S M L

ग्रेट भेटमध्ये गौतम राजाध्यक्ष

नव्या वर्षातली ही पहिलीच ग्रेट भेट. या भागात आयबीएन लोकमतचे संपादक निखिल वागळे यांनी प्रसिद्ध फोटोग्राफर गौतम राजाध्यक्ष यांची मुलाखत घेतली. गौतम राजाध्यक्ष यांना जग ओळखतं ते ग्लॅमरस फोटोग्राफर. पण त्यांची एवढीच ओळख पुरेशी नाही. ते लेखक आहेत. ते पटकथालेखक आहेत. ते उत्कृष्ट जाहिरात बनवतात. त्यांना संगीत आणि चित्रकलेत रस आहे. अशा बहुरंगी व्यक्तिमत्वाचा जीवनपट या मुलाखतीत उलगडला गेला.खरं तर गौतम राजाध्यक्ष यांना फोटोग्राफर व्हायचंच नव्हतं. "पूर्वी मनोरंजनाची एवढी साधनं नव्हती. मे महिन्याच्या सुट्टीत करायचं काय ? किती पुस्तकं वाचणार ? किती वाचणार ? मग माझ्या काकांनी मला फोटोग्राफीची गोडी लावली. पण मला व्हायचं होतं लेखक. मी जेव्हा लिंटासमध्ये काम करायचो, तेव्हा सुट्टीच्या दिवशी मी जाऊन लोकांच्या मुलाखती घ्यायचो. तेव्हा फोटोग्राफर्स मिळत नव्हते. मग मला संपादक सांगायचे तू स्वत:च फोटो घे. काहीच नसण्यापेक्षा किंवा स्टॉकमधले फोटो वापरण्यापेक्षा आम्ही ते फोटो वापरू. पण कॉपीतच काय, माझे फोटो कव्हरवरती छापले जायला लागले. मग मला कळलं की माझे लेखन काही लोकांना आवडत नाही, पण फोटो मात्र आवडतात. मग 1985 मध्ये जेव्हा मी चंदेरी सुरू केलं, तेव्हा त्यात माझे फोटोही होते आणि लेखही"आपल्या बहुरंगी व्यक्तिमत्वाचं श्रेय गौतम राजाध्यक्ष डॉ. जोगळेकरांना देतात. ते म्हणाले "डॉ. जोगळेकर म्हणजे माझ्या आत्याचे यजमान. ते माझ्या आजोबांच्या वयाचे. त्यांनी मला एखाद्या नातवासारखं वाढवलं. संगीत, चित्रकला, नृत्य, अ‍ॅस्ट्रॉलॉजी अशा वेगवेगळ्या छंदात त्यांनी मला प्रोत्साहन दिलं. पुस्तकं दिली. कॅसेट्स दिल्या." डॉ. जोगळेकर हे त्या काळातील मान्यवर विद्वान. त्यांच्या विषयी गोतम राजाध्यक्ष म्हणाले "खरं तर डॉ. जागळेकर पुण्याच्या कॉन्झरवेटीव्ह फॅमिलीतून आले. एफआरसीएस करण्यासाठी 1916 मध्ये त्यांनी एफआरसीएस केलं. पुढे तिथे खूप चांगल्या कॉलेजेसमध्ये शिकवलं. त्यांचा हा बदलता दृष्टीकोन त्यांनी मला दिला. माझ्या प्रत्येक छंदाला त्यांनी पुस्तकं दिली, मदत केली. तेव्हा रेकॉर्डस मिळत नसत. मग कोणी परदेशी गेले की ते माझ्यासाठी रेकॉर्ड्स मागवत असत. त्यांनी मला संगीत नाटकं दाखवलं. साहित्य मंदीर तेव्हा ओपन एयर थिएटर होतं. तिथे मी प्रसिद्ध संगीत नाटकं पाहिली.माझी आत्या आर्टिस्ट होती. तिनेही मला बर्‍याच गोष्टी वाचून दाखवल्या. माझे चुलत भाऊ वसंत राजाध्यक्ष यांचाही माझ्यावर खूप प्रभाव आहे. मला बीएससीमध्ये जेव्हा चांगले मार्क्स मिळाले, तेव्हा विद्यापीठीनं मला सांगितलं की एका वर्षात आम्ही तुला पीएचडीसाठी घेतो. पण माझ्या भावानं मला सांगितलं की तू एवढा क्रिएटिव आहेस, तर तू तुझं टॅलेन्ट वाया घालवू नकोस. त्यानं मला अ‍ॅड वर्ल्डकडे ढकललं. आणि तेव्हाचे जे दिग्गज होते अ‍ॅलेक पदमसी, जोसेफ डिकुन्हा त्यांच्या हाताखाली शिकून मी तयार झालो.""लिन्टासमध्ये माझ्यातला कलाकार घडला. आम्हाल अ‍ॅलेक पदमसी नेहमी सांगायचे की तुम्ह जेव्हा ऍड बघता तेव्हा हेडलाईन झाका आणि बघा पिक्चर तुम्हाला काय सांगतय. तसंच पिक्चर झाका आणि बघा तुम्हाला हेडलाईन काय सांगतेय. जर ते इंडिपेन्डटली दोन्ही गोष्टी तुमच्यापर्यंत मेसेज पोहचवू शकत असाल तर ती अ‍ॅड पूर्ण आहे. जर पिक्चरमधून मेसेज पोहचवायला तुम्हाला कॅप्शनची गरज लागली तर तुम्ही कुठेतरी चुकताय. कमी शब्दात अ‍ॅडच्या माध्यमातून मेसज कसा पोहचवायचा, हे मी शिकलो. त्याचा पुढे मला खूप फायदा झाला. पुढे असं झालं की मी फिल्म फेअर, इलेस्ट्रिटेड विकली अशा बर्‍याच मॅगझीन्ससाठी लिहीत होतो. पण फक्त शिनवार रविवार. पुढे लिन्टासमध्ये जेव्हा माझ्या प्रमोशनची वेळ आली. म्हणजे मी क्रिएटिव डायरेक्टर बनण्याच्या मार्गावर होतो, तेव्हा मी पूर्ण वेळ फोटोग्राफीकडे वळण्याचा निर्णय घेतला. पण एका धावत्या गाडीतून दुसर्‍या धावत्या गाडीत उडी मारली. म्हणून मला धक्का बसला नाही. मग अ‍ॅड, जर्नलिस्टिक, आर्टिस्टिक अशा वेगवेगळ्या फोटोग्राफीकडे वळलो."