S M L

आढावा स्पोर्टस 2008 (भाग 3)

आढावा स्पोर्टस 2008 (भाग 3) बुद्धीबळात भारत नं.1 भारतीय बुध्दीबळासाठी 2008 हे वर्ष आनंदमयी होतं असंच म्हणावं लागेल. यावर्षी बुध्दीबळातील 64 घरांचा राजा म्हणून ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंदनं आपलं स्थान पुन्हा एकदा पक्कं केल्. सलग दुस-यांदा जगज्जेता होण्याचा मान त्याला मिळाला. तर नवोदित बुध्दीबळपटूंनीही अविस्मरणीय कामगिरी करत भारताला बुध्दीबळ जगतात मानाचं स्थान मिळवून दिलं. रशियन खेळाडूंची मक्तेदारी असलेल्या बुध्दीबळाच्या पटावर भारतीय बुध्दीबळपटूंनी यावर्षी वजीराची भूमिका बजावली. आणि या पटाचा राजा ठरला तो साहजिकच ग्रँडमास्टर विशनाथन आनंद. वर्ल्ड चॅम्पियनशिपमधली व्लादिमीर क्रामनिक विरुद्धची लढत जिंकत आनंदनं तिस-यांदा वर्ल्ड चॅम्पियन होण्याचा मान मिळवला.या विजयानं आनंदनं आपल्या शिरपेचात आणखी एक तुरा रोवला.बुध्दीबळातील नॉकआऊट, पारंपरिक आणि मॅच प्ले अशा तिनंही वेगवेगळ्या प्रकारात वर्चस्व गाजवणारा तो एकमेव बुध्दीबळपटू बनला.चौसष्ट घरांचा राजाया वर्षात आनंदनं वर्ल्ड चॅम्पियनशिपबरोबरच जगभरातील विविध स्पर्धांवर आपल्या बुध्दीची मोहर उमटवली. स्पेनमधली मोरेलिना - लिनारेस ही मानाची स्पर्धा आनंदने सलग दुस-यांदा तर चेस क्लासिक मेन्ज 2008 ही स्पर्धा सलग नवव्यांदा जिंकली. त्याचबरोबर ब्लाइंडफोल्ड अ‍ॅन्ड रॅपीड चेस टुर्नामेंटवरही आपलं वर्चस्व पुन्हा एकदा सिध्द केलं. आनंदमयी 'वर्ष 2008'परदेशात तिरंगा फडकवणा-या आनंदचं मायदेशात जल्लोषात स्वागत झालं. देशभरात दिवाळी साजरी केली गेली.भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन महेंद्रसिंग धोणीने एका खास कार्यक्रमात आनंदला 5 लाख रुपयांची हि-याची अंगठी भेट दिली.ज्युनियर्सचीही गरुड झेप आनंदपाठोपाठ भारतीय ज्युनियर बुध्दीबळपटूंनीही 2008 हे वर्ष गाजवलं.यावर्षी अभिजीत गुप्ताने मुलांची तर द्रोणालिका हरीकाने मुलींची वर्ल्ड ज्युनियर चॅम्पियनशिप जिंकली. दोघांच्या या विजयानं दोन्ही गटात चॅम्पियनशिप जिंकणारा भारत जगातला पहिला देश ठरला. परिमार्जन नेगीला मात्र या स्पर्धेत सिल्व्हर मेडलवरच समाधान मानावं लागलं. वर्ल्ड युथ चॅम्पियनशिपमधेही भारतानं 4 गोल्ड, 2 सिल्व्हर आणि 2 ब्राँझ मेडल्सची कमाई करत स्पर्धेवर वर्चस्व गाजवलं. वर्ल्ड ब्लाइंड ऑलिम्पियाडमधेही भारताला श्रीकृष्ण उडूपाने गोल्ड मेडल मिळवून दिलं. महाराष्ट्राचा दबदबामहाराष्ट्रातील बुध्दीबळपटूंनीही यावर्षी चमकदार कामगिरी केली. जळगांवचा