S M L

योग आणि आरोग्य (भाग : 2)

निरोगी आरोग्यासाठी आपलं मन प्रसन्न असण्याची आवश्यकता आहे. मनावर ताबा ठेवणं जरी कठीण असलं तरी आपण आपल्या श्वासावर नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे. हे श्‍वासावरचं नियंत्रण आपल्याला योगाभ्यासातून मिळवता येतं. योगाभ्यासाचा उपयोग कोणी आणि कसा करावा यावर मार्गदर्शन योगतज्ज्ञ शिल्पा जोशी यांनी केलं. निरोगी आरोग्यासाठी जोतो धडपडताना दिसतो. निरोगी आरोग्यासाठी हल्ली तर योगाचाही आधार घेतला जात आहे. पण आरोग्य म्हणजे काय, नि चांगल्या आरोग्यासाठी योगाचा उपयोग कसा होतो, असा प्रश्न अनेकांना पडतो. त्यावर योगतज्ज्ञ शिल्पा जोशी सांगतात, " वर्ल्ड हेल्थ ऑरगानायझेशनने म्हणजे WHOने योगाची व्याख्या केली आहे. चांगलं आरोग्य म्हणजे फक्त योगाचा अभाव नाही. तर मानसिक, शारीरिक, बौद्धिक आणि अध्यात्मिक या चार गोष्टींचं संतुलन म्हणजे उत्तम आरोग्य. योग या शास्त्रात मानसिक, शारीरिक आणि अध्यात्मिक या तीन गोष्टीेंचा समावेश होतो. या तीन महत्त्वपूर्ण गोष्टींन मानवी जीवनाचं संतुलन राखलं जात. योगा हे फक्त प्रतिबंधात्मक शास्त्र नसून रोग न होण्यासाठीही प्रतिबंध केला जातो." योगाला सुरुवात वयाच्या आठव्या वर्षापासून करावा, असा सल्ला शिल्पा जोशी यांनी दिला. त्या सांगतात, " योग हा फक्त शरीराशी निगडीत नसून तो बराचसा मनाशीही निगडीत आहे. मानवी शरीर आणि मन यांची सांगड घालून मानवी जीवनाचा विकास केला जातो. योगाची आठ अंग आहेत. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा आणि साधना यांनाच अष्टांग योग म्हणतात. योगात या आठ अंगाचा उपयोग केला जातो. त्यामुळेच योग हा फक्त शरीरावर नाही तर मनावरही परिणाम करतो. " योगाभ्यासात आहार आणि विहाराची गरज आहे. योगाभ्यासातल्या आहाराविषयी शिल्पा जोशी सांगतात, "योगाभ्यासातला आहार हा सात्विक असावा लागतो. सात्विक आहार म्हणजे ताजं, सकस आणि पौष्टिक आहार खाल्लाच पाहिजे. म्हणजे पूर्णान्न. या पूर्णान्नामध्ये भात, भाजी, पोळी, वरण, आमटी, कोशिंबीर सारख्या पदार्थांचा समावेश होतो. आजच्या धावपळीच्या आयुष्यात पूर्णान्न खायला कोणालाच वेळ नसतो. लोकं हवं त्यावेळेला हवं ते खातात. फास्ट फूड तसंच इन्स्टंट फूडचा जेवणात सर्वात जास्त वापर केला जातो. फास्ट फूड तसंच इन्स्टंट फूड मधल्या प्रीझरव्हेटीव्हचा शरीरावर परिणाम होतो. शक्यतो सात्विक आहार खाल्ल्यानं योगासनं करताना शरीरावर वाईट परिणाम होत नाही. " शिल्पा जोशी यांनी योगाभ्यासातलं प्रणायामाचं महत्त्व सांगितलं. " योगाभ्यासात प्राणायामालाही महत्त्व आहे. प्राणायामाच्या माध्यमातून मनावर ताबा ठेवता येतो. मनावर ताबा ठेवण्यासाठी आधी श्वासावर ताबा ठेवला पाहिजे. श्वासावर ताबा ठेवता आला की मनावर ताबा ठेवणं सोपं जातं, " अशी माहिती शिल्पा जोशी यांनी दिली. "योगा करत असताना त्याचवेळी दुसरा कोणताही व्यायाम करायचा नाही. योगा सकाळी करत असाल तर दुसरा व्यायाम संध्याकाळी करावा, " असा मोलाचा सल्ला शिल्पा जोशी यांनी दिला. योगाभ्यासाविषयी योगतज्ज्ञ शिल्पा जोशी यांनी सांगितलेली माहिती पुढील व्हिडिओवर पाहता येईल. ' योग आणि आरोग्य ' चा योग आणि आरोग्य (भाग : 3) पुढच्या लिंकवर पाहता येईल.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 30, 2008 11:40 AM IST