गौतम राजाध्यक्ष हे आज एवढे यशस्वी फोटोग्राफर आहेत, पण फोटोग्राफीचं अधिकृत ट्रेनिंग त्यांनी घेतलं नाहीये. त्याविषयी ते महणाले "तो काळ वेगळा होता. तेव्हा कामातून शिकायला भरपूर वेळ होता. एकदा चुकलात, तर परत संधी मिळायची. आता तुमच्या पहिल्या असाइनमेन्टमध्ये चुका झाल्या, तर परत तुम्हाला कोणी बोलवत नाही. म्हणून फोटोग्राफीच्या किमान व्याकरणाचं ट्रेनिंग घ्यायला हवं. तेव्हाही घाई होती, पण लोकांना पेशन्स भरपूर होता. आर्टिस्टवर विश्वास होता. आताही असं शिकता येईल. टेक्निक कितीही चांगलं असलं, तरी जेवढा कॅमेरा तुम्ही जास्त वापराल, तेवढं जास्त शिकता येई. पण फोटोग्राफी आम्ही पॅशनमुळे शिकलो. आम्ही फक्त फोटो काढायचो. आम्ही हा कधी विचार केला नाही की या फोटोचा उपयोग होणार आहे का ? त्यावेळेस फोटोग्राफी महाग होती. आता सगळं डिजिटलाईज झालं आहे. फोटोग्राफी स्वस्त झाली आहे. "पैशाच्या दृष्टीने फोटोग्राफी स्वस्त झालीय, पण कलेच्या दृष्टीनेही फोटोग्राफी स्वस्त झाली आहे का ? या प्रश्नाचं उत्तर देताना गौतम राजाध्यक्ष म्हणाले "1839 मध्ये डॅरनने कॅमेरा आणि फिल्म आणली. तोपर्यंत पेन्टिंग येणार्‍यांनाच आर्टिस्ट होण्याची संधी होती. पण कॅमेरा आल्यापासून कॅमेरातून चित्र टिपून लोक आर्टिस्ट झाले. आताही पार्टी, लग्न, मुंज या गोष्टींचे फोटो कोणीही काढू शकतो. हा खूप मोठा फायदा आहे. आणि आता या गोष्टीची दुसरी बाजू बघितली तर आता फोटोग्राफरकडून एवढीच अपेक्षा असते की तू आम्हाला एक चांगलं पिक्चर दे. पुढे ऑपरेटर्स कॉम्पवर बसतात आणि फोटोवर संस्कार सुरू होतात. रंग बदल, लाईट्स, कलर वाटेल ते बदलतात. तंत्रज्ञानाच्या अतिवापरामुळे फोटोग्राफरचं महत्त्व कमी झालंय आणि त्यामुळेच फोटोग्राफर्सही पहिल्याइतकं फोटोंमध्ये मन घालत नाहीत. "गौतम राजाध्यक्षांबद्दल असं म्हटलं जातं की त्यांनी फोटोत भावना आणल्या. हात आणि केस यांचा इतका सुंदर वापर गौतम राजाध्यक्षांइतका चांगला कोणीच केला नाही. त्याविषयी बोलताना ते म्हणाले "हात आणि केस हे मला अतिशय आवडतात. शोभा राजाध्यक्ष मला कायम म्हणायच्या की तुझ्या सगळ्या फोटोत हात आपले केसात असतात. त्यांच्या डोक्यात काय उवा आहेत का ? मी फक्त एवढच म्हणायचो की पण ते बरं दिसतय की नाही...! मला असं वाटतं की माझी फोटोग्राफी हे माझ्या लेखनाचं एक्स्टेन्शन आहे. जेव्हा तुम्ही मुलाखत घेता, तेव्हा त्या मुलाखतीच्या सुरांना जुळणारे फोटो घ्यावेत. ग्लॅमर फोटोग्राफी म्हणजे फोटतनं फक्त सौंदर्य दाखवायचं असेल तर कलर्स, बॅकग्राउंड, कपड्यांचं टेक्स्चर एवढंच फक्त बघायचं. पण जेव्हा तुम्ही एखाद्या लेखासाठी फोटो घेता, तेव्हा त्या व्यक्तीचे विचार, स्वभाव, मन दिसलं पाहिजे. दोन फोटोंमध्ये जरी हे मिळालं तर तुम्ही म्हणू शकता मी चांगला फोटो काढलाय. आयुष्यात मला असं एक दोन व्यक्तींना फोटोत तसं काढता आलं नाही. उदाहरणार्थ वैजयंतीमाला. एक तर तेव्हा मी नवीन होतो आणि ती खूप इम्पेशन्ट होती." फोटोजमधल्या स्वाभाविकतेला गौतमजींनी कायमच प्राधान्य दिलंय. त्याविषयी बोलताना ते म्हणाले "मी नेहमी मॉडेलशी संवाद साधायचा प्रयत्न करतो. तुम्ही मॉडलला ळखत असलं पाहिजे, जर आवडत नसेल, तर फोटोग्राफी करू नका. तुम्ही मॉडेलला स्टुडिओमध्ये बोलावता, लाईट्स लावता आणि त्याला सांगता नॅचरल हस. हे कसं शक्य आहे ? मग त्याला खुलवणं हे फोटोग्राफरचं कौशल्य आहे. एखाद्या गायकाला खुलवणं सगळ्यात सोपं आहे. त्याला एखादा राग गायला सांगायचा आणि फोटो काढायचे. अर्थात हे वाटतं तेवढं सोपं नाही. आजही अमिताभला बोलतं करणं सोपं नाही. मग मी त्याला सांगितलं की अरे एखादा फोटो नाही चांगला आला, तर आपण नको वापरुयात तो. मग मी त्याला विचारलं व्हू शूट्स यू बेस्ट ? मग तो म्हणाला की ऑल द व्हिलन्स इन फिल्म इंडस्ट्री. या जोकवर तो स्वत:च हसला आणि मी फोटो घेतले. चांगल्या अ‍ॅक्टर्सला फोटो काढून घेणं नेहमीच अवघड असतं. मग मी त्यांना कॅरेक्टर देतो. म्हणजे अमिताभला सांग की तू मोहब्बतेमधला प्रोफेसर आहे. आमीरला सांगायचं की तो रंगीलामधला राजा आहे. मग ते चांगला रिस्पॉन्स देतात. आमीर मला नेहमी विचारतो की माझं मोटिवेशन काय ? मी सांगतो अरे दर वेळेस मोटिवेशन लागत नाही. मग आम्ही गप्पा मारायला सुरुवात करतो आणि मग नॅचरल फोटो येत गेले"गौतम राजाध्यक्षांना फोटोग्राफीकडे ढकलण्यात शबाना आझमींचा मोठा वाटा आहे. त्याविषयी बोलताना ते म्हणाले "शबाना आणि मी एकाच कॉलेजमधले. आमची मैत्री होतीच. मग एकदा मी तिला विचारलं की मी तुझे फोटो काढू का ? ती हो म्हणाली. मग मी काढलेले फोटो तिला फार आवडले. मग तिनं मला यात ढकललं. मग पृथ्वीच्या आसपासचे सगळे अनिल कपूर, मजहर खान अशा सगळ्यांना माझ्याकडे पाठवून दिलं. तिच्यावर जे लेख असायचे स्टारडस्टमध्ये वगैरे, त्यावेळेस ती सांगायची की फोटो गौतमच काढणार. मी म्हणायचो की माझ्याकडे एवढा वेळ नाही आणि तेवढी माझी तयारीही. ती म्हणायची आपण शनिवार रविवार वापरू. चुकलं तर पुढचा शनिवार रविवार. पण तू हे सिरीयस्ली घ्यायला हवंस."