प्रतीक पाटील आंतरशालेय बुध्दीबळ स्पर्धेतील जगज्जेता झाला. ही स्पर्धा जिंकणारा तो भारतातील पहिलाच खेळाडू आहे. तर याच स्पर्धेत सोनिया देशमुखनं वैयक्तिक ब्राँझ तर सांघिक गटात गोल्ड मेडल मिळवलंय. इराणमधील तेहरान इथं झालेल्या आशियाई बुद्धीबळ स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करणा-या औरंगाबादच्या तेजस्विनी सागरनं 8 वर्षाखालील गटात उपविजेतेपद मिळवलं.मुंबईच्या आदित्य उदेशीने मंगलोरला झालेल्या नॅशनल सब-ज्युनिअर बुद्धीबळ स्पर्धेचं विजेतेपद पटकावलंय. तब्बल 32 वर्षांनंतर मुंबईच्या बुद्धिबळपटूनं ही स्पर्धा जिंकली.ग्रँडमास्टर विश्वनाथ आनंदनं हे वर्ष गाजवलंच. पण एकूणच या वर्षात भारतीयांनी आपल्या बुध्दीची छाप अख्ख्या जगावर उमटवली असंच म्हणता येईल.चेसबरोबरच बॅडमिंटन जगतावरही भारतीय खेळाडूंचं वर्चस्व राहिलं. भारतीय बॅडमिंटनसाठी 2008 हे वर्षं म्हणजे सबकुछ सायना असंच होतं. जागतिक बॅडमिंटन क्रमवारीत टॉप टेनमध्ये धडक देणा-या सायनानं यंदा अनेक विक्रमांची मोडतोड केली.सायनाची भरारी -बीजिंग ऑलिम्पिकमधील हे क्षण केवळ सायनासाठीच नव्हे तर अवघ्या भारतासाठी अभिमानाचे होते.ऑलिम्पिकच्या क्वॉर्टरफायनलमध्ये पोहचणारी सायना पहिली भारतीय बॅडमिंटनपटू ठरली होती.दोनच महिन्यांनंतर तैपेई इथं झालेली चायनीज ओपन स्पर्धा तिने जिंकली.अर्थात ही तर नुसती सुरूवात होती.कारण त्यापाठोपाठ वर्ल्ड ज्युनिअर बॅडमिंटन आणि युथ कॉमनवेल्थचं विजेतेपद पटकावत तीनं जागतिक क्रमवारीत दहाव्या क्रमांकावर झेप घेतली.वर्षअखेरीस मेलेशियातील वर्ल्ड सुपर सीरिजच्या उपांत्यफेरीत तीनं धडक दिली.आजवर भारताच्या कोणत्याही खेळाडूला अशी कामगिरी करता आलेली नाही.तिच्या याच कामगिरीची दखल जागतिक बॅडमिंटन फेडरेशननेही घेतली.आणि सायना या वर्षीची सर्वोत्कृष्ट उदयोन्मुख बॅडमिंटनपटू ठरली.बॅडमिंटनमधली सुपरस्टार ठरूनही सायनाच्या वाटेला सरकारी उपेक्षा आलीच.मलेशियातील बॅडमिंटन स्पर्धेसाठी पासपोर्ट मिळवण्याकरिता तीला झगडावं लागले.बॅडमिंटनपटूंची सुरेख कामगिरीहे वर्षं जसं सायनाचं होतं, तसंच ते चेतन आनंदचंही होतं.स्पॅनिश ओपन ग्रांप्रि स्पर्धेत बाजी मारुन त्याने आपला फॉर्म सिद्ध केलाय.या स्पर्धेत सेमी फायनलमध्ये त्याने टॉप सिडेड इंडोनेशियाच्या आंद्रे कुर्नियवानला हरवलं.एकूणच युरोपियन सर्किटमध्ये त्याने जोशपूर्ण कामगिरी केली.त्यानंतर नेपाळ ओपन स्पर्धा त्याने जिंकली आणि बंगलोरला झालेल्या इंडियन ओपन स्पर्धेतही तो उपविजेता ठरला.