतला. हे सारं स्फोटांचं तांडव सुरू असतानाच वर्षभरापूर्वीच्या आठवणी ताज्या असतानाच मालेगावमध्ये स्फोट झाला. त्यात तिघांना आपले प्राण गमवावे लागले. ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीला आसामला स्फोटानं हादरवलं. सलग 13 बॉम्बस्फोटांमध्ये 66 लोकांना आपला जीव गमवावा लागला. ईशान्य भारतातला तो सर्वात भीषण बॉम्बस्फोट होता. यावर्षात देशात खूप हिंसेच्या घटना घडल्या. अनेक निरपराधांना आपले प्राण गमवावे लागले. देशात होणार्‍या दहशतवादी हल्ल्यांचा बिमोड करण्यात सरकार कमी पडलं. आणि अत्याधुनिक साधनं नसल्यानं सुरक्षा यंत्रणाही अपुरी पडत असल्याचं दिसलं. दहशतवादानं देशभर धुमाकुळ माजवलाय.कधी भगवा तर कधी हिरवा.मात्र या सा-यात भरडला जातोय तो सर्वसामान्य भारतीय.आणि नुकसान होतंय ते फक्त आपल्या देशाचं.या देशावर सत्ता गाजवणा-या राजाकारण्यांना मात्र कशाचंही भान आलं नाही.आणि म्हणूनच राजकारण्यांच्या खूर्च्यांखालीही यावेळी बॉम्बस्फोट झाले.काहींना खूर्ची गमवावी लागली. तर काहींना सत्ता.रिवाइंड 2008 - श्रद्धांजली पहाण्यासाठी येथे क्लिक करा रिवाइंड 2008 - सामाजिक राजकारण पहाण्यासाठी येथे क्लिक करा रिवाइंड 2008 - साहित्य आणि पुरस्कार पहाण्यासाठी येथे क्लिक करा रिवाइंड 2008 - राष्ट्रीय आणि प्रादेशिक राजकारण पहाण्यासाठी येथे क्लिक करा