योग आणि आरोग्य (भाग : 2)

निरोगी आरोग्यासाठी आपलं मन प्रसन्न असण्याची आवश्यकता आहे. मनावर ताबा ठेवणं जरी कठीण असलं तरी आपण आपल्या श्वासावर नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे. हे श्‍वासावरचं नियंत्रण आपल्याला योगाभ्यासातून मिळवता येतं. योगाभ्यासाचा उपयोग कोणी आणि कसा करावा यावर मार्गदर्शन योगतज्ज्ञ शिल्पा जोशी यांनी केलं. निरोगी आरोग्यासाठी जोतो धडपडताना दिसतो. निरोगी आरोग्यासाठी हल्ली तर योगाचाही आधार घेतला जात आहे. पण आरोग्य म्हणजे काय, नि चांगल्या आरोग्यासाठी योगाचा उपयोग कसा होतो, असा प्रश्न अनेकांना पडतो. त्यावर योगतज्ज्ञ शिल्पा जोशी सांगतात, " वर्ल्ड हेल्थ ऑरगानायझेशनने म्हणजे WHOने योगाची व्याख्या केली आहे. चांगलं आरोग्य म्हणजे फक्त योगाचा अभाव नाही. तर मानसिक, शारीरिक, बौद्धिक आणि अध्यात्मिक या चार गोष्टींचं संतुलन म्हणजे उत्तम आरोग्य. योग या शास्त्रात मानसिक, शारीरिक आणि अध्यात्मिक या तीन गोष्टीेंचा समावेश होतो. या तीन महत्त्वपूर्ण गोष्टींन मानवी जीवनाचं संतुलन राखलं जात. योगा हे फक्त प्रतिबंधात्मक शास्त्र नसून रोग न होण्यासाठीही प्रतिबंध केला जातो." योगाला सुरुवात वयाच्या आठव्या वर्षापासून करावा, असा सल्ला शिल्पा जोशी यांनी दिला. त्या सांगतात, " योग हा फक्त शरीराशी निगडीत नसून तो बराचसा मनाशीही निगडीत आहे. मानवी शरीर आणि मन यांची सांगड घालून मानवी जीवनाचा विकास केला जातो. योगाची आठ अंग आहेत. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा आणि साधना यांनाच अष्टांग योग म्हणतात. योगात या आठ अंगाचा उपयोग केला जातो. त्यामुळेच योग हा फक्त शरीरावर नाही तर मनावरही परिणाम करतो. " योगाभ्यासात आहार आणि विहाराची गरज आहे. योगाभ्यासातल्या आहाराविषयी शिल्पा जोशी सांगतात, "योगाभ्यासातला आहार हा सात्विक असावा लागतो. सात्विक आहार म्हणजे ताजं, सकस आणि पौष्टिक आहार खाल्लाच पाहिजे. म्हणजे पूर्णान्न. या पूर्णान्नामध्ये भात, भाजी, पोळी, वरण, आमटी, कोशिंबीर सारख्या पदार्थांचा समावेश होतो. आजच्या धावपळीच्या आयुष्यात पूर्णान्न खायला कोणालाच वेळ नसतो. लोकं हवं त्यावेळेला हवं ते खातात. फास्ट फूड तसंच इन्स्टंट फूडचा जेवणात सर्वात जास्त वापर केला जातो. फास्ट फूड तसंच इन्स्टंट फूड मधल्या प्रीझरव्हेटीव्हचा शरीरावर परिणाम होतो. शक्यतो सात्विक आहार खाल्ल्यानं योगासनं करताना शरीरावर वाईट परिणाम होत नाही. " शिल्पा जोशी यांनी योगाभ्यासातलं प्रणायामाचं महत्त्व सांगितलं. " योगाभ्यासात प्राणायामालाही महत्त्व आहे. प्राणायामाच्या माध्यमातून मनावर ताबा ठेवता येतो. मनावर ताबा ठेवण्यासाठी आधी श्वासावर ताबा ठेवला पाहिजे. श्वासावर ताबा ठेवता आला की मनावर ताबा ठेवणं सोपं जातं, " अशी माहिती शिल्पा जोशी यांनी दिली. "योगा करत असताना त्याचवेळी दुसरा कोणताही व्यायाम करायचा नाही. योगा सकाळी करत असाल तर दुसरा व्यायाम संध्याकाळी करावा, " असा मोलाचा सल्ला शिल्पा जोशी यांनी दिला. योगाभ्यासाविषयी योगतज्ज्ञ शिल्पा जोशी यांनी सांगितलेली माहिती पुढील व्हिडिओवर पाहता येईल.

' योग आणि आरोग्य ' चा योग आणि आरोग्य (भाग : 3) पुढच्या लिंकवर पाहता येईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 30, 2008 11:40 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close