अमिताभ दिलीपकुमारपासून काजोलपर्यंत सगळ्याच जनरेशनची माणसं गौतम राजाध्यक्षांच्या कॅमेरासमोर खुलले. त्याविषयी बोलताना ते म्हणाले "काजोलला कोणतीच शिस्त आवडत नाही. फोटो तर अजिबातच नाही. तिला मी तर आमचं लहान भूत म्हणतो. काम आहे ना, मग ते उरकून टाकू. फक्त फिल्म प्रमोशनच्या वेळेस ती जरा शांत असते, पण ते ही लवकर करावं लागतं. नाहीतर मग ती लगेच डाउन होते. दक्षिणेतले कलाकार या बाबतीत खूप पेशंट असतात. त्यांच्यासाठी वर्क इज वर्कशिप" पण या सगळ्यांमध्ये गौतम राजाध्यक्षांची फेवरेट मॉडेल म्हणजे माधुरी. तिच्याविषयी बोलताना ते म्हणाले "एखाद्या फोटोग्राफरसाठी माधुरी म्हणजे परफेक्ट मॉडेल आहे. कामासाठी आणि स्वभावानं सगळ्यात गोड म्हणजे माधुरी. तिला फक्त सांगायचं की मला काय हवं. एकदा मी तिच्यासाठी मार्लीन मॉनरोचा विग आणला होता. मी माधुरीला सांगितलं मॉनरो म्हणजे स्वीटनेस विथ सेक्सीनेस. आणि पाच सेकंदता शी वॉज मॉनरो. ते फोटो जेव्हा मी लंडनला प्रिन्टसाठी घेऊन गेलो, तेव्हा तिथे ते मॉनरोवर टीव्ही सीरियल बनवत होते. त्यांनी 170 मुलींची ऑडिशन घेतली होती. पण ते फोटो बघून ते म्हणाले की ही मुलगी काम करेल का ? मी म्हटलं ही आमची टॉपची अ‍ॅक्ट्रेस आहे. ती टीव्ही सीरियलमध्ये काय करणार ? माधुरीला नुसती कल्पना दिली की ती तशी बदलायची. तिला नुसती साडी दिली की ती भारतीय. वेस्टर्न आउटफीट्स दिले की ती बदलली. आता तिचं लग्न झालंय. दोन मुली आहेत तिला. पण तशी मुलगी मला आजपर्यंत भेटलेली नाही."आत्ताचे कलाकार गौतम राजाध्यक्षांना पहिल्याइतके आवडत नाहीत. त्याविषयी ते म्हणाले "आजच्या अ‍ॅक्टर्सना अ‍ॅक्टर्स म्हणायची सुद्धा मला भीती वाटते. मी त्यांना परफॉर्मर्स म्हणेन. आधीचे कलाकार काहीतरी बनायला यायचे. त्यांना दिलीप कुमार किंवा अमिताभ व्हाययचं होतं. ते वाचायचे, फिल्म्स बघायचे. पण आता लोक इथे फक्त पैशांसाठी येतात. त्यांना गल्‌ॅमर पाहिजेल. पण त्यांना माहितीय की हे ग्लॅमर त्यांना खूप कमी वेळ मिळणारे. मग अ‍ॅड्स, एन्डॉर्समेन्ट... मेक मनी व्हाईल सन शाइन्स, हे त्यांचं सूत्र झालंय."मंगेशकर कुटुंबीयांशी गौतम राजाध्यक्षांचे संबंध अतिशय जिव्हाळ्याचे आहेत. त्याविषयी बोलताना ते म्हणाले "कुठे ना कुठेतरी आमचे सूर जुळलेत. मी त्यांच्यासमोर गातो. लोक तोंड सुद्धा उघडत नाहीत. मी त्यांना घाबरत नाही, त्यामुळे ते पण जास्त फ्री असतात. पुढच्या पिढीशी म्हणजे आशाताईंची मुलं, मीनाताईंची मुलं किंवा बाळासाहेबांची मलं, माझ्याबरोबर खूप फ्रेन्डली आहेत. त्यामुळे हे बंध आणखी घट्ट झाले असावेत."गौतम राजाध्यक्षांनी फिल्म इंडस्ट्रीच्या बाहेरील अनेक व्यक्तिमत्वांचे सुंदर फोटो काढलेत. धिरुभाई अंबानी, जे. आर. डी टाटा, इस्मत चुगताई, एम. एफ. हुसेन अशी अनेक माणसं त्यांना आपल्या कॅमेरात कैद केली. त्याविषयी बोलताना ते म्हणाले "त्या सगळ्यांमध्ये मला इंटरेस्ट होता. जेआरडी टाटांनी 130-1940 मध्ये जे केलं, त्यामुळे इंडस्ट्रीला नवी दिशा मिळाली. आणि त्याहीपलीकडे, माणूस म्हणूनही ते ग्रेट होते. वाईन, म्युझिक अशा वेगवेगळ्या गोष्टींवर ते बोलायचे. धिरुभाई अंबानी पण तसेच. एकदा मी फोटो घेत असताना त्यांचा नातू तिथे आला. तो म्हणाला की पप्पा आय कान्ट डू इट. यावर ते म्हणाले की हा शब्द मला परत ऐकायचा नाही. तूही हा शब्द तुझ्या डिक्शनरीतून काढून टाक. प्रसिद्ध फोटोग्राफर जहांगीर गझर मला एकदा म्हणाले होते की पोर्ट्रेचर करणं अवघड असतं. कारण ते फोटो तुमच्या सबजेक्टला आवडले पाहिजेत. प्रत्येकामध्ये एक व्हॅनिटी असते, अहंकार असतो. ते सॅटिसफाय करता आलं पाहिजे. त्यांच्यातली विद्वत्ता, गुण बाहेर काढलेच पाहिजेत, त्याच वेळी त्यांना सुंदरही केलं पाहिजे. जे. आर. डी टाटांना मी पहिल्यांदा शूट केलं, तेव्हा सॉफ्ट फोकस वापरला. तोंडावर खूप सुरकुत्या असल्यानं त्यांनी पहिल्या फोटोग्राफरचं काम रिजेक्ट केलं होतं. आणि मला जरा काळजी होतीच, कारण तेव्हा फोटोशॉप वगैरे काही नव्हतं. सॉफ्ट फोकस लेन्स वापरल्याने त्यांच्या चेहर्‍यावर तेजी आली आणि सुरकुत्या कमी झाल्या. प्रत्येक वेळेला तुम्ही शूट करता तेव्हा नवीन गोष्टी इन्व्हेंट करता. त्या माणसाचा चेहरा कसा आहे, त्याला काय सूट होईल आणि ते खुलवण्यासाठी काय करायला हवं, हे जमायला हवं "गौतम राजाध्यक्षांविषयी असं बोललं जातं की माणूस कितीही वाईट दिसत असला किंवा मनाने वाईट असला तरी तो राजाध्यक्षांच्या फोटोमध्ये चांगलेच दिसतात. त्याविषयी बोलताना गौतम राजाध्यक्ष म्हणाले की "माझा माणसातल्या चांगुलपणावर पूर्ण विश्वास आहे. मी इतका चिकित्सक माणूस आहे की तो चांगुलपणा मी शोधून काढतो. आणि त्यात वाईट काय आहे ? प्रत्येक माणसाला कधी ना कधी असं वाटतच की चांगलं दिसावं. माझं काम मी करतोय. त्यावर कोणाला टीका करायची असेल, तर करू देत."