S M L

रिवाइंड 2008 - सामाजिक राजकारण

राज ठाकरे यांचे हिंसक आंदोलनया वर्षावर प्रभाव राहिला तो राज ठाकरे यांचा. मराठीमाणसाचा मुद्दा शिवसेनेकडून हिरावून घेण्यात ते यशस्वी ठरले. त्यात त्यांचा बराच मोठा राजकीय लाभ झाला, मात्र प्रगतीशील विचारांची साक्ष देणारा आणि पुरोगामीपणा अभिमानानं मिरवणार्‍या महाराष्ट्राचं त्यात मोठं नुकसान झालं. दुकानांवरील मराठी पाट्यांचा मुद्दा असो की अमिताभ बच्चनवरील टीका, रेल्वेभरतीच्या वेळी परप्रंतीय विद्यार्थ्यांना केलेली मारहाण असो का जागोजागी केलेली प्रक्षोभक भाषणं, राज छठआकरे नेहमीच मीडियामधून चर्चेत राहिले. एकमेकांचं तोंडही न पहाणारे बिहारी नेते पहिल्यांदाच या मुद्द्यावर एकत्र आले. राज ठाकरेंचा मुद्दा संसदेतही गाजला. त्यांच्यावर कारवाई न केल्याबद्दल तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि त्तकालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्यावर बरीच टीका झाली. त्यातूनच राहुल राज सारख्या प्रकरणातून राजकीय वातावरणही चांगलच गरम झालं. अखेर राज ठाकरे यांना अटक झाली, पण केवळ एक रात्र कोठडीत काढल्यावर ते जामीनावर मुक्त झाले. यानंतर राज ठाकरे यांच्यावर भाषण बंदीही लादली गेलीडाऊ आंदोलनइंद्रायणीच्या काठावरील चाकणजवळच्या डाऊ प्रकल्पाला वारकर्‍यांनी मोठा विरोध घेतला. मात्र सरकारनं सरळ सरळ डाऊची बाजू घेतल्यावर हे आंदोलन चिघळले. बंडातात्या कराडकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात डाऊ कंपनीचं ऑफिसही पेटवून देण्यात आलं. यानंतर बंडातात्यांना अटक झाली, मात्र त्याचेही तीव्र पडसाद उमटले. या प्रकरणात सातत्यानं कंपनीची बाजू घेणार्‍या आर. आर. पाटील यांना कार्तीकी एकादशीला विट्ठलाची महापूजा न करू देण्याचा निर्णय वारकर्‍यांनी घेतला. आर. आर. पाटील यांनीही या वादात न पडता मिळेल तिथे महापूजा केली.खैरलांजी हत्याकांडाचा निकालसर्वांच्याच उत्कंठेचा विषय ठरलेल्या खैरलांजी हत्याकांडाचा निकाल या वर्षी लागला. त्यात 11 पैकी 8 आरोपींना न्यायालयानं दोषी ठरवलं तर तिघांची निर्दोष मुक्तता केली. आरोपींपैकी 8 6 जणांना फाशीची शिक्षा दिली गेली तर 2 जणांना जन्मठेप. यात अ‍ॅट्रोसिटी अ‍ॅक्टअंतर्गत आरोपींना दोषी ठरवण्यास न्यायालयानं नकार दिल्यामुळेसरकारी पक्षाला मोठा धक्का बसला.ओबीसी आरक्षणकेंद्रीय उच्च शिक्षण संस्था अर्थात आयआयटी आणि आयआयएममध्ये ओबीसी विद्यार्थ्यांना आरक्षण देण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे बरेच वाद निर्माण झाले. मात्र न्यायालयाने सरकारच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले. यानंतर सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये या शिक्षण संस्थातील ओबीसी आरक्षणाच्या जागा रिक्त असल्याचं न्यायालयाच्या निदर्शनास आलं. त्यावरून न्यायालयानं सरकारला फटकारलं. आबीसी कोटा भरला जात नसेल, तर त्या जागा खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना उपलब्ध करून द्यायचे आदेश न्यायालयानं दिले.गुज्जर आंदोलनराजस्थानच्या वाळवंटात ऐन मे महिन्यात गुज्जर समाजाचं आरक्षणावरून चाललेलं आंदोलन चांगलच पेटलं. या हिंसाचाराचं लोण राजस्थानच्या इतर भागातही पोहचलं. आंदोलन आटोक्यात ठेवण्यासाठी पोलिसांनी केलेल्या गेळीबारात 31 जणांचा दुदैर्वी अंत झाला. या आंदोलनामुळेच पुढे झालेल्या विधानसभा निवडणुकांत वसुंधरा राजे सरकारला पायउतार व्हावं लागलं.डेरा सच्चा सौदा चे मुंबईतील आंदोलनडेरा सच्चा सौदा चे प्रमुख बाबा राम रहीम यांच्यावर बलात्कार आणि खून प्रकरणी सीबीआयनं आरोपपत्र दाखल केलं. त्याचे हिंसक पडसाद कारण नसताना मुंबईतील मुलुंडमध्ये उमटले. त्यांच्या कार्यकर्त्यांनी हिंसक आंमदोलन सुरू केले. त्याची मोठी झळ सामान्य मुंबईकराला लागली. मुंबईताल मध्य रेल्वेच्या सेवा काही काळ बंद पडल्या. सुरुवातीला पोलिसांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली मात्र आंदोलनाची तीव्रता वाढू लागताचपोलिसांनी कठोर पावलं उचलत आंदोलन आटोक्यात आणलं.चर्चवर हल्लेकर्नाटक आणि ओरिसामध्ये या वर्षी चर्चेसवर मोठ्या प्रमाणात हल्ले झाले. काही ठिकाणी चर्चेसची मोडतोड तरकाही ठिकाणी जाळपोळही झाली. या हल्ल्यात चर्चेसमधील नन्सवरही अत्याचार झाल्याचे आरोप केले गेले. या सगळ्यात बजरंग दलाचा आणि विश्व हिंदू परिषदेचा हात असल्याचा आरोप करत या संघटनांवर बंदी घालण्याची मागणी केली गेली. यावरून राजकारण चागलच तापलं, मात्र हा प्रश्न सोडवण्यासाठी कोणत्याही राजकीय पक्षानं पुढाकार घेतल्याचं दिसलं नाही.जुहूत रेव्ह पार्टीजुहूत एका पबमध्ये सुरू असलेल्या रेव्ह पार्टीवर अमली पदार्थ विरोधी पथकानं छापा टाकला. रेव्ह पार्टीची धंदी अनुभवणार्‍या 192 तरुणांना आणि 38 तरुणींना या वेळी ताब्यात घेतलं तर अमली पदार्थांची विक्री करणार्‍या 8 विक्रत्यांनाही ताब्यात घेण्यात आलं.हे वर्ष देखील प्रचंड सामाजिक उलथापालथीचं गेलं, पण त्यात भरडला गेला तो सामान्य माणूसचरिवाइंड 2008 - श्रद्धांजली पहाण्यासाठी येथे क्लिक करा रिवाइंड 2008 - दहशतवादाचा भस्मासूर पहाण्यासाठी येथे क्लिक करा रिवाइंड 2008 - साहित्य आणि पुरस्कार पहाण्यासाठी येथे क्लिक करा रिवाइंड 2008 - राष्ट्रीय आणि प्रादेशिक राजकारण पहाण्यासाठी येथे क्लिक करा

