S M L

नवं वर्ष नवी सुरुवात... (भाग : 2 )

नवीन वर्षं सुरू झाल्यावर आपण अनेक संकल्प करतो. नव्या वर्षाचे अनेकांचे संकल्प अनेक वेळा मोडले जातात. या मनाच्या खेळावर बोलण्यासाठी टॉक टाइम 'मध्ये मानसोपचार तज्ज्ञ अनुराधा सोवनी आल्या होत्या. त्या मुंबई विद्यापीठात प्राध्यापिका आहेत. या कार्यक्रमात त्यांनी नवीन संकल्प कसे ठरवायचे, ते पूर्ण कसे करायचे यावर मार्गदर्शन केलं. अनेकदा संकल्प केले जातात आणि ते अनेकदा मोडलेही जातात. मग आपण संकल्प करतो तरी का, यावर अनुराधा सोवनी सांगतात, " ज्या गोष्टींची आपल्या मनात शंका असते. त्या गोष्टींच्या खात्रींसाठी संकल्प केले जातात. ज्या गोष्टी सहज जमतात, त्या पूर्ण करण्यासाठी अजिबात संकल्प केले जात नाहीत. आणि न जमणा-या गोष्टींचे संकल्प हमखास मोडतात. कारण ते कधी पूर्ण होणार नाहीत, याची आपल्याला खात्री असते." 1 जानेवारी या दिवसाला वलय प्राप्त झालं आहे. त्याविषयी मानसोपचार तज्ज्ञ अनुराधा सोवनी बोलल्या. त्या सांगतात, " नव्या वर्षाला मी असं करणार, मी तसं करणार, असं करत एकापेक्षा जास्त मनसुबे रचले जातात. त्यातले काहीच पूर्ण होतात. तर काही नाही. जे पूर्ण होत नाही त्यांचं खापर इतर संकल्पांवर फोडलं जातं. त्यामुळे कधी कधी इतर संकल्पही अर्धवट सोडले जातात. आता परत पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी करू असं म्हणत संकल्प पुढच्या वर्षीच्या जानेवारी महिन्याला केले जातात. त्यामुळेच प्रत्येक नव्या वर्षाची पहिल्या तारखेला वलय प्राप्त झालं आहे. " संकल्पात डायरी लिखाणालाही अनन्य साधारण महत्त्व आहे. " डायरी लिहिल्यानं आपल्याला गत काळात डोकावता येतं. या डायरी लिहिण्याचा फायदा हा संकल्पांसांठी सहज होतो. आपण कोणकोणते नवे संकल्प केलेत, कोण कोणते संकल्प सोडलेत त्याची पडताळणी होते. संकल्प का फेल गेले याची फेरतपासणी करता येते, त्याचा फायदा पुढचे संकल्प रचताना होतो, " अशी माहितीही मानसोपचार तज्ज्ञ अनुराधा सोवनी यांनी दिली. कोणतेही संकल्प हे अपराधीपणाच्या भावनेनं करायचे नाही, असा सल्ला अनुराधा सोवनी यांनी दिला. त्या सांगतात, " संकल्प अपराधीपणाच्या भावनेने केल्यावर त्यातल्या अपराधीपणाच्या भावनेमुळे पूर्ण होत नाहीत. तेच संकल्प जर स्वत:ला आनंद मिळण्याच्या हेतूनं केलेत तर ते पूर्ण होतील होतील. संकल्प करताना कधी स्वत:ला शिक्षा करू नका. स्वत:प्रेम करून संकल्प करा."बरेचदा संंकल्प पूर्ण न झाल्यानं स्वत:ला शिक्षा केली जातो. पण ते चूक आहे. " संकल्प पूर्ण न झाल्याची शिक्षा शरीराला दिल्याने त्याचा परिणाम संकल्पांवर होतो. संकल्प पूर्ण न झाल्याची शिक्षा शरीराला द्यायची नाही, " असं अनुराधा सोवनीचं मत आहे. व्यसनं सोडायची असतील तर त्यासाठी कठोर संकल्प केले पाहिजेत, असाही सल्ला अनुराधा सोवनींनी दिला. काही व्यसनं सोडताना त्याचा त्रास शरीराला निश्चितच होतो. यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असं अनुराधा सोवनी म्हणाल्या. कोणताही संकल्प करताना तो आपल्याला झेपेल की नाही यांचं भान राखूनच ते केले पाहिजेत. संकल्प करताना स्वत:साठीही वेळ राखून ठेवायला पाहिजे. अशा संकल्पांचा आनंद वेगळा असल्याचं अनुराधा सोवनी यांनी सांगितलं. नवं वर्ष नवी सुरुवात... या विषयावर मानसोपचार तज्ज्ञ अनुराधा सोवनी यांनी केलेलं मार्गदर्शन पुढील व्हिडिओवर पाहता येईल.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 1, 2009 09:09 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 1, 2009 09:09 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close