S M L

रिवाइंड 2008 - राष्ट्रीय आणि प्रादेशिक राजकारण

26/11 चे राजकीय धक्केमुंबई जशी अतिरेक्यांच्या हल्ल्यानं हादरली तसंच अनेक राजकारण्यांच्या खुर्चीखालीही स्फोट झाले. कितीही रक्ततपात झाला तरी आपल्या कपड्यांची घडीही विस्कटणार नाही, याची काळजी घेणार्‍या माजी गृहमंत्री शिवराज पाटील यांना या वेळी आपली घडी काही नीट बसवत आली नाही. शांत प्रतिमेचे गृहमंत्री अशी त्यांची प्रतिमा होती, पण मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर हा शांतपणा जरा अतीच झाला, अशी भावना जनतेमध्ये निर्माण झालं. दहशतवादाचा प्रश्नही शांततेच्या मार्गाने सोडवण्याचा त्यांचा विचार कोणालाच पटला नाही. आधीपासूनच काँग्रस हायकमांड त्यांच्यावर नाराज होतीच, तसे संकेतही त्यांना दिले गेले होते. अखेर 26/11 चे निमित्त झाले आणि त्यांना पायउतार व्हावं लागलं. शिवराज पाटील गेले तरी आपले स्थान सुरक्षित आहे अशाच काहीशा समजुतीत त्तकालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख वावरत राहिले. वेळप्रसंगी दिल्लीतही फिल्डिंग लावण्यास त्यांनी कमी केले नाही. मात्र आपल्या पुत्रप्रेमामुळे ते अडचणीत आले. ताजमध्ये रितेश देशमुख आणि रामगोपाल वर्मा यांना घेऊन जायच्या त्यांच्या निर्णयामुळे त्यांच्यावर चोहो बाजूने टीकेची झोड उठली आणि अखेर त्यांना आपलं स्थान सोडावं लागलं.तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांची प्रतिमा तशी चांगली होती, मात्र मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर 'मोठ्या शहरात अशा गोष्टी कधीकधी घडतात' या त्यांच्या वक्तव्याची किंमत त्यांना चुकवावी लागली आणि आबांना पायउतार व्हावं लागलं. एकूणच 26/11 नंतर जनतेच्या भावना समजून घेण्यात अपयश आल्यामुळे शिवराज पाटील, विलासराव देशमुख आणि आर. आर. पाटील यांच्यावर राजकीय धक्का सहन करण्याची वेळ आली.या परिस्थितीत खरं तर शांत रहाण्यातच शहाणपण होतं पण नारायण राणे यांचा स्वाभिमान अचानक उचंबळून आला. कोणत्या परिस्थितीत मुख्यमंत्री बदलले गेले याची तमा न बाळगता मुख्यमंत्रीपदाच्या लढतीत ते आन, बान और शान से उतरले. मुख्यमंत्रीपद गळाला लागत नाही म्हटल्यावर तर आत्तापर्यंत फक्त विलासरावांविरुद्ध धडधडणारी राणेंची तोफ काँग्रेस नेतृत्वावरही बरसली. अखेर या सगळ्याचा परिणाम व्हायचा तोच झाला आणि राणेंची काँग्रेसमधून हाकालपट्टी झाली.अशा परिस्थितीत मुख्यमंत्रीपदासाठी गरज होती ती कार्यक्षम आणि सक्षम नेतृत्वाची. या वेळेस राजकारणात जोपासलेली स्वच्छ प्रतिमा, अजातशत्रुत्व आणि वडिलांची पुण्याई या बळावर मुख्यमंत्रीपदाची माळ अशोक चव्हाण यांच्या गळ्यात पडली. आपल्या कार्यक्षमतेचा प्रत्यय देत त्यांनी विधानसभेत सरकारला केवळ तारलच नाही, तर आपल्या राजकीय कौशल्याने विरोधकांनाही चकीत केलं. आपला इ मेल आयडी सामान्य जनतेला उपलब्ध करून देऊन 'आम आदमी' बरोबरही जवळीक साधायचा त्यांनी प्रयत्न केला.उपमुख्यमंत्रीपदासाठी छगन भुजबळ यांच्यापेक्षा लायक उमेदवार शरद पवारांना सापडूच शकत नव्हता. तेलगी प्रकरणी अनेक आरोप झेलून राजकीय विजनवासात गेलेल्या भुजबळांना देशभर ओबीसींचे भव्य मेळावे घेऊन आपली ताकद तर दाखवलीच होती. मग पुन्हा एकदा भुजबळांकडे उपमुख्यमंत्रीपद देण्यात आले. मात्र आर. आर. पाटील सांभाळत असलेले गृह खाते सोपवण्यात आले ते अर्थमंत्री जयंत पाटील यांच्याकडे. स्वच्छ प्रतिमा आणि कार्यक्षम कारभार ही जयंत पाटील यांची वैशिष्ट्ये. केंद्रातही शिवराज