गौतमजींनी आजपर्यंत राजकारण्यांचे फोटो काढलेले नाहीत. याविषयी बोलताना ते म्हणाले "मी त्यांच्याशी काय बोलू ? म्हणजे आज ते एक बोलतात, उद्या वेगळं. आज ते एका पक्षात आहेत, उद्या दुसर्‍या पक्षात. मग त्यांच्यातलं मी काय दाखवू ? ते आत्ता बोलले ते खरं का पक्ष आणि धोरणं बदलली की बोलतील ते खरं ? राजीव गांधी, व्ही. पी. सिंग आणि चंद्रशेखर यांनी ते पंतप्रधान असताना मला फोटो काढण्यासाठी बोलावलं होतं. पण मी ते रिजेक्ट केलं कारण, ते जेमतेम अर्धा पाउण तास वेळ देणार. मग त्यांचा असा फोटो काढा वगैरे, मला जमणार नाही. मी त्या टाईपचा फोटोग्राफर नाही. आणि मला कुठे ना कुठे वाटतं की हे राजकारणी आपल्यासाठी काही करत नाहीत. वर त्यांचे फोटो काढले की लोक म्हणणार अच्छा तुम्ही या पार्टीच्या जवळचे वगैरे वगैरे... सत्तेपुढे लोक डोकं झुकवतात, पण मला त्याचा मोह नाही. मी माझ्या तत्वांशी ठाम आहे. मी राधाकृष्णनना शूट केलं असतं. नेहरूंना केलं असतं. ते विद्वान होते. लेखक, तत्वज्ञ होते. मग गोष्ट वेगळी आहे. आता तर राजकारणात डिसेन्ट माणसंही सापडत नाहीत. "गौतम राजाध्यक्षांवर कोणाचा प्रभाव आहे ? या प्रश्नाचं उत्तर देताना ते म्हणाले "भरपूर चित्रकारांचा प्रभाव आहे. लहानपणापासून मॅगझीनमध्ये फोट बघताना मी विचार करत असे. हा कसा काढला असेल... काय विचार केला असेल वगैरे वगैरे. पण माझ्या मते माझे दोन आदर्श म्हणजे ब्रेसाँ आणि रिचर्ड अ‍ॅविडॉन. ब्रेसाँ हा माझ्या मते गेल्या शतकातला सर्वोत्कृष्ट फोटोजर्नलिस्ट होता. अ‍ॅविडॉनचं काम मला खूप जवळून पहाता आलं. मी माझ्या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी लंडनला होतो, तेव्हा सकाळी माझे प्रिन्ट्स व्हायचे आणि रात्री रिचर्ड अ‍ॅविडॉनचे रोल्स पॅरासहून यायचे, ते मी बघायचो. पॅरीस त्याने किती तरी वेळा शूट केलं, पण प्रत्येक वेळेस काहीतरी नवीन सापडतं. "गौतम राजाध्यक्षांकडे ऑपेरा म्युझिकचं देशातलं सगळ्यात मोठं कलेक्शन आहे. आपल्या या छंदाविषयी बोलताना ते म्हणाले "लहानपणी मेच्या सुट्टीत एकदा मी चांगल्‌या रेकॉर्डस शोधत होतो. त्यावेळी मला एक रेकॉर्ड सापडलं. त्यातलं म्युझिक इतकं वेगळं होतं, पण मला त्यातली मेलडी कळली. काका परत आल्यावर मी त्यांना विचारलं, तेव्हा त्यांनी मला ऑपेरा अ‍ॅट होम हे पुस्तक दिलं. हे म्हणजे आपल्या संगीत नाटकांसारखच असतं. त्यामुळे ऑपेरा कळायला मला फारसा वेळ लागला नाही. 400 वर्षांपूर्वीची ही कला आहे. जर्मन, फ्रेंच, स्पॅनीश, रशियन, इटालीयन अशा वेगवेगळ्या भाषांमधल्या रचना इथे सापडतात. हा खूप मोठा ठेवा आहे. ऑपेराच्या रचनेत मराठी नाट्यसंगीताला बसवण्याचा मला प्रयोग करायचा आहे. किर्लोस्कर, देवल यांना ऑपेरा माहित होता. मुंबईतही ऑपेरा हाउस बांधला होतं. पण त्यात ऑपेरा झाले नाहीत. पण संगीत नाटकांसाठी ऑपेरा म्हणजे काही नवी गोष्ट नाही."गौतम राजाध्यक्षांनी कथा-पटकथा लेखनही केलं आहे. काजोलचा पहिला सिनेमा - 'बेखुदी', माधुरीचा 'अंजाम' आणि नुकताच आलेला 'सखी' यांची कथा-पटकथा त्यांनी लिहिले आहेत. याविषयी बोलताना ते म्हणाले "जावेद अख्तर एकदा म्हणाला की ज्याला कथा सांगण्याची आवड आहे, ज्याच्याकडे व्हिज्युल सेन्स आहे, कथा ऐकताना चित्र उभी करण्याची ताकद आहे, त्यानं हे काम करावं जावेदनं मला 30 वर्षांपूर्वीच याबद्दल विचारलं होतं. मी बराच वेळ घेतला, पण आता मी पटकथा लिहीत आहे. मराठी चित्रपटाचं स्क्रिप्टींग करताना खूप मजा आली. तो अनुभव आपला वाटला. तुमच्या इमॅजिनेशनला पूर्ण वाव द्यायचा असेल, तर सिनेमाला पर्याय नाही. पण मी डिरेक्शन करणार नाही. त्यासाठी लागणारं टेम्परामेन्ट माझ्याकडे नाही. फोटोग्राफीमध्ये तुम्ही कॅमेरामन असता, तुम्हीच आर्ट डायरेक्टर, कोरिओग्राफर, सबकुछ असता. पण सिनेमात लाईट्समन काहीतरी करत असतात, कॅमेरामन वेगळा असतो... एवढी स्लो प्रोसेस मला जमणार नाही. पण माझी पटकथा चांगली असेल, तर दिग्दर्शक त्यात बदल करूच शकत नाही." पटकथेकडे वळण्याविषयी ते म्हणाले "रिलायन्स एन्टरटेनमेन्ट म्हणजे बिग पिक्चर्स या क्षेत्रात येत आहे. त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या पटकथा हव्या आहेत. तर त्यांच्या पे रोलवर जे लेखक आहे, त्यांना आम्ही मार्गदर्शन करतोय. मला खूप मजा वाटते. कारण त्यांच्या नवीन कल्पना डेव्हलप करताना मजा येते आणि आमच्या कल्पनांना त्यांचा मिळणारा प्रतिसादही तितकाच चांगला असतो." आयुष्यातला शेवटचा क्षणही एन्जॉय करणं हा आपला अ‍ॅटिट्यूड असल्याचं ते म्हणाले.या मुलाखतीचा शेवट करताना निखिल वागळे म्हणाले "गौतम राजाध्यक्ष हे केवळ ग्लॅमर फोटोग्राफर नाहीत. ते काय काय करतात, यातला काही भाग या मुलाखतीतून उलगडला. पण मला खात्री आहे की भविष्यात ते अशा काही गोष्टी करणार आहेत, की पुन्हा त्यांची मुलाखत घ्यावी लागेल. "

आईबीएन लोकमत | Updated On: May 13, 2013 02:51 PM IST

ग्रेट भेटमध्ये गौतम राजाध्यक्ष