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 30, 2008 11:29 AM IST

रिवाइंड 2008 - दहशतवादाचा भस्मासूर

2008 मध्ये दहशतवादानं भारताला अनेक हादरे दिले. दहशतवादानं सीमेवरचे स्थान सोडून सामान्य माणसाच्या आयुष्यात प्रवेश केला...मुंबईवरील भीषण दहशतवादी हल्ला26 नोव्हेंबर 2008 एव्हाना मुंबईकर आपापल्या घरी परतले होेते. तर काहींची पावलं घराकडे वळत होती. त्यांच्यासाठी तो नेहमीचाच दिवस होता.मात्र ही रात्र वैर्‍याची असेल, याची पुसटशी कल्पना कोणाच्याच मनात शिवली नाही. अशातच ते दहा दहशतवादी काळ बनून मुंबईवर येऊन थडकले. मुंबईचा सागरकिनारा त्यांना उतरण्यासाठी सुरक्षित होता. कुलाब्याच्या कफ परेड किना-यावर ते यमदूत उतरले. सोबत होतं मृत्यूचं सामान. योजना तर ठरलेली होती . गटा-गटाने ते दक्षिण मुंबईत पसरले. ताज ,ऑबेरॉय ही पंचतारांकित हॉटेल्स आणि सीएसटी रेल्वे स्थानक त्यांच्या हिटलिस्टवर होतं. थोड्याच वेळात सगळीक डे हाहाकार माजला. दहशतवाद्यांनी त्यांचा मोर्चा हळूहळू कामा हॉस्पिटलकडं वळवला. तिथेही त्यांनी हिंसाचाराचं थैमान घातलं. याहीवेळी मुंबईत घुसण्यासाठी दहशतवाद्यांनी समुद्र मार्गेच घुसघोरी केली. या हल्ल्यात मात्र त्यांनी पंचतारांकित हॉटेलला लक्ष्य केलं होतं. तसंच इस्त्रायली लोकांचंं गेस्ट हाऊस असलेलं नरीमन हाऊसही त्यांच्याकडून लक्ष्य झालं होतं. या रक्तपातामध्ये तब्बल 182 निरपराध लोकांचे बळी गेले. दहशतवाद्यांना काबूत करण्यासाठी सरकरानं लष्कराला पाचारण केलं. पण त्यालाही उशीर झाला होता. लष्करानं ताबा घेईपर्यंत अनेकांना आपले प्राण गमवावे लागले होते. संध्याकाळच्या वेळी गेट वे ऑफ इंडियाच्या परिसरात फिरायला जाणार्‍यांनी मात्र त्या रात्री चांगलाच थरार अनुभवला. सगळीकडे केवळ गोळीबाराचेच आवाज कानावर थडकत होते. घटनास्थळावरून प्रसारमाध्यमांनी केलेलं थेट प्रक्षेपण... प्रत्यक्ष घटनास्थळी तिथला थरार अनुभवणारे मुंबईकर... शिवाय हॉटेलमध्ये अडकलेले लोक सुखरूप बाहेर पडावेत म्हणून प्रार्थना करणारे त्यांचे नातेवाईक! हा सगळा सीन कुठल्या सिनेमा सेटवरचा नव्हता. तर मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचं हे यथायोग्य वर्णन आहे. तब्बल साठ तास मुंबईकरांनी हा थरार अनुभवला.अमेरिकेतल्या एफबीआयनंही हा जगातला सगळ्यात मोठा हल्ला असल्याचं नमूद केलं. दक्षिण मुंबईतल्या प्रमुख तीन ठिकाणावर सुरू असलेला हा हल्ला म्हणजे युद्धजन्य स्थिती असल्याची जाणीव होण्यासाठी तीन ते चार तासांचा काळ लोटला. एनएसजी आणि मरीन कमांडो आल्यानंतर दहशतवाद्यांकडं किती ताकदीची शस्त्रे आहेत, याचा अंदाज आला. रात्रीनंतर सगळे रस्ते सुनसान झाले. पोलिसांच्या गाड्या आणि अ‍ॅम्ब्युलन्सच्या सायरननं सगळ्यांच्याच काळजात चर्रर होत होतं. आवाज फक्त गोळीबाराचे...अशातच तीन जिगरबाज अधिकारी गमावून बसल्याची बातमी आली आणि सगळ्यांच्याच मनात पुन्हा चर्रर झालं. एटीएस प्रमुख हेमंत करकरे, अ‍ॅडिशनल सीपी अशोक कामटे आणि खंडणीविरोधी पथकाचे प्रमुख विजय साळसकर शहीद झाले. दुसर्‍याच दिवशी कामटे यांच्या पुण्यातल्या अंत्ययात्रेत त्यांच्या मुलांच्या किंकाळ्या कामटे गेले त्यापेक्षाही सगळ्यांचं मन विषण्ण करून सोडणार्‍या होत्या. एनएसजीच्या कमांडोजची तर कडवी झुंज सुरूच होती... कारवाईच्या गोंधळातच राजकीय शेरेबाजी सुरूच होती, त्यातून जनतेच्या जीवापेक्षा राजकारणालाच महत्त्व देण्यात आमचे दिग्गज राजकारणी गुंतले होते. अशा परिस्थितीत सरकारमधलेच जबाबदार मंत्री मात्र, बेजबाबदार विधानं करत होते आर. आर. पाटील यांनी तर "मोठ्या शहरात अशी एखादी गोष्ट घडते" असं विधान करून लोकांच्या संतापात अधिकच भर घातली.