यावर्षी जागतिक क्रमवारीत पहिल्या पंधरा खेळाडूंत स्थान मिळवण्याची किमया त्याने केली आहे. भारताचा थॉमस कप टीमचा कॅप्टन अनुप श्रीधर, व्ही दिजू आणि महिलांमध्ये ज्वाला गुट्टी अदिती मुटाटकर यांची कामगिरीही लक्षवेधी ठरली.आतापर्यंत बॅडमिंटनमध्ये डबल्स हा भारतासाठी कच्चा दुवा होता.पण 2008मध्ये भारतीय बॅडमिंटनपटूंनी डबल्समध्ये तीन स्पर्धा जिंकल्या.व्ही दिजू आणि ज्वाला गुट्टाची जोडी मिक्स्ड डबल्समध्ये सध्याची धोकादायक जोडी मानण्यात येतेय.याशिवाय ठाण्याच्या अक्षय देवलकर आणि जीष्णू सन्याल या जोडीनेही आशादायक कामगिरी केली.बॅडमिंटनमधला 'आनंद'मुंबईच्या आनंद पवारनं यंदा पोर्तुगीज ओपन बॅडमिंटन स्पर्धेा जिंकून इतिहास घडवला.पोर्तुगिज ओपन स्पर्धा जिंकणारा तो पहिला भारतीय बॅडमिंटनपटू ठरला.याचवर्षी त्यानं ऑस्ट्रियन ओपनचंही विजेतेपद पटकावलं.याआधी 24 वर्षापुर्वी भारताच्या सय्यद मोदीयांनी ही स्पर्धा जिंकली.सायना नेहवालच्या विजयी कामगिरीनं 2008 वर्षाची सुरवात झाली आणि सरत्या वर्षाचा निरोपही सायनाच्याच यशानं झाला. पण शटल आणि रॅकेटच्या या स्पर्धेत सायनाबरोबरच इतर बॅडमिंटनपटूंनीही बाजी मारली.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 31, 2008 07:52 PM IST

आढावा स्पोर्टस 2008 (भाग 3)

बुद्धीबळात भारत नं.1 भारतीय बुध्दीबळासाठी 2008 हे वर्ष आनंदमयी होतं असंच म्हणावं लागेल. यावर्षी बुध्दीबळातील 64 घरांचा राजा म्हणून ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंदनं आपलं स्थान पुन्हा एकदा पक्कं केल्. सलग दुस-यांदा जगज्जेता होण्याचा मान त्याला मिळाला. तर नवोदित बुध्दीबळपटूंनीही अविस्मरणीय कामगिरी करत भारताला बुध्दीबळ जगतात मानाचं स्थान मिळवून दिलं. रशियन खेळाडूंची मक्तेदारी असलेल्या बुध्दीबळाच्या पटावर भारतीय बुध्दीबळपटूंनी यावर्षी वजीराची भूमिका बजावली. आणि या पटाचा राजा ठरला तो साहजिकच ग्रँडमास्टर विशनाथन आनंद. वर्ल्ड चॅम्पियनशिपमधली व्लादिमीर क्रामनिक विरुद्धची लढत जिंकत आनंदनं तिस-यांदा वर्ल्ड चॅम्पियन होण्याचा मान मिळवला.या विजयानं आनंदनं आपल्या शिरपेचात आणखी एक तुरा रोवला.बुध्दीबळातील नॉकआऊट, पारंपरिक आणि मॅच प्ले अशा तिनंही वेगवेगळ्या प्रकारात वर्चस्व गाजवणारा तो एकमेव बुध्दीबळपटू बनला.