नव्या वर्षातली ही पहिलीच ग्रेट भेट. या भागात आयबीएन लोकमतचे संपादक निखिल वागळे यांनी प्रसिद्ध फोटोग्राफर गौतम राजाध्यक्ष यांची मुलाखत घेतली. गौतम राजाध्यक्ष यांना जग ओळखतं ते ग्लॅमरस फोटोग्राफर. पण त्यांची एवढीच ओळख पुरेशी नाही. ते लेखक आहेत. ते पटकथालेखक आहेत. ते उत्कृष्ट जाहिरात बनवतात. त्यांना संगीत आणि चित्रकलेत रस आहे. अशा बहुरंगी व्यक्तिमत्वाचा जीवनपट या मुलाखतीत उलगडला गेला.खरं तर गौतम राजाध्यक्ष यांना फोटोग्राफर व्हायचंच नव्हतं. "पूर्वी मनोरंजनाची एवढी साधनं नव्हती. मे महिन्याच्या सुट्टीत करायचं काय ? किती पुस्तकं वाचणार ? किती वाचणार ? मग माझ्या काकांनी मला फोटोग्राफीची गोडी लावली. पण मला व्हायचं होतं लेखक. मी जेव्हा लिंटासमध्ये काम करायचो, तेव्हा सुट्टीच्या दिवशी मी जाऊन लोकांच्या मुलाखती घ्यायचो. तेव्हा फोटोग्राफर्स मिळत नव्हते. मग मला संपादक सांगायचे तू स्वत:च फोटो घे. काहीच नसण्यापेक्षा किंवा स्टॉकमधले फोटो वापरण्यापेक्षा आम्ही ते फोटो वापरू. पण कॉपीतच काय, माझे फोटो कव्हरवरती छापले जायला लागले. मग मला कळलं की माझे लेखन काही लोकांना आवडत नाही, पण फोटो मात्र आवडतात. मग 1985 मध्ये जेव्हा मी चंदेरी सुरू केलं, तेव्हा त्यात माझे फोटोही होते आणि लेखही"आपल्या बहुरंगी व्यक्तिमत्वाचं श्रेय गौतम राजाध्यक्ष डॉ. जोगळेकरांना देतात. ते म्हणाले "डॉ. जोगळेकर म्हणजे माझ्या आत्याचे यजमान. ते माझ्या आजोबांच्या वयाचे. त्यांनी मला एखाद्या नातवासारखं वाढवलं. संगीत, चित्रकला, नृत्य, अ‍ॅस्ट्रॉलॉजी अशा वेगवेगळ्या छंदात त्यांनी मला प्रोत्साहन दिलं. पुस्तकं दिली. कॅसेट्स दिल्या." डॉ. जोगळेकर हे त्या काळातील मान्यवर विद्वान. त्यांच्या विषयी गोतम राजाध्यक्ष म्हणाले "खरं तर डॉ. जागळेकर पुण्याच्या कॉन्झरवेटीव्ह फॅमिलीतून आले. एफआरसीएस करण्यासाठी 1916 मध्ये त्यांनी एफआरसीएस केलं. पुढे तिथे खूप चांगल्या कॉलेजेसमध्ये शिकवलं. त्यांचा हा बदलता दृष्टीकोन त्यांनी मला दिला. माझ्या प्रत्येक छंदाला त्यांनी पुस्तकं दिली, मदत केली. तेव्हा रेकॉर्डस मिळत नसत. मग कोणी परदेशी गेले की ते माझ्यासाठी रेकॉर्ड्स मागवत असत. त्यांनी मला संगीत नाटकं दाखवलं. साहित्य मंदीर तेव्हा ओपन एयर थिएटर होतं. तिथे मी प्रसिद्ध संगीत नाटकं पाहिली.माझी आत्या आर्टिस्ट होती. तिनेही मला बर्‍याच गोष्टी वाचून दाखवल्या. माझे चुलत भाऊ वसंत राजाध्यक्ष यांचाही माझ्यावर खूप प्रभाव आहे. मला बीएससीमध्ये जेव्हा चांगले मार्क्स मिळाले, तेव्हा विद्यापीठीनं मला सांगितलं की एका वर्षात आम्ही तुला पीएचडीसाठी घेतो. पण माझ्या भावानं मला सांगितलं की तू एवढा क्रिएटिव आहेस, तर तू तुझं टॅलेन्ट वाया घालवू नकोस. त्यानं मला अ‍ॅड वर्ल्डकडे ढकललं. आणि तेव्हाचे जे दिग्गज होते अ‍ॅलेक पदमसी, जोसेफ डिकुन्हा त्यांच्या हाताखाली शिकून मी तयार झालो.""लिन्टासमध्ये माझ्यातला कलाकार घडला. आम्हाल अ‍ॅलेक पदमसी नेहमी सांगायचे की तुम्ह जेव्हा ऍड बघता तेव्हा हेडलाईन झाका आणि बघा पिक्चर तुम्हाला काय सांगतय. तसंच पिक्चर झाका आणि बघा तुम्हाला हेडलाईन काय सांगतेय. जर ते इंडिपेन्डटली दोन्ही गोष्टी तुमच्यापर्यंत मेसेज पोहचवू शकत असाल तर ती अ‍ॅड पूर्ण आहे. जर पिक्चरमधून मेसेज पोहचवायला तुम्हाला कॅप्शनची गरज लागली तर तुम्ही कुठेतरी चुकताय. कमी शब्दात अ‍ॅडच्या माध्यमातून मेसज कसा पोहचवायचा, हे मी शिकलो. त्याचा पुढे मला खूप फायदा झाला. पुढे असं झालं की मी फिल्म फेअर, इलेस्ट्रिटेड विकली अशा बर्‍याच मॅगझीन्ससाठी लिहीत होतो. पण फक्त शिनवार रविवार. पुढे लिन्टासमध्ये जेव्हा माझ्या प्रमोशनची वेळ आली. म्हणजे मी क्रिएटिव डायरेक्टर बनण्याच्या मार्गावर होतो, तेव्हा मी पूर्ण वेळ फोटोग्राफीकडे वळण्याचा निर्णय घेतला. पण एका धावत्या गाडीतून दुसर्‍या धावत्या गाडीत उडी मारली. म्हणून मला धक्का बसला नाही. मग अ‍ॅड, जर्नलिस्टिक, आर्टिस्टिक अशा वेगवेगळ्या फोटोग्राफीकडे वळलो."