S M L

वजन आणि फिटनेस (भाग : 3)

आपल्या बिझी शेड्युलमध्ये आपल्याला फिटनेसवर लक्ष देणं फारसं जमत नाही. मग वजनावर नियंत्रण राहणार तरी कसं ? वजन आणि फिटनेस अशा दोन्हींवर नियंत्रण ठेवायचं असेल तर उपासतापास, डायए, व्यायाम असं चक्र एकदम सुरू होतं. असं करूनही वजनावर नियंत्रण ठेवूंन फीट राहण्याचा फंडा मिळतोच असं नाही. टॉक टाइम 'मध्ये याच समस्येवर बोलण्यासाठी ओबेसिटी तज्ज्ञ डॉ. नितीन पाटणकर आले होते. त्यांनी याच समस्येवर प्रेक्षकांना मार्गदर्शन केलं. डॉ. नितीन पाटणकर सांगतात, " आजकाल बाजारात इन्स्टंट फूडचा सुळसुळाट झालेला आहे. तशी वजन घटवणं ही इन्स्टंट गोष्ट नाहीये. म्हणजे वजनावर आणि फीटनेसवर खूप मेहनत घ्यावी लागते. वजन आणि फीटनेसवर काम करणं ही भाजी आणि घर घेण्यासारखं आहे. घर घेण्यापूर्वी जशी खटपट करावी लागते आणि घर घेतल्यावर जी मेहनत घ्यावी लागते तसं वजनावर काम करणं आहे. दिवसाचे 24 तास असतात. या 24 तासांच्या वेळेत काही वाढ करता येत नाही. तर आपल्याला आपल्या कामाच्या प्रायॉरिटीज ठरवता आल्या पाहिजेत. या प्रायॉरिटीज ठरवताना व्यायामालाही वेळ देता आला पाहिजे. " डायटचे काही क्रॅश कोर्सेस असतात. त्या क्रॅश कोर्सेस बद्दल डॉ. पाटणकर सांगतात, " डायेटवर क्रॅश कोर्स करा. पण तो केल्यावर फिटनेस टीकवता आला पाहिजे. काही जण मोठ्या हौसेनं जिममध्ये नाव घालतात. जीममध्ये नाव घातल्यावर सुरुवातीचे 15 दिवस जातात. पण नंतर मात्र जात नाहीत. असं करू नये. व्यायामामध्ये सातत्य हवं. चालणं हा उत्तम व्यायाम आहे. तो करावा. बाहेरचं खाणं शक्यतो टाळावं. डायेट करताना जेवणामध्ये भाज्या आणि फळांचा सर्वात जास्त उपयोग करावा." काहींना वाढलेल्या वजनावर नियंत्रण ठेवायचं असतं. तर काहींना वजन वाढवायचं असतं. डॉक्टर सांगतात , " वजन कमी करण्यापेक्षाही वजन वाढवणं कठीण आहे. जेवढा वजन कमी करायला वेळ लागतो, त्याच्यापेक्षा जास्त वेळ वजन वाढवायला लागतो. वजन वाढवण्यासाठी शरीरातले स्नायू आणि चरबीची वाढ होणं आवश्यक आहे. " पोटाची सुटलेली डेरी हीही अनेकांची समस्या असते. त्यावर डॉक्टर सांगतात, " सुटलेलं पोटं कमी करण्यासाठी आतड्यांच्या खालची आणि पोटाच्या चामडीच्या खालची चरबी कमी होणं आवश्यक आहे. यासाठी चरबी मोजली पाहिजे आणि ती तेवढ्या प्रमाणात केली पाहिजे." ओबेसिटी तज्ज्ञ डॉ. नितीन पाटणकर यांनी टॉक टाइम मध्ये वजन आणि फिटनेस या विषयावर केलेलं मार्गदर्शन व्हिडिओवर ऐकता येईल.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 31, 2008 10:14 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 31, 2008 10:14 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close