पाटलांचे गृहमंत्रीपद तत्कालीन अर्थमंत्री पी चिदंबरम यांच्याकडेच सोपवण्यात आले होते. त्याच प्रयोगाची पुनरावृत्ती महाराषट्रातही झाली. गोपिनाथ मुंडेंचा बंडाचा पवित्रागोपिनाथ मुंडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत नितीन गडकरींविरु नितीन गडकरींविरुद्ध बंडाचा पवित्रा घेतला आणि भाजपमधील भल्याभल्या धुरीणांची झोप उडाली. प्रमोद महाजनांच्या दुदैर्वी मृत्यूनंतर गोपिनाथ मुंडे यांना वारंवार डावलले गेल्याची भावना होती. त्यातच प्रदेशाध्यक्ष नितीन गडकरी यांच्या संघ परिवाराच्या जवळीकीमुळे त्यांचे राजकीय वजन वाढले होते. आपली राजकीय ताकद दाखवून देण्यासाठी मुंडे ही खेळी खेळले आणि महाराष्ट्र भाजमध्ये अक्षरश: भूकंप झाला. आजही मुंडेइतका लोकप्रिय नेता महाराष्ट्रात भाजपकडे नाही. त्यातच कार्यकर्त्यांचा मुंडेंना भरघोस पाठिंबा असल्याचे दिसून आले. यानंतर तातडीने पावलं उचलत भाजप नेतृत्वाने मुंडेंची समजूत घातली आणि काळाची पावले ओळखत मुंडे शांत झाले. या प्रकरणाचा विरोधकांना कोणताही फायदा उचलता आला नसला, तरी आपली राजकीय ताकद दाखवून देण्यात मुंडे कमालीचे यशस्वी ठरले.अणुकरार आणि विश्वासदर्शक ठरावअणुकराराच्य मुद्द्यावरून डाव्या पक्षांनी सरकारचा पाठिंबा काढला, मात्र समाजवादी पक्षाचा आधार घेत सत्ता टिकवण्यात काँग्रेस यशस्वी. मात्र विश्वासदर्शक ठरावादरम्यान अमरसिंह आणि अहमद पटेल यांनी सरकारच्या बाजूने मतदान करण्यासाठी लाच दिल्याचा आरोप केला. पुढे चौकशीत आरोप निष्फळ ठरले.कर्नाटकमध्ये कमळ फुललेमहागईचा राक्षस आणि नुकतेच जयपूरमध्ये झालेले बॉम्बस्फोट यांचा फायदा उठवत कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपनेजोरदार मुसंडी मारली. संघटीत प्रचार आणि भजप नेते येडीयुरप्पा यांना असलेली जनतेची सहानुभुती याबरोबरच केंद्रातील सरकारचं महागई रोखण्यात आलेलं अपयशही भाजपला सत्ता मिळवण्यास कारणीभूत ठरले. नतर अपेक्षेप्रमाण येडीयुरप्पा मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले.पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकापाच राज्यांच्या विधझानसभा निवडणुकीत काँग्रेसला घवघवीत यश मिळालं. राजस्थानाता गुज्जर आंदोलनाचा भजपला बसलेल्या फटक्याचा मोठा लाभ उठवत वसुंधरा राजे सरकारचा काँग्रेसनं मोठा पराभव केला. दिल्लीत काँग्रेसनं आपली सत्ता राखली. मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्या करिष्म्याच्या जोरावर दिल्लीत काँग्रेसनं सत्ता राखली. मिझोरममध्येही निर्णायक बहुमत मिळवत काँग्रेसनं सत्ता मिळवली. मध्य प्रदेश आणि छत्तासगडमध्ये सत्ता राखण्यात भाजप जरी यशस्वी ठरला असला तरी त्यांच्या जागांमध्ये मोठी घट झाली. एकूणच दहशतवादाचा बीमोड हा जणू आमचाच मक्ता आहे या थाटात वावरणार्‍या आणि 26/11 चा राजकीय प्रयत्नात असलेल्या भाजपला मतदारांनी नाकारलं. मात्र कल्याणकारी प्रशासन देणार्‍या शीला दीक्षित, शिवराज चौहान आणि डा. रमण सिंग या मुख्यमंत्र्यांवर जनतेनं पुन्हा एकदा विश्वास दाखवला. एकूणच या निवडणुका विकासाच्या मुद्द्यावर लढल्या गेल्याचं आणि त्यामुळेच भारतीय लोकशाही अधिक परिपक्व झाल्याचं चित्र या निवडणुकांमध्ये दिसलं. रिवाइंड 2008 - सामाजिक राजकारण पहाण्यासाठी येथे क्लिक करा रिवाइंड 2008 - साहित्य आणि पुरस्कार पहाण्यासाठी येथे क्लिक करा रिवाइंड 2008 - श्रद्धांजली पहाण्यासाठी येथे क्लिक करा रिवाइंड 2008 - दहशतवादाचा भस्मासूर पहाण्यासाठी येथे क्लिक करा