गौतम राजाध्यक्ष हे आज एवढे यशस्वी फोटोग्राफर आहेत, पण फोटोग्राफीचं अधिकृत ट्रेनिंग त्यांनी घेतलं नाहीये. त्याविषयी ते महणाले "तो काळ वेगळा होता. तेव्हा कामातून शिकायला भरपूर वेळ होता. एकदा चुकलात, तर परत संधी मिळायची. आता तुमच्या पहिल्या असाइनमेन्टमध्ये चुका झाल्या, तर परत तुम्हाला कोणी बोलवत नाही. म्हणून फोटोग्राफीच्या किमान व्याकरणाचं ट्रेनिंग घ्यायला हवं. तेव्हाही घाई होती, पण लोकांना पेशन्स भरपूर होता. आर्टिस्टवर विश्वास होता. आताही असं शिकता येईल. टेक्निक कितीही चांगलं असलं, तरी जेवढा कॅमेरा तुम्ही जास्त वापराल, तेवढं जास्त शिकता येई. पण फोटोग्राफी आम्ही पॅशनमुळे शिकलो. आम्ही फक्त फोटो काढायचो. आम्ही हा कधी विचार केला नाही की या फोटोचा उपयोग होणार आहे का ? त्यावेळेस फोटोग्राफी महाग होती. आता सगळं डिजिटलाईज झालं आहे. फोटोग्राफी स्वस्त झाली आहे. "पैशाच्या दृष्टीने फोटोग्राफी स्वस्त झालीय, पण कलेच्या दृष्टीनेही फोटोग्राफी स्वस्त झाली आहे का ? या प्रश्नाचं उत्तर देताना गौतम राजाध्यक्ष म्हणाले "1839 मध्ये डॅरनने कॅमेरा आणि फिल्म आणली. तोपर्यंत पेन्टिंग येणार्‍यांनाच आर्टिस्ट होण्याची संधी होती. पण कॅमेरा आल्यापासून कॅमेरातून चित्र टिपून लोक आर्टिस्ट झाले. आताही पार्टी, लग्न, मुंज या गोष्टींचे फोटो कोणीही काढू शकतो. हा खूप मोठा फायदा आहे. आणि आता या गोष्टीची दुसरी बाजू बघितली तर आता फोटोग्राफरकडून एवढीच अपेक्षा असते की तू आम्हाला एक चांगलं पिक्चर दे. पुढे ऑपरेटर्स कॉम्पवर बसतात आणि फोटोवर संस्कार सुरू होतात. रंग बदल, लाईट्स, कलर वाटेल ते बदलतात. तंत्रज्ञानाच्या अतिवापरामुळे फोटोग्राफरचं महत्त्व कमी झालंय आणि त्यामुळेच फोटोग्राफर्सही पहिल्याइतकं फोटोंमध्ये मन घालत नाहीत. "गौतम राजाध्यक्षांबद्दल असं म्हटलं जातं की त्यांनी फोटोत भावना आणल्या. हात आणि केस यांचा इतका सुंदर वापर गौतम राजाध्यक्षांइतका चांगला कोणीच केला नाही. त्याविषयी बोलताना ते म्हणाले "हात आणि केस हे मला अतिशय आवडतात. शोभा राजाध्यक्ष मला कायम म्हणायच्या की तुझ्या सगळ्या फोटोत हात आपले केसात असतात. त्यांच्या डोक्यात काय उवा आहेत का ? मी फक्त एवढच म्हणायचो की पण ते बरं दिसतय की नाही...! मला असं वाटतं की माझी फोटोग्राफी हे माझ्या लेखनाचं एक्स्टेन्शन आहे. जेव्हा तुम्ही मुलाखत घेता, तेव्हा त्या मुलाखतीच्या सुरांना जुळणारे फोटो घ्यावेत. ग्लॅमर फोटोग्राफी म्हणजे फोटतनं फक्त सौंदर्य दाखवायचं असेल तर कलर्स, बॅकग्राउंड, कपड्यांचं टेक्स्चर एवढंच फक्त बघायचं. पण जेव्हा तुम्ही एखाद्या लेखासाठी फोटो घेता, तेव्हा त्या व्यक्तीचे विचार, स्वभाव, मन दिसलं पाहिजे. दोन फोटोंमध्ये जरी हे मिळालं तर तुम्ही म्हणू शकता मी चांगला फोटो काढलाय. आयुष्यात मला असं एक दोन व्यक्तींना फोटोत तसं काढता आलं नाही. उदाहरणार्थ वैजयंतीमाला. एक तर तेव्हा मी नवीन होतो आणि ती खूप इम्पेशन्ट होती." फोटोजमधल्या स्वाभाविकतेला गौतमजींनी कायमच प्राधान्य दिलंय. त्याविषयी बोलताना ते म्हणाले "मी नेहमी मॉडेलशी संवाद साधायचा प्रयत्न करतो. तुम्ही मॉडलला ळखत असलं पाहिजे, जर आवडत नसेल, तर फोटोग्राफी करू नका. तुम्ही मॉडेलला स्टुडिओमध्ये बोलावता, लाईट्स लावता आणि त्याला सांगता नॅचरल हस. हे कसं शक्य आहे ? मग त्याला खुलवणं हे फोटोग्राफरचं कौशल्य आहे. एखाद्या गायकाला खुलवणं सगळ्यात सोपं आहे. त्याला एखादा राग गायला सांगायचा आणि फोटो काढायचे. अर्थात हे वाटतं तेवढं सोपं नाही. आजही अमिताभला बोलतं करणं सोपं नाही. मग मी त्याला सांगितलं की अरे एखादा फोटो नाही चांगला आला, तर आपण नको वापरुयात तो. मग मी त्याला विचारलं व्हू शूट्स यू बेस्ट ? मग तो म्हणाला की ऑल द व्हिलन्स इन फिल्म इंडस्ट्री. या जोकवर तो स्वत:च हसला आणि मी फोटो घेतले. चांगल्या अ‍ॅक्टर्सला फोटो काढून घेणं नेहमीच अवघड असतं. मग मी त्यांना कॅरेक्टर देतो. म्हणजे अमिताभला सांग की तू मोहब्बतेमधला प्रोफेसर आहे. आमीरला सांगायचं की तो रंगीलामधला राजा आहे. मग ते चांगला रिस्पॉन्स देतात. आमीर मला नेहमी विचारतो की माझं मोटिवेशन काय ? मी सांगतो अरे दर वेळेस मोटिवेशन लागत नाही. मग आम्ही गप्पा मारायला सुरुवात करतो आणि मग नॅचरल फोटो येत गेले"

गौतम राजाध्यक्षांना फोटोग्राफीकडे ढकलण्यात शबाना आझमींचा मोठा वाटा आहे. त्याविषयी बोलताना ते म्हणाले "शबाना आणि मी एकाच कॉलेजमधले. आमची मैत्री होतीच. मग एकदा मी तिला विचारलं की मी तुझे फोटो काढू का ? ती हो म्हणाली. मग मी काढलेले फोटो तिला फार आवडले. मग तिनं मला यात ढकललं. मग पृथ्वीच्या आसपासचे सगळे अनिल कपूर, मजहर खान अशा सगळ्यांना माझ्याकडे पाठवून दिलं. तिच्यावर जे लेख असायचे स्टारडस्टमध्ये वगैरे, त्यावेळेस ती सांगायची की फोटो गौतमच काढणार. मी म्हणायचो की माझ्याकडे एवढा वेळ नाही आणि तेवढी माझी तयारीही. ती म्हणायची आपण शनिवार रविवार वापरू. चुकलं तर पुढचा शनिवार रविवार. पण तू हे सिरीयस्ली घ्यायला हवंस."