चौसष्ट घरांचा राजाया वर्षात आनंदनं वर्ल्ड चॅम्पियनशिपबरोबरच जगभरातील विविध स्पर्धांवर आपल्या बुध्दीची मोहर उमटवली. स्पेनमधली मोरेलिना - लिनारेस ही मानाची स्पर्धा आनंदने सलग दुस-यांदा तर चेस क्लासिक मेन्ज 2008 ही स्पर्धा सलग नवव्यांदा जिंकली. त्याचबरोबर ब्लाइंडफोल्ड अ‍ॅन्ड रॅपीड चेस टुर्नामेंटवरही आपलं वर्चस्व पुन्हा एकदा सिध्द केलं. आनंदमयी 'वर्ष 2008'परदेशात तिरंगा फडकवणा-या आनंदचं मायदेशात जल्लोषात स्वागत झालं. देशभरात दिवाळी साजरी केली गेली.भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन महेंद्रसिंग धोणीने एका खास कार्यक्रमात आनंदला 5 लाख रुपयांची हि-याची अंगठी भेट दिली.ज्युनियर्सचीही गरुड झेप आनंदपाठोपाठ भारतीय ज्युनियर बुध्दीबळपटूंनीही 2008 हे वर्ष गाजवलं.यावर्षी अभिजीत गुप्ताने मुलांची तर द्रोणालिका हरीकाने मुलींची वर्ल्ड ज्युनियर चॅम्पियनशिप जिंकली. दोघांच्या या विजयानं दोन्ही गटात चॅम्पियनशिप जिंकणारा भारत जगातला पहिला देश ठरला. परिमार्जन नेगीला मात्र या स्पर्धेत सिल्व्हर मेडलवरच समाधान मानावं लागलं. वर्ल्ड युथ चॅम्पियनशिपमधेही भारतानं 4 गोल्ड, 2 सिल्व्हर आणि 2 ब्राँझ मेडल्सची कमाई करत स्पर्धेवर वर्चस्व गाजवलं. वर्ल्ड ब्लाइंड ऑलिम्पियाडमधेही भारताला श्रीकृष्ण उडूपाने गोल्ड मेडल मिळवून दिलं. महाराष्ट्राचा दबदबामहाराष्ट्रातील बुध्दीबळपटूंनीही यावर्षी चमकदार कामगिरी केली. जळगांवचा प्रतीक पाटील आंतरशालेय बुध्दीबळ स्पर्धेतील जगज्जेता झाला. ही स्पर्धा जिंकणारा तो भारतातील पहिलाच खेळाडू आहे. तर याच स्पर्धेत सोनिया देशमुखनं वैयक्तिक ब्राँझ तर सांघिक गटात गोल्ड मेडल मिळवलंय. इराणमधील तेहरान इथं झालेल्या आशियाई बुद्धीबळ स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करणा-या औरंगाबादच्या तेजस्विनी सागरनं 8 वर्षाखालील गटात उपविजेतेपद मिळवलं.मुंबईच्या आदित्य उदेशीने मंगलोरला झालेल्या नॅशनल सब-ज्युनिअर बुद्धीबळ स्पर्धेचं विजेतेपद पटकावलंय. तब्बल 32 वर्षांनंतर मुंबईच्या बुद्धिबळपटूनं ही स्पर्धा जिंकली.ग्रँडमास्टर विश्वनाथ आनंदनं हे वर्ष गाजवलंच. पण एकूणच या वर्षात भारतीयांनी आपल्या बुध्दीची छाप अख्ख्या जगावर उमटवली असंच म्हणता येईल.चेसबरोबरच बॅडमिंटन जगतावरही भारतीय खेळाडूंचं वर्चस्व राहिलं. भारतीय बॅडमिंटनसाठी 2008 हे वर्षं म्हणजे सबकुछ सायना असंच होतं. जागतिक बॅडमिंटन क्रमवारीत टॉप टेनमध्ये धडक देणा-या सायनानं यंदा अनेक विक्रमांची मोडतोड केली.सायनाची भरारी -बीजिंग ऑलिम्पिकमधील हे क्षण केवळ सायनासाठीच नव्हे तर अवघ्या भारतासाठी अभिमानाचे होते.ऑलिम्पिकच्या क्वॉर्टरफायनलमध्ये पोहचणारी सायना पहिली भारतीय बॅडमिंटनपटू ठरली होती.