अखरे जिगबारज कमांडोंनी तब्बल साठ तासांच्या लढाईत, दहशतवाद्यांना पाणी पाजलंच. दहशतवाद्यांना यमसदनी पाठवल्यानंतर बड्या दिलानं तिथं उपस्थित मुंबईकरांनी त्यांचं स्वागत केलं. 'भारत माता की जय' च्या घोषणा दिल्या. मुंबईकरांनी दिलेली शाबासकी आणि मानसिक बळ हे कमांडोंना प्रेरणा देणारं होतं. मुंबईवरील हल्ल्याचा थरार संपून आठ दिवस उलटत असताही आपली सुरक्षा व्यवस्था कशी सुस्त आहे, याचा नमुना सगळ्यांनाच पाह्यला मिळाला, तो म्हणजे सीएसटी स्टेशनवर पुन्हा एका बॅगमध्ये सापडलेल्या स्फोटकांच्या रूपानं.मुंबईवर हल्ला करणार्‍या अजमल कसाब या अतिरेक्याला जिवंत पकडण्यात पोलिसांना यश आलं. पण हा लढा लढताना सोळा जवानांना आपण गमावून बसलो. अखेर ह्या हल्ल्याच्या मागं पाकिस्तान असल्याच्या पुराव्यांना दुजोरा मिळू लागला. पण पाकिस्तानं ही गोष्ट झिडकारली.तो प्रकार नेहमीचाच होता! अजमल कसाब पाकिस्तानचा असल्याचं भारतानं पुरावे देऊनही पाकिस्तानं त्याला मान्यता दिली नाही. पण अखेर पाकिस्तानमधल्या राजकीय सुंदोपसुंदीनं तिथल्या सरकारला खोटं पाडलं. माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनीच कसाब पाकिस्तानी असल्याची कबुली देऊन टाकली.मुंबईवर झालेल्या हल्ल्यानं तब्बल साठ तास गुमान सगळी युद्धजन्य परिस्थिती पाहणार्‍या जनतेनं मात्र उत्स्फुर्त उठाव केला आणि गेट वे ऑफ इंडिया समोर जमलेल्या लाखो मुंबईकरांनी सगळ्याच राजकारण्यांना धारेवर धरलं. जनतेनं केलेल्या ह्या उठावामुळं राजकारणी खडबडून जागे झाले. सरकारला पाय उतार व्हावं लागलं... केंद्रातल्या मंत्र्यांना आपली पदं सोडावी लागली. जनतेच्या उद्रेकाचाच हा परिणाम होता.भगवा दहशतवादनोव्हेंबरमध्ये मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला आणि महिन्यापूर्वी देशात दहशतवादी कारवाया करण्यात हिंदुत्त्ववादी संघटनांचा हात सांगून एटीएसनं खळबळ माजवून दिली होती. ह्या सगळ्या तपासाचे प्रमुख होते मुंबईवरच्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले एटीएसप्रमुख हेमंत करकरे.साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर, स्वयंघोषित शंकराचार्य असलेल्या दयानंद पांडे आणि लष्कराच्या सेेवेत असलेला कर्नल प्रसाद पुरोहित यांची नावं प्रमुख आरोपी म्हणून समोर आली. त्यांच्यासह अकरा जण या कटात सहभागी असल्याचे पुरावे एटीएसनं उघड केले. शिवाय अभिनव भारत सारख्या हिंदुत्ववादी संघटनांचा यात हात असल्याचं समोर आल्यानंतर शिवसेना हिंदुत्वाच्या मुद्यावर या सगळ्यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर आली. कोर्टाच्या आवारात या खटल्यात आरोपींवर पुष्पवृष्टी करण्याचे प्रकारही घडले. मालेगाव बॉम्बस्फोटाशी निगडित सर्वच आरोपींना मोक्काही लावण्यात आला. हिंदुत्ववादाला दहशतवादाची उपमा देऊन हिणवू नका, असा कांगावा करायला भाजपनं सुरूवात केली. पण या घडामोडीत सगळ्यात महत्त्वाची बाब समोर आली ती म्हणजे या स्फोटाच्या कटात लष्करातले माजी अधिकारी आणि सेवेत असलेला एक अधिकारी सहभागी होता. त्यामुळे देशाच्या सुरक्षा व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं. या स्फोटाचे धागेदोरे शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अजून कुणीही कुठल्या निष्कर्षापर्यंत येऊन पोहचलं नाही. ही घटना अगदी हे वर्ष सरत असताना समोर आली. पण वर्षाच्या मध्यंतरीला म्हणजे मे महिन्यात वाशीच्या विष्णुदास भावे नाट्यगृहात स्फोट होण्यापूर्वीच सर्व स्फोटकं पोलिसांनी ताब्यात घेतली. हे नाट्य संपत नाही तोच, जून महिन्याच्या सुरूवातीलाच ठाण्याच्या गडकरी रंगायतन स्फोटानं हादरलं. यात सनातन संस्थेचा हात असल्याचं बोललं जात होतं. पण त्यावरूनही बराच वादंग झाला. याला काही राजकीय पक्षांनी भगवा दहशतवाद म्हणून संबोधलं. त्यावरून शिवसेनेची अस्मिता जागृत झाली. साध्वीच्या पाठीशी उभं राहण्याचं आवाहन बाळासाहेबांनी हिंदुंना केलं. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात राजकीय उलथापालथ सुरूच आहे. त्यात आता याप्रकरणातल्या प्रत्येक आरोपीनं एटीएस त्यांचा छळ करत असल्याचं न्यायालयासमोर प्रतिज्ञापत्राद्वारे सांगितल्यानं, त्यावरून मोठं वादळ उठलं. एकीकडं भगव्या दहशतवादाच्या मुद्यावरून सार्‍या देशात रान पेटलं असताना मात्र, संसदेत बजरंग दल आणि हिंदू जागरण मंचावर बंदी घालण्याच्या मुद्यानं उचल खाल्ली. हिंदू आणि मुस्लीम दहशतवाद्यांमध्ये कोणत्याही पद्धतीचा दुटप्पीपणा नको, अशी भूमिका कम्युनिस्ट पक्षानं घेतली. हिंदुत्ववादी संघटनेच्या विरोधात हे रान उठलेलं असताना गडकरी रंगायतन स्फोटातला आरोपी रमेश गडकरी हा सनातन प्रभातचा साधक असल्याचं समोर आलं. पण या संस्थेनं तो साधक त्यांचा असल्याचं मान्य केलं, पण स्फोटाशी संबंध असल्याच्या मुद्यावरून मात्र हात झटकले. देशभरातील दहशतवादी हल्लेजगभरातल्या पर्यटकांचे आकर्षणकेंद्र असलेलं 'गुलाबी शहर' जयपूरदेखील मे महिन्यात बॉम्बस्फोटांच्या धक्क्यानं हादरून गेलं. केवळ 20 मिनिटात सारं शहर हादरून गेलं. या भीषण बॉम्बस्फोटात 60 जण ठार झाले. जुलै महिन्यात बंगलोरमध्ये लागोपाठ नऊ स्फोट झाले. तर त्याच्या दुसर्‍यादिवशी अहमदाबादही स्फोटांच्या मालिकानं हादरून गेलं. या दोन्ही ठिकाणांच्या स्फोटामध्ये 47 जणांना आपले प्राण गमवावे लागले. जुलैच्या महिन्याच्या शेवटी सुरत शहरात 18 जिवंत बॉम्ब सापडल्यानं सगळ्यांच्या मनाचा थरकाप उडाला. हे दिवस सरत नाहीत तोच सप्टेंबर महिन्यात देशाच्या राजधानीलाही बॉम्बस्फोटाचे धक्के बसले. दिल्लीतल्या पाच प्रमुख ठिकाणांना दहशतवाद्यांनी लक्ष्य करून, 20 निरपराध लोकांचा बळी घेतला. हे सारं स्फोटांचं तांडव सुरू असतानाच वर्षभरापूर्वीच्या आठवणी ताज्या असतानाच मालेगावमध्ये स्फोट झाला. त्यात तिघांना आपले प्राण गमवावे लागले. ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीला आसामला स्फोटानं हादरवलं. सलग 13 बॉम्बस्फोटांमध्ये 66 लोकांना आपला जीव गमवावा लागला. ईशान्य भारतातला तो सर्वात भीषण बॉम्बस्फोट होता. यावर्षात देशात खूप हिंसेच्या घटना घडल्या. अनेक निरपराधांना आपले प्राण गमवावे लागले. देशात होणार्‍या दहशतवादी हल्ल्यांचा बिमोड करण्यात सरकार कमी पडलं. आणि अत्याधुनिक साधनं नसल्यानं सुरक्षा यंत्रणाही अपुरी पडत असल्याचं दिसलं. दहशतवादानं देशभर धुमाकुळ माजवलाय.कधी भगवा तर कधी हिरवा.मात्र या सा-यात भरडला जातोय तो सर्वसामान्य भारतीय.आणि नुकसान होतंय ते फक्त आपल्या देशाचं.या देशावर सत्ता गाजवणा-या राजाकारण्यांना मात्र कशाचंही भान आलं नाही.आणि म्हणूनच राजकारण्यांच्या खूर्च्यांखालीही यावेळी बॉम्बस्फोट झाले.काहींना खूर्ची गमवावी लागली. तर काहींना सत्ता.

रिवाइंड 2008 - श्रद्धांजली पहाण्यासाठी येथे क्लिक करा

रिवाइंड 2008 - सामाजिक राजकारण पहाण्यासाठी येथे क्लिक करा

रिवाइंड 2008 - साहित्य आणि पुरस्कार पहाण्यासाठी येथे क्लिक करा

रिवाइंड 2008 - राष्ट्रीय आणि प्रादेशिक राजकारण पहाण्यासाठी येथे क्लिक करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 30, 2008 11:29 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close