अमिताभ दिलीपकुमारपासून काजोलपर्यंत सगळ्याच जनरेशनची माणसं गौतम राजाध्यक्षांच्या कॅमेरासमोर खुलले. त्याविषयी बोलताना ते म्हणाले "काजोलला कोणतीच शिस्त आवडत नाही. फोटो तर अजिबातच नाही. तिला मी तर आमचं लहान भूत म्हणतो. काम आहे ना, मग ते उरकून टाकू. फक्त फिल्म प्रमोशनच्या वेळेस ती जरा शांत असते, पण ते ही लवकर करावं लागतं. नाहीतर मग ती लगेच डाउन होते. दक्षिणेतले कलाकार या बाबतीत खूप पेशंट असतात. त्यांच्यासाठी वर्क इज वर्कशिप" पण या सगळ्यांमध्ये गौतम राजाध्यक्षांची फेवरेट मॉडेल म्हणजे माधुरी. तिच्याविषयी बोलताना ते म्हणाले "एखाद्या फोटोग्राफरसाठी माधुरी म्हणजे परफेक्ट मॉडेल आहे. कामासाठी आणि स्वभावानं सगळ्यात गोड म्हणजे माधुरी. तिला फक्त सांगायचं की मला काय हवं. एकदा मी तिच्यासाठी मार्लीन मॉनरोचा विग आणला होता. मी माधुरीला सांगितलं मॉनरो म्हणजे स्वीटनेस विथ सेक्सीनेस. आणि पाच सेकंदता शी वॉज मॉनरो. ते फोटो जेव्हा मी लंडनला प्रिन्टसाठी घेऊन गेलो, तेव्हा तिथे ते मॉनरोवर टीव्ही सीरियल बनवत होते. त्यांनी 170 मुलींची ऑडिशन घेतली होती. पण ते फोटो बघून ते म्हणाले की ही मुलगी काम करेल का ? मी म्हटलं ही आमची टॉपची अ‍ॅक्ट्रेस आहे. ती टीव्ही सीरियलमध्ये काय करणार ? माधुरीला नुसती कल्पना दिली की ती तशी बदलायची. तिला नुसती साडी दिली की ती भारतीय. वेस्टर्न आउटफीट्स दिले की ती बदलली. आता तिचं लग्न झालंय. दोन मुली आहेत तिला. पण तशी मुलगी मला आजपर्यंत भेटलेली नाही."आत्ताचे कलाकार गौतम राजाध्यक्षांना पहिल्याइतके आवडत नाहीत. त्याविषयी ते म्हणाले "आजच्या अ‍ॅक्टर्सना अ‍ॅक्टर्स म्हणायची सुद्धा मला भीती वाटते. मी त्यांना परफॉर्मर्स म्हणेन. आधीचे कलाकार काहीतरी बनायला यायचे. त्यांना दिलीप कुमार किंवा अमिताभ व्हाययचं होतं. ते वाचायचे, फिल्म्स बघायचे. पण आता लोक इथे फक्त पैशांसाठी येतात. त्यांना गल्‌ॅमर पाहिजेल. पण त्यांना माहितीय की हे ग्लॅमर त्यांना खूप कमी वेळ मिळणारे. मग अ‍ॅड्स, एन्डॉर्समेन्ट... मेक मनी व्हाईल सन शाइन्स, हे त्यांचं सूत्र झालंय."मंगेशकर कुटुंबीयांशी गौतम राजाध्यक्षांचे संबंध अतिशय जिव्हाळ्याचे आहेत. त्याविषयी बोलताना ते म्हणाले "कुठे ना कुठेतरी आमचे सूर जुळलेत. मी त्यांच्यासमोर गातो. लोक तोंड सुद्धा उघडत नाहीत. मी त्यांना घाबरत नाही, त्यामुळे ते पण जास्त फ्री असतात. पुढच्या पिढीशी म्हणजे आशाताईंची मुलं, मीनाताईंची मुलं किंवा बाळासाहेबांची मलं, माझ्याबरोबर खूप फ्रेन्डली आहेत. त्यामुळे हे बंध आणखी घट्ट झाले असावेत."गौतम राजाध्यक्षांनी फिल्म इंडस्ट्रीच्या बाहेरील अनेक व्यक्तिमत्वांचे सुंदर फोटो काढलेत. धिरुभाई अंबानी, जे. आर. डी टाटा, इस्मत चुगताई, एम. एफ. हुसेन अशी अनेक माणसं त्यांना आपल्या कॅमेरात कैद केली. त्याविषयी बोलताना ते म्हणाले "त्या सगळ्यांमध्ये मला इंटरेस्ट होता. जेआरडी टाटांनी 130-1940 मध्ये जे केलं, त्यामुळे इंडस्ट्रीला नवी दिशा मिळाली. आणि त्याहीपलीकडे, माणूस म्हणूनही ते ग्रेट होते. वाईन, म्युझिक अशा वेगवेगळ्या गोष्टींवर ते बोलायचे. धिरुभाई अंबानी पण तसेच. एकदा मी फोटो घेत असताना त्यांचा नातू तिथे आला. तो म्हणाला की पप्पा आय कान्ट डू इट. यावर ते म्हणाले की हा शब्द मला परत ऐकायचा नाही. तूही हा शब्द तुझ्या डिक्शनरीतून काढून टाक. प्रसिद्ध फोटोग्राफर जहांगीर गझर मला एकदा म्हणाले होते की पोर्ट्रेचर करणं अवघड असतं. कारण ते फोटो तुमच्या सबजेक्टला आवडले पाहिजेत. प्रत्येकामध्ये एक व्हॅनिटी असते, अहंकार असतो. ते सॅटिसफाय करता आलं पाहिजे. त्यांच्यातली विद्वत्ता, गुण बाहेर काढलेच पाहिजेत, त्याच वेळी त्यांना सुंदरही केलं पाहिजे. जे. आर. डी टाटांना मी पहिल्यांदा शूट केलं, तेव्हा सॉफ्ट फोकस वापरला. तोंडावर खूप सुरकुत्या असल्यानं त्यांनी पहिल्या फोटोग्राफरचं काम रिजेक्ट केलं होतं. आणि मला जरा काळजी होतीच, कारण तेव्हा फोटोशॉप वगैरे काही नव्हतं. सॉफ्ट फोकस लेन्स वापरल्याने त्यांच्या चेहर्‍यावर तेजी आली आणि सुरकुत्या कमी झाल्या. प्रत्येक वेळेला तुम्ही शूट करता तेव्हा नवीन गोष्टी इन्व्हेंट करता. त्या माणसाचा चेहरा कसा आहे, त्याला काय सूट होईल आणि ते खुलवण्यासाठी काय करायला हवं, हे जमायला हवं "गौतम राजाध्यक्षांविषयी असं बोललं जातं की माणूस कितीही वाईट दिसत असला किंवा मनाने वाईट असला तरी तो राजाध्यक्षांच्या फोटोमध्ये चांगलेच दिसतात. त्याविषयी बोलताना गौतम राजाध्यक्ष म्हणाले की "माझा माणसातल्या चांगुलपणावर पूर्ण विश्वास आहे. मी इतका चिकित्सक माणूस आहे की तो चांगुलपणा मी शोधून काढतो. आणि त्यात वाईट काय आहे ? प्रत्येक माणसाला कधी ना कधी असं वाटतच की चांगलं दिसावं. माझं काम मी करतोय. त्यावर कोणाला टीका करायची असेल, तर करू देत."