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 29, 2008 11:35 AM IST

26/11 चे राजकीय धक्केमुंबई जशी अतिरेक्यांच्या हल्ल्यानं हादरली तसंच अनेक राजकारण्यांच्या खुर्चीखालीही स्फोट झाले. कितीही रक्ततपात झाला तरी आपल्या कपड्यांची घडीही विस्कटणार नाही, याची काळजी घेणार्‍या माजी गृहमंत्री शिवराज पाटील यांना या वेळी आपली घडी काही नीट बसवत आली नाही. शांत प्रतिमेचे गृहमंत्री अशी त्यांची प्रतिमा होती, पण मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर हा शांतपणा जरा अतीच झाला, अशी भावना जनतेमध्ये निर्माण झालं. दहशतवादाचा प्रश्नही शांततेच्या मार्गाने सोडवण्याचा त्यांचा विचार कोणालाच पटला नाही. आधीपासूनच काँग्रस हायकमांड त्यांच्यावर नाराज होतीच, तसे संकेतही त्यांना दिले गेले होते. अखेर 26/11 चे निमित्त झाले आणि त्यांना पायउतार व्हावं लागलं. शिवराज पाटील गेले तरी आपले स्थान सुरक्षित आहे अशाच काहीशा समजुतीत त्तकालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख वावरत राहिले. वेळप्रसंगी दिल्लीतही फिल्डिंग लावण्यास त्यांनी कमी केले नाही. मात्र आपल्या पुत्रप्रेमामुळे ते अडचणीत आले. ताजमध्ये रितेश देशमुख आणि रामगोपाल वर्मा यांना घेऊन जायच्या त्यांच्या निर्णयामुळे त्यांच्यावर चोहो बाजूने टीकेची झोड उठली आणि अखेर त्यांना आपलं स्थान सोडावं लागलं.तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांची प्रतिमा तशी चांगली होती, मात्र मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर 'मोठ्या शहरात अशा गोष्टी कधीकधी घडतात' या त्यांच्या वक्तव्याची किंमत त्यांना चुकवावी लागली आणि आबांना पायउतार व्हावं लागलं. एकूणच 26/11 नंतर जनतेच्या भावना समजून घेण्यात अपयश आल्यामुळे शिवराज पाटील, विलासराव देशमुख आणि आर. आर. पाटील यांच्यावर राजकीय धक्का सहन करण्याची वेळ आली.या परिस्थितीत खरं तर शांत रहाण्यातच शहाणपण होतं पण नारायण राणे यांचा स्वाभिमान अचानक उचंबळून आला. कोणत्या परिस्थितीत मुख्यमंत्री बदलले गेले याची तमा न बाळगता मुख्यमंत्रीपदाच्या लढतीत ते आन, बान और शान से उतरले. मुख्यमंत्रीपद गळाला लागत नाही म्हटल्यावर तर आत्तापर्यंत फक्त विलासरावांविरुद्ध धडधडणारी राणेंची तोफ काँग्रेस नेतृत्वावरही बरसली. अखेर या सगळ्याचा परिणाम व्हायचा तोच झाला आणि राणेंची काँग्रेसमधून हाकालपट्टी झाली.अशा परिस्थितीत मुख्यमंत्रीपदासाठी गरज होती ती कार्यक्षम आणि सक्षम नेतृत्वाची. या वेळेस राजकारणात जोपासलेली स्वच्छ प्रतिमा, अजातशत्रुत्व आणि वडिलांची पुण्याई या बळावर मुख्यमंत्रीपदाची माळ अशोक चव्हाण यांच्या गळ्यात पडली. आपल्या कार्यक्षमतेचा प्रत्यय देत त्यांनी विधानसभेत सरकारला केवळ तारलच नाही, तर आपल्या राजकीय कौशल्याने विरोधकांनाही चकीत केलं. आपला इ मेल आयडी सामान्य जनतेला उपलब्ध करून देऊन 'आम आदमी' बरोबरही जवळीक साधायचा त्यांनी प्रयत्न केला.