S M L

मधुकर दरेकरांचे व्यायामाचे तंत्रमंत्र (भाग :1)

बदलती जीवनशैली पाहता सर्वच वयोगटातल्या लोकांना व्यायामची गरज भासणार आहे. अगदी ज्येष्ठ नागरिकांनाही. ' सलाम महाराष्ट्र ' नेमकं हेच फिटनेस कन्सल्टंट मधुकर दरेकर यांनी सांगितलं. ' सलाम महाराष्ट्र 'मध्ये त्यांच्या कामाविषयी जाणून घेतलंच. शिवाय त्यांनी कार्यक्रमात अबाल वृद्धांसाठी व्यायामाच्या टीप्स दिल्या, त्या वेगळ्या. फिटनेस कन्सल्टंट मधुकर दरेकर हे उत्तम खेळाडू आहेत. उत्तम खेळाडू म्हणून त्यांना महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती पुरस्कार मिळाला आहे. तर एक उत्तम प्रशिक्षक म्हणून दादोजी कोंडदेव पुरस्कार आणि खेळाच्या माध्यमातून महाराष्ट्राची सेवा केल्याबद्दल जीवनगौरव पुरस्कार मिळालाय.असे तीनही पुरस्कार एकत्र मिळालेले ते एकमेव खेळाडू आहेत.1983 साली महाराष्ट्रामध्ये वेटलिफ्टींग, पॉवर लिफ्टिंगमध्ये त्यांनी स्त्रियांना पुढे आणलं. त्याचं हे क्रीडा क्षेत्रासाठी महत्त्वाचं योगदान आहे.मधुकर दरेकर संपूर्ण महाराष्ट्रात फिटनेस आणि व्यायामाचा प्रसार करत आहेत. ते सांगतात, " व्यायामाची गरज ही फक्त तरु णांना नाही तर वृद्धांनाही आहे. उतार वयातच सांधेदुखी, मधुमेह, उच्चरक्तदब, पचनसंस्थेचे निरनिराळे आजार अशा निरनिराळ्याप्रकारच्या व्याधी जडतात. नियमित व्यायाम केल्यानं, योगासनं केल्यानं या व्याधी कमी करता येतात. मी स्वत: कित्येक ज्येष्ठ नागरिकांना निरनिराळ्या प्रकारचे व्यायाम शिकवतो. व्यायामानं, योगासनांनी कित्येक ज्येष्ठ नागरिकांचा त्रास कमी केला आहे. " उतार वयातच नाही पण तरुण वयातही निद्रानाशाचा त्रास होतो. पण हार त्रास मधुकर दरेकरांना अजिबातच नाहीये. " निद्रानाशाचा नाश मला अजिबातच नाहीये. कारण मी व्यायाम करतो. योगासनं करतो. मेंदूलाच नाही पण शरीराला रक्तपुरवठी नीट झाला तर निद्रानाशाचा त्रास होत नाही. निद्रानशाचा त्रास असणा-यांनी योगासनं केली पाहिजे, " असा मोलाचा सल्ला मधुकर दरेकरांनी दिला. मधुकर दरेकरांची खासियत म्हणजे वेटलिफ्टींग,पॉवर लिफ्टिंगमध्ये त्यांनी स्त्रियांना पुढे आणलं आहे. ते सांगतात, " वेटलिफ्टींग आणि पॉवरलिफ्टींग हा खेळाचा प्रकार नसून तर तुमच्या आत्मसंरक्षणासाठीही उपयोग होतो. मी स्वत:ला दादरच्या कामगार क्रीडा मैदानातल्या कबड्डी, खोखो खेळणा-या मुलींना घेऊन वेटलिफ्टींग, पॉवर लिफ्टींगचं प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली. माझ्याकडे या मुली मोठ्या विश्वासानं शिकल्यात. या मुलींना वेटलिफ्टींग, पॉवर लिफ्टींगमधल्या उत्तमोत्तम पुरस्कारांनी गौरवलं आहे. " उत्तम आरोग्यासाठी व्यायामाचा मूलमंत्र ' मधुकर दरेकरांनी ' ' सलाम महाराष्ट्र ' मधून दिला आहे. मधुकर दरेकरांच्या ' सलाम महाराष्ट्र 'मधल्या गप्पा व्हिडिओवर पाहता येतील.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 30, 2008 06:37 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 30, 2008 06:37 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close