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 29, 2008 02:49 PM IST

रिवाइंड 2008 - सामाजिक राजकारण

राज ठाकरे यांचे हिंसक आंदोलनया वर्षावर प्रभाव राहिला तो राज ठाकरे यांचा. मराठीमाणसाचा मुद्दा शिवसेनेकडून हिरावून घेण्यात ते यशस्वी ठरले. त्यात त्यांचा बराच मोठा राजकीय लाभ झाला, मात्र प्रगतीशील विचारांची साक्ष देणारा आणि पुरोगामीपणा अभिमानानं मिरवणार्‍या महाराष्ट्राचं त्यात मोठं नुकसान झालं. दुकानांवरील मराठी पाट्यांचा मुद्दा असो की अमिताभ बच्चनवरील टीका, रेल्वेभरतीच्या वेळी परप्रंतीय विद्यार्थ्यांना केलेली मारहाण असो का जागोजागी केलेली प्रक्षोभक भाषणं, राज छठआकरे नेहमीच मीडियामधून चर्चेत राहिले. एकमेकांचं तोंडही न पहाणारे बिहारी नेते पहिल्यांदाच या मुद्द्यावर एकत्र आले. राज ठाकरेंचा मुद्दा संसदेतही गाजला. त्यांच्यावर कारवाई न केल्याबद्दल तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि त्तकालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्यावर बरीच टीका झाली. त्यातूनच राहुल राज सारख्या प्रकरणातून राजकीय वातावरणही चांगलच गरम झालं. अखेर राज ठाकरे यांना अटक झाली, पण केवळ एक रात्र कोठडीत काढल्यावर ते जामीनावर मुक्त झाले. यानंतर राज ठाकरे यांच्यावर भाषण बंदीही लादली गेलीडाऊ आंदोलनइंद्रायणीच्या काठावरील चाकणजवळच्या डाऊ प्रकल्पाला वारकर्‍यांनी मोठा विरोध घेतला. मात्र सरकारनं सरळ सरळ डाऊची बाजू घेतल्यावर हे आंदोलन चिघळले. बंडातात्या कराडकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात डाऊ कंपनीचं ऑफिसही पेटवून देण्यात आलं. यानंतर बंडातात्यांना अटक झाली, मात्र त्याचेही तीव्र पडसाद उमटले. या प्रकरणात सातत्यानं कंपनीची बाजू घेणार्‍या आर. आर. पाटील यांना कार्तीकी एकादशीला विट्ठलाची महापूजा न करू देण्याचा निर्णय वारकर्‍यांनी घेतला. आर. आर. पाटील यांनीही या वादात न पडता मिळेल तिथे महापूजा केली.खैरलांजी हत्याकांडाचा निकालसर्वांच्याच उत्कंठेचा विषय ठरलेल्या खैरलांजी हत्याकांडाचा निकाल या वर्षी लागला. त्यात 11 पैकी 8 आरोपींना न्यायालयानं दोषी ठरवलं तर तिघांची निर्दोष मुक्तता केली. आरोपींपैकी 8 6 जणांना फाशीची शिक्षा दिली गेली तर 2 जणांना जन्मठेप. यात अ‍ॅट्रोसिटी अ‍ॅक्टअंतर्गत आरोपींना दोषी ठरवण्यास न्यायालयानं नकार दिल्यामुळेसरकारी पक्षाला मोठा धक्का बसला.