उपमुख्यमंत्रीपदासाठी छगन भुजबळ यांच्यापेक्षा लायक उमेदवार शरद पवारांना सापडूच शकत नव्हता. तेलगी प्रकरणी अनेक आरोप झेलून राजकीय विजनवासात गेलेल्या भुजबळांना देशभर ओबीसींचे भव्य मेळावे घेऊन आपली ताकद तर दाखवलीच होती. मग पुन्हा एकदा भुजबळांकडे उपमुख्यमंत्रीपद देण्यात आले. मात्र आर. आर. पाटील सांभाळत असलेले गृह खाते सोपवण्यात आले ते अर्थमंत्री जयंत पाटील यांच्याकडे. स्वच्छ प्रतिमा आणि कार्यक्षम कारभार ही जयंत पाटील यांची वैशिष्ट्ये. केंद्रातही शिवराज पाटलांचे गृहमंत्रीपद तत्कालीन अर्थमंत्री पी चिदंबरम यांच्याकडेच सोपवण्यात आले होते. त्याच प्रयोगाची पुनरावृत्ती महाराषट्रातही झाली. गोपिनाथ मुंडेंचा बंडाचा पवित्रागोपिनाथ मुंडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत नितीन गडकरींविरु नितीन गडकरींविरुद्ध बंडाचा पवित्रा घेतला आणि भाजपमधील भल्याभल्या धुरीणांची झोप उडाली. प्रमोद महाजनांच्या दुदैर्वी मृत्यूनंतर गोपिनाथ मुंडे यांना वारंवार डावलले गेल्याची भावना होती. त्यातच प्रदेशाध्यक्ष नितीन गडकरी यांच्या संघ परिवाराच्या जवळीकीमुळे त्यांचे राजकीय वजन वाढले होते. आपली राजकीय ताकद दाखवून देण्यासाठी मुंडे ही खेळी खेळले आणि महाराष्ट्र भाजमध्ये अक्षरश: भूकंप झाला. आजही मुंडेइतका लोकप्रिय नेता महाराष्ट्रात भाजपकडे नाही. त्यातच कार्यकर्त्यांचा मुंडेंना भरघोस पाठिंबा असल्याचे दिसून आले. यानंतर तातडीने पावलं उचलत भाजप नेतृत्वाने मुंडेंची समजूत घातली आणि काळाची पावले ओळखत मुंडे शांत झाले. या प्रकरणाचा विरोधकांना कोणताही फायदा उचलता आला नसला, तरी आपली राजकीय ताकद दाखवून देण्यात मुंडे कमालीचे यशस्वी ठरले.अणुकरार आणि विश्वासदर्शक ठरावअणुकराराच्य मुद्द्यावरून डाव्या पक्षांनी सरकारचा पाठिंबा काढला, मात्र समाजवादी पक्षाचा आधार घेत सत्ता टिकवण्यात काँग्रेस यशस्वी. मात्र विश्वासदर्शक ठरावादरम्यान अमरसिंह आणि अहमद पटेल यांनी सरकारच्या बाजूने मतदान करण्यासाठी लाच दिल्याचा आरोप केला. पुढे चौकशीत आरोप निष्फळ ठरले.कर्नाटकमध्ये कमळ फुललेमहागईचा राक्षस आणि नुकतेच जयपूरमध्ये झालेले बॉम्बस्फोट यांचा फायदा उठवत कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपनेजोरदार मुसंडी मारली. संघटीत प्रचार आणि भजप नेते येडीयुरप्पा यांना असलेली जनतेची सहानुभुती याबरोबरच केंद्रातील सरकारचं महागई रोखण्यात आलेलं अपयशही भाजपला सत्ता मिळवण्यास कारणीभूत ठरले. नतर अपेक्षेप्रमाण येडीयुरप्पा मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले.

