S M L

बालकांचं आरोग्य (भाग - 2 )

आपलं मूल शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम असावं अशी प्रत्येक पालकाची इच्छा असते. पण त्यांना रोजच्या धावपळीच्या काळात मुलांकडे हवं तसं लक्ष देणं कठीण होऊन बसतं. काय केलं म्हणजे लहान बालकांचं आरोग्य सुधारेल यावर मार्गदर्शन करण्यास बालरोगतज्ज्ञ डॉ. संदीप केळकर आले होते. लहान मूल कधीच आपल्याशी नीट बोलू शकत नाहीत. तेव्हा रडणं हीच त्यांची भाषा असते. मूल आजारी पडलं आहे, हे समजण्याची काही लक्षणं आहेत. सतत रडणं आणि कारण न समजणं, बाळ जर अंगावरचं दूध पीत असेल आणि नेहमीप्रमाणे ते व्यवस्थित घेत नसेल, बाहेरचं दूध पिणा-या बाळानं उलटी करणं, बाळानं व्यवस्थित आणि पुरेशी लघवी न करणं , बाळाचं मलूल पडणं... ही लक्षणं दिसून आलीत तर आपलं बाळ आजारी पडलेलं किंवा आपल्या बाळाला काही तरी त्रास आहे, हे पालकांनी ओळखून त्याला चांगल्या बालरोगतज्ज्ञांकडे घेऊन जावं. या बाळाचं आजरपण ओळखण्याच्या पाय-या डॉ. संदीप केळकर यांनी सांगितल्या. " लहान बाळांची रोगप्रतिकारक शक्ती ही कमी असते. ऋतू बदलला की मुलं आजारी पडतात. मुलांमधली हा त्रास कमी करण्याकरता डॉक्टर सांगतात, " पहिल्या 4 वर्षांतल्या मुलांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असते. मुलांना जेव्हा जंतूसंसर्ग होतात तेव्हा त्यांची प्रतिकारशक्ती हळुहळु वाढायला सुरुवात होते. तुम्ही जर लहान मुलांचं बारकाईनं निरीक्षण केल्यास एक गोष्ट लक्षात येईल की, जसजसं मूल वाढत जातं, तसतशी मुलामधली रोगप्रतिकारक शक्ती वाढत जाते. कारण मुलांना प्रतिजैविकं दिली जातात. यांच्यामुळे लहानमुलांमधली प्रतिकार शक्ती वाढायला मदत होते. 4 ते 5 वर्षांनंतर मुलांचं आजारी पडणं कमी होतं. जर बाळ सर्दी-पडश्यानं आजारी असेल तर पालकांनी जास्त गंभीर घेऊ नये. पण जर बाळाला जास्तच सर्दी आणि पडशाचा त्रास होत असेल, सर्दी झाल्यावर दम लागत असेल, बाळ सर्दीनं खोकून खोकून निळं पडत असेल तर डॉक्टरांकडून बाळावर उपचार करावेत. फक्त प्रतिजैविकं घेऊन लहान मुलांमधली प्रतिकार शक्ती वाढत नाही, तर त्यासाठी विशेष प्रकारचा आहार बाळाला दिला गेला पाहिजे. त्याविषयी मार्गदर्शन करताना डॉक्टर म्हणाले, " बाळामधली प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी अगदी लहानपणापासून प्रयत्न केले गेले पाहिजेत. सुरुवातीचे 6 महिने बाळाला स्तनपान केलं गेलं पाहिजे. स्तनपानाशिवाय बाळाला काहीच द्यायचं नाही. कारण आईच्या दुधात चांगल्या दर्जाची प्रतिजैविकं असतात. सहा महिन्यांतर बाळाला पोषक आहार द्यायला सुरुवात करावी. मुगाची खिचडी, जुन्या अथवा उकड्या तांदुळाची पेजेपासून सुरुवात करावी. लहान मुलांची सर्वात मोठी समस्या म्हणजे सर्दी. त्यांच्या सर्दीची कारणं वेगवेगळी असतात. लहान मुलांना धुळीपासून, प्राण्यांशी संपर्क आल्यानं, हवामानात बदल झाल्यानं सर्दी होते. अशा वेळी वेळीच औषधोपचार करावेत. बाळाला दात येताना त्याच्या तोंडातून लाळ गळते. त्या वेळी बाळाच्या हिरड्यांना मसाज करणं अतिशय महत्त्वाचं आहे. हिरड्यांना मसाज करण्यासाठी बाजारात निरनिराळी मलम मिळतात. त्यानं मसाज करावा. त्याने हिरड्या चांगल्या मजबूत होतात आणि येणा-या दातांचं आरोग्यही चांगलं होतं.बालरोगतज्ज्ञ डॉ. संदीप केळकर यांच्या मार्गदर्शनासाठी व्हिडिओवर क्लिक करा.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 6, 2009 12:17 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 6, 2009 12:17 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close