S M L

रेशन व्यवस्था - भाग 3

टॉक टाईमचा आजचा विषय होता रेशन व्यवस्था. सगळ्यात महत्त्वाचं मानलं जाणार्‍या रेशनिंग कार्डचं महत्त्व तसं फार कमी जणांना माहिती आहे. बर्‍याच ठिकाणी रेशन कार्ड हे महत्त्वाचं ठरतं. पण वास्तव्याचा पुरावा, याहीपेक्षा त्याचं महत्त्व बरंच आहे. त्याविषयी माहिती देण्यासाठी रेशनिंग समितीचे समन्वयक सुरेश सावंत यांना टॉक टाईममध्ये आमंत्रित करण्यात आलं होतं. या संबंधातील महत्त्वपूर्ण माहिती त्यांनी दिली तसंच यासंदर्भातल्या दर्शकांच्या प्रश्नांची उत्तरं दिली. रेशन कार्ड हे वास्तव्याचा पुरावा म्हणून वापरला जातो. त्यासाठी बर्‍याच लोकांनी रेशनची गरज नसतानाही ते रेशन कार्ड घेतात. त्यामुळे गरीब जनता, ज्यांना रेशनवरील धान्याची खर्‍या अर्थानं गरज असते, त्यांना मग रेशन कार्ड मिळत नाही. त्यामळेच वास्तव्याचा पुरावा म्हणून रेशन कार्ड वापरला जाऊ नये यासाठी आम्ही पाठपुरावा केला. त्याबदली नागरिकांना ओळखपत्र दिली जावीत, अशी मागणी आम्ही केली आहे असं सुरेश सावंत यांनी सांगितलं. रेशन कार्ड कसं मिळवावं, त्याचे हक्क, अधिकार, अडचणी यासंबंधी सुरेश सावंत यांनी दर्शकांना केलेलं मार्गदर्शन ऐकण्यासाठी सोबतच्या व्हिडिओवर क्लिक करा.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 7, 2009 03:55 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 7, 2009 03:55 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close