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकापाच राज्यांच्या विधझानसभा निवडणुकीत काँग्रेसला घवघवीत यश मिळालं. राजस्थानाता गुज्जर आंदोलनाचा भजपला बसलेल्या फटक्याचा मोठा लाभ उठवत वसुंधरा राजे सरकारचा काँग्रेसनं मोठा पराभव केला. दिल्लीत काँग्रेसनं आपली सत्ता राखली. मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्या करिष्म्याच्या जोरावर दिल्लीत काँग्रेसनं सत्ता राखली. मिझोरममध्येही निर्णायक बहुमत मिळवत काँग्रेसनं सत्ता मिळवली. मध्य प्रदेश आणि छत्तासगडमध्ये सत्ता राखण्यात भाजप जरी यशस्वी ठरला असला तरी त्यांच्या जागांमध्ये मोठी घट झाली. एकूणच दहशतवादाचा बीमोड हा जणू आमचाच मक्ता आहे या थाटात वावरणार्‍या आणि 26/11 चा राजकीय प्रयत्नात असलेल्या भाजपला मतदारांनी नाकारलं. मात्र कल्याणकारी प्रशासन देणार्‍या शीला दीक्षित, शिवराज चौहान आणि डा. रमण सिंग या मुख्यमंत्र्यांवर जनतेनं पुन्हा एकदा विश्वास दाखवला. एकूणच या निवडणुका विकासाच्या मुद्द्यावर लढल्या गेल्याचं आणि त्यामुळेच भारतीय लोकशाही अधिक परिपक्व झाल्याचं चित्र या निवडणुकांमध्ये दिसलं.

रिवाइंड 2008 - सामाजिक राजकारण पहाण्यासाठी येथे क्लिक करा

रिवाइंड 2008 - साहित्य आणि पुरस्कार पहाण्यासाठी येथे क्लिक करा

रिवाइंड 2008 - श्रद्धांजली पहाण्यासाठी येथे क्लिक करा

रिवाइंड 2008 - दहशतवादाचा भस्मासूर पहाण्यासाठी येथे क्लिक करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 29, 2008 11:35 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close