गौतमजींनी आजपर्यंत राजकारण्यांचे फोटो काढलेले नाहीत. याविषयी बोलताना ते म्हणाले "मी त्यांच्याशी काय बोलू ? म्हणजे आज ते एक बोलतात, उद्या वेगळं. आज ते एका पक्षात आहेत, उद्या दुसर्‍या पक्षात. मग त्यांच्यातलं मी काय दाखवू ? ते आत्ता बोलले ते खरं का पक्ष आणि धोरणं बदलली की बोलतील ते खरं ? राजीव गांधी, व्ही. पी. सिंग आणि चंद्रशेखर यांनी ते पंतप्रधान असताना मला फोटो काढण्यासाठी बोलावलं होतं. पण मी ते रिजेक्ट केलं कारण, ते जेमतेम अर्धा पाउण तास वेळ देणार. मग त्यांचा असा फोटो काढा वगैरे, मला जमणार नाही. मी त्या टाईपचा फोटोग्राफर नाही. आणि मला कुठे ना कुठे वाटतं की हे राजकारणी आपल्यासाठी काही करत नाहीत. वर त्यांचे फोटो काढले की लोक म्हणणार अच्छा तुम्ही या पार्टीच्या जवळचे वगैरे वगैरे... सत्तेपुढे लोक डोकं झुकवतात, पण मला त्याचा मोह नाही. मी माझ्या तत्वांशी ठाम आहे. मी राधाकृष्णनना शूट केलं असतं. नेहरूंना केलं असतं. ते विद्वान होते. लेखक, तत्वज्ञ होते. मग गोष्ट वेगळी आहे. आता तर राजकारणात डिसेन्ट माणसंही सापडत नाहीत. "गौतम राजाध्यक्षांवर कोणाचा प्रभाव आहे ? या प्रश्नाचं उत्तर देताना ते म्हणाले "भरपूर चित्रकारांचा प्रभाव आहे. लहानपणापासून मॅगझीनमध्ये फोट बघताना मी विचार करत असे. हा कसा काढला असेल... काय विचार केला असेल वगैरे वगैरे. पण माझ्या मते माझे दोन आदर्श म्हणजे ब्रेसाँ आणि रिचर्ड अ‍ॅविडॉन. ब्रेसाँ हा माझ्या मते गेल्या शतकातला सर्वोत्कृष्ट फोटोजर्नलिस्ट होता. अ‍ॅविडॉनचं काम मला खूप जवळून पहाता आलं. मी माझ्या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी लंडनला होतो, तेव्हा सकाळी माझे प्रिन्ट्स व्हायचे आणि रात्री रिचर्ड अ‍ॅविडॉनचे रोल्स पॅरासहून यायचे, ते मी बघायचो. पॅरीस त्याने किती तरी वेळा शूट केलं, पण प्रत्येक वेळेस काहीतरी नवीन सापडतं. "गौतम राजाध्यक्षांकडे ऑपेरा म्युझिकचं देशातलं सगळ्यात मोठं कलेक्शन आहे. आपल्या या छंदाविषयी बोलताना ते म्हणाले "लहानपणी मेच्या सुट्टीत एकदा मी चांगल्‌या रेकॉर्डस शोधत होतो. त्यावेळी मला एक रेकॉर्ड सापडलं. त्यातलं म्युझिक इतकं वेगळं होतं, पण मला त्यातली मेलडी कळली. काका परत आल्यावर मी त्यांना विचारलं, तेव्हा त्यांनी मला ऑपेरा अ‍ॅट होम हे पुस्तक दिलं. हे म्हणजे आपल्या संगीत नाटकांसारखच असतं. त्यामुळे ऑपेरा कळायला मला फारसा वेळ लागला नाही. 400 वर्षांपूर्वीची ही कला आहे. जर्मन, फ्रेंच, स्पॅनीश, रशियन, इटालीयन अशा वेगवेगळ्या भाषांमधल्या रचना इथे सापडतात. हा खूप मोठा ठेवा आहे. ऑपेराच्या रचनेत मराठी नाट्यसंगीताला बसवण्याचा मला प्रयोग करायचा आहे. किर्लोस्कर, देवल यांना ऑपेरा माहित होता. मुंबईतही ऑपेरा हाउस बांधला होतं. पण त्यात ऑपेरा झाले नाहीत. पण संगीत नाटकांसाठी ऑपेरा म्हणजे काही नवी गोष्ट नाही."गौतम राजाध्यक्षांनी कथा-पटकथा लेखनही केलं आहे. काजोलचा पहिला सिनेमा - 'बेखुदी', माधुरीचा 'अंजाम' आणि नुकताच आलेला 'सखी' यांची कथा-पटकथा त्यांनी लिहिले आहेत. याविषयी बोलताना ते म्हणाले "जावेद अख्तर एकदा म्हणाला की ज्याला कथा सांगण्याची आवड आहे, ज्याच्याकडे व्हिज्युल सेन्स आहे, कथा ऐकताना चित्र उभी करण्याची ताकद आहे, त्यानं हे काम करावं जावेदनं मला 30 वर्षांपूर्वीच याबद्दल विचारलं होतं. मी बराच वेळ घेतला, पण आता मी पटकथा लिहीत आहे. मराठी चित्रपटाचं स्क्रिप्टींग करताना खूप मजा आली. तो अनुभव आपला वाटला. तुमच्या इमॅजिनेशनला पूर्ण वाव द्यायचा असेल, तर सिनेमाला पर्याय नाही. पण मी डिरेक्शन करणार नाही. त्यासाठी लागणारं टेम्परामेन्ट माझ्याकडे नाही. फोटोग्राफीमध्ये तुम्ही कॅमेरामन असता, तुम्हीच आर्ट डायरेक्टर, कोरिओग्राफर, सबकुछ असता. पण सिनेमात लाईट्समन काहीतरी करत असतात, कॅमेरामन वेगळा असतो... एवढी स्लो प्रोसेस मला जमणार नाही. पण माझी पटकथा चांगली असेल, तर दिग्दर्शक त्यात बदल करूच शकत नाही." पटकथेकडे वळण्याविषयी ते म्हणाले "रिलायन्स एन्टरटेनमेन्ट म्हणजे बिग पिक्चर्स या क्षेत्रात येत आहे. त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या पटकथा हव्या आहेत. तर त्यांच्या पे रोलवर जे लेखक आहे, त्यांना आम्ही मार्गदर्शन करतोय. मला खूप मजा वाटते. कारण त्यांच्या नवीन कल्पना डेव्हलप करताना मजा येते आणि आमच्या कल्पनांना त्यांचा मिळणारा प्रतिसादही तितकाच चांगला असतो."

आयुष्यातला शेवटचा क्षणही एन्जॉय करणं हा आपला अ‍ॅटिट्यूड असल्याचं ते म्हणाले.या मुलाखतीचा शेवट करताना निखिल वागळे म्हणाले "गौतम राजाध्यक्ष हे केवळ ग्लॅमर फोटोग्राफर नाहीत. ते काय काय करतात, यातला काही भाग या मुलाखतीतून उलगडला. पण मला खात्री आहे की भविष्यात ते अशा काही गोष्टी करणार आहेत, की पुन्हा त्यांची मुलाखत घ्यावी लागेल. "

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 13, 2011 11:04 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close