दोनच महिन्यांनंतर तैपेई इथं झालेली चायनीज ओपन स्पर्धा तिने जिंकली.अर्थात ही तर नुसती सुरूवात होती.कारण त्यापाठोपाठ वर्ल्ड ज्युनिअर बॅडमिंटन आणि युथ कॉमनवेल्थचं विजेतेपद पटकावत तीनं जागतिक क्रमवारीत दहाव्या क्रमांकावर झेप घेतली.वर्षअखेरीस मेलेशियातील वर्ल्ड सुपर सीरिजच्या उपांत्यफेरीत तीनं धडक दिली.आजवर भारताच्या कोणत्याही खेळाडूला अशी कामगिरी करता आलेली नाही.तिच्या याच कामगिरीची दखल जागतिक बॅडमिंटन फेडरेशननेही घेतली.आणि सायना या वर्षीची सर्वोत्कृष्ट उदयोन्मुख बॅडमिंटनपटू ठरली.बॅडमिंटनमधली सुपरस्टार ठरूनही सायनाच्या वाटेला सरकारी उपेक्षा आलीच.मलेशियातील बॅडमिंटन स्पर्धेसाठी पासपोर्ट मिळवण्याकरिता तीला झगडावं लागले.बॅडमिंटनपटूंची सुरेख कामगिरीहे वर्षं जसं सायनाचं होतं, तसंच ते चेतन आनंदचंही होतं.स्पॅनिश ओपन ग्रांप्रि स्पर्धेत बाजी मारुन त्याने आपला फॉर्म सिद्ध केलाय.या स्पर्धेत सेमी फायनलमध्ये त्याने टॉप सिडेड इंडोनेशियाच्या आंद्रे कुर्नियवानला हरवलं.एकूणच युरोपियन सर्किटमध्ये त्याने जोशपूर्ण कामगिरी केली.त्यानंतर नेपाळ ओपन स्पर्धा त्याने जिंकली आणि बंगलोरला झालेल्या इंडियन ओपन स्पर्धेतही तो उपविजेता ठरला.यावर्षी जागतिक क्रमवारीत पहिल्या पंधरा खेळाडूंत स्थान मिळवण्याची किमया त्याने केली आहे. भारताचा थॉमस कप टीमचा कॅप्टन अनुप श्रीधर, व्ही दिजू आणि महिलांमध्ये ज्वाला गुट्टी अदिती मुटाटकर यांची कामगिरीही लक्षवेधी ठरली.आतापर्यंत बॅडमिंटनमध्ये डबल्स हा भारतासाठी कच्चा दुवा होता.पण 2008मध्ये भारतीय बॅडमिंटनपटूंनी डबल्समध्ये तीन स्पर्धा जिंकल्या.व्ही दिजू आणि ज्वाला गुट्टाची जोडी मिक्स्ड डबल्समध्ये सध्याची धोकादायक जोडी मानण्यात येतेय.याशिवाय ठाण्याच्या अक्षय देवलकर आणि जीष्णू सन्याल या जोडीनेही आशादायक कामगिरी केली.बॅडमिंटनमधला 'आनंद'मुंबईच्या आनंद पवारनं यंदा पोर्तुगीज ओपन बॅडमिंटन स्पर्धेा जिंकून इतिहास घडवला.पोर्तुगिज ओपन स्पर्धा जिंकणारा तो पहिला भारतीय बॅडमिंटनपटू ठरला.याचवर्षी त्यानं ऑस्ट्रियन ओपनचंही विजेतेपद पटकावलं.याआधी 24 वर्षापुर्वी भारताच्या सय्यद मोदीयांनी ही स्पर्धा जिंकली.सायना नेहवालच्या विजयी कामगिरीनं 2008 वर्षाची सुरवात झाली आणि सरत्या वर्षाचा निरोपही सायनाच्याच यशानं झाला. पण शटल आणि रॅकेटच्या या स्पर्धेत सायनाबरोबरच इतर बॅडमिंटनपटूंनीही बाजी मारली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 31, 2008 07:52 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close