ओबीसी आरक्षणकेंद्रीय उच्च शिक्षण संस्था अर्थात आयआयटी आणि आयआयएममध्ये ओबीसी विद्यार्थ्यांना आरक्षण देण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे बरेच वाद निर्माण झाले. मात्र न्यायालयाने सरकारच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले. यानंतर सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये या शिक्षण संस्थातील ओबीसी आरक्षणाच्या जागा रिक्त असल्याचं न्यायालयाच्या निदर्शनास आलं. त्यावरून न्यायालयानं सरकारला फटकारलं. आबीसी कोटा भरला जात नसेल, तर त्या जागा खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना उपलब्ध करून द्यायचे आदेश न्यायालयानं दिले.

गुज्जर आंदोलनराजस्थानच्या वाळवंटात ऐन मे महिन्यात गुज्जर समाजाचं आरक्षणावरून चाललेलं आंदोलन चांगलच पेटलं. या हिंसाचाराचं लोण राजस्थानच्या इतर भागातही पोहचलं. आंदोलन आटोक्यात ठेवण्यासाठी पोलिसांनी केलेल्या गेळीबारात 31 जणांचा दुदैर्वी अंत झाला. या आंदोलनामुळेच पुढे झालेल्या विधानसभा निवडणुकांत वसुंधरा राजे सरकारला पायउतार व्हावं लागलं.

डेरा सच्चा सौदा चे मुंबईतील आंदोलनडेरा सच्चा सौदा चे प्रमुख बाबा राम रहीम यांच्यावर बलात्कार आणि खून प्रकरणी सीबीआयनं आरोपपत्र दाखल केलं. त्याचे हिंसक पडसाद कारण नसताना मुंबईतील मुलुंडमध्ये उमटले. त्यांच्या कार्यकर्त्यांनी हिंसक आंमदोलन सुरू केले. त्याची मोठी झळ सामान्य मुंबईकराला लागली. मुंबईताल मध्य रेल्वेच्या सेवा काही काळ बंद पडल्या. सुरुवातीला पोलिसांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली मात्र आंदोलनाची तीव्रता वाढू लागताचपोलिसांनी कठोर पावलं उचलत आंदोलन आटोक्यात आणलं.चर्चवर हल्लेकर्नाटक आणि ओरिसामध्ये या वर्षी चर्चेसवर मोठ्या प्रमाणात हल्ले झाले. काही ठिकाणी चर्चेसची मोडतोड तरकाही ठिकाणी जाळपोळही झाली. या हल्ल्यात चर्चेसमधील नन्सवरही अत्याचार झाल्याचे आरोप केले गेले. या सगळ्यात बजरंग दलाचा आणि विश्व हिंदू परिषदेचा हात असल्याचा आरोप करत या संघटनांवर बंदी घालण्याची मागणी केली गेली. यावरून राजकारण चागलच तापलं, मात्र हा प्रश्न सोडवण्यासाठी कोणत्याही राजकीय पक्षानं पुढाकार घेतल्याचं दिसलं नाही.

जुहूत रेव्ह पार्टीजुहूत एका पबमध्ये सुरू असलेल्या रेव्ह पार्टीवर अमली पदार्थ विरोधी पथकानं छापा टाकला. रेव्ह पार्टीची धंदी अनुभवणार्‍या 192 तरुणांना आणि 38 तरुणींना या वेळी ताब्यात घेतलं तर अमली पदार्थांची विक्री करणार्‍या 8 विक्रत्यांनाही ताब्यात घेण्यात आलं.हे वर्ष देखील प्रचंड सामाजिक उलथापालथीचं गेलं, पण त्यात भरडला गेला तो सामान्य माणूसच

रिवाइंड 2008 - श्रद्धांजली पहाण्यासाठी येथे क्लिक करा

रिवाइंड 2008 - दहशतवादाचा भस्मासूर पहाण्यासाठी येथे क्लिक करा

रिवाइंड 2008 - साहित्य आणि पुरस्कार पहाण्यासाठी येथे क्लिक करा

रिवाइंड 2008 - राष्ट्रीय आणि प्रादेशिक राजकारण पहाण्यासाठी येथे क्लिक करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 29, 2008 02:49 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close